Skip to main content

ही कविता हवी आहे. मिळेल का?

लेखक सालोमालो यांनी सोमवार, 16/02/2009 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मला ह्या चार ओळी मिळाल्या आहेत. पूर्ण कविता कोणाकडे आहे का? कवितेच्या ठेवणीवरून 'ग्रेस' यांची असावी असं वाटतयं. जरा दूर जाती चरायास गाई, पुढे रान नाही हवे तेवढे तुझ्या स्वप्नबांधावरी सांग आई, कुणी फोडले जोगिणींचे चुडे? सालो
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2143
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

''जरा दूर जाती चरायास गाई, पुढे रान नाही हवे तेवढे'' चा दुवा आमचे स्नेही धोंडोपंताच्या ब्लॉगवर घेऊन जातो. ब्लॉगवर धोंडोपंत उवाच म्हणून ज्या काही ओळी दिसतात. त्याच जर आपणास हव्या असलेल्या कवितेच्या ओळी असतील तर त्यांना विचारुन सांगतो...कविता कोणाची आहे ती. -दिलीप बिरुटे (मिपावर धोंडोपंताची आठवण करणारा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यांच्या ब्लॉगवर उजवीकडे छायचित्रे आहेत. त्यात खाली गायींच्या चित्राला या ओळी दिल्या आहेत. ही कविता मिळाली तर येथे लिहा..कविता वाचायला आवडेल. -- लिखाळ.

ही कविता कवी ग्रेस यांची असावी , शीर्षक "चुडे". "चंद्रमाधवीचे प्रदेश" या संग्रहात बहुदा मिळावी.

In reply to by मुक्तसुनीत

हेच म्हणतो... पण संग्रहाचं नाव नाही आठवत मला ही ! *********************** वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ... भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा