Skip to main content
लेखक श्वेता व्यास यांनी सोमवार, 30/01/2017 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
aa

तू गेल्यावर रोज येते मी ठरलेल्या ठिकाणी. आपल्यातली अंतरं विसरून जाते! समोर दिसतं ते सगळंच भव्य! अथांग समुद्र, नजरेत न सामावणारं क्षितिज, अस्ताला जाऊनही अफाट रक्तिमा पसरवणारा सूर्य, बेभान सुटणारा वारा! या सगळ्यापुढे आपण कोण य:किंश्चित प्राणी? पण तुझ्यात सगळं झुगारण्याची हिंमत नाही, कळून चुकलंय मला! रोज पाहते तू गेल्यावर मागे उरलेल्या पाऊलखुणा. बराच प्रयत्न करते मी माझी पावलं त्यात बसवून चालण्याचा! पण दोन पावलातलं अंतर तुझ्यापेक्षा कमीच पडतं, आणि माझे पुन्हा प्रयत्न सुरु होतात तुझ्याशी समाजमान्य बरोबरी करण्याचे! आज का आला नाहीस? काळजी? हुरहूर? नक्की काय? काहीच क्षण.... आणि छान वाटतंय आज कितीतरी युगांनी वाळूत तुझी पावलं येताना पाहताना!

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2426
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

शशक हा प्रकार  मिपावर येवून कळाला. खुपच आवडला. शब्दांचा फापटपसारा नाही,जडव्यागळ शब्दांनी वातावरण निर्मीती नाही. उपसंहार, प्रस्तावना ,व्याकरण,अलंकार असले पारंपारिक संस्कार नाही. मनात विचार  सोडून जाते,कधी तात्पुरते कधी कायमचे.

 

थेट मुद्याला घालते आणी हृदयाला हात भिडते.

 

आवडली हे वेगळे