✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ईश्वराचा शोधं

भ
भृशुंडी यांनी
Mon, 01/30/2017 - 22:17  ·  लेख
लेख
a "आम्हाला ईश्वराचं सत्यस्वरूप शोधायचेय" एका शिष्याने नम्रतेने प्रस्तावना केली. "ह्म्म्म."- घोसातले एक द्राक्ष गुरूदेवमुखी विलीन झाले. "आपले मार्गदर्शन-" काही क्षण विमर्शात लोप पावले. "हे काय आहे?", एका ललनेचे अनावृतावस्थेतले उन्मादक चित्र पुढे ठेवून गुरूदेवांनी विचारणा केली. "काम", पट्टशिष्याचा उत्स्फूर्त सूर आला. "पाप", दुसर्‍या शिष्याने डोळे मिटले. "मोह", तिसर्‍याने नेत्र विस्फारले. "ज्ञान", पुटपुटत चौथ्याने काही मापे टिपून घेतली. "सौंदर्य" पाचवा चित्राकडे सरकला. "पत्ता?" म्हणून सहाव्याने वहीपेन्सिल पुढे ओढली. "स्त्रीचा अपमान!" सातवा खवळून ओरडला. "मोक्षsss" आठव्याची 'हस्तसाधना' भंग पावली. "एका चित्रातले सत्य तुम्हाला उमगेना, आणि ईश्वराचे सत्यस्वरूप शोधताय भोसडीच्यांनो?" म्हणत गुरूदेवांनी पुढले द्राक्ष तोंडात टाकले आणि ते चित्राकडे टक लावून पहात राहिले!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
4908 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

एको सत्

गामा पैलवान
Tue, 01/31/2017 - 00:35 नवीन
एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति. हेही त्या गुरूमहाराजांस विदित नाही! :-( -गा.पै.
  • Log in or register to post comments

ही जुन्या काळातली कथा असल्यास

अॅस्ट्रोनाट विनय
Tue, 01/31/2017 - 10:07 नवीन
ही जुन्या काळातली कथा असल्यास वही आणि पेंसिल कुठून आले? गुरुजींच्या तोंडी शिव्या शोभत नाहीत
  • Log in or register to post comments

__/\__

जव्हेरगंज
Tue, 01/31/2017 - 11:11 नवीन
__/\__ येक नंबर!! मजा आ गया!!!! Image removed.
  • Log in or register to post comments

त्यावेळी

बापू नारू
Tue, 01/31/2017 - 12:55 नवीन
त्यावेळी पण असली चित्र मिळायची काय?
  • Log in or register to post comments

उंचावरून खाली

तिमा
Tue, 01/31/2017 - 14:23 नवीन
गुरुजींच्या शेवटच्या वाक्याने , कथा एका उंचीवरुन खाली आपटली.
  • Log in or register to post comments

हाहाहा.. मला आवडली..

पुंबा
Tue, 01/31/2017 - 14:46 नवीन
हाहाहा.. मला आवडली..
  • Log in or register to post comments

मस्त हो!!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 02/01/2017 - 07:32 नवीन
पण शेवटलं वाक्य एडिट केलं ते लैच मस्त!!
  • Log in or register to post comments

आवड्ली, थोड्क्यात गम्मत :)

पियुशा
Wed, 02/01/2017 - 11:34 नवीन
आवड्ली, थोड्क्यात गम्मत :)
  • Log in or register to post comments

मस्तं!

अनुप ढेरे
गुरुवार, 02/02/2017 - 11:37 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments

आवडली

निओ
गुरुवार, 02/02/2017 - 13:14 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

कथा आवडली

विअर्ड विक्स
Wed, 02/08/2017 - 01:19 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा