मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन
लेखनप्रकार
माझ्यासाठी ५.०० एएम म्हणजे लेट नाईट असते बर्याचदा पण अर्ली मॉर्निंग कधीच नाही. तरीही ह्या पंचपंचऊ:षकाले अॅक्टीव्हाला किका मारुन वैतागलोय. बटनस्टार्ट तर होतच नाहीये, किक अॅणि स्टॅन्डमधला फरकही कळत नाही. स्वतःची नेहमीची बाईक देऊन मागून घेतलीय मित्राची अॅक्टीव्हा. कारणही तसेच. धंदा हो. दुसरे काय. इन्सर्शन्स टाकायचेत एक लाखभर.
.........................
इन्सर्शन्स म्हणजे आपले पॅम्पलेटस हो. फ्लायरपण म्हणतात बरेच क्लायंट. ते नसतात का शन्वार रविवारच्या पेपरच्या पानात. पेपरची घडी उलगडताना सुळ्ळकन सांडतात. एकदा बघितले की पुड्या बांधायला, विमान करायला नाहीतर काचा पुसायला उपयोगी येतात ते. तेच इन्सर्शन्स. न्युजपेपरात इनसर्ट करुन पाठवतात म्हणून इन्सर्शन्स. मार्केटिंग कॅम्पेनवाले सेमिनार, इंडक्शने, वर्कशॉप, एक्झिबिटस, जायंट डिस्प्लेज, शोज आदी नखरे करुन दमले आणि तरीही धंदा होत नसेल तर केले जातात ते पॅम्पलेटस. लहानसहान स्नॅक्स सेंटरापासून आक्खा मेनू होमडिलीव्हरी नंबरासहीत छापणार्या हॉटेलाचे लाडके अॅडव्हर्टाझिंग हत्यार म्हणजे पॅम्पलेट्स. वजने कमीजास्त करुन देणार्या डॉक्टरापासून ते एमएससीआयटी वाटणार्या सेंटरांचे आवडते माध्यम म्हणजे पॅम्पलेटस. एवढे करुन नोकरी लागत नसल्यास एलायसी एमएलएम नायतर न्युट्रापतंजलीहर्बल्स असे कायतरी पॅम्प्लेटसाठी असतेच.
.........................
तर अशाच एका मल्टीन्याशनल कंपनीचे आम्ही लाडके व्हेंडर. लाडके म्हणजे दहा वेळा आमचे तोंड पाहण्यासाठी आमची बिले सगळ्यात उशीरा दिली जातात. त्यांचे क्रियेटिव्ह डिझाईन येते मुंबईवरुन. अर्थातच ते आम्ही न वापरत असलेल्या फॉर्म्याटात असते. साईजही इथे उपलब्ध असलेली कधीच नसते. इथली ऑफिस हेड ते पाहूनच वैतागलेली असते. कारण सोलापूरकरांना आधीची हुच्च डिझाईन न झेपल्याने धंदा थांबलेला असतो. तिला लोकल भाषेत पाहिजेत जाहीराती. आम्ही त्या बनवतो कशाबशा. त्या अॅप्रुव्ह होऊन ऑर्डर दिली जाते. कोटेशन्समधले रेट मॅडमना समजत नसतात. सोळा हजार पॅम्प्लेटसना ८७०० रुपये म्हणजे "अरे हे दोन रुपयाच्या आसपास जातेय रे" म्हणणारी ही बाई. शेवटी लाखभराची ऑर्डर झाली की घाई होते. उद्या संडेला रीडर्स जास्त असतील, मग उद्याच्या पेपरला येऊ दे असे शनवारी दुपारी सांगितले जाते. डिझाईन सेट करुन प्लेटा मारुन मशीनीवर चढायला संध्याकाळ. प्रिंट होऊन कटिंग व्हायला रात्री १२ वाजतात.
.........................
हे पॅम्पलेट्सचे रेट साईज, पेपर आणि प्रिंटिंग वर अवलंबून असतात. सगळ्यात हलका कागद तो ६० जीएसएम चा जाहीरात कागद. हा वेस्टकोस्टचा असतो पण जाहीरात कागद म्हणूनच ओळखतात. गुलाबी, पिवळा, निळा, हिरवा अशा फिक्क्या रंगात मिळतो. त्यावर एकरंगी छपाई केली जाते. हा सगळ्यात स्वस्त प्रकार. मग मॅपलिथो. ह्यावर चाररंगी/बहुरंगी छपाई केली जाते. नंतर आर्टपेपर. हा ९० जीएसएम ते १३० पर्यंत मिळतो. हा ग्लॉसी. अर्थातच महाग. साईज १/८ म्हणजे आपल्या एफोर च्या निम्मा. १/४, १/५ हे रेग्युलर चालणारे फॉर्म्याट. किंमती साधारण २५ पैसे प्रति पॅम्प्लेट ते १.२० रुपये प्रति अशी पडते.
.........................
डिझाईन, प्रिंटिंग वगैरे सोपस्कार पार पडल्यावर ते न्युजपेपरात वाटायला द्यावे लागतात. लहान सहान क्लायंटस स्वतःच नेऊन पेपरवाल्या माणसाला देउन टाकतात. ते हजारभर पॅम्प्लेटससाठी तीन चारशे रुपये घेऊन निम्मे गट्ठे रद्दीवाल्याला विकून मोकळे होतात. मोठ्या कंपन्या ही खेंगटी आमच्या गळ्यात बांधतात. बर बांधतात ते बांधतात, त्यांचा विश्वासही नसतो. एका फ्रेशर एमबीएच्या गळ्यात हे कॅम्पेन असते. "यू डोंट वरी, साहील वील म्यानेज एवरीथिंग. जस्ट कोऑपरेट हिम" असा वरुन आदेश मिळाल्यावर साहीलसाहेब फोन नंबर देऊन एकदा वॉस्सप पिंगून गुडूप झोपतात.
.........................
रविवारी पहाटे गट्ठे चार चौकात पोहोचतात. शहरांचे वृत्तपत्र विक्रेत्यांचे विभाग असतात. त्यांचे ठिय्ये ठरलेले असतात. चार साडेचारच्या सुमाराला एकेक क्रूझर, ओमनी पेपर घेऊन यायला सुरुवात होते. अर्ध्या तासात तेथे मंडईची कळा येते. साताठशे विक्रेते ठरलेल्या जागी असतात. स्ट्रीट लाईटस वगैरे लागलेले असतात. प्रेसची स्टीकरे लागलेल्या टूव्हीलर्स आणि सायकलींच्या गर्दीत स्वेटशर्ट आणि कानटोप्यांची लगबग चालू असते. वृत्तपत्राचा एजंट ठराविक प्रती त्या त्या मुख्य विक्रेत्याला वाटून पैसे घेऊन निघून जातो. लोकल छापलेले पेपर आधी येतात. एक्स्प्रेस, लोकसत्ता, हिंदू, डीसी, व्हीटी हे उशीरा येतात. मुख्य विक्रेत्याकडेच पॅम्प्लेट वाटपाची जबाबदारी दिली असल्याने आम्ही फक्त खेळ पाहात उभे असतो. त्यांचीही संघटना, अध्यक्ष, सचिव वगैरे असतात. त्यांनी ठेवलेले उपविक्रेते असतात. त्यांच्याकडची लाईन टाकणारी मुले असतात. आजही पेपरलाईन टाकून शिक्षण पूर्ण करणारी मुले आहेत. शिवाय हे पॅम्प्लेटसचे काम म्हण्जे त्यांना बोनस असतो. सगळ्यांकडे गट्ठे मिळाले की ते सोडवून त्यात पुरवण्या टाकण्याचे काम सुरु होते. त्यासोबतच ही पॅम्प्लेटस सरकवली जातात. ह्या सरकवण्याचे त्यांना प्रति पॅम्प्लेट २० ते २५ पैसे मिळतात. म्हणजे हजारी दोनशे रुपये. ते जागीच रोख द्यावे लागतात. मुख्य विक्रेत्यासोबत व्यवहार असल्यास तो वाटपाची व दोन दिवस साईडची जबाबदारी घेतो पण ५ पैसे जास्त घेतो.
दहा कॉल झाल्यानंतर साहीलसाहेब जॉगींग सूट वगैरे चढवून अवतीर्ण होतात. पॅप्म्प्लेटस पेपरात घुसतानाचे स्नॅप्स मोबाईलात कैद होतात. वेगवेगळ्या हेडरचे, वेगवेगळे विक्रेते इन्सर्शन करत असताना स्नॅप्स घेतले जातात. ते त्यांना रिपोर्ट करायचे असतात. हि सगळी प्रोव्हीजन का तर ह्या धंद्यातही चालते चालूगिरी. सुरु होते प्रिंटरपासून. लाख म्हणताना पॅम्प्लेटस छापली जातात ९० हजार. कारण ही कोण मोजत बसत नाहीत. मग आम्ही आता प्रिंटर मशीन काउंटरचा पण स्नॅप देतो. नंतर हे विक्रेते. निम्मेच गट्ठे टाकले जातात. उरलेले रद्दीत जातात. ह्या रद्दीतल्या पॅम्प्लेटसचे चाहते म्हणजे पानपट्ट्या अन स्नॅक्स सेंटरवाले. पाठकोरे पॅम्प्लेटस बाइंड करुन वापरणारेही कस्टमर असतात. फोटो काढून कस्टमर सरकले की गट्ठा हळूच सरकवला जातो. मग त्यासाठी शेवटच्या गट्ठ्यापर्यंत स्नॅप करावे लागतात. वेगव्गळ्या एरीयातले, वेगवेगळ्या पेपरचे असे एजंटस स्पॉटचे स्नॅप्स एकत्र करुन बिलासोबत अॅटॅच करुन वाट पाहावी लागते ती चेकची.
.........................
हे पॅप्म्प्लेट्स साधारण डबल पेपर, डबल कस्टमर, ऑफीस, वाचनालये असा क्रॉस काउंट काढला तरी ६० टक्क्यापर्यंत सर्क्युलेट होतात. रविवारी, सुटीच्या दिवशी पडलेली पॅम्प्लेट्स वाचली जातात. ह्यांचा वाचक वर्ग मुख्यतः गृहिणी आणि पेन्शनरवर्ग. कुपन्स/व्हावचर्स /मेनू असलेली पॅम्प्लेटस जपून ठेवली जातात. पॉकेट कॅलेंडर, कटिंग केलेले स्कूटरेटचे चित्र, सुगंधी बुकलेट अशा टाइपची इन्सर्शन्स सक्सेसफुल होतात. जाहीरातदार त्याचे काम करतो अन मग ते बघायची, नीट वाचायची, वाचून त्यावर काही कृती करायची जबाबदारी मात्र ग्राहकराजाची.
.........................
(जाहिरातीची वेगवेगळी शस्त्रे वापरुन चालवल्या जाणार्या मोहिमेचा हा पहिला भाग. क्रमश: ह्या हत्यारखान्याची ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद )
वाचने
25425
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
मस्त झाली आहे सुरुवात. येऊ
@सासं, कृपया हा फोटो धाग्यात
In reply to @सासं, कृपया हा फोटो धाग्यात by अभ्या..
फोटो दिसत नाहिये रे. लिंक दे.
लइ ब्येस झालंय इन्सर्शन.
मस्त रे, अजून येऊ दे पटापट,
छान ओळख. पु.भा.प्र.
सुंदर! पुढच्या भागाच्या
आभ्यादादा आमच्या पॉम्लेट
In reply to आभ्यादादा आमच्या पॉम्लेट by भीमराव
राईट्ट बाबुदादा,
भारी ओळख
मस्तं लिहीलंय.. पु.भा.प्र.
छान
In reply to छान by वरुण मोहिते
एड्सदिनानिमित्त कंडोम वाटणे
In reply to छान by वरुण मोहिते
वरुणभाव, खाली संदीपाण्णा
In reply to वरुणभाव, खाली संदीपाण्णा by अभ्या..
ओके
मस्त लेख!! डिटेलिंग आवडलं!!
जाहिरात आणि मुद्रण या
लै भारी सुरुवात.
मस्त सुरुवात. पुभाप्र
आवडले!
अभ्या, छान !
हि यंत्रणा न्युजपेपरचा एन्व्हलप सारखे माध्यम म्हणून वापर करुन घेते फक्त.हे सगळ्याचं कन्क्लूजन !पेपरात ढिगाने आलेले
वा.. मस्त माहिती. छान सुरुवात
सविस्तर वर्णन आवडले. अशी
In reply to सविस्तर वर्णन आवडले. अशी by खेडूत
पावसाळ्यात जास्त.
अभ्या दादा छान माहिती दिलीय.
अतिशय रोचक.
हाय भारी . ताक पुढे लवकर
पंचपंचऊ:षकाले
In reply to पंचपंचऊ:षकाले by सूड
थ्यांक्स रे सुडक्या.
एका माहिती नसलेल्या सप्लाय
मस्त रिपोर्टिंग ...
मस्तच !
In reply to मस्तच ! by धर्मराजमुटके
छान प्रतिसाद!
In reply to छान प्रतिसाद! by संदीप डांगे
होय !
In reply to होय ! by धर्मराजमुटके
थॅन्क्स धर्मराज, संदीप
In reply to थॅन्क्स धर्मराज, संदीप by अभ्या..
बँकाचे अहवाल हा एक दिव्य
In reply to थॅन्क्स धर्मराज, संदीप by अभ्या..
एम्बेड की लिंक/प्लेस?
In reply to एम्बेड की लिंक/प्लेस? by आदिजोशी
तेच रे रे ते आदी. ओले ओले
In reply to होय ! by धर्मराजमुटके
मग विकल्या का २०० कुंडल्या?
In reply to मग विकल्या का २०० कुंडल्या? by आदूबाळ
अरे शीयेसायबा,
पु भा प्र असं म्हणणार नाही.
प्यांपलेट कसली टाकता राव ....
अभ्या एकदम मस्त लेख !!!
घरी पेपरात आलेले हे कागद बघून
एवढी किचकिच करून पेपरात
छान माहिती
मस्त रे अभ्या, येउ ते अजुन.
लेख भारी जमलाय आणि स्टाईल पण
सर्व वाचक प्रतिसादकांना
१ नंबर लेख
ब्बाबो! अनंताचा पसारा आहे
लाइन