साहित्यिक लोकांना , जनतेच्या पैशावर फुकटची मेजवानी झोडायला मिळत नाहीए . म्हणून या लोकांनी तोडलेले तारे ..
डोंबिवलीत ‘निवडणूक’ संमेलन!
Maharashtra Times | Updated: Jan 24, 2017, 12:37 AM IST
साहित्य महामंडळाद्वारे तयार करण्यात आलेल्या महाकोषातून साहित्य संमेलनाचे आयोजन पूर्णपणे करणे अशक्य असल्याचे वक्तव्य साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी डोंबिवलीमध्ये पत्रकार परिषदेत केले. राजकीय यंत्रणांवर संमेलनासारख्या उपक्रमांसाठी अवलंबून असणे चुकीचे असले तरीही सद्यस्थितीमध्ये त्याला पर्याय नसून या परिस्थितीला मराठी लोकच जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ज्याप्रकारे इतर भाषेसाठी इतर भाषिकांमध्ये आत्मियता आहे, त्याप्रमाणे मराठी भाषिकांमध्ये भाषेसाठी मराठी भाषिक काही करत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जर महाकोषातून येणाऱ्या व्याजातून दरवर्षी संमेलनाचे आयोजन करायचे असेल तर ते संमेलन अत्यंत साधेपणाने असले पाहिजे त्याचबरोबर महाकोषामध्ये साधारणपणे प्रतिवर्षी ८०-९०कोटी रुपये असले पाहिजेत. मात्र जनसहभाग कमी असल्यामुळे हे शक्य नसल्याचे यावेळी जोशी यांनी बोलताना सांगितले.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/literature-festival-in-dombivali/articleshow/56743521.cms
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरे फुकटयानो , मराठी जनता हुशार आहे. ती योग्य तिथे पैसा देत असतेच. अभय बंग, बाबा आमटे, प्रकाश आमटे, स्नेहालय गिरीश कुलकर्णी, आता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे - नाम , हे सगळे लोक आपल्या परीने जनते करता काम करत आहेत आणि मराठी जनता त्यांना आपल्या परीने मदत करत असतेच.
तुम्हा साहित्यिक लोकांना २/४ दिवसाच्या संमेलन करता ६ कोटी कशाला पाहिजे ? फाईव्ह स्टार नाश्ता, जेवणावळी, संद्याकाळी परत उत्तम नाश्ता, रात्री परत भारी जेवणावळी हे पाहिजे. मागे पंजाब मध्ये काहीतरी संमेलन गाजवले तुम्ही लोकांनी. त्या ट्रेन मध्ये आणि संमेलन च्या ठिकाणी काय काय खायला प्यायला होते. किती गोड पदार्थ होते. कशी उत्तम व्यवस्था होती हीच वर्णने गाजली. नाष्टाला कांदेपोहे , उपमा. जेवणाला साधी पोळी भाजी भात असे पदार्थ ठेवले तर काय मराठी साहित्याचा कडेलोट होणार आहे कि काय ? हे पदार्थ ठेवा. स्वस्तात संमेलन घ्या. पण ते नाही. या पोटार्थी लोकांना जनतेच्या पैशावर पुख्खे झोडायचे आहेत. आणि जनता काय या भिकमाग्याना पैसे द्यायला तयार नाही. तर लगेच हे मराठी जनतेची लायकी काढून मोकळे. ८० / ८० कोटीच्या उड्या मारतात हे भिकारी. १ कोटी जमले आहेत त्यात भागवा नाहीतर राजकारणी लोकांकडे भीक मागा , पण जनतेचे किती प्रेम आहे मराठी भाषेवर हे ठरवायची तुमची लायकी नाही .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक शंका
कसले बोडक्याचे मनोरंजन घेऊन बसला आहात ?
नाम संस्थेचे कुठेच काही
दुष्काळ राहिलाय कोठे ?
लेखाशी पूर्ण सहमत. मराठी लोक
लेखाचा मतितार्थ उत्तम आहे
मराठी जनतेची लायकी काढायला
बरं
वरमावर घाव
एकंदरीत हि माणसे काही साव
दोघांनी मिळून तोडलेले तारे आवडले.
तारे ते लोक तोडतायत . मी
दोघेही चुकीचेच आहात.
लेखाची भाषा चुकत आहे
बरोबर आहे, मोहित्यांचा मुद्दा
१. श्रीपाद जोशींचे वक्तव्य
मी स्वत: विकास आमटे, गिरीश
मी जनता आहे
माझा राग मी इथे व्यक्त केला.
;)
ठीक आहे की.
आत्ता जो काही पैसा जमतो तो हे
मागे या साहित्यक लोकांनी
मला काय माहित आहे ते बाजूला
हा मराठी भाषेचा उत्सव आहे.