व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने तूला काही सांगाव म्हणतोय
जून्या आठवणीतले जूनेच डाव तूझ्याशी मांडावे म्हणतोय
आइनस्टाइनचे सिद्धांत आणि ऍरीस्टोटल ची गणित मला जमलीच नाहीत
तशी ऐन वसंतात साद घालणारी 'तू' मला कधी कळलीच नाहीस
आता तूझ्यातल्या ' तू' ला आणि माझ्यातला ' मी' ला जरा पावसात न्याव म्हणतोय
द्वैताची भावना विरे पर्यंत चिंब चंब भिजवाव म्हणतोय.
तन भिजेल पण मन मात्र कोरडच राहील
कारण माझ्यातल्या 'मी' ला तुझ्यातली 'तू' कधी जाणवलीच नाहीस.
आता व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने आकाशातल्या बापाकडे एक गार्हाण घालाव म्हणतोय
पूढल्या व्हॅलेंटाइन पर्यंत, न जमलच तर निदान पूढल्या पावसापर्यंत तरी ...
माझ्यातल्या 'तू' ला तुझ्यातल्या 'मी' ने
आपुल्या आठवणीत भिजवत ठेवाव म्हणतोय.
(चु भू द्या घ्या )
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2113
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्यातल्या 'तू' ला तुझ्यातल्या 'मी' ने...
+१ हेच
In reply to माझ्यातल्या 'तू' ला तुझ्यातल्या 'मी' ने... by मनीषा
आहाहा !!
सुरेख कविता
धन्यवाद
आता
धन्यवाद