Skip to main content

सात खून माफ

लेखक जेपी
Published on गुरुवार, 12/01/2017
रेल्वे आपला भोंगा वाजवत फलाट २ वर आली.रात्रीची १० वाजायला आलते. फलाटावर उतरलो तसा फुलारी समोर आला,सलाम ठोकुन माझ्या हातातील बॅगला हात घातला. "राहु दे आतली सुटकेस घे." किडमीडा फुलारी सुटकेस उचलत माझ्या मागे ओढत येत राहीला. मला त्याची पर्वा नव्हती,मरु दे साला.! ** १० वर्ष नंतर पुन्हा स्वत:च्या गावात आलतो. १० वर्षापुर्वी सोडल त्या पेक्षा फार बदलत नव्हत. गाडीत बसताना ताईच्या घरचा पत्ता दिला. फुलारी मागे बसला आणी लोचट हसत म्हणला "साहेब ओळखला". ** घरातुन बाहेत पडताना ताईला सांगीतल " जेवायला नाही" आज फुलारीच्या जागी गुडमेवार होता. ** गाडी एसपी ऑफीस ला घ्यायला सांगितली.आत आलो तसा सगळ्यानी कडक सलाम ठोकला. सगळ्यावर माझा राग नव्हता. हलकी मान झुकवुन संमती दिली. एसपीला भेटलो.त्याची माझी दुसरी भेट. पुर्वी नाशिकला भेटला होता. आता चार्ज घ्यायला ग्रामीण ला जाव लागणार होत. गुडमेवार काय बोलत होता ते माझ्या डोक्यात घुसत नव्हत. डोक भंजाळल होत. माझी नजर बाहेर फिरत होती. एक बॅनर दिसला. त्यावरच्या मोठ्या फोटो ने ,माझ लक्ष खेचल. प्रकाश पुरोहीत . त्याच्या *यचा कि* .हरामी इथे कुठे आला. क्रमश..
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4059
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

नमस्कार, हा भाग लहान झाला आहे.आणी शेवटच्या ओळी लिहीतना पकड सुटली आहे,याची जाणीव होतेय.एखादी दिर्घकथा लिहायचा प्रथमच प्रयत्न करतोय,चांगले- वाईट,आवडल -नाय आवडल, प्रतिसाद जरुर द्यावे.

ए भावसाहेब तू एकदम atmosphere बनवलेनी. साला एकदम भारी, लवकर लिव हो पुढले पार्ट सिरीज चे. :)

चार्ज घ्या लवकर ... छान लिहले . पुलेशु

पुढचा भाग लवकर येवो.