भारत-तैवान-चीन - एक सुवर्णसंधी
गेल्या आठवड्यात ट्रंपने तैवानच्या अध्यक्षाला फोन केल्याची बातमी वाचली. त्यावरुन चिनने केलेला थयथयाट पण पाहिला. खरतर ही भारतासाठी असलेली सुवर्णसंधी आहे.
आजपर्यंत तैवान हा चिनचा भाग आहे ही दिलेली मान्यता आपण आता काढुन घ्यायला हवी. तैवानला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणुन मान्यता द्यायला हवी.
खरतर चिनचा ग्वादार बंदर आणी एकुणच CPEC योजनेला भारताची ही भुमिका जबर धक्का ठरेल. विशेषतः अमेरिका+ भारत अशा दोघांनीही ही घोषणा केली तर जगाचा याकडे बघायचा द्रुष्टीकोनच बदलेल. आणी ते योग्यच आहे. भारताला तैवानचा उपयोग पूर्वेकडचे भारताचे ग्वादार म्हणुन करता येईल.
आपला देश सद्ध्या महत्वाच्या ट्रांझिशनमधुन जात आहे. युनो सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व , मौलाना मसुद अझहरचा प्रश्न , एनएसजी सदस्यत्व या सगळ्या गोष्टीत चिन वारंवार खोडा घालतोच आहे. त्यावर जालिम उपाय म्हणुन हे योग्य ठरेल.
हो आता काही लोक असे म्हणतील की यावरुन चिन-भारत युद्ध भडकेल. पण मला मात्र तशी शक्यता वाटत नाहिये. कारण ह्या प्रश्नामुळे युद्ध छेडायला चिनचे राज्यकर्ते नक्कीच वेडे नाहीत.
माझे तरी या प्रश्नावर असे मत आहे आपले मत अवश्य मांडा
हा धागा चर्चेसाठीच काढला आहे.
वाचुन प्रतिक्रिया मात्र अवश्य द्या.
याद्या
1568
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
काथ्याकूटात हवं होतं ना हे,
अगदी बरोबर
सहमत आहे; पण'पूर्वेकडचे तैवान
In reply to अगदी बरोबर by डॉबरमॅन
होय ग्वादारच हवे होते
In reply to सहमत आहे; पण'पूर्वेकडचे तैवान by संजय पाटिल
भारत तसे खरेतर करीत आहे.
भारताने अशी अधिकृत भुमिका
In reply to भारत तसे खरेतर करीत आहे. by एस