✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राग (अर्थातच सान्गितिक)

ख — खग्या, Wed, 01/04/2017 - 19:22
आशयाच्या अंबरांनी शब्द माझा टंच व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा .. स्वर टिपेचा बरसुदे त्या भीमसेनी मार्दवाने सूर शब्दांच्या द्वयाने जीव माझा धन्य व्हावा सोहिनीच्या आर्जवांनी जीव स्वप्नाळून जावा जोगिया वा भैरवाने सूर्य गगनी अवतरावा विभासाच्या त्या सुरांनी नूर दिवसाचा ठरावा कलिंगडाच्या भैरवाने अंतरात्मा शुद्ध व्हावा .. मारावा अन सारंगाच्या साक्षीने दिन सार्थ व्हावा श्री मधुवंती पूर्वी संगे मध्यांन्होत्तर वेळ जावा ... यमन येऊदे संध्याकाळी साथ घेऊन शंकऱ्याला हंसध्वनी वा कल्याणाने दिवस रोजचा अंत व्हावा.. रात्रीला मग नंदसंगे मल्हाराने फेर घ्यावा रागेश्री अन कलावतीने केदाराचा हात घ्यावा .. दरबारी मग मालकंस अन भूपाळीचा नाद व्हावा .. तृप्त जीवाला निद्रासमयी दुर्गेचरणी मिळो विसावा..

प्रतिक्रिया द्या
2543 वाचन

💬 प्रतिसाद (10)

वा वा वा वा ! काय सुरेख

वेल्लाभट
गुरुवार, 01/05/2017 - 10:39 नवीन
वा वा वा वा ! काय सुरेख गुंफलेत राग तुम्ही ! आणि तेही यथोचित प्रसंगवेळांत. क्या बात. जाणकार दिसता.
  • Log in or register to post comments

जाणकार नाही

खग्या
गुरुवार, 01/05/2017 - 19:13 नवीन
परन्तु असेच सुचले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सुरेख!

पैसा
गुरुवार, 01/05/2017 - 12:29 नवीन
एकूणच रचना खूप आवडली!
  • Log in or register to post comments

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 01/05/2017 - 12:39 नवीन
मस्त प्रयत्न आवडला पहिल्या दोन ओळी वाचल्यावर सुरेश भटांच्या "एवढे दे पांडुरंगा"ची आठवण झाली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

हो त्या ओळी त्यान्च्याच आहेत

खग्या
गुरुवार, 01/05/2017 - 19:09 नवीन
हो त्या ओळी त्यान्च्याच आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मला राग येत नाही!

चांदणे संदीप
गुरुवार, 01/05/2017 - 14:39 नवीन
पहिले कडवे आवडले, बाकी सगळे बाऊन्सर! Sandy
  • Log in or register to post comments

सुरेख!

प्राची अश्विनी
गुरुवार, 01/05/2017 - 15:00 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

व्वाह!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2017 - 16:28 नवीन
व्वाह! वाचताना राग नै आला ! ;)
  • Log in or register to post comments

सुंदर.

एस
गुरुवार, 01/05/2017 - 18:40 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

खूपच छान... आवडली

कवि मानव
Tue, 01/10/2017 - 21:45 नवीन
खूपच छान... आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा