मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर केला गेला अन म्हटले चला आपणही सहभागी होउ.
९० मिनिटात १० की मी चालणे करुन विकांताचा (दुबैत शुक्र - शनि विकांत असतो ना) शुभारंभ केला गेला आहे.
आता दिवसभर नोट बंदी वर काथ्या कुटायला मोकळा.
च्यायला, विश्वासच बसत नै की कुंदन इतका चालला असेल म्हणून. सरासरी विवाहित माणसं तासाला सहा किमी चालतात. (माझं स्वत:चं संशोधन आहे) कुंदन विवाहित असूनही(अंदाजे हं) दीड तासात दहा किमी चालले, म्हणजे त्यांनी आदर्श उभा केला आहे असेच म्हणावे लागेल. अभिनंदन हो कुंदनसेठ. ;)
-दिलीप बिरुटे
मी सकाळी चार किमि केलेत (विथ एअरोबिक्स). आज अजून ४ तरी होतील. उद्या परत तेवढेच. माझे टार्गेट दोन दिवसात १२ होते. नक्कीच क्रॉस करणार. परवा पाय थोडा मुरगळल्याने सूर्यनमस्कार घालायची मात्र रिस्क घेत नाही.
मी आज 16 km चाललो सकाळी.दोन टप्यात.दोन तासात.
मग घरी आलो.थकलो.मग झोपलो.आता जागा झालो .प्रतिसाद दिला.
उद्या एकुण 22 km च लक्ष ठेवलय.गावाकडे जाण्यासाठी.;)
वजन आटोक्यात आणण्यासाठी रोज 8-9 किमी चालणे होतच होते.. आज म्हटलं थोडं पळून पाहू..
पहीले चार किमी मस्त वाटलं, नंतर डाव्या गुडघ्याने असहकार पुकारला.. घरी पोहचेपर्यंत सुजून टम्म झालेला.. संध्याकाळी डाॅक्टरने लिगामेंट फाटला असल्याची सुवार्ता दिली...
आता आराम..
मी खूप वर्षांपूर्वी जिमला जात होतो , वजन आटोक्यात आले होते. पण नंतर नंतर जिम चा कंटाळा येऊ लागला. पुन्हा वजन वाढले.
शेवटी २ वर्षांपूर्वी मी पोहायला शिकलो. पुन्हा फिट झालो. पण कामाच्या व्यस्ततेमूळे कॉन्टीनुए करणे जमले नाही.
आता पुन्हा घरीच सूर्यनमस्कार आणि शाळेत शिकवलेले व्यायाम चालू केले आहेत. थोड्या दिवसांनी पुन्हा पोहायला चालू करण्याचा मानस आहे.
वजन जास्त असतना चालणे उत्तम आहे. पण पोहणे जास्त एफ्फेक्टिव्ह आहे असा माझा अनुभव आहे. डॉ. खरे साहेब आणि मोदक साहेब या सारखे जाणकार अधिक सांगू शकतील.
.... श्री राम समर्थ.....
चालण्याने वजन कमी होते का
असे असते तर जगातील एकजात सगळे वेटर सडपातळ असते,
माझ्या पाहण्यात दैनंदिन कामाचा भाग म्हणून ८ ते दहा तास भरभर चालणारे लोकांच्या पोटाची ढेरी व इतर भागावर चरबी आढळते ,
पोहणे हा स्वस्त व सर्वांगाला व्यायाम होणार प्रकार असून ह्यात सांध्यांची झीज होत नाही.
प्रतिक्रिया
निरनिराळ्या शहरांतला विकांत!
अरे वा!
अरे व्वा.. अभिनंदन..!!!
उद्या दुपारला पवणे होईल,
अभिनंदन.….!
रिपोर्टिंग
मी आज 16 km चाललो सकाळी.दोन
.
वजन जास्त असतना चालणे उत्तम आहे. पण पोहणे जास्त एफ्फेक्टिव्ह आहे
या चालण्यावरून एक प्रश्न:
जेपी,कुंदन - भारी चालता!!
आज मुंब्रा हाइक १८० मिटर्स.
चालण्याने वजन कमी होते का
गरम पाण्यात मध टाकून पिण्याने