प्रेरणा : केडीभाऊ, स्वादि आणि सास्व तैं व इतर
उपकरण : टफ्फल एयर फ्रायर
कृती :
१)
प्रथम नेहेमी प्रमाणे इटल्या कराव्यात. इटली पात्रातून काढून थोड्या गार झाल्यावर इटल्या अर्ध्या कापाव्यात. त्या अर्ध्या भागाचे पुन्हा दोन उभे भाग करावेत. अशा रीतीने एका इटलीचे चार उभे भाग होतील.
२)
१० इटल्यांचे ४० उभे काप एयर फ्रायर मध्ये टाकावेत. इटल्यांच्या तुकड्यांवर १ चमचा तेल टाकावे. ऑइल स्प्रे असेल तर अत्युत्तम.
३)
एयर फ्रायर १५ मिनिटांसाठी चालू करावा. १५ मिनिटांनंतर रागरंग बघून, खरं म्हणजे इटल्यांचा रंग बघून आणखी १० किंवा १५ मिनिटे फ्रायर चालू करावा. आता मात्र जवळपास थांबून बकध्यान किंवा इट्लीध्यान करावे. इटल्यांना अपेक्षित तांबूस सोनेरी रंग चढला कि एयर फ्रायर बंद करावे.
४)
फ्राईड इटल्या बाहेर काढून डिश मध्ये मांडाव्यात. टोमॅटो किंवा तत्सम डिपींग सॉस बरोबर असावा. मोबल्याच्या मदतीने १, २ फटू खेचावेत.
५)
फ्राईड इटल्यांचा गिल्ट-फ्री फन्ना उडवावा. छान क्रिस्पी होतात.
६)
यथावकाश मोबल्या वरचा फटू इथे शेर करावा.
तळटीप :
माझ्या आधी केलेल्या सगळ्या इटल्या सर्व्हर ने खाल्ल्या मुळे नवीन इटल्या केल्या आहेत. त्या संपण्याआधी आस्वाद घ्यावा, हि विनंती.
वाचने
11610
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
इटली नाय हो, इडली. बाकी फोटो
मागील्वेळचाच प्रतिसाद देते
फ्राईड इटल्या विथ सांबार
In reply to मागील्वेळचाच प्रतिसाद देते by रेवती
फोटू आवडले. आता इडल्या करताना
In reply to फ्राईड इटल्या विथ सांबार by लीना कनाटा
परत एकदा मागचा प्रतिसाद.
सेंट टफ्फल्स इटॅलिका
In reply to परत एकदा मागचा प्रतिसाद. by एस
=)))
सॉस सोबत का खायच्या पण?
इटल्या फारच आवडल्या.
वा वा भारी कलपाना आहे ही :)
या इटल्या काल्पनिक नाहीयेत.
लीनामामी, अहो त्या म्हणत आहेत
In reply to या इटल्या काल्पनिक नाहीयेत. by लीना कनाटा
फोटो मस्त दिसतो आहे.
या इडल्या माइक्रोवेव ओवनमध्ये कश्या करायच्या?
एअर फ्राईड साबुवडे
एयर फ्राईज
लीनामामींनी नव्या पदार्थांचा
आवं रेवतीअक्का,
In reply to लीनामामींनी नव्या पदार्थांचा by रेवती
सोकापाभिसुथंची झंझट नगं म्हून इकत आणायची बटाट्याची काचरं. आनि हि समदी क्रुती लिवायचा टंकाळा :)लाईट बिल खुप येतं का हो हे
एयर फ्रायर १,४०० वॉट चा आहे.
In reply to लाईट बिल खुप येतं का हो हे by पिलीयन रायडर
इटली..
हि सोनियांची इटली नाही हो.
एअर फ्रायर पाककृती फर्मास
धन्स ओपी साहेब
In reply to एअर फ्रायर पाककृती फर्मास by फेदरवेट साहेब