नग्नता आणि मुक्ती
लेखनप्रकार
इथल्या जैनीजमवर आलेल्या एका तद्दन पोस्टवर बरीच सांगोपांग चर्चा झाली. त्यात अनेक सदस्यांनी नग्नता आणि मुक्तीच्या संबंधाविषयी कुतुहल प्रकट केलं होतं. त्या निमित्तानं ही पोस्ट.
प्रथम महावीराचा अध्यात्मिक विचार समजून घेऊ. महावीराच्या दृष्टीनं आपलं शरीराशी झालेलं तादात्म्य हा स्वरुपोलब्धितला एकमेव अडसर आहे. त्यामुळे त्याची सर्व साधना, शरीराशी झालेलं तादात्म्य संपवण्यावर केंद्रित आहे. तदनुसार, केश विमोचनादी अत्यंत क्लेशदायी साधना दिगंबर पंथात आल्या आहेत. शारीरिक क्लेषातून तादात्म्य मुक्ती आणि तादात्म्य मुक्तीमुळे स्वरुपोलब्धी अशी दिगंबर पंथीयांची प्रक्रिया आहे.
स्वतः महावीरानं अत्यंत खडतर साधना केली. सर्व साधना शरीरविरोधी असल्यामुळे त्या निसर्गविरोधी आहेत कारण शरीर हा संपूर्ण प्राकृतिक फिनॉमिना आहे. उपासतापास, अनवाणी चालणं, शरीराला कमालीचे क्लेश देणं अशा प्रक्रिया करुन महावीरानं खडतर तप केलं. एकदिवस महावीर केवळ एका वस्त्रानिशी पर्वतावर ध्यानासाठी निघाला असतांना, ते वस्त्र एका काटेरी झुडूपात अडकलं. महावीराकडे ते एकच वस्त्र होतं, पण जितका त्यानं ते सोडवायचा प्रयत्न केला तितकं ते जास्त अडकत गेलं. शेवटी झुडूपाला त्रास होईल या विचारनं, महावीरानं ते वस्त्र सोडून दिलं आणि त्याचा देह संपूर्ण नग्न झाला. त्याच्या मनात कमालीची अनुकंपा निर्माण झाली. आता महावीराकडे काहीही उरलं नाही. खडतर तपामुळे तो दैहिक तादाम्यापासून बराचसा मुक्त झाला होता आणि आता संपूर्ण नग्नतेमुळे मनापासूनही मुक्त झाला. अशाप्रकारे महावीर सिद्ध झाला. त्या दिवशी नेमकी अमावस्या होती. साधारणतः सर्व सिद्ध प्रकृतीला अनुसरुन साधना करतात त्यामुळे पौर्णिमेला, जेंव्हा प्रकृती आपल्या भरतीवर असते तेंव्हा सिद्ध होतात. पण महावीराची साधना, अशरण या भूमिकेवर बेतली असल्यानं, तो अमावस्येला सिद्ध झाला. अध्यात्मात, अमावस्येला एखादा सिद्धत्त्वाला पोहोचल्याचं, महावीर हे एकमेव उदाहरण समजलं जातं.
अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरीग्रह आणि ब्रह्मचर्य ही पाच शिलं महावीरानं जरी सांगितली असली तरी अहिंसा हे परम तत्त्व मानलं जाण्याचं कारण सुद्धा महावीराला काटेरी झुडूपाविषयी वाटलेली अनुकंपा हेच मानलं गेलं आहे.
महावीराच्या विचारसरणीत एक मोठा दोष आहे. स्त्री देहाला रजोवृत्ती आणि जनन या प्रक्रियांवर मात करता येणं असंभव आहे. त्यामुळे स्त्रीयांना देहाशी तादात्म्य तोडणं अशक्य आहे अशी त्याची धारणा होती. तदनुसार, महावीराच्या दृष्टीनं स्त्रीला सांप्रत जन्मात मुक्त होणं अशक्य आहे. आणि तिला मुक्त होण्यासाठी पुरुष देहात जन्म घ्यावा लागेल अशी धारणा बनली.
अर्थात, ती धारणा चूक आहे हे बुद्धानं सिद्ध करुन दाखवलं. कारण देह स्त्री आहे की पुरुष यानं काही फरक पडत नाही. देहाशी तादात्म्य श्वासामुळे आहे ही उघड गोष्ट त्यानं दाखवून दिली. त्यामुळे विपश्यना ही बुद्धाची अध्यात्मिक साधना प्रचलित झाली.
आपल्याकडे दिगंबर जैनांचे मुनी म्हणजे सर्व साधना टो-टो फॉलो करण्याचा विनोदी प्रकार करतात. त्यांना वाटतं की शारीरिक क्लेष करत करत, सरते शेवटी नग्न होण्यातच सर्व इतीश्री आहे. तशात, जैन समाजात अशा मुनीवरांचा प्रचंड आदर केला जातो, त्यामुळे त्यांना मागे हटणं पण शक्य होत नाही.
थोडक्यात, नग्न होण्यात नाही, तर देह आणि मन यापासून विलग होण्यात सिद्धी आहे ही गोष्ट त्यांना समजणं मुश्कील आहे.
वाचने
5354
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
त्याकाळी जोरदार विरोध करणारा
In reply to त्याकाळी जोरदार विरोध करणारा by कंजूस
सध्या त्या चुकीच्या साधनांपायी हजारो लोकांचं आयुष्य वाया जातंय
बरीच माहिती कळली. वाचलं
इंटरेस्टिंग
सुंदर लेख पण ...
लेखाचे शीर्षक सार्वत्रिक
In reply to लेखाचे शीर्षक सार्वत्रिक by माहितगार
पोस्ट फक्त उल्लेखित धाग्यावर झालेल्या चर्चेच्या संदर्भात आहे.
आडंबरसे परे, अध्यात्म बहुत
पांडूऊऊऊऊऊऊ... .
प्रत्येक सजिवाचा मृत्यु,
In reply to प्रत्येक सजिवाचा मृत्यु, by कंजूस
आत्मा एकच आहे
In reply to आत्मा एकच आहे by संजय क्षीरसागर
आपल्या शोधाचे उत्तर मिपावर
In reply to आपल्या शोधाचे उत्तर मिपावर by माहितगार
मला वाटते पिडीएफचे पृष्ठ क्र.
In reply to आत्मा एकच आहे by संजय क्षीरसागर
होय. आत्मा आहे हे प्रथम धरले
Yach level chya pratikriya
नग्नते ला विरोध हि एक