Skip to main content

पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी सोमवार, 12/12/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे. तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि. तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते. तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत. पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही. आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत. खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही. तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो. कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते. धन्यवाद.

वाचने 25789
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

ण ~ न. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा फुटो पाहे! ह.

In reply to by एकनाथ जाधव

लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्‍याचं बोलणं गं मंजूळ मैनेचं, नारी गंऽऽऽ नारी गंऽऽऽ नारी गं, हो नारी गं हो नारी गं.. ग

In reply to by सूड

गोरी तेरा गांव बडा प्यारा मैं तो गया मारा, आके यहां रे, आके यहां रे. रंगीबिरन्गे , फुल खिले है, लोग भी फुलों जैसे आ जाये इक बार यहां तो, जायेगां फीर कैसे ... स

In reply to by अजया

यमुनाजळि खेळू खेळ कन्हैया, का लाजता ? हलती कशा या लाटा, फुलतो शरीरी काटा का हो दूर रहाता ? प्रेमगंगा ही वहाता घ्या उडी घ्या, का पाहता ? चला ना ! बहुमोल अशी ही वेळ अरसिका का दवडिता ? त

In reply to by पगला गजोधर

यशो, मगाशी त येऊन गेलय म्हणून द घेतिये. दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने. न

In reply to by रेवती

नका विचारू देव कसा देव असे हो भाव तसा सगूण कुणी म्हणती देवाला कोणी म्हणती निर्गुण त्याला विश्वरूप त्या परमेशाचा चराचराचर असे ठसा स

In reply to by यशोधरा

ससा तो ससा कि कापुस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धाऊ नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली || ल

In reply to by यशोधरा

लगी लगी है ये दिल की लगी न समझो इसे दिल्लगी... मै ने जो चाहा था मिल गयी वो खुशी लगी लगी है ये दिल की लगी न समझो इसे दिल्लगी... ग

In reply to by बबन ताम्बे

मधु मागशि माझ्या सख्या, परि मधुघटचि रिकामे पडति घरी आजवरी कमळाच्या द्रोणीं मधू पाजिला तुला भरोनी, सेवा ही पूर्विची स्मरोनी करिं न रोष सखया, दया करीं. र

In reply to by यशोधरा

लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी लायेकरनी वाकरे शेंड्याच्या गोयेकरनी वटीनं खुर्दा वरलीकरनी पोरी वरलीकरनी सफेद परक्या मोंबयकरनी लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी लायेकरनी वाकरे शेंड्याच्या गोयेकरनी न

In reply to by Rahul D

मी डोलकरं मी डोलकरं डोलकरं दर्याचा राजा घर पान्यावरी बंदराला करतो येजाऽऽऽ मी डोलकरं मी डोलकरं डोलकरं दर्याचा राजा ज

In reply to by सूड

जा जा .... जा जा .... जा जा .... जा जा .... कबुतर जा जा जा .... कबुतर जा जा जा .... पहले प्यार की पहली चिट्ठी .... साजन को दे आ ..... अ

In reply to by पगला गजोधर

आज जाने की जिद ना करो... यूंही पहलू में बैठे रहो ह (एवढा उजवीकडचा प्रतिसाद द्यायचं माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी मो० टफी यांचा आभारी आहे.)

In reply to by आदूबाळ

होठों से छूं लो तुम मेरा गीत अमर कर दो | बन जाओ मीत मेरे, मेरी प्रीत अमर कर दो || ना उम्र की सीमा हो, ना जन्मों का हो बंधन | जब प्यार करे कोई तो देखे केवल मन | नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो || आकाश का सूनापन मेरे तनहा मन में | पायल झनकाती तुम आ जाओ जीवन में | साँसे देकर अपनी संगीत अमर कर दो || जग ने छिना मुझ से, मुझे जो भी लगा प्यारा | सब जीता किये मुझ से, मैं हर पल ही हारा | तुम हार के दिल अपना, मेरी जीत अमर कर दो || द

In reply to by रेवती

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते त

In reply to by रेवती

माई नी माई मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा जोगन हो गई तेरी दुलारी मन जोगी संग लागा

In reply to by एस

दुनिया तुफान मेल नहीं भैंया, दुनिया वेड्यांचा बाजार ! दुनिया वेड्यांचा बाजार झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! एका रात्री इथून पसार दुसर्‍या रात्री दर्यापार हुश्शार, भाईं हुश्शार ! झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! बुडलो, मेलो, ठार अखेरीस कुठे सुरैया, निम्मी, मीना, नर्गिस लाख खर्चले, वसूल हजार झांजीबार, झांजीबार, झांजीबार ! आली रे आली रसाळ आंबेवाली आरे हड्‌ ! आली, आली नवी निवडणुक पेरा पैका, मते आपसूक मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार झांजीबार, झांजीबार, झांजीबार !

In reply to by यशोधरा

लोकांचं एकूणच सामान्य ज्ञान , सहनशक्ती आणि अक्कल किती कमी आहे. हे कळावं म्हणून असे धागे गरजेचे असतात . असे " लेख" वाचायचे . उगाच हसल्यासारखं करायचं . माउस च्या दोन खर्चिक क्लिक्स आणि २ स्क्रोल वाया घालवले म्हणून स्वतःला शिव्या द्यायच्या . आणि खफ वर दंगा करायला परत जायचं . शिंपला ए

In reply to by एम.जी.

प्रसिद्ध कशाला करायचं त्यांना? आम्ही वर गाण्याच्या भेंड्या सुरु केल्यात. तुम्ही पण त्यात सहभागी होऊ शकता.

बाहेरचे जे सगळे आले ते पुणे हे मवाल्यांचे , कम्युनिस्टांचे, दहशतवाद्यांचे , उकाड्याचे गाव नाही म्हणून ,प्रत्येकाचा येण्यातील स्वार्थ वेगवेगळा. पेशव्याना कोकणात कर्त्रुत्व गाजवता आले नसते अन डी वाय ना कोल्हापुरात.

आपण किनई पुणेकरांच घर ऊन्हात बांधू हा. 65 वा सवाई साताऱ्यात झालाच पायजे अवांतर जे पी ना बोलवा रे

एक धागा सुखाचा.. शंभर धागे टफिचे ।।

सवाई गन्धर्व सोहळा पुढच्या वर्षी प्रत्यक्ष हजर राहून ऐकाव्याचे असल्यास हे करता येईल. १. समारंभाच्या स्थानाला चालत जाता येईल एवढ्या अंतरावरील हॉटेल मध्ये आत्तापासून आरक्षण करा. २. पहिल्या रांगेतील सोफयावरील जागेचे आत्ताच आरक्षण करा. हे परवडत नसेल तर घरी बसून तू नळीवर २०१७ चे कार्यक्रम उपलब्ध होतील तेंव्हा ऐका. तुमच्या तोंडसुख घेण्याने पुण्याची रहदारी किंवा सवाईचे श्रोते सुधारतील या भ्रमात राहू नका.

टर्बोशेठ ...होऊ द्या एखादा मोहोत्सव सातारा कोल्हापुरात , बघा जमतोय का सवाई सारखा , उगीच पुण्यात येण्याचे कष्ट घेऊ नका !

तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे, ,
सवाई गंधर्व महोत्सव तुमच्यासारख्यांकरता नसतो हो. रसिक, कलाप्रेमी, दर्दी आणि शास्त्रीय व अभिजात संगीतप्रेमी पुणेकरांसाठी ते असतात. तुमच्यासारख्या सातार्करांनी डोक्यावर पांढर्‍या पिसांची गुलछबू टोपी घालावी (शांताराम वणकुद्रे, एम जी रामचंद्रन इ. मंडळी कायम अशा टोपीत दिसायची. या टोपीत माणूस छंदीफंदी दिसतो.), तोंडात पानाचा तोबरा भरावा, गळ्यात ३-४ पदरी जाड सोनेरी गोफ घालावे, "शांताबाईचा जलवा"/"करंट ४४०"/"नाद करायचा नाय" असली नावे असलेल्या वगनाट्याला जावे, स्टेजवरच्या छमकड्या नाचत असताना जोरदार शिट्ट्या माराव्या, "बाई वाड्यावर या"/"आवाज वाढव डीजे"/"पोपट"/"आँटी तुझी घंटी" असल्या चावट द्व्यर्थी गाण्यावर खुर्चीवर चढून नाच करावा, खुर्चीखाली जोरदार पानाची पिंक मारावी, ख्रॅssssssssssक असा जोरदार आवाज काढून खाकरा काढावा, गुटख्याची पुडी तोंडात रिकामी करून रिकामी पुडी खाली फेकावी आणि वगनाट्य संपल्यावर बुलेट ताणून एखाद्या रेस्टॉरंट कम बारमध्ये जाऊन पिऊन आणि नंतर नळी फोडून सावकाश मध्यरात्री घरी जावे. सवाई बिवाई असल्या ठिकाणी जाऊन कशाला डोक्याला ताप करून घेता?

In reply to by श्रीगुरुजी

सातरकडच्याच एका महोत्सवाची माहीती http://mumbaimirror.indiatimes.com/others/sunday-read/Sacred-ground/art…? त्यात एका ठीकाणी काय म्हटले आहे ते पहा “A large part of the audience, including villagers and farmers, know when a performer is approaching the sam (first beat of a rhythmic cycle) even in (less frequently heard) taals like Jhoomra and Tilwada,” he said. “This is something you don’t see in Mumbai.” अजुन एक “Listeners there are hard-core music lovers,” said Samsi. “Despite it being a rural area, they have been exposed to intense, traditional classical music. Many of them even know the Gwalior and Agra gharana khayals being sung. They are not like urban audiences, who keep clapping for everything. You get proper daad (encouragement) and appreciation from the heart.”

यानिमित्ताने आम्हीही याच विषयावर पूर्वी अशाच चालू केलेल्या एका धाग्याची जाहिरात. जरूर वाचा :) http://www.misalpav.com/node/29276

पुणेकर आणि गायन लेखात एकत्र आल्याने कायप्पावरला एक जोक आठवला - एका गायकाचं पुण्यात गाणं असतं. पुणेकर सारखं वन्स मोर देतात. गायकाला छान वाटतं. पण वन्स मोर संपत नाही. मग तो विचारतो, "एवढ्या वेळा वन्स मोर का?" पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोर देतोच....

हे म्हणजे असे आहे कि आपल्या बनियानला भले भगदाड असो पण दुसऱ्याच्या शर्टावरचा डाग बघून फिदी फिदी हसायचे ! पुण्यात बोलावले कोणी होते ? तोंड वर करून यायचे आणि वर आल्या गावाला शिव्या घालायच्या बरं जमत बुआ सातारकरांना ! तुमच्या साताऱ्यात का नाही हो त्या मूर्तीने काढली इन्फोसिस ? पुणेकर १-४ मध्ये झोपल्याने धंद्याचे जेवढे नुस्कान (मुद्दाम शुद्धलेखनाच्या चुका करतो आहे तुम्हाला कळावे म्हणून) करून घेतो ना तेव्हढा तुमचा सातारचा वर्षभराचा टर्न ओव्हर तरी आहे का बघा !

अत्तास नाय, पार पुण्यपत्तन असल्यापासुन माजवलं जात आहे.

एका पुणेरी माणसाला तीन भाषा बोलणारा पोपट दिसतो...... तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो.. आणि काही प्रश्न विचारतो.. माणूस – Who are you.?? पोपट – I am Parrot.. माणूस – तुम कोन हो..? पोपट – मैं तोता हु ..l माणूस – तू कोण आहेस..? पोपट – तु बहिरा हाय का बे...?? बैताडया, तुले २ वेळा सांगितलं तरी समजत नाही का बे..? स्वताले जास्त शायना समजून रायला का बे..? आता का कानाखाली वाजवुन सांगु काबे तुले बहिय्रा.. की मी पोपट आहो ते... दिसत नाही का तुले भोकण्या... ** पुणेरी माणूस:- बाप रे, पोपट नागपुरचा आहे वाटतं?