महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
वाचने
25789
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
ण ~ न.
In reply to स्वतंत्र नको by पैसा
हरी नाम मुखी रंगते, एकतारी
In reply to ण ~ न. by एस
तुझ्या गळा
In reply to हरी नाम मुखी रंगते, एकतारी by सूड
तुझ्या कान्ती सम
In reply to हरी नाम मुखी रंगते, एकतारी by सूड
लटपट लटपट तुझं चालणं गं
In reply to तुझ्या कान्ती सम by एकनाथ जाधव
गोरी तेरा गांव बडा प्यारा
In reply to लटपट लटपट तुझं चालणं गं by सूड
सांग सांग भोलानाथ
In reply to गोरी तेरा गांव बडा प्यारा by बबन ताम्बे
ये रे
In reply to सांग सांग भोलानाथ by पाटीलभाऊ
नाही कसे म्हणू तुला, म्हणते
In reply to ये रे by रुस्तम
तव नयनांचे दल हलले गं,
In reply to नाही कसे म्हणू तुला, म्हणते by यशोधरा
गगनसदन तेजोमय
In reply to तव नयनांचे दल हलले गं, by रेवती
यमुनाजळि खेळू खेळ कन्हैया, का
In reply to गगनसदन तेजोमय by अजया
ये रातें ये मोसम, नदीका
In reply to गगनसदन तेजोमय by अजया
"ए " येऊ द्या ...
In reply to ये रातें ये मोसम, नदीका by पगला गजोधर
हे चालेल का
In reply to "ए " येऊ द्या ... by बबन ताम्बे
चालेल :-)
In reply to हे चालेल का by समीर वैद्य
यशो, मगाशी त येऊन गेलय म्हणून
In reply to ये रातें ये मोसम, नदीका by पगला गजोधर
ओक्के.
In reply to यशो, मगाशी त येऊन गेलय म्हणून by रेवती
ससा तो ससा कि कापुस जसा
In reply to ओक्के. by यशोधरा
लवलव करी पातं
In reply to ससा तो ससा कि कापुस जसा by प्रसाद गोडबोले
लगी लगी है ये दिल की लगी
In reply to लवलव करी पातं by यशोधरा
गम है कोई तो ...
In reply to लगी लगी है ये दिल की लगी by संदीप डांगे
मधु मागशि माझ्या सख्या, परि
In reply to गम है कोई तो ... by बबन ताम्बे
लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी
In reply to लवलव करी पातं by यशोधरा
आता ग घ्यावा का न?
In reply to लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी by सूड
न जाने मेरे, दिल को क्या हो
In reply to लाय लाय लाय लाय लायेकरनी पोरी by सूड
या चिमण्यांनो परत फिरा रे,
In reply to न जाने मेरे, दिल को क्या हो by पगला गजोधर
ये जो मोहब्बत है, ये उनका
In reply to या चिमण्यांनो परत फिरा रे, by यशोधरा
मुझे तेरी मोहब्बत का सहारा
In reply to ये जो मोहब्बत है, ये उनका by Rahul D
ज
In reply to ये जो मोहब्बत है, ये उनका by Rahul D
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव
In reply to ज by सूड
जा जा .... जा जा .... जा जा .
In reply to ज by सूड
आज जाने की जिद ना करो...
In reply to जा जा .... जा जा .... जा जा . by पगला गजोधर
ह्यो ह्यो ह्यो पावना सखूचा
In reply to आज जाने की जिद ना करो... by आदूबाळ
होठों से छूं लो तुम मेरा गीत
In reply to आज जाने की जिद ना करो... by आदूबाळ
दम मारो दम,
In reply to होठों से छूं लो तुम मेरा गीत by पगला गजोधर
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
In reply to दम मारो दम, by रेवती
माई नी माई
In reply to दम मारो दम, by रेवती
दम मारो दम..
In reply to होठों से छूं लो तुम मेरा गीत by पगला गजोधर
माझ्या नवर्यानं सोडलिया दारू
In reply to दम मारो दम.. by प्रभू-प्रसाद
गेले द्यायचे राहून तुझे
In reply to माझ्या नवर्यानं सोडलिया दारू by शिवोऽहम्
ने मजसी ने परत मातृभूमीला
In reply to गेले द्यायचे राहून तुझे by परिधी
शेपटीवाल्या प्राण्यांची
In reply to ससा तो ससा कि कापुस जसा by प्रसाद गोडबोले
दुनिया तुफान मेल
In reply to ण ~ न. by एस
लोकांचं एकूणच सामान्य ज्ञान
In reply to मग मिपावर असले धागे का राहतात by यशोधरा
अहो त्यानी मागेच कबूल केलय,
In reply to लोकांचं एकूणच सामान्य ज्ञान by अद्द्या
पुण्याला शिव्या घालून
प्रसिद्ध कशाला करायचं त्यांना
In reply to पुण्याला शिव्या घालून by एम.जी.
बर्याच घार्या गोर्या अनुनासिक
खरी बात...
ऊगी ऊगी हा टफि
हे चालेल का
टफिंनी आणखी धागे काढावे,
In reply to हे चालेल का by समीर वैद्य
टफी आणि केजरीवाल कुठे काय बोलतील
टफि को नोंसेन्स पसंद है
पर्याय
पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे????
आवरा
टर्बोशेठ ...होऊ द्या एखादा मोहोत्सव सातारा कोल्हापुरात
तर निमित्त झाले ते ६४ व्या
सातरकडच्याच एका महोत्सवाची
In reply to तर निमित्त झाले ते ६४ व्या by श्रीगुरुजी
जाहिरात
पुणेकर आणि गायन लेखात एकत्र
ह्म्म्म्म !
एका पुणेरी माणसाला तीन
एका पुणेरी माणसाला तीन
मोबाईल वरुन येत नाही.
पुण्याच स्तोम
एका पुणेरी माणसाला तीन
एका पुणेरी माणसाला तीन