✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अश्रू अनावर झाले..

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 12/11/2016 - 13:36  ·  लेख
लेख
पिंपरी अशी उंच टेकडीवर उभी राहून पुण्याला साद घालत होती. दुपार टळटळत होती. गिधाडे उडत होती. पुणं आपलं आभाळाला देणगी देत निवांतपणे पहुडलं होतं. यावेळी कोथरुड जरी दारात आलं असतं तरी पुण्यानं त्याला हुंगलं नसतं. मुळा मुठा नावाच्या समुद्राला भरती आली होती. पाखरे उडत होती. दूरवरची साद ऐकल्यावर पुण्यानं कूस बदलली. च्यायला काय कटकट आहे. मागं एकदा भोसरी अशीच साद घालायची. त्यावेळीसुद्धा पुणं असंच वैतागलं होतं. मग त्यानं भोसरीची वाटच लावून टाकली. पण पिंपरीची कथा थोडी वेगळी होती. दम दमा दम रापून निघालेलं ते एक अवखळ सौदर्य होतं. तिचा नाद करायला कुणी एकजण आला होता. तेव्हा तिनं हाडं मोकळी करुन त्याला लांबवर पसरवला होता. तेव्हापासून पिंपरीचा नाद करायला कोणी गेलं तर लोकं त्याला 'हाडपसर' म्हणतात. भोसरीनं आपलं तोंड काळं करुन घेतलं. जोगतीनी सारखी तिची तऱ्हा. चिंचवडनं सुद्धा तिला आपलं म्हणनं सोडून दिलं. निगडीवर टाकलेला डाव फसल्यावर त्यानं पिंपरीवर आपला मोर्चा वळवला. त्यात पुण्याची साथ लाभेना म्हणून पिंपरी एकटी पडलेली. आणि अशा कुवेळी पिंपरीवर नजर पडली ती बारामतीची. बारामती ही बाराची होती. ती कायम बार भरायची. चिंचवडला तिनं नादी लावलं. मग पिंपरीबरोबर त्याचं वाजवून दिलं. भोसरीबरोबर दोस्ती काय केली. हिंजवडीपण येऊन मिळाली. आणि अशाप्रकारे पुण्याला ढुसन्या द्यायला सुरवात झाली. वेळ काय सांगून येत नाही म्हणतात. पण ती अशी आली की सजली सवरली नटली मुरडली पिंपरी बऱ्याच दिवसांनी त्या टेकडीवर गेली. आभाळाला देणगी देत पुणं निवांतपणे पहुडलं होतं. यावेळी कोथरुड जरी दारात आलं असतं तरी पुण्यानं त्याला हुंगलं नसतं. पिंपरीनं ते बघितलं आणि तिला अश्रू अनावर झाले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
2396 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

जरा पडू द्या हो....

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/11/2016 - 14:49 नवीन
दुपारी १ ते ४ आम्ही कोणालाही विचारत नाही. ती आमची हक्काची विश्रांतीची वेळ आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

काय कल्पना आहे!

चांदणे संदीप
Sun, 12/11/2016 - 16:00 नवीन
पण परिस्थिती याच्या अगदी उलट आहे! शिवाय हिंजवडी पिंचिंत येत नाही! :) आ. ण. Sandy
  • Log in or register to post comments

=))

रातराणी
Sun, 12/11/2016 - 18:38 नवीन
=))
  • Log in or register to post comments

बारामतीचा एक गडी येतो आणि

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 12/11/2016 - 19:19 नवीन
बारामतीचा एक गडी येतो आणि कोंदट पेठांत वसलेल्या पुण्याची वाट लावतो यातच पुणेकरांची अक्कल कीती चालते ते कळते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा