राज्यात लवकरच रिअल इस्टेट कायद्याची अंमलबजावणी
नागपूर : केंद्र सरकारने पारित केलेल्या रिअल इस्टेट कायद्याची महाराष्ट्र सरकार अंमलबजावणी करणार आहे. सरकारने त्यासंबंधीचं पत्रकही जारी केलंय. इतक्या तातडीने रिअल इस्टेट कायद्याची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे.
बिल्डरांनी ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा न देणं, ग्राहकाची फसवणूक करणं, अशा सर्व गोष्टींना आता आळा बसणार आहे. अंमबजावणीनंतर प्रत्येक राज्यात एक प्राधिकरण तयार होईल. हे प्राधिकरण ग्राहकाच्या तक्रारींचं निवारण करणार आहे.
यापूर्वी राज्यसभेत हे विधेयक केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलं होतं. आता सर्व राज्यांना या विधेयकाची अंमवलबजावणी करायची आहे. त्यामुळे एवढ्या तातडीने रिअल इस्टेट विधेयकाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र पहिलच राज्य आहे.
रिअल इस्टेट विधेयकाची वैशिष्ट्ये:
प्रत्येक राज्यात रिअल इस्टेट प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात येईल. हे प्राधिकरण ग्राहक आणि बिल्डर यांच्यातील व्यवहारावर लक्ष ठेवून असेल. ग्राहक-बिल्डरांमधील तक्रारींचं निवारणही हे प्राधिकरण करेल.
रिअल इस्टेट विधेयकानुसार बिल्डरला बिल्टअप एरियाऐवजी आता कार्पेट एरियानुसारच फ्लॅटची विक्री करावी लागणार आहे. ताबा दिल्याच्या तीन महिन्याच्या आत इमारत रहिवाशी कल्याण मंडळाकडे सुपूर्द करावी लागेल.
घर ताबा देण्यास उशीर किंवा बांधकामात काही दोष आढळल्यास बिल्डरला व्याज आणि दंडाची शिक्षा असेल. ग्राहकांकडून घेतलेले पैसे बिल्डरने 15 दिवसांच्या आत बँकेत जमा करण आवश्यक असेल.
इमारत प्रकल्पाचं लेआऊट, मंजुरी कधी मिळाली, प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होईल, कंत्राटदार कोण इत्यादी सर्व माहिती बिल्डरने ग्राहकांना देणं अनिवार्य असणार आहे.
इमारीतचं प्रकल्प सुरु झाल्यानंतर त्या प्रकल्पासंबंधित सर्व माहिती वेबासाईटवर प्रसिद्ध करणं, बिल्डरांना बंधनकारक असणार आहे.
500 स्क्वेअर मीटर किंवा त्याहून अधिक जागेवर प्रकल्प उभा राहत असेल, तर रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करणं बंधनकारक असेल. कारण हा प्रकल्प रिअल इस्टेट विधेयकाच्या अंतर्गत मोडला जाईल.
इमारत प्रकल्पात कोणतेही बदल करायचे असल्यास 66 टक्के ग्राहकांच्या परवानगी असायला हवी.
जर कोणत्याही बिल्डरने रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास, त्या बिल्डरला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. शिवाय, त्याच्याकडून दंडही आकारला जाऊ शकतो.
इमारतीतील रहिवाशांना खाण्या-पिण्याचं स्वातंत्र्य असेल. काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत कुणीही जबरदस्ती करु शकत नाही.
प्रॉपर्टी डिलर्स, इस्टेट एजंटनाही आता नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे.
प्रकल्पाला कोणकोणत्या मंजुऱ्या मिळाल्या आहेत, याचीही माहिती बिल्डरने देणं आवश्यक असेल.
प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी गरजेची असून नोंदणीविना बिल्डर प्रकल्पाची बुकिंग किंवा विक्री करु शकत नाही.
याद्या
5184
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळ बातमी इथे वाचता येईल..!
गुड.
इमारतीतील रहिवाशांना खाण्या
हे नियम कागदावर उत्तम आहेत.
एक मह्त्वाचं कलम हे आहे की
हे सोपे आहे. प्रत्येक
In reply to एक मह्त्वाचं कलम हे आहे की by अनुप ढेरे
ओके, समजल!
In reply to हे सोपे आहे. प्रत्येक by डॉ सुहास म्हात्रे
एस्क्रो अकाऊंट
In reply to एक मह्त्वाचं कलम हे आहे की by अनुप ढेरे
2007 2008 सालच्या रियल ईस्टेट
>>ह्या ऐकाँँउटवर सरकारचा
In reply to 2007 2008 सालच्या रियल ईस्टेट by डँबिस००७
ते दुबई बद्दल बोलत आहेत
In reply to >>ह्या ऐकाँँउटवर सरकारचा by नितिन थत्ते
बिल्डरधार्जीणेपणा असल्यावर
केंद्र सरकारच्या कायद्यातल्या
नवीन कायदे का हवेत? (एक प्रश्न)
पोलिसांनी इतक्यात नवी मुंबई
In reply to नवीन कायदे का हवेत? (एक प्रश्न) by रविकिरण फडके
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी
In reply to पोलिसांनी इतक्यात नवी मुंबई by अभिजित - १
कायदे चिक्कार आहेत देशात. पण
In reply to जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी by डॉ सुहास म्हात्रे
अभिजीत
माझ्यामते एस्क्रोमुळे
पण एस्क्रोबद्दल काही नाही ना
In reply to माझ्यामते एस्क्रोमुळे by मार्मिक गोडसे
एक मह्त्वाचं कलम हे आहे की
एक केंद्र सरकारचं बिल आहे.
In reply to एक मह्त्वाचं कलम हे आहे की by मार्मिक गोडसे
केंद्र आणि राज्य सरकार , दोघे
In reply to एक केंद्र सरकारचं बिल आहे. by अनुप ढेरे