Skip to main content

कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण

लेखक अप्पा जोगळेकर यांनी गुरुवार, 01/12/2016 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल. या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही. हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत. नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. १. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52 आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-( २. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05 ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील. सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे. ३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43 सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत. नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. image ४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54 आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्‍याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल. बरोबर..? ५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15 नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते. पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते. आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे. शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.) आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्‍या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो. पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते. या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत. ६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35 सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे. पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल. ७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40 काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे). उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ? असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता. ८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.

वाचने 104047
प्रतिक्रिया 582

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

काहींना कम्पलसरी चार्ज बसतोच. बहुतेक क्रेडिट कार्डांना. मी क्रेडिट कार्डने पेट्रोल भरायचो. डेबिटने कधी भरल्याचे आठवत नाही कारण, पेट्रोलसाठी कार्ड वापरणे सोडून चार वर्ष झालीयेत. आताही अनेकांना कार्डवर चार्जेस लागत आहेतच. काहींना लागत नसतील तर ते इंधनकंपन्या व बॅन्कांमधलं साटेलोटं असेल, किंवा जेवढी कमाई त्या खातेधारकाकडून होत असेल त्याच्या बदल्यात असे चार्ज वेव ऑफ होत असतील. पण चार्ज कुठेच कोणालाच लागत नाहीत अशी अगदी ब्लॅण्केट कन्डिशन नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्याकडे पावत्या किंवा स्टेटमेंट नव्हती काढून दाखवायला. म्हणून गप्प बसलो. =))

In reply to by संजय क्षीरसागर

सर, एवढा गदारोळ घालून अजून मूळ मुद्दा तुमच्या पर्यंत पोहोचला नसेल असे गृहीत (वरचे प्रतिसाद परत एकदा वाचले तरी चालतील) धरून सांगतो - कि सरसकट सगळ्याच कार्डांना चार्जेस लागतात हे खरे नाही. बहुतेक क्रेडिट कार्ड्स ला लागतात. पण सरसकट नाही. बहुतांशी डेबिट कार्ड्सना लागत नाहीत. परत, हेही सरसकट नाही. त्यामुळे वर झालेली हि चर्चा हा निष्कारण वाद नक्कीच नव्हता!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

चार्जेस लागतातच ! कधी ते मर्चंट बेअर करतो, कधी कस्टमरला लावतो इतकाच काय तो फरक. नाही तर प्रोसेसींग काय फुकटात करणार का बँका आणि कार्ड कंपन्या ? आणि कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

खरंच हद्द झाली असावी आता! असो...माझ्या खिशातून कुठलेही चार्जेस जात नाहीत(मग ते कोणीही भरो) या आनंदात मी राहतो आणि तुमच्या खिशातून जात आहेत याचा राग तुम्ही व्यक्त करत रहा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

त्यांच्या खिशातून जातात आणि तुमच्यामाझ्या खिशातून जात नाहीत या भेदभावाचा त्यांना क्रोध आला असावा. त्यांची बँक चार्ज लावते आणि आपली बँक लावत नाही. बँक बदला, नशीब बदलेल!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हा गैरसमज असू शकेल कारण ते इतर प्रकारे काढले जात असतील. पण आनंदात राहायला काहीच हरकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

हो नक्की! २०० रु.ची वस्तू डेबिट कार्ड ने मला २०० लाच मिळते. याव्यतिरिक्त मला माहित नसलेले कुठलेही चार्जेस जात नाहीत. त्यामुळे मला आनंद मानायला काहीच हरकत नाही!

In reply to by संजय क्षीरसागर

स्वतः हट्टाने चुकीचे पर्याय वापरून आणि वर दुसर्‍यांनी सुचवलेल्या चांगल्या पर्यायांना हट्टाने विरोध करूनही, परत दोष दुसर्‍यांवर ढकलणे फार विनोदी दिसते, हे सांगायला हवेच का?! =)) चालूद्या !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यात हट्ट वगैरे कुठे आहे ? आधी ही कॅशनं पेट्रोल भरत होतो तेच चालू ठेवीन. विषय संपला !

In reply to by संजय क्षीरसागर

बँकेत न ठेवता खिश्यात कॅश ठेवल्याने तिच्यावरचे व्याज (४%) बुडत नाही का ? अरे देवा, म्हणजे असाही तोटा, तसाही तोटाच होतोय ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सेविंगमध्ये असले तर ४%, फिक्स्डमध्ये असते तर अजून जास्त आर्थिक तोटा... आणि हे ध्यानात आले तर अजून जास्त मानसिक त्रास. हे जगच लई क्रूर, वाईट्ट हाय :)

In reply to by संजय क्षीरसागर

?????? तीनशे रुपयाला २ % म्हणजे फारतर ६ सव्वा सहा रुपये लागायला पाहिजे त्या सेस बीस च्या शेपट्या धरून ..... पण इथे तुम्हाला ११.५० रु. म्हणजे जवळपास ४ % जास्त लागलेत हे कोणतं गणित ? कॅशलेस च्या भोंगा लावून नवीन लुटायचा धंदा आरंभलाय काय ? म्हणजे कार मध्ये जर ३००० चं पेट्रोल टाकलं तर तब्बल ११५ रुपयाला चंदन लागेल कॅशलेस ची आरती ओवाळायची म्हटली तर ?

In reply to by संजय क्षीरसागर

नुसतं बरोबर आहे म्हणून थांबण्यापेक्षा ते ११.५ रुपये नेमके कशात गेले हे आपल्या बँकेला विचारून सांगाल तर सगळ्यांनाच कळेल. आत्ता मी माझ्या एक मित्राशी बोललो, त्याच्या कार्डवरून ११.५ रुपयेच गेले आहेत. त्याने कस्टमर केअरला संपर्क केला असता कळले की ते पैसे रिकंसीलीएशन मध्ये परत येतील. परत आले तर इथे टंकतो! जमल्यास आपण बघा संपर्क करून म्हणजे नक्की माहिती तरी कळेल.

याबद्दल आज बातमी आली आहे http://www.loksatta.com/pune-news/additional-charge-on-debit-card-purch…
काही ठिकाणी डेबिट कार्डच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या खरेदीवर व्यावसायिकांकडमून दोन टक्के अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतच्या विविध तक्रारी सध्या येत आहेत. अतिरिक्त शुल्काच्या मुद्दय़ावरून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये वादावादीही होत आहे. अतिरिक्त शुल्काबाबत व्यावसायिकांकडे नागरिकांनी विचारणा केल्यास बँकांकडून हे शुल्क आकारले जात असल्याचे सांगण्यात येते. डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने २०१३ मध्येच सूचना प्रसिद्ध केली आहे. डेबिट कार्डच्या व्यवहारावर अतिरिक्त शुल्क लावता येणार नाही. तसे करणे अयोग्य असून, कायद्यात बसणारे नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लावता येणार नसल्याचे त्यात रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
डेबिट कार्डच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारल्याबाबत नागरिकांना थेट रिझव्‍‌र्ह बँकेकडे ई-मेलद्वारे तक्रार नोंदविता येते. gov@rbi.in या रिझव्‍‌र्ह बँकेच्या ई-मेलवर तक्रार स्वीकारली जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभागाकडेही याबाबत तक्रार दाखल करता येते. cepdeo@rbi.org.in हा या विभागाचा ई-मेल आहे.