प्राजुची कदंब कविता वाचली. छानच आहे. आता इतकी सुरेख लयबद्ध कविता वाचून आमचं मन आनंदाने तुडुंब झालं! मग राहवेना....ईर्शाद...
कळवळणार्या अवजड देहा, दिसता कुक्कुट छान
उपवासाची ऐशीतैशी, सुटे 'मिती'चे भान
खवचट टवळे, डँबिस भोचक, विशाल ललना फुले
येताजाता खुसफुसणाऱ्या, कन्या आणिक मुले
हिरवापालक तांबूसगाजर, मिक्सर फिरवी त्वरे
चेंडूवरती साक्षात्कारी, तटतटता अंबरे!
खाद्यसखा की म्हणू तुडुंब, जणु मैद्याची बोरी
पानोपानी पहा खिजविते संकल्पा वासरी
जिमेत भवती नाचत झुंबा तरुणींच्या लीला
मोह वाटुनी सोडुन निद्रा सत्वर ये बावळा
रुंद–रुंदशा देहाची बघ भव्य असे सावली
तुमान करते रोज अचंबा तनू कशी मावली!!
-चतुरंग
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7633
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्हा ह्हा हा! भारी एकदम.
ह्हा ह्हा हा!
भारी एकदम.
वाह...
वाह...
पुरानी जीन्स..
पण पोट फार..
कुल्याच्या वरती..
चढेनाच यार..
हे आमचं जुनं अपूर्ण काव्य आठवलं
गवि सर नमस्कार !
पुरानी जीन्स..पण पोट फार..
कुल्याच्या वरती..
चढेनाच यार..
विडंबन आवडलंही खुप आणि एका आवडत्या गाण्याचा बाप भाऊ करुन टाकल्याने वाईटही वाटलं. दोन्ही भावनांचा संगम झाला एकाच वेळी.
बाकी फार गप्प गप्प असता तुम्ही हल्ली.
तुमचा आमिरखान झालाय का ?
सालमे एखादाच पिक्चर ? एखादाच स्टेटमेंट पन ऐसा की
पुरा हिन्दुस्थान हिला देंगे !
स्मिताल्या ( एकुण चार पहाव्या )
+१००
In reply to गवि सर नमस्कार ! by मारवा
+१००
रंगाशेठ 'सुटलेयत' ;)
>> तुमान करते रोज अचंबा तनू कशी मावली!!
हहपुवा! :)
क्या बात है !
मौज भारी !!
लैच भारी बाबा...
लैच भारी बाबा...
अय्यो!
आम्हीही अचंबित! हे कसं काय ब्वा जमलं याना! =))
अप्रतिम आहे!! तुम्ही मुहुर्त
अप्रतिम आहे!! तुम्ही मुहुर्त केला आहातच तर आता इतर जुन्या लोकांनीही लिहायचं मनावर घ्यावं. शिळोप्याच्या गप्पांचे धागे वाचावे तरी किती?
खिक्क
खिक्क
तुफान!
तुफान!
भारी फारच मस्त...
रुंद–रुंदशा देहाची बघ भव्य असे सावली
तुमान करते रोज अचंबा तनू कशी मावली!!
हे तर अतिशय आवडले
पैजारबुवा,
मस्त जमलंय विडंबन.
मस्त जमलंय विडंबन.
मस्तच!!!
मस्तच!!!
>> तुमान करते रोज अचंबा तनू
>> तुमान करते रोज अचंबा तनू कशी मावली!!
हा हा हा !!!! गडाबडा लोळतोय !!!!
काही जुने धागे बघत असतांना हा
काही जुने धागे बघत असतांना हा धागा दिसला! सुटला कसा नजरेतून कोण जाणे..!!
पण ते तुमानीचं मत आता एकदम रिलेट झालंय बघा आपल्याला पण!
हा हा हा.. बाब्बौ.. फक्त त्या शेवटच्या शेरावर मागचे दहा मिनिटं हसतोय! दंडवत घ्यावा रंगाशेठ! _/\_