कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण
नमस्कार,
गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(
२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.
३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.
बरोबर..?
५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)
आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.
पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.
६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.
पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.
७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काका,
कोणत्याही पेट्रोल पंपावर चार्जेस घेत नाहीत ?
दोन दिवसांपासून हि चर्चा
मॉल्स चार्जेस बेअर करतात
अप्पा, कुठल्या दुनियेत आहात ?
माझ्या कडे citi बँक चे
सहमत.
उद्या चेक वटवायला बँकेत गेलो म्हणून बाईकच्या पेट्रोलचे चार्जेस सुद्धा बँकेकडे मागतील.याला =)) आणिट्रान्जाक्शन व्हिजिबल, ट्रेसेबल होते हाच खरा त्रासाचा मुद्दा आहे. या पारदर्शीपणाचा बर्याचशा सीए, डॉक्टर किंवा व्यावसायिकांना त्रास होतो आहे यात आशचर्य काहीच नाही. डोळे मिटून दूध पिणार्यांना सम्जावून सांगणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.याला तर अतीसहमती ! :)ट्रांझॅक्शन्समध्ये कायद्याचा
.
डेबिट कार्ड swipe केले तर चार्जेस नसतात
डेबिट कार्डला चार्जेस नसतात कारण ते आपलेच पैसे असतात
फरक इतकाच की
=))
अन्य ठिकाणी डेबिट कार्डला
कोणत्या बँकेचं कार्ड आहे ?
HDFC Bank
म्हात्र्यांना वर दिलेला प्रतिसाद पाहाल का ?
बरं
आहो,
अगदीच सोपं आहे
SBI बिगेस्ट सरकारी बँक आहे.
NEFT ला चार्ज नसतो असं मला
>
स्टेट बॅंकेची कॅटेगरी वेगळी आहे
बाकी माहिती नाही ताई डिटेल्स
थोडे तरी चार्जेस लागणार
नेटवर किंवा पीओएस वर चार्जेस
कार्ड स्वाईप चार्जेस
अवांतर : काळा आणि पांढरा पैसा
काही लोकं डोळ्यावर चश्मा
बेनामी व्यवहारास नोंदणीच्या
फिरवाफिरवीची बीजं खूबीने आधीच
समर्थनासाठी असंबद्ध लिंका
स्कोरसेटलींग शिवाय काही येत
प्रतिवाद न करता भ्याडपणे पळ
श्री. मोदक,
पुरावे द्या, मग बोला.
कसले पुरावे? ते म्हणतात ना
फिरवाफिरवी ?
मागील सरकारने त्याच्या १०
जरा इस्कटून सांगा की !
हिकानामीची ग्रोथ का कायशी ती
पण देशा मधला काळा पैसे पण
ते गामा पैलवान भार्तात नस्तात
नाही, इथे प्रतिसाद देण्याचे
मे जिथे तिथे विरोधकांना पेड
सगळे अवांतरच चालू आहे. आम
बघा ना हो अप्पा!! कसं करायचं
इथे ज्यांनी नेटपॅक घ्यायचेच
तुम्ही बातमी वाचले का नीट ? वाचा .. अर्थ समजून घ्या मग टाका