Skip to main content

लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 02/12/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
लेडी सीमोर वर्सली या १८व्या शतकातील इंग्लंडच्या नैतिकतेच्या कल्पनांची धूळदाण उडवणाऱ्या बाईबद्दल ऐकून तिला तसंच विसरून जाणं कठीण आहे. तिच्यावरचा अख्खा बीबीसी २ चा 'द स्कँडलस लेडी डब्ल्यू' हा एपिसोड पाहून तर लिहिल्याशिवाय राहवणारच नव्हतं. ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं, तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची,आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता, त्या काळात प्रचंड बदनामी पत्करून आपल्या नवऱ्याने प्रियकरावर चालवलेल्या खटल्यात संपूर्ण निकाल फिरवून दाखवून त्या बदनामीसहित ताठ मानेने जगणारी ही व्यक्ती खरंच होऊन गेली यावर विश्वासच बसत नाही. पण विचार केला, तर स्त्री आणि स्त्रीचा पायदळी तुडवला गेलेला सन्मान यांचे अविश्वसनीय संदर्भ द्यायला आपल्या जनमानसात रुजलेल्या कथा तरी कुठे कमी आहेत? कुंती, द्रौपदी, आणि सीता या आपल्या अग्निशिखांचे नशीब घेऊन त्याचा वणवा करणाऱ्या या मनस्विनीबद्दल लिहिणे म्हणूनच क्रमप्राप्तच होते. लेडी सीमोर फ्लेमिंग या प्रचंड श्रीमंत सौंदर्यवतीने तिच्या प्रतिष्ठेला साजेशा रिचर्ड वोर्सलीशी लग्न केले आणि तिचं माणूस असणं संपलं. ती आता नवऱ्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास बांधील असलेली एक वस्तू होती. आणि तिच्या नवऱ्याच्या इच्छांसाठी तिने जे केलं, ते आजच्या काळातपण अंगावर शहारे आणेल. रिचर्ड हा ‘voyeur’ होता. तिला अन्य पुरुषांशी प्रणय करताना दाराच्या छिद्रातून बघणे ही त्याची अपेक्षा होती. आणि त्याने तिला यासाठी अक्षरश: वापरले. नवऱ्याचा आदेश पाळणे हे तिचे कर्तव्य समजले जात असल्याने तिने ही गोष्ट सहन केली. नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली. या कुंतीची द्रौपदी झाली, ती रिचर्डचा जिवलग मित्र, कॅप्टन बिसेट आल्यावर. आतापर्यंत ती कोणत्याही मित्राला वापरू देण्याची वस्तू होती. पण बिसेटच्या ती खरीखुरी प्रेमात पडली होती. त्यांच्या बहरलेल्या प्रणयाने रिचर्डला अजून विकृत आनंद मिळत असल्याने त्याची ना असायला हरकतच नव्हती. आता ती दोन जिवलग मित्रांची ‘पतिव्रता’ झाली. एक लग्नात तिला जिंकून घेणारा ‘मालक’ आणि दुसरा, ज्याच्यावर तिचं प्रेम होतं. पण प्रेम म्हणजे शरीरापलीकडे जे काही असतं त्याचे तरंग आता सीमोरच्या आसुसलेल्या अंतरंगात उमटायला लागले होते. या आयुष्याचा तिला मनस्वी कंटाळा आला होता. बिसेटसोबत, तिच्या खऱ्या प्रेमासोबत त्याच्यापासून झालेल्या मुलीला घेऊन तिला संसार थाटायचा होता. हे लोढणं गळ्यात घेण्याचं बिसेटने कुठच्या नशेच्या क्षणी ठरवलं काय माहीत, पण त्या दोघांनी पळून जाण्याचं धाडस केलं. कदाचित सीमोरला वाटलं असेल की रिचर्डची या सगळ्यालाच संमती असल्याने तो तिला सहज घटस्फोट देईल. पण इतक्या पुरुषांना ओळखूनही तिला पुरुषी अहंकार काय चीज असते त्याची ओळख व्हायची होती. ते दोघं पळून गेले आहेत हे कळल्यावर रिचर्डने थयथयाट केला. सीमोर आणि बिसेट यांच्या प्रेमाला तो मान्यता देत होता तो त्याच्या आनंदासाठी, तिच्या नव्हे हे ते दोघंही विसरून गेले होते. रिचर्ड हे राजकारणातील बडं धेंड होतं. त्याची नाचक्की त्याला कदापि सहन झाली नसती. त्याने बिसेटवर कोर्टात केस टाकली, आणि त्याच्या मालकीची बायको पळवल्याबद्दल त्याच्यावर तब्बल २०००० पाऊंडचा दावा ठोकला. आता बिसेट हबकला. हे असं काही त्याला अपेक्षितच नव्हतं. एवढी मोठी नुकसानभरपाई देऊन तो रस्त्यावर आला असता. लग्नबाह्य संबंधाबद्दलचे कायदे बघता तो सरळ सरळ दोषी होता. आणि इथे उभी राहिली ती अग्निदिव्याची तयारी असणारी सीमोरमधली सीता. तिला कोर्टात जाऊन साक्ष देणं शक्य नव्हतं. म्हणून तिने तिला ज्यांच्यासोबत शय्यासोबत करायला रिचर्डने भाग पाडलं होतं त्या लोकांना कोर्टात उभं केलं. बिसेटला वाचवण्यासाठी तिने आपली अब्रू पणाला लावली. इतका रसभरीत विषय मिळाल्यावर त्याचं चर्वितचर्वण होणारच. या केसची अनेक वर्णनं, त्यावरची व्यंगचित्रं अतिशय प्रसिद्ध झाली. सीमोरच्या आयुष्यात एकूण २७ पुरुष होते अशी वर्णनं इंग्लंडमधे प्रसिद्ध झाली. इतका वणवा पेटवलेल्या सीमोरने शेवटी निर्णय फिरवला. गुन्ह्यात जर आरोपीला दावेदाराची साथ असेल, तर गुन्ह्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे केसचा निर्णय लागला तेव्हा कोर्टाने नुकसानभरपाई म्हणून बिसेटने रिचर्डला १ शिलिंग एवढी रक्कम द्यावी असा निर्णय दिला. जिला जवळपास वेश्येसारखं वागवलं गेलं, तिने स्वतःचा उलटा लिलाव करून स्वतःची किंमत २०००० पाऊंडवरून १ शिलिंग करवून घेतली. प्रचंड नाचक्की सहन केली सीमोरने, तिच्या प्रियकरासाठी, एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी. पण जगात धोब्याच्या शब्दावरूनपण स्त्रीला टाकता येतं, इथे तर सगळ्या जगासमोर तिने चारित्र्याच्या कल्पनांचे बुरखे टराटरा फाडले होते. त्या बिसेटने तिला काही काळातच सोडून दिलं. त्यानंतर तिने वाईट परिस्थितीत दिवस काढले. अजून सूड पूर्ण न झालेल्या रिचर्डने तिला घटस्फोट दिलाच नव्हता. त्यासाठी त्याने तिला फ्रान्सला ४ वर्षे जाण्याची अट घातली. सीमोर फ्रान्सवरून परत आली आणि रिचर्डचा मृत्यू झाला. तिला विधवा म्हणून तिच्याच राहिलेल्या हुंड्यामधली शिल्लक मिळाली. सीमोरने आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक प्रचंड त्रास सहन केला. पण तिच्या लग्नाच्या भयाण वास्तवातून बाहेर पडल्यावर तिने जगाला काही किंमतच दिली नाही असं दिसतं. हुंड्याची रक्कम मिळाल्यावर रॉयल लायसन्सने तिने आपलं लग्नापूर्वीचं आडनाव परत मिळवलं आणि स्वतःपेक्षा दोन दशकांनी लहान असणाऱ्या एका संगीतकाराशी लग्न केलं. तिच्या या नवऱ्याने लग्नानंतर तिचं आडनाव घेतलं होतं.. सीमोरची कथा हादरवून टाकते. ही घटना घडून दीड शतकपण लोटलं नाहीये, हे अजून हादरवून टाकतं. जे रामायण-महाभारतातले संदर्भ माझ्या भारतीय मनात पक्कं मूळ धरून होते, त्यांना गदागदा हलवते सीमोर. कुंती काय, द्रौपदी काय, सीता काय, समाजाने ठरवून दिलेल्या नियमांसाठी आपला आत्मसन्मान गिळाव्या लागलेल्या स्त्रिया. त्यांच्या, आणि असमानतेच्या इतिहासातील अनेक व्यथांना चव्हाट्यावर आणणारी सीमोर कधीच विसरली जाणार नाही.
लेखनविषय:

वाचने 17875
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by मारवा

पण इतक्या उहापोहाची आवश्यकता नाही असं वाटतं. जर प्रस्थापिताविरुद्ध बगावत केली तर कौतुक व्हावं. पण दीर्घकाळ तो पॅटर्न मान्य केला आहे. आता बिसेट, स्वतःची त्याच्यापासून झालेली मुलगी आणि नो डेली सोप ऑफ बोल्ड-सीन्स, असा पर्याय दिसला आहे. त्यानुसार पहिल्या विरुद्ध बंड केलं, यात स्त्रीत्त्वाचा गौरव दिसत नाही.

अतिशय कठीण परिस्थितीतून गेली ती बाई.

नगरीनिरंजन, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
सीता, कुंती व द्रौपदीशी केलेली तुलना बरोबरच आहे.
वैयक्तिक मत. ते मांडायचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. २.
नवर्‍याच्या आनंदासाठी असो की वंश टिकवण्यासाठी असो परपुरुषाशी संग करावा लागणे हे सीमोर व कुंतीच्या बाबतीत झाले. तेच द्रौपदीचं.
माझ्या मते कुंती आणि द्रौपदी यांना परपुरुषाशी संग करावा लागला नव्हता. ३.
निव्वळ कुंती अनवधानाने म्हणाली वाटून घ्या म्हणून लगेच पांडव कंपनीने ठरवून टाकलं वाटून घ्यायचं म्हणून. तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी जाणून घेतलेला दिसत नाही.
माझ्या मते द्रौपदीला कसलीही अडचण नव्हती. एव्हढंच काय तिच्या माहेरच्यांनाही कसलाच आक्षेप नव्हता. हस्तिनापुराच्या उत्तरेस नेपाळ/तिबेट प्रांत आहे. तिथे आजही अनेकपतीत्व चालतं. आजून एक गोष्ट म्हणजे द्रौपदीस बालपण नव्हतं. त्यामुळे स्वप्नांतला राजकुमार वगैरे जशी स्वप्नं असतात तशी तिची नसावीत. ४.
सितेलाही निर्दोष असूनही सरळसरळ जंगलात सोडून देण्यात आलं.
तिला आश्रमात सोडलं होतं. जंगलात नव्हे. तिच्यावर अन्याय झालाय हे मान्य. मात्र तो रामाने केला हे अमान्य. प्रजाजनांनी आक्षेप घेतल्यानेच त्याला तिचा त्याग करावा लागला. नंतर त्याने दुसरं लग्नदेखील केलं नाही. विशेषत: दशरथाने अनेक स्त्रियांशी विवाह करण्याच्या (हल्लीच्या भाषेत बायका ठेवण्याच्या) पार्श्वभूमीवर हे वर्तन पार वेगळं आहे. ५.
ह्या स्त्रिया सीमोरपेक्षा महान होत्या; त्यांचा संघर्ष वेगळा होता वगैरे उगाच पोकळ मुद्दे मांडून आपल्या संस्कृतीची लक्तरे झाकण्याची गरज नाही.
संस्कृतीची लक्तरे? हा खमंग पदार्थ कुठल्या हाटिलात लाभतो? कुंती, द्रौपदी आणि सीता या लेडी सीमूरपेक्षा महान आहेत असं कोण म्हणतो? या चौघीही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत हे माझं वाक्य तुम्ही वाचलेलं दिसंत नाही. ६.
अगदी फुले-कर्व्यांनी काही करेपर्यंत म्हणजे दीड-दोनशे वर्षांपुर्वीपर्यंत आपल्याकडे हीच परिस्थिती होती आणि मागास ग्रामीण भागात अजूनही असेल. शोषण करण्याची कारणे फक्त वेगळी.
फुले कर्वे येण्यापूर्वी जणू सगळा अंध:कार (=जहिलीयत) होता. ते आल्यानंतर स्त्रियांचं जग एकाएकी उजळून निघालं. ते म्हणजे बायकांचे फुल्टू मसीहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by nanaba

naanba, माझ्या मते फक्त तुम्हीच तुमचे मसीहा असता. तेंव्हा जरा सांभाळून. शिवाय जहिलीयतचं काय? फुले कर्वे यांच्या अगोदर ज्यांनी प्रयत्न केले ते नगण्य का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माझ्या मते कुंती आणि द्रौपदी यांना परपुरुषाशी संग करावा लागला नव्हता.
तुमच्या मते? तुमची संस्कृतीरक्षक (की जातरक्षक?) भूमिका आधीच माहित असल्याने पुढे वाद घालायची इच्छा नाही. चतुरंग यांना समजलेय मला काय म्हणायचेय ते आणि तेवढे मला पुरेसे आहे.
फुले कर्वे यांच्या अगोदर ज्यांनी प्रयत्न केले ते
ह्याबद्दलचे माझे अज्ञान मात्र दूर झाले तर बरेच. ह्या लोकांबद्दल थोडक्याततरी लिहावे.

अजून सूड पूर्ण न झालेल्या रिचर्डने तिला घटस्फोट दिलाच नव्हता. त्यासाठी त्याने तिला फ्रान्सला ४ वर्षे जाण्याची अट घातली. सीमोर फ्रान्सवरून परत आली आणि रिचर्डचा मृत्यू झाला. तिला विधवा म्हणून तिच्याच राहिलेल्या हुंड्यामधली शिल्लक मिळाली. आपले विधान जे आहे ते थोडे मला कन्फ्युज्ड करत आहे. म्हणजे मी या विषयाची माहीती मिळवत ट्राइंग टु पीसेस इट ऑल टुगेदर करतांना इथे अडखळलो. हे विधान जरासे एकांगी भासले. हे अगदी बरोबर आहे. रीचर्ड ला सुड हवा होता म्हणुन त्याने तिला मुद्दाम डिव्होर्स दिला नाही याचे कारण १- सिमोर ला डिव्होर्स न मिळाल्याने दुसरा विवाह कायदेशीर करणे शक्य नव्हते. याने तिच्या अडचणी वाढणार होत्या. २- यामूळेच सिमोर च्या हक्काची स्वतःचीच हुंड्याची रक्कम तिला परत मिळणार नव्हती कारण अजुनही लीगल पत्नीच. मात्र जो बीबीसी चा एपिसोड बघितला त्यात तिने याचा प्रतिकार फार आक्रमकतेने केलेला आहे. तिने असंख्य पत्रे पाठवुन लीगल पत्नीच्या नात्याने विविध वस्तुंची मागणी रीचर्डला करुन त्याला हे प्रकरण महागात पाडलेले आहे. हे ती खुष होउन बिसेट ला सांगण्याचा सीन आहे. बिसेट जेव्हा म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीत तेव्हा मी अजुनही रीचर्डची कायदेशीर पत्नी आहे व त्याला वस्तु मागु शकते अशा अर्थाचा. व तिची असंख्य मागणीची पत्रे वाचुन हताश झालेला रीचर्ड ही एपिसोड मध्ये दाखवलेला आहे. हा एक चतुर कॅलक्युलेटेड आक्रमक प्रतिकार सिमोर ने केलेला आहे. परंपरेचा कायद्याचाच वापर करुन त्याच्यावर बाजी उलटवलेली बीबीसी एपिसोड मध्ये तरी दिसते. याला कंटाळुन थकुन रीचर्ड पडती बाजु घेऊन स्वतः तिला वाटाघाटीसाठी बोलावतो.द त्यात तो हे ही कबुल करतो की आता मी या सर्व प्रकारांनी थकलो आहे ती ही म्हणते की मी ही थकलेली आहे मग तो म्हणतो की ठिक आहे मग आपण अ‍ॅग्रीड आहोत ना ती संमती देते. हा एक सामोपचाराचा सीन आहे यात रीचर्ड तिला म्हणतो की तु फ्रान्स ला ४ वर्षासाठी जायचे आहेस आणी सीझ द एक्स्पेन्डीचर्स अशी ही अट घालतो. म्हणजे त्याच्यावर लादत असलेले खर्च थांबवावे या अर्थाने मागणी आहे. त्यावर तु मला एक्साइल मध्ये पाठवतोयस का ? असे सिमोर विचारते ? त्यावर रीचर्ड म्हणतो की तुला फ्रान्स ला जाण्यात काय अडचण आहे इंग्लंड बरोबर फ्रान्स पीस शांतता करारात आहे. तिथे तुला अनेक सांभाळ करणारे मिळतील इ. हे तो साध्या समजुतीच्या टोन मध्ये बोलतोय. तीही या प्रस्तावावर फार हताश चिडलेली आहे असे एपिसोड मध्ये तरी दाखवलेले नाही. दोन प्रौढांमधला समजुतदार सेटलमेंट असा सीन एकुण दिसतो. उलट ती पुन्हा तक्रारही करते की तु मला कधीच चेरीश केलं नाहीस इ. ही बोलणं होत. दोन्ही जण एकुण सुडभावना संपुन थकलेल्या व्हेटरन्स सारखे दिसतायत. आता त्या काळच्या परीस्थितीत सेमोर ला पॅरीस अधिक अनुकुल होते हेच ध्यानात घेऊन ही अट घातलेली दिसतेय. पॅरीस कॉन्झर्व्हेटीव्ह इंग्लडच्या मानाने तरी किमान तेव्हा पुढारलेले होते. व सिमोर सारख्या स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकोण ही उदार होता असे रुबेनहोल्ड च्या पुस्तकातील जो भाग गुगल बुक्स वर वाचायला मिळतो त्यात लेखकाने म्हटलेले आहे. तर या पार्श्वभुमीवर तुमचे चित्रण काहीस गडद व एकांगी वाटतेय. मला या विषयाचा पुर्ण अभ्यास नाही व सर्वात महत्वाची कमी म्हणजे माझ्याकडे रुबेनहोल्ड चे पुर्ण पुस्तक नाही तुकड्या तुकड्यात गुगल बुक्स वर वाचायचा कंटाळा येतो मात्र रुबेनहोल्ड चे पुस्तक अत्यंत उत्कृष्ठ आहे असे सॅम्पल पाहुन खात्रीपुर्वक वाटते. त्यात फ्रान्स इंग्लड च्या सामाजिक परीस्थितीचा संकेंतांचा परंपरांचा फार सखोल आढावा घेतलेला दिसतोय. पुस्तक फारच सखोल आहे हे नक्कीच वाचणार. पण तो पर्यंत बीबीसी एपिसोड ( जो मला वाटत पुस्तकाला मॅच च करु शकत नाही ) हा मर्यादीत सत्य दाखवत आहे असे वाटते. आणि नुसता एपिसोड बघुन तुमचे वरील विधान वाचल्यास मात्र कनफ्युजन वाढते तुम्हाला जमल्यास यावर खुलासा करावा. म्हणजे अजुन जाणुन घ्यायला आवडेल पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हा तिच्यावर झालेला अन्याय खोडण्याचा प्रयत्न नाही. हा एक व्यामिश्र विषय त्याच्या सामाजिक/ सांस्कृतिक पार्श्वभुमीत मुळातुन समजण्यासाठी केलेला माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. (आणि एक मला थोडे सिमोर शी मादाम बोव्हारी चे साम्य आढळले कर्ज खरेदी अनेक पुरुष इ.इ.) https://books.google.co.in/books?id=IQ0nCgAAQBAJ&pg=PT157&lpg=PT157&dq=… हा पुर्ण भाग सिलेक्ट करुन पेस्ट अ‍ॅन्ड गो केल्यास वरील संदर्भ असलेले पान मिळते.

In reply to by मारवा

मारवाजी, तुमचं आणि माझं इंटरप्रिटेशन वेगळं असू शकतं. मला तुमच्या मताचा पूर्ण आदर आहे. मी पुस्तक वाचलेलं नाही, नाहीतर त्याचा उल्लेख लेखातच केला असता. तुम्हाला माझं चित्रण एकांगी वाटलं असेल, तर त्याचा आदर आहे. मात्र, हा लेख पूर्णपणे त्या एपिसोडची ओळख करून देण्यासाठी लिहिलेला नाही. एखाद्या व्यक्तिरेखेला नाट्यरूपात आणताना गडद केले जाते. सीमोरने चतुराईने रिचर्डला त्रास देणे, अतिशय बोल्ड कविता लिहिणे, यात काही तथ्यांश असेलही, पण इंटरनेटवर मला तसा संदर्भ सापडला नाही म्हणून मी तो टाळला. बाकी, आधीच लिहिल्याप्रमाणे मूळ रामायण-महाभारतातले संदर्भ घेऊन मी या धाग्यावर बोलणार नाही कारण इथे त्याचे प्रयोजन मला वाटत नाही. धन्यवाद.

५ ऑक्टोबर १९५८ ते ९ सप्टेंबर १८१८, असा ६० वर्षांचा जीवनपट आहे. १७ व्या वर्षी रिचर्डशी विवाह. रॉबर्ट या पहिल्या मुलाचा अकाली मृत्यू. २३ व्या वर्षी (ऑगस्ट १९७१), बिसेटपासून जेन नांवाची मुलगी. पण लोकापवाद टाळण्यासाठी रिचर्डनं ती आपलीच आहे म्हटलं. एकूण सत्तावीस पुरुषांशी संबंध असल्याची वदंता. नोव्हेंबर १९७१ ला बिसेटबरोबर पलायन. त्यावर रिचर्डनं बिसेट विरुद्ध २०,००० पौंडाचा दावा ठोकला. कोर्टात सिमोरनं (बिसेटला वाचवायला), ज्या पुरुषांशी संबंध आले होते आणि सांप्रत चालू होते अशांची साक्ष काढली. दावा रिचर्ड विरुद्ध जाण्याची दोन कारणं झाली. (१) रिचर्डनं बिसेटला सिमोरचं, स्नानगृहातलं नग्नावस्थेत दर्शन घडवलं होतं. (२) विल्यम ऑसबॉर्न या डॉक्टरनं, सिमोरला जेम्स ग्रॅहमशी संबंध ठेवल्यामुळे गुपप्तरोग झाला होता, अशी साक्ष दिली. परिणामी रिचर्डला दाव्यापोटी, फक्त १ शिलींग डॅमेज मिळालं. बिसेटनं सिमोरला सोडण्याचं कारण असं की ती रिचर्डपासून सेपरेशन मागत होती, डिवोर्स नाही. त्यामुळे रिचर्ड जीवंत असेपर्यंत सिमोरशी विवाह शक्य नव्हता. आता सिमोरला जगण्यासाठी, हाय-प्रोफाईल गणिका व्हावं लागलं. पुढे सिमोर कर्जबाजारी झाल्यानं, तिला पॅरीस सोडावं लागलं. १७८८ मधे नवा प्रियकर, जोसेफ बोलोग्नेबरोबर इंग्लंडला आगमन. तिथे रिचर्डशी सेपरेशन करारवर सह्या. त्यात (इतका गोंधळ घातल्याची शिक्षा म्हणून) फ्रांसला ४ वर्ष रवानगी. १७९७ ला सिमोर पुन्हा इंग्लंडला. १८०५ मधे रिचर्डचा मृत्यू. ७०,००० पौंड मिळाले. त्या वेळी ही ४७ वर्षांची. १२ सप्टेंबर १८०५ ला (म्हणजे ४७ व्या वर्षी) पुन्हा, २६ वर्षाच्या जॉन लेवीसशी लग्न! ९ सप्टेंबर १८१८ ला मृत्यू . ही घ्या लिंक मी पहेले छूटच बोललेलो की २७ रिळांचे बोल्ड सीन्स करायची गरज नव्हती.

In reply to by संजय क्षीरसागर

२३ व्या वर्षी (ऑगस्ट १७८१), बिसेटपासून जेन नांवाची मुलगी. पण लोकापवाद टाळण्यासाठी रिचर्डनं ती आपलीच आहे म्हटलं.

In reply to by संजय क्षीरसागर

मी पहेले छूटच बोललेलो की २७ रिळांचे बोल्ड सीन्स करायची गरज नव्हती. संक्षी काका, लेडी सीमोरने किती बोल्ड सीन्स कोणाबरोबर करायचे किंवा करायला हवे होते हे तुम्ही ठरवणार का ? की हे नविन मोरल पोलिसींग ? तिने स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी बोल्ड सीन दिलेही असतील. तिचा प्रश्न. बाई मोठी धाडसी असणार. बाकी तिच्यावर किती अन्याय झाला वगैरे गळेकाढूपणा फोल वाटतो इथपर्यंत ठीक आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

ज्योक आहे हो तो ! मला काय पडलीये तिची ? बाकी तिच्यावर किती अन्याय झाला वगैरे गळेकाढूपणा फोल वाटतो इथपर्यंत ठीक आहे. तेवढ्यासाठीच तर दुनियेपेक्षा वेगळा विचार मांडलायं ना!

पिशी अबोली,
आधीच लिहिल्याप्रमाणे मूळ रामायण-महाभारतातले संदर्भ घेऊन मी या धाग्यावर बोलणार नाही कारण इथे त्याचे प्रयोजन मला वाटत नाही.
तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. पण सीता, द्रौपदी अशी नावं घेतली तर रामायणमहाभारताचे उल्लेख येणं अपरिहार्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवानजी, ज्या पद्धतीने हे संदर्भ लेखात आले आहेत, ती अतिशय नवीन पद्धत आहे का? या कशाशीच संबंध नसणाऱ्या 4 भारतीयांना तुम्ही विचारलेत, तर त्यांना 'मूळ' महाभारतातील संदर्भ माहीत असतील का या लेखातील? दुसरं, पुन्हा पुन्हा 'मूळ' म्हणून उल्लेख केला जात आहे म्हणून, हा वाद घालणाऱ्यांना लोककथांमधील रामायण आणि महाभारत नाकारायचं असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. मला मात्र भांडारकरच्या एडिशनइतकीच जनमानसात रुजलेली रामायणे आणि महाभारते जवळची वाटतात. महाभारत आणि रामायणाच्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या संस्कृत एडिशनमधील संदर्भ घेऊन चर्चा करायला मला फार आवडेल. पण इथे त्याचे प्रयोजन मला वाटत नाही. हा रिसर्च पेपर नाही. अगदी मिपावरचा संस्कृत रामायण-महाभारतात प्रक्षिप्त भाग किती, अशा प्रकारची काही चर्चा असणारा धागाही नाही. रामायण-महाभारताचे संदर्भ आले, की ते प्रमाण मानल्या गेलेल्या प्रतीबरहुकूम असले पाहिजेत असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. जर कुणाला वाटत असेल, तर त्याचा आदर आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. अजून एकच- कदाचित बऱ्याच जणांनी इथे केलेले उल्लेख भांडारकरचे आहेत. भांडारकरच्या महाभारत प्रकल्पाला माझ्या स्मृतीप्रमाणे 'क्रिटिकल एडिशन' म्हणतात,'ओरिजिनल महाभारत' नव्हे. तीही लिखित एडिशन आहे, manuscripts चा अभ्यास करून केलेली. Oral महाभारतांचं असं डॉक्युमेंटेशन अजून झालेलं नाही, म्हणून भांडारकरच्या एडिशनचं महाभारत तेच मूळ, असं म्हणणं मला पटत नाही. मला वाटतं माझी बाजू मी शक्य तेवढी मांडलेली आहे. माझ्या मतस्वातंत्र्याचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by पिशी अबोली

पिशी अबोली, मूळ प्रत वापरण्यासंबंधी तुमच्या मतांचा आदर आहे. :-) संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची मूळ प्रत सिद्ध केली होती. त्याप्रमाणे रामायण आणि महाभारताच्या मूळ प्रती सिद्ध करण्याची गरज आहे. बाकी, मूळ प्रतीचा आग्रह धरण्यामागे एक कारण आहे. न घडलेल्या घटनांचा हवाला देऊन राम, कृष्ण, युधिष्ठिरादि पुरुषांची मानखंडना केली जाते. सीता, द्रौपदी यांच्यावर जो अन्याय झाला तो या पुरुषांमुळे अशी काहीशी भावना वाढीस लागण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी मूळ प्रतीचा आधार घेतलेला बरा पडेल (असं माझं मत). आ.न., -गा.पै.

In reply to by पिशी अबोली

लोककथांमधील रामायण आणि महाभारत
लोककथांमधील रामायण महाभारत हे जर मूळ संदर्भांचा विपर्यास करणारे असेल तर ते खोडुन काढावेच लागेल . आणि तसे न करता उगाचच भलत्याच कथा लोककथांच्या नावाखाली पसरवायच्या असतील तर तशा त्या सीमोर मॅडमच्याही मिचाक पसरवता येतीलच की ! महाभारतात १८ पर्वे + रामायणाची ७ कांड एकत्र केले तरीही सीमोर मॅडमची तर २७ कांडांची तुलना होणार नाही .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

मारवा, तुमचा इथला प्रतिसाद आवडला. असंच काहीसं लिहायचं मनात होतं. त्याआगोदर तुम्हीच लिहिलंत! माझे टंकनश्रम वाचवल्याबद्दल आभार! :-) आ.न., गा.पै.


ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं , तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची , आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता >> अजून सगळे प्रतिसाद वाचले नाहीत पण वर्तमानकाळातही भारतीय कायद्यानुसार १. पत्नी ही पतीची मालमत्ता आहे. २. पतीच्या संमतीने पत्नी स्वखुशीने कितीही पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवू शकते. ३. पतीची संमती न घेता पत्नीने इतर पुरषाशी संबंध ठेला तर तो त्या प्रियकराविरुद्ध खटला दाखल करू शकतो. ज्यात ३ महिने कारावास आणि ५००० रुपये शिक्षा आहे.

In reply to by एमी

या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून ही परिस्थिती आहे हे आपले माणूस म्हणून हक्क गृहीत धरणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलापण माहीत नव्हतं. ज्यांना हे कळूनही त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, त्या महाभागांना काही करू शकत नाही. पण काही संवेदनशील पुरुष आयडिंचेही उत्तम प्रतिसाद(अगदी आक्षेपसुद्धा संयमाने नोंदवणारे, असे) बघून ही परिस्थिती काही पिढ्यांनी तरी बदलेल, असा आशावाद बाळगायला हरकत नाही.

In reply to by पिशी अबोली

मलातरी आतापर्यंत एकही अशी विवाहीत/विवाहोत्सुक व्यक्ती भेटली नाही जिने आपण लग्न करुन कोणत्या डिफॉल्ट कायद्यांना संमती देतोय ते माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अथवा माहीत झाल्यावर त्याबद्दल स्वतः काहीतरी अॅक्शन घेतलीय. वरील तीन मुद्द्यांखेरीज लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नसणे, ४९८ अ चा गैरवापर वगैरे मुद्देदेखील मला महत्वाचे वाटतात. 'ही परिस्थिती काही पिढ्यांनी तरी बदलेल, असा आशावाद बाळगायला हरकत नाही' ही मला केवळ निष्क्रियता वाटते. पटत नाही. ज्यांना खरोखरच हे कायदे मान्य नाहीत त्यांनी पर्सनल काँट्रेक्ट करायला चालू करावे.

In reply to by एमी

भारतीय कायद्यानुसार १. पत्नी ही पतीची मालमत्ता आहे. २. पतीच्या संमतीने पत्नी स्वखुशीने कितीही पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवू शकते.
बापरे फारच गंभीर प्रकार दिसतो हा ! जरा योग्य ते कायद्यांचा रेफरन्स देता का ? आपण लगेच ह्याची सत्यासत्यता तपासुन पाहु .
३. पतीची संमती न घेता पत्नीने इतर पुरषाशी संबंध ठेला तर तो त्या प्रियकराविरुद्ध खटला दाखल करू शकतो. ज्यात ३ महिने कारावास आणि ५००० रुपये शिक्षा आहे.
हे कायद्याचे तत्व ऐकुन आहे , एखादी विवाहित स्त्री स्वेच्छेने परपुरुषासोबत संबंध ठेवत असेल तरीही ती निर्दोषच मानली जाते , एकुणच ती बिच्चारी आहे , निष्पाप आहे , विक्टिम आहे असे गृहीत धरुन संबंध ठेवणार्‍या पुरुषालाच शिक्शा होते ! ही बातमी वाचलीत का : 18 वर्षांची तरूणी बनली आई, 12 वर्षाच्या मुलावर गुन्हा http://www.lokmat.com/storypage.php?newsid=17070860&catid=2 बिच्चार्‍या १८ वर्षाच्या निष्पाप स्त्रीला १२ वर्षाच्या क्रुर पुरुषाने कसे बळी पाडले आहे पहा ! दुत्त दुत्त ! एक शक्यता अशीही असु शकते की : बिचार्‍या सी मोअर मॅडम २७ जणांना घोळवत असताना त्यांच्या नवर्‍याने रंगे हाथ पकडले असावे त्यांना . पण कायद्याने सी मोअर मॅडमची स्वेच्छा/ कन्सेंट कोर्टात पुराव्याशिवाय सिध्द करता येणार नाही म्हणुन बिसेट सरांना प्रत्यक्षदर्षी म्हणुन बोलावले असणार अन नंतर बिसेटरावांनी कधीतरी पार्टी चेंज केली असणार. ( फॉर ऑब्वियस रीजन्स ;) ) अशीही शक्यता असु शकतेच की. सी मोअर मॅडम ना कोणी प्रत्यक्ष भेटले नाहीये , त्यामुळे २७ प्रकरणांमध्ये त्यांचा कंसेंट होता कि नव्हता हे कोणीच १००% खात्रीशीर सांगु शकत नाही ! कन्सेंट असुही शकतो , नसुही शकतो , कदाचित सी मोअर मॅडम नवर्‍याच्या विकृत स्वभावाच्या व्हिक्टिम असु शकतात , कदाचित वर्सलीसर महाचालु बायच्कोच्या आतख्याली स्वभावाचे 'बेसिक इन्स्टिंक्ट'चे व्हिक्टिम असु शकतात , ५०%-५०% चान्सेस आहेत. जर शक्यताच नाकारायच्या असतील आणि प्रतिकुल मते मांडणार्‍यांवर असंवेदनशीलतेचा शिक्का मारायचा असेल तर त्यापेक्षा साहित्य कोनाड्यातच ठेवलेले काय वाईट ? , तिकडे प्रतिकुल मते येणाचे चान्सेस कमी ! असोच्च असो. अवांतर : मुळ महाभारत न वाचणार्‍यांसाठी : आदिपर्वात उद्दालक श्वेतकेतु संदर्भात एक उपाख्यान आहे की ज्या मध्ये सर्वप्रथम श्वेतकेतुने विवाहबाह्य संबंधाना निषिध्द ठरवणारी मर्यादा घालुन दिली आहे , त्या पुर्वी आर्षकाळात सर्व स्त्री पुरुष स्वेच्छेने परस्त्रशी/ परपुरुषाशी ऐच्छिकपणे रत होवु शकत होते ! आता बोला !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बापरे फारच गंभीर प्रकार दिसतो हा ! जरा योग्य ते कायद्यांचा रेफरन्स देता का ? आपण लगेच ह्याची सत्यासत्यता तपासुन पाहु . >> भारतीय कायदा कलम ४९७. १८६० सालचा आहे. बेसिकली कोणत्याही जेंडरच्या पार्टनरवर मोनोगमी एन्फोर्स 'केवळ स्पाऊस'च'' करु शकतो. www.ebc-india.com/lawyer/articles/2001v6a3.htm http://m.timesofindia.com/india/Wife-is-private-property-so-no-trespass… माझ्यामते अडल्टरी हा केवळ सिवील गुन्हा असावा क्रिमिनल असू नये. हे कारण मान्य करुन घटस्फोट मिळावा. === लेखात आणि वर कुठल्यातरी प्रतिसादात आलाय तो 'विवाहीत स्त्रिला प्रियकरापासून मुल झाले तरी ते पतीचेच मानण्यात यावे' हा कायदादेखील बहुतेक अजून तसाच आहे. अगदी रिसेंटली कदाचीत बदलला असेल पण बहुतेक नाहीच.

नगरीनिरंजन, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
तुमची संस्कृतीरक्षक (की जातरक्षक?) भूमिका आधीच माहित असल्याने पुढे वाद घालायची इच्छा नाही. चतुरंग यांना समजलेय मला काय म्हणायचेय ते आणि तेवढे मला पुरेसे आहे.
माझ्याशी वाद न घालण्याचा निर्णयाचा आदर आहे. २.
ह्याबद्दलचे माझे अज्ञान मात्र दूर झाले तर बरेच. ह्या लोकांबद्दल थोडक्याततरी लिहावे.
झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर याच परिस्थितीतून पुढे आल्या होत्या. आनंदीबाई पेशवे या मोठ्या हिकमतीच्या होत्या. अधिक वाचनासाठी लेख : http://voiceofdharma.org/books/ohrr/ch07.htm आ.न., -गा.पै.

कोणाच्या म्हशी आणि कोणाला उठाबशी. ती सीमोर, रिचर्ड्स आणि बिसेट आणि कोण कोण असतील ते सगळे मरून शंभराहून जास्त वर्षे झाली. त्यातल्या कोणाला आपण भेटून बोललेलो नाही. त्या काळात इंग्लंडात काय सामाजिक परिस्थिती होती याबद्दलही आपले सगळ्यांचे ज्ञान खरे तर अगाधच. कारण आपण त्याची लांबून सुद्धा कल्पना करू शकत नाही. तरी पण कोणी सिमोरबद्दल भानगडीची बाई इ. उद्गार वाचले. ___/\___ 'शांतता कोर्ट चालू आहे' ची आठवण आली का कोणाला? आताच्या काळचे आणि तेही भारतीय समाजाचे मापदंड सिमोरला लावणे हे विचित्र आहे खरे तर.

In reply to by पैसा

शांतता कोर्ट चालू आहे ची आठवण आलीच! म्हण आवडली. लक्षात ठेवेन. बहुतेक प्रत्येक धाग्यावर हि म्हण लिहिता येईल! :)

In reply to by पैसा

त्यावेळी इंग्लंडातल्या परिस्थितीचे ज्ञान नसताना, आताच्या काळचे आणि तेही भारतीय समाजाचे मापदंड लावून त्यावरून एखाद्या स्त्रीला बदचलन ठरवणे म्हणजे खरंच कोपरापासून __/\__ गमतीची गोष्ट म्हणजे हेच महाशय शहरात राहणाऱ्या लोकांना गावातील जीवनाची कल्पना नसते म्हणून उगाच स्वतावरून दुसऱ्याची परीक्षा करू नये म्हणून ज्ञानामृत पाजत फिरत होते. अवघड आहे.

सिमोर ची कहाणी अत्यंत र्‍हुदयद्रावक आहे. त्यातही काही अगदी "टीप्पीकल मानसिकता" दर्शवणार्‍या प्रतिक्रिया वाचल्यावर वाटले परिस्थितीत अजूनही फारसा फरक पडला नाहीये. असही असू शकेल की, २७ वेळा पर्यंत तिने सारे बिनविरोध सहन केले कारण तोवर तिला बिसेट भेटला नव्हता म्हणून. तिच्या संपर्कातले सारेच पुरूष जर तिच्या पतिसारखेच असतील तर ती विरोध कशासाठी करणार ? आणि कुणाच्या आधारावर करणार? शरीरापलीकडे देखिल काही नाते असू शकते, हे कळल्यावर तिने विरोध करण्याचे धाडस दाखविले असणार. अर्थात या सर्व जर-तर च्या गोष्टी. खरंखोटे काय ते देव जाणे ---

In reply to by मनीषा

त्यातही काही अगदी "टीप्पीकल मानसिकता" दर्शवणार्‍या प्रतिक्रिया वाचल्यावर वाटले परिस्थितीत अजूनही फारसा फरक पडला नाहीये.
एक्झॅक्ट्ली..

पयल्याच शेकड्याखातीर पिशी तुका खुब्ब परबी!! याय!!

लोकहो, आंतरजाळ्यावर थोडा हात मारला तेव्हा काही माहिती गवसली. सोळाव्या शतकाच्या अखेरपासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत इंग्लंडमध्ये पत्नीची विक्री करण्याची पद्धत होती. त्या काळात पती पत्नीस हुंडा देत असे. ही हुंड्याची रक्कम परत मिळावी म्हणून देखील पत्नीची विक्री केली जाई. यावरून लेडी सीमूरच्या बाबतीत काय घडलं असावं याचा अंदाज बांधतो. १. लेडी सीमूरला तिच्या नवऱ्याने २७ वेळा विक्रीसाठी प्रस्तुत केली असावी. तसा संशय घेण्यास वाव आहे. तो मैथुनप्रेक्षी असता तर इतर कुणाचंही मैथुन बघता आलं असतं. बहुतेक त्याने विक्रीसाठी मालाची जाहिरात केली असावी. (प्रॉपर्टीचा अर्थ माल असा होतो. त्याकाळी पत्नी पतीची मालमत्ता समजण्यात येत असे.) २. त्यापैकी मॉरीस बिसेट म्हणून एकजण तिला पसंत पडला. बऱ्याच प्रसंगी नवऱ्यापासून सुटण्यासाठी बायकाच स्वत:ची विक्री करवून घेण्यात पुढाकार घेत. तसा काहीसा आग्रह लेडी सीमूरचा देखील असावा. म्हणूनच बहुधा २७ प्रस्तुतीकरणे घडली. ३. बिसेट आणि वर्सली याचं पैशावरून फाटलं. म्हणून पत्नी चोरल्याचा २०,००० पौंडांचा दावा वर्सलीने बिसेटवर लावला. पण त्यात लेडी सीमूरदेखील अडकली. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात २०,००० पौंड ही खूप म्हणजे खूपंच मोठी रक्कम आहे. ४. या कालावधीत तिचं पाहिलं अपत्य परलोकवासी झालं होतं. म्हणून तिने बिसेटकडून त्यांच्या भावी आयुष्याशी सुसंगत अशी अपत्यप्राप्ती करवून घेतली. ५. मात्र वर्सलीच्या दाव्यामुळे बिसेट आणि ती अडचणीत येणार म्हणून तिने वीसहजार पौंडांचा दावा एक शिलिंगवर आणला. यासाठी तिने अनेक साक्षी काढल्या. ६. २०,००० पौंड मिळणार नाहीत हे कळल्यावर वर्सलीने तिला काडीमोड द्यायचं नाकारलं. केवळ विभक्ती मान्य केली. लग्न करता येणार नाही हे समजल्यावर बिसेटचा तिच्यातला (आणि बहुतेक तिचाही त्याच्यातला) रस संपुष्टात आला. ७. आतापावेतो तिचं इंग्लंडमधलं बाजारमूल्य चांगलंच उणावलं. म्हणून बाईसाहेबांनी प्यारिसास प्रस्थान केलं. पैसे तर तिथेही लागतातंच. म्हणून वर्सलीकडे (उचित) तगादा लावला. ८. अखेरीस वर्सली मेल्यावर बाईसाहेब इंग्लंडला परतल्या. त्याची इस्टेट घेऊन नवा भिडू शोधला. असो. हा केवळ माझा अंदाज आहे. लेडी सीमूरवर अन्याय झाला की नाही हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं आहे. बाई मोठी धडाडीची आहे हे निश्चित. ती घाण्यास जुंपली जाणार होती पण तिने नकार दिला. खरंतर डावंच उलटवला. (She was taen for a ride, but she refused. In fact she turned the tables.) या अर्थी तिची द्रौपदीशी केलेली तुलना उचित वाटते. आ.न., -गा.पै.