मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजला नाही, या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंधच नाही, असे तुणतणे वाजविणाऱ्या पाकिस्तानने अखेर या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजल्याचे मान्य केले. वारंवार खोटे बोलणाऱ्या पाकिस्तानचा खरा (काळा) चेहरा तेथील सरकारने आज स्वत:च जगासमोर उघड केला आहे. मात्र, देशविहीन शक्तींचे (नॉन स्टेट ऍक्टर) हे कारस्थान असून, त्यांनी स्वत:चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे कृत्य केल्याची सारवासारव पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी केली आहे. तसेच रशिया, इटली, स्पेन आणि अमेरिका हे देशही मुंबई हल्ल्याशी संबंधित असून, या देशांतही कटाचा काही भाग शिजला आहे. या देशांप्रमाणेच पाकिस्तान हा एक देश आहे, असेही या मंत्र्याने म्हटले आहे.
मुंबईवरील हल्ला झाल्यानंतर त्यासंबंधीचे पुरावे भारताने पाकिस्तानच्या थोबाडावर फेकले होते. या पुराव्यांनी थोबडा फुटले असतानाही पाक सरकारने वेळोवेळी हात झटकले. हल्लाप्रकरणातील जिवंत पकडला गेलेला आरोपी अजमल कसाबही हा पाकिस्तानी नागरिक नाही, अशी धादांत खोटी भूमिकाही पाकिस्तान सरकारने ठामपणे घेतली होती. मात्र, भारताचे पुरावे भक्कम असल्यामुळे पाकिस्तानला काळवंडलेल्या चेहऱ्याने सत्य कबूल करावे लागले.
मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग होता, असे त्यांनी म्हणणे ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. आता हल्ल्याशी संबंधित आरोपींना ताब्यात मिळविण्यासाठी भारताने तातडीने प्रयत्न करायला हवेत.
वाचने
4099
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरोबर आहे.
एकमेव माणूस
In reply to बरोबर आहे. by सायली पानसे
आरोपींना
दाऊदमुळेच
In reply to आरोपींना by मराठी_माणूस
खरं आहे.
In reply to दाऊदमुळेच by अन्वय
ईथे दुबईत
अरे बुरखा कसला गाxx फाटली हरामखोरा॑ची..
काही बुरखा
ह्या
In reply to काही बुरखा by अभिष्टा
एक नंबरचे
पण ही
सहमत !
व्वा व्वा
In reply to सहमत ! by वाहीदा
डी.पी.शर्मांनी लिहिलेलं आय.एस.आय. च्या कारवाया वाचा.
चूकून
In reply to डी.पी.शर्मांनी लिहिलेलं आय.एस.आय. च्या कारवाया वाचा. by वडापाव
ह्याच
In reply to डी.पी.शर्मांनी लिहिलेलं आय.एस.आय. च्या कारवाया वाचा. by वडापाव
बायनेपणा....
पाकिस्तानचा बुरखा फाट्ला