पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!!?
२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही.
बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथवा हास्यास्पद आहे असे समजले जाते.पण काही पुरुषांना बायकांचे वाईट अनुभव येतात हे खरे आहे.कायद्याचे संरक्षण सर्व बाबतीत स्त्रीला असल्याने पुरुषांना कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न पडतो.काहीही झालं तरी चूक पुरुषाचीच असते असा प्रवाद असल्याने स्त्रीच्या अत्याचाराला बळी पडलेले पुरुष कुठेच दाद मागायला जात नाहीत.
मलाही माझ्या वैयक्तीत आयुष्यात अश्या स्त्रीयांचे वाईट अनुभव आले होते.पैकी खाली काही देत आहे.
अनुभव१
मी कॉलेजला असताना ,२००४ ला पहिल्यांदा मला बायकाही क्रुर वागु शकतात व पुरुषांचा यथेच्य विनयभंग करु शकतात याचा अनुभव आला.झालं होतं असं कि आमच्या केमिस्ट्री लॅब मध्ये एक महिला लॅब अटेडंट होती.एकदा माझ्याकडून practicle चालू असताना महागडा थर्मामीटर फुटला.मला शिव्या बसल्याच पण त्या महिला लॅब अटेंडंट्लाही शाब्दीक मार सर्वांसमोर मिळाला,का ते माहीत नाहि.पण तीने त्या दिवसापासुन मला त्रास द्यायला सुरवात केली.सर्वांसमोर मला तब्येतीवरुन चिडवणे ,practicleला आवश्यक वस्तु देताना सहेतुक स्पर्श करणे ,रोखुण बघणे,माझ्या मित्रांना खाजगित मी तिच्या प्रेमात पडलो आहे असे अप्रत्यक्ष सांगणे असे अनेक प्रकार तिने केले.
तिच्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच नव्हता,दिसायला बरी असली तरी मला तिच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.माझं लक्ष फक्त अभ्यासावर होते.२००४ च्या त्या सहा सात महिण्यात तिच्या harassment चा व unwanted sexual advancesचा मला मानसिक त्रास झाला.मित्र म्हणायचे एंजॉय कर,पण आवडत नसलेल्या बाईची नकोशी जवळीक एंजॉय कशी करायची.तक्रार करायला गेलो असतो तर मीच तिला exploit करतोय असा अर्थ लगेच काढला गेला असता,ते मला नको होते.ति तेव्हा तिशीत होती ,मॅरीड होती.पण स्त्री असुन इतकी सायकोपॅथिक कशी हा प्रश्न मला अजुनही पडतो.
अनुभव २
एकदा महामंडळाच्या लालडब्याने प्रवास करताना एक मध्यमवयीन महीला माझ्या शेजारी येऊन बसली.बस कधी सुटणार वगैरे चौकश्या करायच्या त्यातिच्या माझ्याकडे करुन झाल्या.बस सुटल्यावर यथावकाश बसमधले दिवे घालवल्यावर तिने मला खेटायला सुरवात केली,असेल चालू म्हणुन मी दुर्लक्ष केले .पण तिने चक्क त्या अंधारल्या बसमध्ये माझा हात हातात घेतला .मध्यममार्गी व पांढरपेशा मानसिकतेमुळे मी ओशाळलो.हात झटकम सोडवून घेतला व सीट बदलुन बसलो.तिचा स्टॉप आल्यावर तिने वळुन माझ्याकडे बघितले ,व ' मी फार काही गमावले ,असा हसरा कटाक्ष टाकून निघुन गेली.तिच्या अश्या वागण्याने मला त्या प्रसंगात काही सुचले नाही..आपणच संधी गमावली का ? असा एक पुरुषी विचारही मनात येऊन गेला .पण पांढरपेशी मानसिकता असल्याने गप्प राहीलो.
अनुभव ३
आमच्या इथल्या एका नवीन शॉपिंग सेंटरमधे गेलो होतो,खरेदी झाल्यावर काउंटरपाशी आलो.काउंटरवर एक मुलगी बसली होती.
काउंटरवरची ती-( हसुन) आवडले तुम्हाला?
मी- काय ते?
ती- (डोळ्यात रोखुन बघत)आमचे शॉपिंग सेंटर?
मी- हं,बिल करताय ना?
ती-( माझ्या डोळ्याशी भिडवलेले डोळे न हलवता) करतेय की!
मी- कीती झाले?
ती- (लाडात येऊन) लीहलेय की त्याच्यावर!
मी बिल देऊन पुढे गेल्यावर मागे वळुण पाहिले, तिने शेजारच्या काऊंटरवरच्या टगीला टाळी दिली व कसा नजरेने गार केला' असा भाव चेहर्यावर आणला.
तर मंडळी पुरुषांचाही विनयभंग होतो.एक स्त्री तो करु शकते.आज स्त्री सुरक्षेविषयी काथ्याकुट होत असताना ही बाजुही पुढे आलि पाहिजे असे वाटल्याने अनेक अनुभवापैकी हे काही अनुभव शेअर केलेत.आपल्याला आवडलेल्या स्त्रीचा सहवास मिळावा असे मला वाटायचे / वाटते,तसा तो मिळालाही.पण हे unwanted sexual advances ही वाट्याला आले.मान्य, स्त्री इतका पुरुषांना याचा त्रास होत नाही ,पण आखीर मर्द भी इन्सान होता है ना.त्याचि काळजि करणारे कुणीच नाही,तसे कायदे नाहीत हे पाहुन खेद वाटल्याशिवाय रहात नाहि.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इथेही काही आगाऊ मिपाबायका
अहो
बाकी हे शॉपिंग सेंटर आहे कुठे
+६६१११११११११११६१
लुनावाले ब्रह्मे कि काय
टॅफीजी
मी बिल देऊन पुढे गेल्यावर
टिंगल
एक्झॅक्टली
ही टायटल्स कशी वाटतात ?
लोल
लोल एक्झॅक्टली
बाई बाटली मटणाची
अरेरे
निर्भयाच्या बाबतीत घडलेली
अहो निओ१ ,निर्भयाच्या
मग ?? असे समजू की तुमच्यामुळे
त्यांनी आधीच डोके चालत नाही
डोके
१. हे अनुभव एकाच व्यक्तीला
तुमच्या अनुभवांवरून तुम्ही
मटणाचा पुतळा
कामभावना आणि करुणा यांचा सहभाग असावा.
स्त्री अथवा पुरुष कोणीही असेल
असं कसं असं कसं
त्यानिमित्ताने हा व्हिडो
आवर्जून बघा. एखादी मुलगी
उगी, उगी ! त्या टग्या
=)))) टग्या बायका!
तुम्ही जर चेमिस्ट्री केली तर
छळ मांडीला......
टरब्या...
मांडीला छळ वाटत असेल तर
मिपाकरांचा..
पुरुषांचाही विनयभंग होतो?
पुरुषांच्या विनयभंगावर उपाय
काही अनुभव
सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ता
काहीही...
स्त्री पुरुष संबंध म्हणजे
स्पर्ष करणारी स्त्रीच्या भावनांचा आदर
इथे त्या मैत्रीणीच्य भावना
कोणताही निष्कर्ष धोकाधायक असू शकतो.
मी आधीच लिहिले आहे की ती
विनयभंगाचं माहित नाही; पण
`फ्लर्ट करणे` ह्याला मराठीत
फ्लर्ट = प्रणयाधाराण