✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!!?

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी
गुरुवार, 12/01/2016 - 20:29  ·  लेख
लेख
२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही. बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथवा हास्यास्पद आहे असे समजले जाते.पण काही पुरुषांना बायकांचे वाईट अनुभव येतात हे खरे आहे.कायद्याचे संरक्षण सर्व बाबतीत स्त्रीला असल्याने पुरुषांना कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न पडतो.काहीही झालं तरी चूक पुरुषाचीच असते असा प्रवाद असल्याने स्त्रीच्या अत्याचाराला बळी पडलेले पुरुष कुठेच दाद मागायला जात नाहीत. मलाही माझ्या वैयक्तीत आयुष्यात अश्या स्त्रीयांचे वाईट अनुभव आले होते.पैकी खाली काही देत आहे. अनुभव१ मी कॉलेजला असताना ,२००४ ला पहिल्यांदा मला बायकाही क्रुर वागु शकतात व पुरुषांचा यथेच्य विनयभंग करु शकतात याचा अनुभव आला.झालं होतं असं कि आमच्या केमिस्ट्री लॅब मध्ये एक महिला लॅब अटेडंट होती.एकदा माझ्याकडून practicle चालू असताना महागडा थर्मामीटर फुटला.मला शिव्या बसल्याच पण त्या महिला लॅब अटेंडंट्लाही शाब्दीक मार सर्वांसमोर मिळाला,का ते माहीत नाहि.पण तीने त्या दिवसापासुन मला त्रास द्यायला सुरवात केली.सर्वांसमोर मला तब्येतीवरुन चिडवणे ,practicleला आवश्यक वस्तु देताना सहेतुक स्पर्श करणे ,रोखुण बघणे,माझ्या मित्रांना खाजगित मी तिच्या प्रेमात पडलो आहे असे अप्रत्यक्ष सांगणे असे अनेक प्रकार तिने केले. तिच्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच नव्हता,दिसायला बरी असली तरी मला तिच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.माझं लक्ष फक्त अभ्यासावर होते.२००४ च्या त्या सहा सात महिण्यात तिच्या harassment चा व unwanted sexual advancesचा मला मानसिक त्रास झाला.मित्र म्हणायचे एंजॉय कर,पण आवडत नसलेल्या बाईची नकोशी जवळीक एंजॉय कशी करायची.तक्रार करायला गेलो असतो तर मीच तिला exploit करतोय असा अर्थ लगेच काढला गेला असता,ते मला नको होते.ति तेव्हा तिशीत होती ,मॅरीड होती.पण स्त्री असुन इतकी सायकोपॅथिक कशी हा प्रश्न मला अजुनही पडतो. अनुभव २ एकदा महामंडळाच्या लालडब्याने प्रवास करताना एक मध्यमवयीन महीला माझ्या शेजारी येऊन बसली.बस कधी सुटणार वगैरे चौकश्या करायच्या त्यातिच्या माझ्याकडे करुन झाल्या.बस सुटल्यावर यथावकाश बसमधले दिवे घालवल्यावर तिने मला खेटायला सुरवात केली,असेल चालू म्हणुन मी दुर्लक्ष केले .पण तिने चक्क त्या अंधारल्या बसमध्ये माझा हात हातात घेतला .मध्यममार्गी व पांढरपेशा मानसिकतेमुळे मी ओशाळलो.हात झटकम सोडवून घेतला व सीट बदलुन बसलो.तिचा स्टॉप आल्यावर तिने वळुन माझ्याकडे बघितले ,व ' मी फार काही गमावले ,असा हसरा कटाक्ष टाकून निघुन गेली.तिच्या अश्या वागण्याने मला त्या प्रसंगात काही सुचले नाही..आपणच संधी गमावली का ? असा एक पुरुषी विचारही मनात येऊन गेला .पण पांढरपेशी मानसिकता असल्याने गप्प राहीलो. अनुभव ३ आमच्या इथल्या एका नवीन शॉपिंग सेंटरमधे गेलो होतो,खरेदी झाल्यावर काउंटरपाशी आलो.काउंटरवर एक मुलगी बसली होती. काउंटरवरची ती-( हसुन) आवडले तुम्हाला? मी- काय ते? ती- (डोळ्यात रोखुन बघत)आमचे शॉपिंग सेंटर? मी- हं,बिल करताय ना? ती-( माझ्या डोळ्याशी भिडवलेले डोळे न हलवता) करतेय की! मी- कीती झाले? ती- (लाडात येऊन) लीहलेय की त्याच्यावर! मी बिल देऊन पुढे गेल्यावर मागे वळुण पाहिले, तिने शेजारच्या काऊंटरवरच्या टगीला टाळी दिली व कसा नजरेने गार केला' असा भाव चेहर्यावर आणला. तर मंडळी पुरुषांचाही विनयभंग होतो.एक स्त्री तो करु शकते.आज स्त्री सुरक्षेविषयी काथ्याकुट होत असताना ही बाजुही पुढे आलि पाहिजे असे वाटल्याने अनेक अनुभवापैकी हे काही अनुभव शेअर केलेत.आपल्याला आवडलेल्या स्त्रीचा सहवास मिळावा असे मला वाटायचे / वाटते,तसा तो मिळालाही.पण हे unwanted sexual advances ही वाट्याला आले.मान्य, स्त्री इतका पुरुषांना याचा त्रास होत नाही ,पण आखीर मर्द भी इन्सान होता है ना.त्याचि काळजि करणारे कुणीच नाही,तसे कायदे नाहीत हे पाहुन खेद वाटल्याशिवाय रहात नाहि.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
11250 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

इथेही काही आगाऊ मिपाबायका

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/01/2016 - 20:32 नवीन
इथेही काही आगाऊ मिपाबायका आहेत म्हणे, सांभाळून रहा =))
  • Log in or register to post comments

अहो

Deserter
गुरुवार, 12/01/2016 - 20:36 नवीन
किती फेकाल काय मर्यादा आहे की नाही
  • Log in or register to post comments

बाकी हे शॉपिंग सेंटर आहे कुठे

अभिजित - १
गुरुवार, 12/01/2016 - 20:38 नवीन
बाकी हे शॉपिंग सेंटर आहे कुठे ? पत्ता टाका कि .,.
  • Log in or register to post comments

+६६१११११११११११६१

टवाळ कार्टा
गुरुवार, 12/01/2016 - 21:13 नवीन
+६६१११११११११११६१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

लुनावाले ब्रह्मे कि काय

सामान्य वाचक
गुरुवार, 12/01/2016 - 21:04 नवीन
त्यांच्या वरही बऱ्याच मुली भाळायच्या म्हणे
  • Log in or register to post comments

टॅफीजी

पगला गजोधर
गुरुवार, 12/01/2016 - 21:09 नवीन
टॅफीजी आता तुमच्यासाठी माझे 2 प्रश्न 1. तुमच्याकडे स्वतःची एखादी जुनी लुना आहे का ? 2. तुमचे आडनाव "ब्रम्हे" आहे का ? तुम्ही किंवा एखाद्या नातेवाईकाने, मुक्तपीठमधे काही लेख लिहीलेले का ?
  • Log in or register to post comments

मी बिल देऊन पुढे गेल्यावर

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/01/2016 - 21:10 नवीन
मी बिल देऊन पुढे गेल्यावर मागे वळुण पाहिले, तिने शेजारच्या काऊंटरवरच्या टगीला टाळी दिली व कसा नजरेने गार केला' असा भाव चेहर्यावर आणला.
त्या दुकानात गेला होता त्यावेळी चुकुन तुमचं पोस्ट उघडं होतं का हो? बहुतेक ते उघडं असावं म्हणूनच त्या महिला तुमची फिरकी घेत असाव्यात. तुम्हाला वाटलं की त्या आपल्या विनयभंग करताहेत. पण त्या तुमच्या पोस्टाकडे बघून टिंगल करत असाव्यात. असो. बाहेर जाताना यापुढे काळजी घ्या.
  • Log in or register to post comments

टिंगल

कानडाऊ योगेशु
Fri, 12/02/2016 - 13:33 नवीन
मी चुकुन लिंगल असे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एक्झॅक्टली

इरसाल
गुरुवार, 12/01/2016 - 21:32 नवीन
अनोळखी मुलीला स्वतःच्या लुनावर बसवुन वर ४००० (त्या काळात ) देणारे ब्र्ह्मे....हेच ते.
  • Log in or register to post comments

ही टायटल्स कशी वाटतात ?

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 12/01/2016 - 21:36 नवीन
आत्महत्या ते विनयभंग......एक प्रवास...... स्किझोफ्रेनिया....एक आभास..... रामन राघव....एक त्रास...... हागणदारीमुक्त मिपा...एक आस.... (कॉपीराईट विकत घ्यावा लागेल...इच्छुकांनी नोंद घेणे !)
  • Log in or register to post comments

लोल

खटपट्या
गुरुवार, 12/01/2016 - 22:11 नवीन
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

लोल एक्झॅक्टली

वरुण मोहिते
गुरुवार, 12/01/2016 - 22:22 नवीन
टफी तुमचा नंबर द्या ना .. साताऱ्याला येऊ मटण खाऊ . मज्जा करू. तुमची ओळख आहे तिथल्या मॉल ला पण जाऊ . मजा येईल मस्त पिकनिक होईल . बाई बाटली मटणाची ताटली ..हाय काय नाय काय .सगळे प्रश्न पण सोडवू .नंबर पाठवा ना पण . भेटूया आपण .
  • Log in or register to post comments

बाई बाटली मटणाची

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 12/01/2016 - 22:33 नवीन
बाई बाटली मटणाची ताटली>>>>>>> नको,माणसानं चारित्र्यशील असावे,तरच तुमचा आदर राखला जातो.
  • Log in or register to post comments

अरेरे

सूड
गुरुवार, 12/01/2016 - 22:51 नवीन
अरेरे
  • Log in or register to post comments

निर्भयाच्या बाबतीत घडलेली

निओ१
गुरुवार, 12/01/2016 - 22:52 नवीन
निर्भयाच्या बाबतीत घडलेली घटना व इतर तुमच्यासोबत घडलेल्या घटना याची जुळणा पटत नाही मनाला. ती अतिशय क्रुर अशी घटना होती व त्यामुळे किमान स्त्री-अस्तित्वाबद्दल एक सकारात्मक चर्चा घडली देशभरामध्ये व त्या मुलीला/स्त्रीला ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याबद्दल क्षणमात्र विचार न करता आपल्या अनुभवासोबत तुम्ही ती घटना जोडावी व कोणीच त्याबदल तुम्हाला जाब विचारु नये याचे जास्त नवल वाटत आहे. येथे जे संपादक आहेत त्यांना काय रुल्स आहेत? काय नियम आहेत म्हणजे ते कधी कार्यरत होतात ?
  • Log in or register to post comments

अहो निओ१ ,निर्भयाच्या

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गुरुवार, 12/01/2016 - 23:06 नवीन
अहो निओ१ ,निर्भयाच्या प्रकरणानंतर जे पिटीशन आले होते ते मी साईन केले होते व PMO ला पाठवले होते.ज्याद्वारे स्त्री सुरक्षेविषयी कायदे कडक केले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

मग ?? असे समजू की तुमच्यामुळे

निओ१
गुरुवार, 12/01/2016 - 23:12 नवीन
मग ?? असे समजू की तुमच्यामुळे कायदे झाले? अरे मित्रा, तुम्ही बुद्धी कुठे गेली? चांगले वाईट यातील भेद तरी उमजतो आहे का तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

त्यांनी आधीच डोके चालत नाही

वगिश
Fri, 12/02/2016 - 00:34 नवीन
त्यांनी आधीच डोके चालत नाही हे स्पष्ट केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

डोके

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 12/02/2016 - 08:02 नवीन
डोके चालो न चालो, ह्याच्या सृजनशीलतेला सलाम... __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश

१. हे अनुभव एकाच व्यक्तीला

पुष्कर जोशी
Fri, 12/02/2016 - 08:14 नवीन
१. हे अनुभव एकाच व्यक्तीला आलेले नसावेत ... २. हे अनुभव भारतातील नसावेत ३. हे कोणत्या तरी ईंग्रजी फोरम चे भाषांतर असावे. होय ना ..!?
  • Log in or register to post comments

तुमच्या अनुभवांवरून तुम्ही

याॅर्कर
Fri, 12/02/2016 - 09:37 नवीन
तुमच्या अनुभवांवरून तुम्ही मदनाचा पुतळा आहात असे भासते.
  • Log in or register to post comments

मटणाचा पुतळा

मिनेश
Fri, 12/02/2016 - 16:38 नवीन
मटणाचा पुतळा आहेत ते. कारण बुद्धी आधीच निघून गेलीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

कामभावना आणि करुणा यांचा सहभाग असावा.

कलंत्री
Fri, 12/02/2016 - 09:39 नवीन
स्त्री अथवा पुरुष कोणीही असेल / असो, विरुद्धलिंगी व्यक्तिने कधीही सुचक अथवा सरळ सरळ आपल्या इच्छा व्यक्त केल्या असेल तर, आपला तो सन्मान समझावा आणि आपण किती सामान्य असूनही त्या व्यक्तिने नकळतच आपल्या अस्मिता अथवा अंहकाराला खतपाणीच घातले आहे असा भाव असु द्यावा. शेवटी आपण सर्व वासना<च्या आधिन आहोत याचे साक्षिदार म्हणून त्या त्या व्यक्तिबद्दल करुणाही वाटली पाहिजे.
  • Log in or register to post comments

स्त्री अथवा पुरुष कोणीही असेल

सूड
Fri, 12/02/2016 - 15:41 नवीन
स्त्री अथवा पुरुष कोणीही असेल / असो, विरुद्धलिंगी व्यक्तिने कधीही सुचक अथवा सरळ सरळ आपल्या इच्छा व्यक्त केल्या असेल तर, आपला तो सन्मान समझावा
सहमत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

असं कसं असं कसं

टवाळ कार्टा
Fri, 12/02/2016 - 15:54 नवीन
असं कसं असं कसं स्त्रीने असे केले तर ते पुरुषाला आकर्षित करण्यासाठीचे विभ्रम आणि पुरुषाने असे केले तर तो विनयभंग अशी साधी सरळ व्याख्या माहित नाही अज्जून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

त्यानिमित्ताने हा व्हिडो

सूड
Fri, 12/02/2016 - 16:34 नवीन
त्यानिमित्ताने हा व्हिडो आठवला. पोरींच्या जीभेवर जी काही सरस्वती नाचत्ये की बस रे बस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आवर्जून बघा. एखादी मुलगी

सूड
Fri, 12/02/2016 - 17:04 नवीन
आवर्जून बघा. एखादी मुलगी जेव्हा "तिच्याकडे काय बघतो रे" विचारते; तेव्हा त्यात "माझ्याकडे का बघत नाहीस" असा छुपा अर्थ असतो हे दाखवणारा प्रचंड हास्यास्पद व्हिडिओ आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

उगी, उगी ! त्या टग्या

सस्नेह
Fri, 12/02/2016 - 11:49 नवीन
उगी, उगी ! त्या टग्या बायकांचं घर आपण उन्हात बांधू हं. तुम्ही असं करा, उद्यापासून बुरखा घेऊन बाहेर जात जा अं ! कोणी काही करणार नाही, मग !
  • Log in or register to post comments

=)))) टग्या बायका!

अजया
Fri, 12/02/2016 - 16:17 नवीन
=)))) टग्या बायका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तुम्ही जर चेमिस्ट्री केली तर

एकुलता एक डॉन
Fri, 12/02/2016 - 12:35 नवीन
तुम्ही जर चेमिस्ट्री केली तर तुम्हाला शॉपिंग माल कसे लारवाडु शकता ?
  • Log in or register to post comments

छळ मांडीला......

भम्पक
Fri, 12/02/2016 - 12:52 नवीन
अरे टरब्या जरा गप पड ना यार . लय पकवतो बाबा तू.
  • Log in or register to post comments

टरब्या...

पाटीलभाऊ
Fri, 12/02/2016 - 13:17 नवीन
हाहाहा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भम्पक

मांडीला छळ वाटत असेल तर

आदूबाळ
Fri, 12/02/2016 - 13:32 नवीन
मांडीला छळ वाटत असेल तर स्टरेच बँडेज लावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भम्पक

मिपाकरांचा..

पाटीलभाऊ
Fri, 12/02/2016 - 13:59 नवीन
सध्या मिपाकरांचा (अ)विनय(कायदे)भंग चालू आहे, तो कसा कमी करता येईल ???
  • Log in or register to post comments

पुरुषांचाही विनयभंग होतो?

प्रसाद गोडबोले
Fri, 12/02/2016 - 14:27 नवीन
पुरुषांचाही विनयभंग होतो? >>> होतो ना , कोण म्हणते होत नाही ? कालच परत एकदा व्हिडिओ पाहिला , "फ्रॉम डॉन टिल ड्स्ट" ह्या चित्रपटात सलमादीदींनी क्वांन्टिनरावांचा कसला विनयभंग केला आहे ... दुत्त दुत्त ...
  • Log in or register to post comments

पुरुषांच्या विनयभंगावर उपाय

गामा पैलवान
Fri, 12/02/2016 - 16:11 नवीन
टफि, तुम्ही म्हणता ते खरंय. एकंदरीत पुरुषांनी इतकं नीतिमान राहायला हवं की विनयभंग करायची कुण्या स्त्रीची छाती झाली नाय पाहिजे. (द्व्यर्थ अनभिप्रेत). आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

काही अनुभव

मराठी कथालेखक
Fri, 12/02/2016 - 16:14 नवीन
मुलीकडून sexual advances चा अनुभव मलाही आहे. पण ती मुलगी स्वभावाने वाईट नव्हती किंवा तिचा कुटील हेतू नव्ह्ता म्हणून दुर्लक्ष केले. कुणा मुलीने पाहताक्षणी प्रेमात पडावं वा तिला मी आवडावं असं का॑ही माझं व्यक्तीमत्व नाही. ऑर्कुट्च्या जमान्यात एका मुलीशी ओळख झाली होती. शिकलेली आणि स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी होती. आम्ही काही वेळा भेटलो. भेटल्यावर काहीना काही निमित्ताने हाताला खांद्याला स्पर्श करणे , रस्ता ओलांडताना हात पकडणे ई. ती काही विशेष सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ता. पण तिचा काही त्रासही नव्ह्ता म्हणून दुर्लक्ष केले. पुढे माझ्या फ्रेंडलिस्ट मधील माझ्या एका मित्रावर तिची नजर गेली. तो माझा चांगला मित्र होता (आणि आहे). त्याचे फोटो तिला आवडलेत. त्याच्याशी ओळख करुन दे असा तिने हट्ट केला. मग मी त्यांचि ऑर्कुटवरुनच ओळख करुन दिली. त्यावेळी तो भारताबाहेर होता. नंतर एकदा सुटीत आल्यावर आम्ही तिघे भेटलो. पण मी मुद्दामच उशीरा गेलो. हॉटेलात जेवणानंतर ती निघून गेली. मग मित्राने मला सांगितले की ती मुद्दामच स्पर्श करत होती वगैरे...मी त्याला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.
  • Log in or register to post comments

सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ता

कलंत्री
Mon, 12/05/2016 - 12:19 नवीन
हे आवडले नाही. बाह्य सौंदर्यावर आपण किती दिवस लक्ष देणार आहो? स्त्री पुरुष संबंध म्हणजे स्पर्षही नको असा निकष कसा ठेवता येईल? २० /२५ वर्षापूर्वी माझ्या वहिनींना मी डबलसिट नेणे टाळत असे कारण स्पर्ष घडतो. हे मी माझ्या एका मित्राला सांगितल्यानंतर त्याने माझी चांगली कान उघाडणी केली. एक स्त्री ही स्त्री आहे हे तिच्यासाठी पुरेसे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

काहीही...

मराठी कथालेखक
Mon, 12/05/2016 - 13:05 नवीन
वा वा..स्त्रीने विनाकारण स्पर्श केला तर पुरुषाने समजून घ्यावे आणि हेच पुरुषाने केले तर ? आणि तसंही आम्ही फार जास्त वेळा भेटलो नाही, त्यामुळे मी त्या गोष्टीचा बाउ केला नाही. तसेच तिच्याशी मैत्रीही तोडली नाही. आजही ती माझ्या फेसबूकच्या फ्रेंडलिस्ट मध्ये आहे आणि तिला हवं तेव्हा ती मला फोनही करते.
एक स्त्री ही स्त्री आहे हे तिच्यासाठी पुरेसे नाही का?
तिच्यासाठी ते पुरेसं आहेच की. पण तुम्ही हे वाक्य इथे नेमकं का म्हंटलंय ते सांगा. मग मी उत्तर देतो.
बाह्य सौंदर्यावर आपण किती दिवस लक्ष देणार आहो?
हे तुम्ही माझ्या
ती काही विशेष सुंदर नव्हती आणि मला तिच्यात तसा काही रस नव्ह्ता
या वाक्यामुळे म्हंटलंय का ? बाह्य सौंदर्यामुळे एखादी मुलगी आकर्षक वाटते, तिच्याविषयी ओढ निर्माण होते तर हे स्वाभाविकच आहे ना. आणि तसेच सुंदर नसल्याने एखाद्या मुलीबद्दल 'तसे' काही आकर्षण निर्माण झाले नाही तर त्यात काय चूक ? जबरदस्तीने तर आकर्षण वाटून घेता येत नाही ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

स्त्री पुरुष संबंध म्हणजे

मराठी कथालेखक
Mon, 12/05/2016 - 13:08 नवीन
स्त्री पुरुष संबंध म्हणजे स्पर्षही नको असा निकष कसा ठेवता येईल?
निकष ठरवण्याचे अधिकार कुणाकडे ? फक्त स्त्रीकडेच का ? एखाद्या मुलीला/स्त्रीला आवडत नसेल तर साधा हँडशेकही टाळला जातोच ना ? मग असाच एखादा आगंतुक/न आवडणारा स्पर्श टाळण्याचा /त्यास विरोध करण्याचा हक्क पुरुषालाही आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

स्पर्ष करणारी स्त्रीच्या भावनांचा आदर

कलंत्री
Mon, 12/05/2016 - 15:10 नवीन
हा मुद्दा प्रत्येकाच्या आकलन, अनुभवाने आणि अपेक्षानेच सिद्ध होऊ शकतो. सरसकट विधाने करता येणार नाही हे मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

इथे त्या मैत्रीणीच्य भावना

मराठी कथालेखक
Mon, 12/05/2016 - 15:14 नवीन
इथे त्या मैत्रीणीच्य भावना स्पष्ट होत्या. माझं राहू द्या हव तर. निदान माझ्या मित्राच्या बाबतीत तरी त्याचे फोटो पाहून म्हणजे बाह्य रुप पाहूनच ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. त्यामुळे आकर्षणाच्या प्रभावामुळेच ती असे स्पर्श करीत होती हे नाकारता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

कोणताही निष्कर्ष धोकाधायक असू शकतो.

कलंत्री
Mon, 12/05/2016 - 15:26 नवीन
(माझे वय ५२आहे.) कामभावनेच्या संदर्भातील कोणताही निष्कर्ष हा त्या व्यक्तिवर कधीकधी अन्यायकारक अथवा आपले आकलन अपूरे आहे असे दाखवू शकतो. मानवी संबंधात मी एकच तत्त्व वापरतो की १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपाराध्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. माझे वय यासाठी लिहिले की जगाचा बरा आणि वाईट असा अनुभव गाठीशी आहे. बाकी आपण प्रगल्भ आहात हे मी जाणतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मी आधीच लिहिले आहे की ती

मराठी कथालेखक
Mon, 12/05/2016 - 15:40 नवीन
मी आधीच लिहिले आहे की ती मुलगी तशी वाईट नव्ह्ती किंवा तिचा हेतू पण काही वाईट नव्ह्ता म्हणून मी या गोष्टीचा बाऊ केला नाही. मित्रालाही तोच सल्ला दिला. पण तिच्याकडून असे अगंतूक स्पर्श मला आवडले नव्हते. जर आम्ही वरचेवर भेटलो असतो तर मात्र मला तिला कदाचित स्पष्टपणे सांगावच लागलं असतं. बाकी समोरच्याचा हेतू काहीही असला किंवा त्याबाबतचे माझे आकलन कितीही अपुरे असले तरी तिची आपल्या बाबत एखादी कृती "ना आवडण्याचा" वा त्या कृतीस विरोध करण्याचा माझा अधिकार तुम्ही प्रगल्भपणे मान्य कराल अशी अपेक्षा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

विनयभंगाचं माहित नाही; पण

वेल्लाभट
Mon, 12/05/2016 - 15:50 नवीन
विनयभंगाचं माहित नाही; पण तुमचा 'विवेक'भंग नक्कीच झालाय. त्याबद्दल खेद वाटतो.
  • Log in or register to post comments

`फ्लर्ट करणे` ह्याला मराठीत

साहना
Tue, 12/06/2016 - 02:16 नवीन
`फ्लर्ट करणे` ह्याला मराठीत विनयभंग म्हणतात का ? माझ्या मते विनयभंग मध्ये शारीरिक जबरदस्ती अभिप्रेत आहे. "विनयभंग" हा शब्द lightly वापरल्याने कदाचित ज्या महिलांना आणि पुरुषांना खरोखर शारीरिक जबरदस्ती सहन करावी लागते त्यांच्या समस्यांना आपण कमी कमी लेखत आहात असा आभास होतो. तुम्हाला कदाचित विनोद बुद्धीने लिहावे असे वाटले असेल पण "विनयभंग" हा शब्द कदाचित चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments

फ्लर्ट = प्रणयाधाराण

कलंत्री
Tue, 12/06/2016 - 10:29 नवीन
हा शब्द योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा