✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नगरपालिका निवडणुका २०१६.

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी
Sun, 11/27/2016 - 11:18  ·  लेख
लेख
महाराष्ट्रात सध्या नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान चालू आहे.२०१४ साली झालेले सत्तांतर ,त्यात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेलेला जनाधार.अच्छे दिनची दाखवलेली स्वप्ने ,या पार्श्वभुमीवर या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या निवडणुका १६४ ठीकाणी होत आहेत ,या निवडणुकांचे निकाल लगेच उद्या लागणार आहेत ,त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.जे मतदार आहेत त्यांनी जरुर आपला मतदानाचा हक्क बजवावा.धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10603 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

कोण देश बंद करायला निघालं

संदीप डांगे
Tue, 11/29/2016 - 21:12 नवीन
कोण देश बंद करायला निघालं होतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

@ गुरुजी

वरुण मोहिते
Wed, 11/30/2016 - 15:25 नवीन
पॉलिटिक्स पेशन्स गेम आहे .. त्यामुळे कोणाचीही दुकान, पक्ष बंद होणार नाही आहेत . २०१९ चा निष्कर्ष लगेच काढू नये . अवांतर _ राज ठाकरे हुशार आहे पण त्याच्या आजूबाजूंच्या लोकांमुळे त्याची धोरणं चुकली . त्यात अहंकार . त्यांना २-३ वेळा भेटलो आहे म्हणून सांगतोय .वय हि त्यांची जमेची बाजू . त्यामुळे आताच काही सांगता येणार नाही .
  • Log in or register to post comments

राज ठाकरे हुशार आहे

कपिलमुनी
Wed, 11/30/2016 - 16:43 नवीन
यावर एकदा लिहाच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

माणूस हुशार आहेच हो, धंद्यात!

संदीप डांगे
Wed, 11/30/2016 - 18:58 नवीन
माणूस हुशार आहेच हो, धंद्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

दोन्ही ठाकरे अत्यंत अहंकारी

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/01/2016 - 15:49 नवीन
दोन्ही ठाकरे अत्यंत अहंकारी आहेत. दोघांचाही स्वतःच्या पक्षाच्या ताकदीबद्दल प्रचंड गैरसमज आहे. दोघेही पोकळ बढाया मारण्यात पटाईत आहेत. दोघेही बेताल बोलण्यात अव्वल आहेत. राज ठाकरेंच्या अत्यंत धरसोड धोरणांमुळे त्या पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. नगरपालिका निवडणुकीत तब्बल २८०० हून अधिक नगरसेवकांपैकी मनसेचे जेमतेम १६ नगरसेवक निवडून आले. सुरवातीला स्थापना झाल्यावर काही काळ मनसे काँग्रेसला पाठिंबा देत होती. काही काळ सेनेला तर काही काळ भाजपला पाठिंबा दिला. २०१४ पासून नाशिक, नगर, पुणे इ. ठिकाणी राष्ट्रवादी व मनसेने एकमेकांना पाठिंबा दिलेला आहे. मनसेने कोणताही मुद्दा फार काळ उचलून धरला नाही. टोलबंदी असो किंवा मराठी कार्ड असो, काही दिवस मुद्दा उचलून हवा निर्माण करणे व नंतर थंड बसून राहणे हेच मनसेने आतापर्यंत केले आहे. त्यामुळे मनसेला मतदारांनी संपूर्ण नाकारले आहे. २००९ च्या निवडणुकीत सेनेची मते कापणे या महान कार्यासाठी मनसेचा जन्म झाला होता. २००९ मध्ये मनसेमुळे भाजप-सेना युतीच्या तब्बल ६-८ खासदारांचा व ३८ आमदारांचा पराभव झाला होता. मनसे नसती तर २००९ मध्ये महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे सरकार आले असते. त्यानंतर मनसेचे अवतारकार्य संपले. भविष्यात मनसेची स्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यांच्या दुकानाच्या फळ्या केव्हाच लागल्या आहेत. आता फक्त टाळा लावायचे शिल्लक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

त्यांचे ते बघतील, तुम्ही का

संदीप डांगे
गुरुवार, 12/01/2016 - 16:01 नवीन
त्यांचे ते बघतील, तुम्ही का अस्वस्थ होताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आमचे गुरुजी

वरुण मोहिते
गुरुवार, 12/01/2016 - 16:05 नवीन
शतप्रतिशद भाजप आहेत .म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्यांचं ते बघतील, आमचं आम्ही

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/01/2016 - 20:26 नवीन
त्यांचं ते बघतील, आमचं आम्ही बघू. तुम्हाला काय त्रास होतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नै, हाच प्रश्न तुम्ही मला

संदीप डांगे
गुरुवार, 12/01/2016 - 20:45 नवीन
नै, हाच प्रश्न तुम्ही मला दुसऱ्या धाग्यावर विचारला होता, म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरोबर ना. तिथे तुम्ही शोबाजी

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/01/2016 - 20:54 नवीन
बरोबर ना. तिथे तुम्ही शोबाजी वगैरे म्हणत होता, इतरांना भाट, भक्त वगैरे म्हणत होता. म्हणूनच विचारलं होतं. इथे मला कोणीतरी काहीतरी विचारतंय आणि त्याला मी उत्तर देतोय. तुम्ही तशी मध्ये पडण्याची गरज नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

निकाल उलटे पडले

सुज्ञ
गुरुवार, 12/01/2016 - 01:43 नवीन
धाग्यावर निकालाआधी गुरुजींचे मांडलेले गृहितक खोटे ठरले. पण त्यापेक्षा महत्वपूर्ण गोष्ट हि आहे कि " पूर्वीच्या नागरपालिका निकालाप्रमाणेच आताही निकाल लागतील व आपल्याला धूळवड खेळायची चांगलीच संधी मीळेल" अशा हेतूने एका भित्र्या, हळव्या मनाच्या, डोके न चालणाऱ्या, आणि आत्महत्याच करावीशी वाटणाऱ्या माणसाने काढलेला हा धागा सपशेल आपटला. नोटबंदी च्या निर्णयानंतर कोणालाही अशी धुळवड खेळायची संधी न दिल्याबद्दल सर्व मतदारांचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

.

सुज्ञ
गुरुवार, 12/01/2016 - 02:02 नवीन
व आभार
  • Log in or register to post comments

पण ट.फी. म्हणजेच नानासाहेब नेफळे कशावरून ?

बबन ताम्बे
गुरुवार, 12/01/2016 - 16:09 नवीन
खरे आहे का हे ?
  • Log in or register to post comments

आमचे हे म्हणणाऱ्या त्या माई

अभिजित - १
गुरुवार, 12/01/2016 - 21:00 नवीन
आमचे हे म्हणणाऱ्या त्या माई कुठेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा