Skip to main content

Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे?

लेखक समी
Published on सोमवार, 28/11/2016
मला Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करायचे ह्यावर उपाय हवे आहेत. माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे. त्यांची औषधे चालू आहेत. पण अजून काय करता येईल आणि ह्याचे नंतर काय काय परिणाम होवू शकतील किंवा पुढे काय काळजी घ्यावी जेणे करून वजन नेहमी अटोक्यात राहिल?

याद्या 3488
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे. सेकंड ओपीनीयन घ्या. शक्यतो अ‍ॅलोपॅथ चे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या ज्ञानाबद्दल शंका नाही पण अशा सहसा प्रचलित नसलेल्या (किंवा मला महिती नसेल..!) प्रश्नाबद्दल अनेक ठिकाणांहून माहिती मिळवा असे सुचवतो.

In reply to by समी

इथे अनेक डॉक्टर आहेत. पण त्यांच्याकडून इथे कन्सल्टिंगची अपेक्षा करणे चुकीचे वाटते म्हणून मी त्यांना व्यनीने संपर्क साधतो आणि त्यांच्या दवाखान्यात जाऊन सल्ला घेतो.

In reply to by मोदक

ह्याबद्दल माहिती हवीय. म्हणजे आत्ता औषधे आणी इतर मार्गाने वजन कमी केले पण औषधे बंद झाल्यावर पुन्हा वाढेल का? तसेच ह्याचा नंतरच्या आयुष्यात काहि परिणाम होतो का? पुढे असे पुन्हा होवू नये ह्यासाठि काय करावे? असे कोणी काहि सांगू शकेल का ते हवे आहे.

आयुर्वेदिक डॉ. नी नाडि परिक्षा करुन सांगितले पण ह्यासाठि इतर काहि टेस्ट असतात का?

शरीरात वॉटर रिटेन्शन वाढण्याची दोन महत्वाची कारणे : १. मिठाचे अतिरिक्त सेवन : चिप्स इत्यादी गोष्टींचे अतिरिक्त सेवन मिठाचे प्रमाण वाढवते .. २. हॉर्मोन्सचे असंतुलन : कॉर्टिसॉल व बाकीच्या हार्मोन्स च्या असंतुलन मुळे वॉटर रिटेन्शन वाढते .. त्यामुळे योग्य टेस्ट करुन खरे कारण जाणून घ्या ... इथले डॉक्टर्स अधिक मार्गदर्शन करतीलच..

मुद्दा क्लिष्ट आहे कारण वय वर्षे फक्त ८ म्हणजे जर एखादी चुकीची सवय (जसे जंक फूड सेवन करणे, अति प्रमाणात पाणी पिणे, इ.) असेल तर ती मोडणे अवघड होऊन बसते. अमर विश्वास यांनी नमूद केल्याप्रमाणे काही कारणे असतील तर त्यावर विचार (आणि ऍक्शन सुद्धा) व्हायला हवे. माझ्या लहानपणी मी (सतत नाक वाहणारी सर्दी असल्याकारणाने) एका ज्येष्ठ (त्या वेळचे त्यांचे वय वर्षे ८६) आयुर्वेदाचारयांकडे गेलो होतो. त्या वेळी त्यांनी माझ्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर उठे पर्यंत सगळ्या सवयीची माहिती घेतली आणि या निष्कर्षाला पोचले कि माझी पाणी प्यायची पद्धत अयोग्य आहे. घेतला लोटा कि रिचवला पोटात अशा पद्धतीने मी पाणी प्यायचो (अगदी रेग्युलर्ली). त्यामुळे त्याचे (पाण्याचे) पचन व्यवस्थित होत नसे आणि त्यामुळे मेद (माझ्या बाबतीत सर्दीच्या रूपात) निर्माण होऊन रोग होत असे. त्यावर त्यांनी मला खालील प्रमाणे पाणी पिण्यास सांगितलं. १. तहान लागली कि दोन घोट २. जेवताना एक घोट ३. झोपल्यानंतर उठेपर्यंत पाणी प्यायची गरज वाटली नाही पाहिजे. वाटल्यास एकाच घोट. बास्स्स. यापेक्षा जास्त पाण्याची आपल्या शरीराला गरज नसते. तहान frequently लागू शकते त्यामुळे दर थोड्या वेळाने एक एक सिप घेत राहणे इष्ट. दिवसाला ठरवून अमुक लिटर पाणी पोटात गेलेच पाहिजे असे काही नसते. प्रत्येकाची गरज वेगळी असते. मग हि कन्सेप्ट अली कुठून? युरोपात आणि अमेरिकेत फक्त sparkled water च मिळते (sparkled = carbonized किंवा आपल्याकडे सोडा मिळतो तसे). तिथे प्लेनवॉटर मिळायची वानवा असते. हळू हळू त्यांच्या लक्षात आले कि साधे पाणी पिणे आरोग्यास हितकारक असते त्यामुळे आता तिथे जनजागृती म्हणून वरील विधान (ठराविक लिटर पाणी पिलेच पाहिजे) रुजू झाले आणि आपल्याकडे तिकडूनच आले (पाश्चात्यांचे अंधानुकरण). अर्थात मी त्या वेळी १०-१२ वर्षांचा असल्यामुळे याचा seriousness नव्हता आणि माझी जुनी सवय अबाधित राहिली ती मागील वर्षीपर्यंत (वय वर्षे ३२ पर्यंत). या वेळी एका आयुर्वेदीय ब्लॉग वर सर्दीला हे कारण असू शकते असे वाचनात आल्यावर "करून बघायला काय हरकत आहे?" असा विचार करून मी पाणी प्यायची पद्धत बदलली (अगदी लहानपणी त्या आयुर्वेदाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे). सुरुवातीला जड गेले पण जशी सवय जडत गेली तास फरक जाणवू लागला. दिवसाला २ रुमाल खराब करणारा मी आता अजिबात रुमाल न वापरता १-१ आठवडा काढू शकतो. तात्पर्य: तिच्या पाणी पिण्याच्या सवयी तपासा. आयुर्वेदीय उपचार घ्या, ते लॉन्ग लास्टिंग आणि कायमचे असतात. फक्त औषधांवर विसंबून राहू देऊ नका. त्यांनी जे लाईफस्टाईल मध्ये बदल सुचवले असतील ते अवश्य करून घ्या. तिला नक्की फरक पडेल.

वाॅटर रिटेन्शन उगाच होणार नाही.त्याची कारणे असतात.तिचे कोणत्या टेस्ट करून हे निदान केले आहे? तिला दमा आहे का? काही कारणांनी स्टिराॅइड घ्यावी लागली आहेत का? थायराॅइड,किडनी प्रोफाईल काय आहे? या प्रकारच्या टेस्ट करुन निदान झाले आहे का? वाॅटर रिटेन्शन हे अन्य आजाराचे लक्षण असू शकते.तो आजार शोधुन औषधोपचार व्हायला हवेत. अती खारट, जंक ,चायनीज फूड बंद करायला हवे आहेच.

उत्तम प्रतिसाद स्थितप्रज्ञ. साध्या मीठा ऐवजी सैंधव वापरणं .

सगळ्यांचेच आभार.... वैद्य भाऊ सुळे ह्यांनी थायराॅइड टेस्ट करायला सांगितली होती त्या रिपोर्ट्वरून त्यांनी निदान केलेय की तीचे वजन वाढायचे कारण Water Retention. तीला वेफर्स खायची खुप सवय आहे. शारिरीक हालचाल म्हणजे खेळ किंवा इतर व्यायाम प्रकार काहिच होत नाहित. बाकी जंक फुड नाहि खात ती. त्यांनी सांगितलेय की शारिरीक हालचाल कमी आहे त्यामुळे पाण्याचा निचरा नीट होत नाहिय. आणि मीठ कमी करायला सांगितले आहे. आजपासून तीला शारिरीक हालचालीसाठि ग्राऊंड चालू करतेय. खाण्यात हिरव्या भाज्या जास्त असतील असे पदार्थ देतेय.

In reply to by समी

तीला वेफर्स खायची खुप सवय आहे.
Exactly! या कारणामुळे प्रचंड प्रमाणात Sodium आणि Saturated Fats शरीरात जातात. Water retention च्या बऱ्याच कारणांपैकी महत्त्वाचे कारण जास्त मीठ सेवन करणे हे ही आहे. शारीरिक हालचाल तर हवीच. जेवढ्या लहान वयात ती ऍक्टिव्ह राहील तितके तिला पुढे ऍक्टिव्ह राहणे सोपे जाईल.

१. वॉटर रिटेन्शन (पाणी शरीरातून बाहेर टाकण्याची शरिराची, मुख्यतः किडनीची, ताकद कमी होणे) हे आजाराचे निदान नाही, तर काही गंभीर आजारांतच ते मूळ आजाराचा शरीरावर झालेला परिणाम (साईन) म्हणून दिसते. २. वॉटर रिटेन्शनने (शरीरात साठलेल्या पाण्याच्या वजनामुळे) तात्पुरते वजन वाढत असले तरी, ते माणसाच्या "वजन जास्त असण्याच्या" सर्वसाधारण कारणात/कल्पनेत गणले जात नाही. तुम्ही फारच त्रोटक माहिती दिली आहे. तरीही, तुमच्या एका प्रतिसादातील त्या मुलीच्या जीवनप्रणालीची (लाईफस्टाईल) माहिती वॉटर रिटेन्शन नसण्याच्या शक्यतेला दुजोरा देत आहे. त्यामुळे, योग्य विश्वासू वैद्यकीय व्यावसायीकाकडून तपासणी करून, वजन वाढण्याचे नक्की कारण माहीत करून घेऊन, त्यावरचे योग्य उपाय करणे फायद्याचे होईल.