गुप्तधनाचे रहस्य
"आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ...हॅ हॅ हॅ..आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ हॅ.हॅ..हॅ.. "
"गपये.."
"आंऊऊऊऊऊऊऊऊ...हँ..हँ..हँ...
" आत गप्तो का ?. उगाच ओरडायला जनावरासारखा." पल्लवीने समोरील पटावरील एक प्याद उचलुन हातात पकडल्,पुढली चाल करायच्या आधी पार्थ कडे एक नजर टाकली.
"ताई ते तर आहेच जनावर्, डुकरासारखा लोळतय मगापासुन आणी आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊ..... करतय." साक्षीने दोन्ही बाजुला लोंबणार्या वेण्याची टोक टाळ वाजवल्यासारख्या एकमेकावर आपटल्या.
" बहनजी हम आप की बडी इज्जत करते हे,लेकीन हमे डुक्कर मत कहो, भले गधा बोलो." पार्थ ने दोन्ही हाताची दुर्बीण करुन वरच्या छतावर रोखली.
" पार्ट्या, इथे मुलीत बसण्यापेक्षा बाहेर खेळायला का जात नाहीस ?"गोरीने एक प्याद उचलुन पुढे सरकावल
" इथ मुल आहेत कुठ खेळायला,आं...ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ... सगळ्या भवान्याच ." पार्थ..
" आता थोबाडीत खाशील.."
"थोबाडीत खाणे से डर नही लगता तै..पर बोर होने से लगता है." पार्थ ने अजुन एक डायलॉग मारला.
"जा तात्या कडे जाऊन बस..गोष्ट सांगेल तुला."
"जाता हुं , पर माना मेंने जो तेरा क्यहना लेकीन तात्या की गोष्ट को सिरीयसली मत लेना."
*********
तासभर बुद्धिबळ खेळल्यावर, पोरींना पण बोर झाल.अश्या वेळेस पार्थ सारखा विनोदवीर आजुबाजुला नसल्या मुळे सगळेच अस्वस्थ झाले.
"ताई...ताई..." दोन्ही हाताने दोरीच्या उड्या मारल्या सारखे हावभाव करत पार्थ पळत आला.
" ताई..ताई.. तात्या.. तात्या.."
"काय झाल तात्याला.."
"तात्याला काही झाल नाही, पण गुप्तधन..गुप्तधन."
"काय बडबडतोयस..कसल गुप्तधन ?".
"गुप्तधन..गुप्तधन पाटलाचा पडक्या वाड्यात.!!"
(क्रमश.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतोय..
छान लिहिलय .
धन्यवाद.
छोटे जासूस
मस्त... पुढचा भाग लवकर टाका
छान
मस्त!
जेप्याच्या आधीच्या आयडीचे काय
हा प्रश्न " मारुती कांबळे च
टक्या
छान छान कथा. पुभाप्र.