Skip to main content

गुप्तधनाचे रहस्य

लेखक jp_pankaj यांनी शनिवार, 26/11/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
"आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ...हॅ हॅ हॅ..आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ हॅ.हॅ..हॅ.. " "गपये.." "आंऊऊऊऊऊऊऊऊ...हँ..हँ..हँ... " आत गप्तो का ?. उगाच ओरडायला जनावरासारखा." पल्लवीने समोरील पटावरील एक प्याद उचलुन हातात पकडल्,पुढली चाल करायच्या आधी पार्थ कडे एक नजर टाकली. "ताई ते तर आहेच जनावर्, डुकरासारखा लोळतय मगापासुन आणी आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊ..... करतय." साक्षीने दोन्ही बाजुला लोंबणार्‍या वेण्याची टोक टाळ वाजवल्यासारख्या एकमेकावर आपटल्या. " बहनजी हम आप की बडी इज्जत करते हे,लेकीन हमे डुक्कर मत कहो, भले गधा बोलो." पार्थ ने दोन्ही हाताची दुर्बीण करुन वरच्या छतावर रोखली. " पार्ट्या, इथे मुलीत बसण्यापेक्षा बाहेर खेळायला का जात नाहीस ?"गोरीने एक प्याद उचलुन पुढे सरकावल " इथ मुल आहेत कुठ खेळायला,आं...ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ... सगळ्या भवान्याच ." पार्थ.. " आता थोबाडीत खाशील.." "थोबाडीत खाणे से डर नही लगता तै..पर बोर होने से लगता है." पार्थ ने अजुन एक डायलॉग मारला. "जा तात्या कडे जाऊन बस..गोष्ट सांगेल तुला." "जाता हुं , पर माना मेंने जो तेरा क्यहना लेकीन तात्या की गोष्ट को सिरीयसली मत लेना." ********* तासभर बुद्धिबळ खेळल्यावर, पोरींना पण बोर झाल.अश्या वेळेस पार्थ सारखा विनोदवीर आजुबाजुला नसल्या मुळे सगळेच अस्वस्थ झाले. "ताई...ताई..." दोन्ही हाताने दोरीच्या उड्या मारल्या सारखे हावभाव करत पार्थ पळत आला. " ताई..ताई.. तात्या.. तात्या.." "काय झाल तात्याला.." "तात्याला काही झाल नाही, पण गुप्तधन..गुप्तधन." "काय बडबडतोयस..कसल गुप्तधन ?". "गुप्तधन..गुप्तधन पाटलाचा पडक्या वाड्यात.!!" (क्रमश.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8556
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वाचतोय.. जरा मोठ्ठे भाग येउदेत..

छान लिहिलय . पुभाप्र . "गुप्तधनाच्या शोधात तात्या आणी प्रिन्सदादा " हे शीर्षक सुचलं . एक शंका - बुद्धीबळ एकूण कितीजण खेळत होते ? डबल्स मध्ये खेळत होते का ?

In reply to by सिरुसेरि

बुद्धिबळ दोनच जण खेळत होते. पल्लवी आणी गौरी. पार्थ-साक्षी दर्शक होते. शिर्षक `'गुप्तधनाचे रहस्य' असे ठरवले आहे.

थोडे मोठे भाग आले तर अजून मजा येईल

जरा मोठे भाग लिही जेप्या, नाहीतर तुझा सत्कार कसा करणार आम्ही?