Skip to main content

जन पळभर म्हणतील 'बाय बाय' !

लेखक लीना कनाटा यांनी रविवार, 27/11/2016 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ नोव्हेम्बर १८७४ कवीवर्य भा. रा. तांबेंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून ........ जन पळभर म्हणतील 'बाय बाय' ! मी जाता मैफिल ती सजेल काय? बार उघडतील, चषक भरतील, बेवडे अपुला क्रम आचरतील, पेग वर पेग स्वये रिचवतील, काही फरक का पडेल काय? जन पळभर म्हणतील 'बाय बाय' ! पेग वर्षतील, चखणा देतील, मद्याचे या पाट वाहतील, कुणा काळजी की न उंचवतील, पुन्हा या मैफिलीत हेच चषक ? जन पळभर म्हणतील 'बाय बाय' ! मित्र मंडळी एकत्र जमतील, चखणा, वारूणी गोळा करतील, हसुनि खिदळुनि चिअर्स करतील, मी जाता त्यांचे काय जाय ? जन पळभर म्हणतील 'बाय बाय' ! अशा मंडळी बाय करावे ! नवीन मैफिल, मित्र जमवावे, मद्य चषका का विन्मुख व्हावे ? पुन्हा एकदा धुंद का न व्हावे? जन पळभर म्हणतील 'बाय बाय' ! मी जाता मैफिल ती सजेल काय?
लेखनविषय:

वाचने 1672
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

:)))

ओके