Skip to main content

ताज्या घडामोडी - ३

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 31/10/2016 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या घडामोडी - १ ताज्या घडामोडी - २ मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

वाचने 66984
प्रतिक्रिया 314

प्रतिक्रिया

काल मध्यरात्री भोपाळ येथीत तुरूंगात असलेल्या सिमीच्या ८ संशयित दहशतवाद्यांनी मध्यरात्री एका रक्षकाची हत्या करून तुरूंग फोडून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोधावर जाऊन ते जिथे लपले होते ती जागा शोधून काढली व त्यांच्याशी झालेल्या चकमकीत सर्व ८ संशयित दहशतवादी ठार झाले. अपेक्षेप्रमाणे हे एनकाऊंटर बनावट असावे असा संशय काँग्रेस, आआप व माकपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. सर्व संशयित दहशतवादी मुस्लिम असल्याने त्यांची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. यापूर्वीही बाटला हाउसमधील चकमकीत मारल्या गेलेल्या २ दहशतवाद्यांच्या मृत्युबद्दल काँग्रेसने गळा काढला होताच. मला व्यक्तिशः हे संशयित दहशतवादी मारले गेल्याचे अजिबात दु:ख नाही. परंतु यावेळी घडलेल्या घटनाक्रमात पूर्ण सुसंगती दिसत नाही. काहीतरी मिसिंग आहे. नक्की काय घडले ते काही दिवसात बाहेर येईलच. SIMI activists’ jailbreak: Encounter, contradictions, politics and all that happened today

नोटा रद्द करण्याच्या धुमश्चक्रीत एक वेगळी बातमी - भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याविरूद्ध केलेल्या प्रतिकारात ७ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यु झाला आहे. पाकिस्तानने ७ सैनिक मारले गेल्याची कबुली देऊन खालील बातमीत त्यांचे फोटो व नाव छापले आहे (केजरीवाल, निरूपम इ. नी पुरावे मागू नयेत म्हणून हे जाहीर केले असावे) In the line of fire: Pakistani soldiers who were killed last night त्याच संबंधी अजून एक बातमी - Seven Pakistan Army soldiers killed in 'unprovoked' Indian firing across LoC: ISPR या बातमीखाली अनेक पाकिस्तानी वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील खालील प्रतिक्रिया रोचक आहे.
Candyman about 7 hours ago Pakistan is dealing with a completely different neighbour this time now. Wisdom says, as a CBMs, both the states should take steps that demonstrate they are serious about peace in the region.

झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षांची बंदी ! चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय. नोटबंदीचा निर्णय अंमलात आणतानाच आधिच देशाची आणि व्यवस्थेची तारांबळ उडत आहे. हा निर्णय थोडा लांबविला असता तर आभाळ कोसळण्यासारखी परिस्थिती नव्हती. विरोधकांच्या आणि माथेफिरुंच्या हातात आयतं कोलीत मिळणार की राडा करायला पैसे असणार नाही म्हणून ही वेळ साधली कोणास ठाऊक !

In reply to by धर्मराजमुटके

या निर्णयाकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले दिसते. इतर राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. नोटा बदलण्याच्या गोंधळात हा निर्णय दुर्लक्षिला जाईल हे ओळखून बंदी घातलेली दिसते.

In reply to by नाखु

+१११ आपले काळे पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आणि / किंवा आपले राजकिय भांडवल वाचविण्याची धडपड करण्याच्या गडबडीत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला झाकीर नाईकबद्दल उमाळा आलेला दिसत नाही ! :)

या निर्णयाकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले दिसते. इतर राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. नोटा बदलण्याच्या गोंधळात हा निर्णय दुर्लक्षिला जाईल हे ओळखून बंदी घातलेली दिसते.
तसं झालं तर ठीक आहे मात्र सध्याच्या गोंधळाचा फायदा किंवा नोटबंदीचे कारण वरवर दाखवून विघातक तत्त्वांनी अराजक माजवू नये हीच इच्छा आहे.

The Reserve Bank of India (RBI) has proposed opening of "Islamic window" in conventional banks for "gradual" introduction of Sharia-compliant or interest-free banking in the country.

लोकहो, ट्रंप निवडून आलेत आणि त्यांना रशियाशी सहकार्य करायचंय. म्हणून बाल्टिक देशांना म्हणे रशियाचा धोका वाटतोय. इथे बातमी आहे : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-38051155 च्यायला, ट्रंप नाटोचं महत्व कमी करणार म्हणून कुणाच्या तरी पोटात दुखू लागलंय. आता ओबामा जरी नाटोची भलामण करीत युरोपभर फिरंत असला तरी त्याचा भरवसा कोणालाच वाटंत नाहीये. नाटोवाल्यांची जाम गोची झालीये. उपरोक्त लेखात बाल्टिक देशांना भीती घातलीये, की रशिया विस्तारवादी आहे. क्रीमिया जसा ताब्यांत घेतला तसेच बाल्टिक प्रदेश रशियन लोकसंख्येच्या जोरावर ताब्यांत घेतले जातील, असा युक्तिवाद आहे. पण युक्रेनमध्ये दंगल माजवण्यासाठी रीतसर निवडून आलेल्या यानुकोव्हीचला बंडखोरांनी हुसकून लावलं याविरुद्ध बीबीसी चकार शब्द काढायला तयार नाही. शिवाय, बाल्टिकांना रशियाच्या विस्तारवादाची भीती घालतांना बीबीसीला पोलंडच्या विस्तारवादाचा सोयीस्कर विसर पडला आहे. १९३८ च्या आसपास पोलंडच्या सर्वेसर्वा जनरल स्मिगली-रिड्झ ने लिथुआनिया काबीज केला होता हे आजून लोकांच्या स्मरणात आहे. त्यावेळेस कुठे गेला होता राधासुता (= ब्रिटन) तुझा धर्म? ब्रिटनसारख्या बेभरवश्याच्या देशावर विश्वास ठेवण्यापेक्षा बाल्टिक देशांनी रशियाशी सलोख्याचे संबंध राखलेले काय वाईट? निदान काहीतरी तोडगा तरी मिळेल. याउलट ट्रंपमुळे नाटोचा म्हणावा तेव्हढा उपयोग नाही. नाटोमुळे फक्त तणावच वाढेल. अशी एकंदरीत बाल्टिकांची धारणा आहे. आ.न., -गा.पै.

३ दिवसांपूर्वी भारतातील काही राज्यात ४ लोकसभा व १४ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. त्याची मतमोजणी आज आहे. ६ महिन्यांपूर्वी आसाम, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी व बंगाल मध्ये विधानसभेची निवडणुक झाली होती. त्यावेळी जो ट्रेंड होता तोच या पोटनिवडणुकीत कायम राहिला आहे. ज्या पक्षाने ६ महिन्यांपूर्वी विधानसभेत बहुमत मिळविले होते, त्यांच्याच बाजूने पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. या व्यतिरिक्त त्रिपुरा मध्ये २ जागांवर विधानसभेची पोटनिवडणुक होती व मध्य प्रदेश मध्ये १ लोकसभा व २ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक होती. त्रिपुरामधील दोन्ही जागांवर सत्ताधारी माकपने विजय मिळविला आहे. यापैकी एका मतदारसंघात भाजपच्या मतात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील सर्व जागा भाजपनेच जिंकल्या आहेत. मध्य प्रदेश मध्ये डिसेंबर २०१३ मध्ये विधानसभा निवडणुक व मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुक झाली होती. सुमारे अडीच ते तीन वर्षानंतर सुद्धा तिथे भाजपचा प्रभाव टिकून आहे. मध्यंतरी गाजलेल्या व्यापम घोटाळ्यामुळे व ८ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा भाजपच्या मतदारांवर प्रतिकुल परीणाम झालेला दिसत नाही. महाराष्ट्रात विधानपरीषदेच्या ६ जागांसाठी निवडणुक होती. या ६ पैकी ५ जागा राष्ट्रवादीकडे होत्या व १ जागा भाजपकडे होती. परंतु आजच्या निकालानुसार काँग्रेसने २, भाजपने २, शिवसेनेने १ व राष्ट्रवादीने फक्त १ जागा जिंकली आहे. विधानपरीषद निवडणुकीत जनमानसाचे प्रतिबिंब उमटत नाही. परंतु या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला झटका मिळाला आहे हे नक्की.

काल पुन्हा एकदा भारताच्या लष्करी तळावर हल्ला होऊन भारताचे दोन अधिकारी व पाच जवान मारले गेले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भारतीय भूभागात असलेल्या लष्करी तळावर अतिरेकी इतक्या सहज पद्धतीने येऊन हल्ला करून अनेकांना मारू शकतात याचे खेदपूर्वक आश्चर्य वाटते. कोठेतरी, काहीतरी नक्की चुकत आहे. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते. गुर्जी, तसे पाहता तुमच्याशी संवाद साधायचा नाही असे ठरवले होते, पण माझ्या कामसंबंधीत तुम्ही बोलल्यामुळे आता बोलतोय. आपण एक काम करू, आम्ही ठेवतो वर्दी उतरवून, बाकी उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, सामरिक निर्णयकार, सुप्रीम कमांडर, न्यूक्लियर ट्रायड, प्रधानमंत्री सगळे जाऊ दे झिलप्या झाडायला, तुम्हाला वाटतंय न क्षेपणास्त्र डागायची वेळ आली आहे, या मग आता तुम्हीच इथे बटन दाबायला क्षेपणास्त्र प्रणालीचे! कसे? =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुमच्याकडून अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती. टकाच्या एका धाग्यात वर्णन केलेल्या प्रकारचाच हा प्रतिसाद आहे. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे! बाकी इतर जे काही तुम्ही ठरविले आहे, त्यास फाट्यावर मारण्यात येत आहे याची आपणास जाणीव आहेच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नाही हो. अजिबात नाही. तुमच्या असल्या (टकाने वर्णन केलेल्या प्रकारच्या) प्रतिसादांची सवय आहे मला.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सगळे जाऊदे झिलप्या झाडायला? असे गुरुजींचे म्हणणे आहे असे का वाटले साहेब आपल्याला? पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते. या वाक्यातून तसा अर्थ निघतो ?

In reply to by सुज्ञ

अरेच्या, सुज्ञ न हो तुम्ही साहेब? घ्या समजून, त्यातूनही आमचीच चूक दिसली तर आम्ही मूर्ख समजून आमच्या तोंडीच लागू नका कसे! सुज्ञपणा असेल तो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नाही पण बापूसाहेब एक सांगाच . कोठेतरी, काहीतरी नक्की चुकत आहे. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते या गुरुजींच्या या वाक्यांमधून आपल्याला गुरुजींनी बाकीच्या लोकांना ( सैनिक , पंतप्रधान वगैरे ना) काही काम नाही आणि क्षेपणास्त्रे डागणे वगैरे सगळे सोप्पे असते असे म्हटलेले का आढळले ? मुद्दाम विचारतोय . एक अभ्यास म्हणून . बाकी कौन किससे गरम हे तुम्ही तो पूर्वीचा एका सदस्यांवरचा श्लेष ओळखलात तेव्हाच आमी ओळखले :)

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.
झिलप्या झाडणे लय दिवसान वाचला न बाप्पा हा वाक्यात उपयोग.

In reply to by सचु कुळकर्णी

सोपं नाहीच हो ते. कुठून तरी फ्रस्ट्रेशन आणि संताप बाहेर काढायचा असतो. म्हणून असं लिहिलं जातं.

In reply to by सचु कुळकर्णी

त्या झिलप्या घाला चुलीतनी, थुमीच लै दिवसानं दिसले न राज्येहो, तुमची सय येत राह्यते येत जाव माणसानं दिवसातून एकडाव अटीसा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आपल मत पटत नाय ना बाप्पा अथिसा कोनाले म्हनुन आपुन गप पडेल असतु वाचन मोड मंदि. तुमि राज्या पुन्याले येनार होता, सारी सोय करेल हाय अभ्याले सांगुन.

In reply to by सचु कुळकर्णी

सारे प्लॅन कॅन्सल झाले ना हो, पुन्याले आलो तर तुम्हाले अन नाखु काकाले भेटल्या बगर थोडीच जाईन.

सर्वोच्च न्यायालयाने चित्रगॄहात खेळ सुरु होण्याआधी राष्ट्रगीत वाजवावे असा आदेश दिला आहे. हे तर आधीपासून होते आहेच ना? मग नव्याने काय बदल किंवा सुरुवात करायला सांगितली आहे न्यायालयाने?

In reply to by संदीप डांगे

अतिशय भंपक निर्णय. केवळ लोकानुनय करणारा. चित्रपट बघायला जाणाऱ्यांनी राष्ट्रगीत ऐकावे हे किती arbitrary आहे. म्हणजे याच न्यायाने सर्कस, नाटक, तमाशा, खेळाचे सामने इ. बघायला जाणाऱ्यांना अशी सक्ती नसावी आणि केवळ चित्रपटगृहांनाच हा नियम हे गैर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रगीत वाजवूनच फक्त राष्ट्रीय भावना दिसते का? राष्ट्रभक्ती हे महान मूल्य आहे, त्याला असं symbols नि मर्यादित करायला नको.

In reply to by पुंबा

तसंही शाळा समाप्तीनंतर राष्ट्रगीताचा फारसा संबंध येत नाहि.

In reply to by संदीप डांगे

बहुतेक सक्तीने आधी फक्त महाराष्ट्रात लागू होता, आता संपूर्ण भारतात लागू केला आहे.

पण आता राष्ट्रगीत चालू असताना फक्त तिरंग्याचं चित्र दाखवा असा निर्णय आहे . बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे देशभक्ती व्हिडीओ दाखवायचे ते नको फक्त तिरंगा दाखवा असा निर्णय आहे

In reply to by वरुण मोहिते

नक्की माहित नाही पण ती याचिकाच यासाठी होती कि - "भारतातील सर्व सिनेमाग्रहांमध्ये राष्ट्रगीत सिनेमाआधी लावणे अनिवार्य करावे आणि त्याचा एक प्रोटोकॉल असावा". तिरंगा दाखवणे, राष्ट्रगीत चालू असताना सिनेमागृहाचे दरवाजे बंद करणे शिवाय राष्ट्रगीताचे नाटकीय रूपांतर न करणे वगैरे प्रोटोकॉल अंतर्गत ठरवले गेले असावे.

तामिळनाडू मधल्या कमुठी इथला ६४८ मेगावॅटचा सोलार ऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला त्यासंदर्भातील हि बातमी. http://thenextweb.com/insider/2016/11/30/india-solar-power-plant-huge/ या बातमीत नॅशनल जिऑग्राफिकच्या मेगास्ट्रक्चर्स या मालिकेतला या प्रकल्पासंदर्भातला डॉक्युमेंट्री व्हिडीओहि जोडलेला आहे. तो अवश्य पाहावा. अदानी उद्योगसमूहाकडे उत्तम अभियंत्यांबरोबर चांगल्या प्रोजेक्त मॅनेजर्सचीही उत्तम टीम असावी असे म्हणायला हरकत नाही.

In reply to by आनंदयात्री

छान बातमी आहे. भारतात वीज क्षेत्रात मोठे बदल गेल्या ४ वर्षात झाले आहेत आणि मोठे बदल येवू घातले आहेत. UPA च्या शेवटच्या काळात कोळश्याच तुटवडा झाल्यामुळे मोठे वीज संकट (किंवा वीज टंचाई) निर्माण झालेली. UPA ने शेवटच्या काळात पाऊले उचलाय चालू केलेली परंतु खरा बदल पियुष गोयल यांनी घडवून आणला. मोदी सरकार मधील अत्यंत कार्यक्षम मंत्री पण प्रसिद्धी पासून सतत दूर. हवामानविषय झालेल्या अंतराष्ट्रीय करारामुळे भारतास कोल्श्यावर अवलंबित्व हळू हळू कमी करून अपारंपरिक आणि अणु उर्जेवर भर द्यावाच लागणार आहे. वीज क्षेत्रातील अजून काही उत्तम बदलाच्या बातम्या सापडल्यास लिंक देईन.

In reply to by अमितदादा

या माहितीसाठी धन्यवाद. खालची फर्स्टपोस्टची लिंक भारत सरकारच्या रुफटॉप सोलर प्रोजेक्टबद्दल माहिती देते. अदानी आणि इतर एनर्जी कंपन्यांचे मार्केट शेअरबद्दलचे स्टॅट्स अतिशय इंटरेस्टिंग आहेत. http://www.firstpost.com/business/adanis-largest-solar-power-project-in… ह्या सोलार आणि रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पाचा (100GW) मूळ आराखडा UPA सरकारच्या काळात झाला असावा असे मानून चालतो आहे. त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. (कोणते मंत्री किंवा कोणते ब्युरोक्रॅट्स). याबद्दल काही माहिती मिळाल्यास नक्की सांगा.

In reply to by आनंदयात्री

अदानी उद्योगसमूहाकडे उत्तम अभियंत्यांबरोबर चांगल्या प्रोजेक्त मॅनेजर्सचीही उत्तम टीम असावी असे म्हणायला हरकत नाही. आजकाल असे म्हणणे म्हणजे बुर्ज्वा प्रतिगामी आणि भांडवदारांशी साठगाठ असल्याचे मानले जाते. अडानी, अंबानी इ उद्योजक आणि त्यांनी घेतलेली कर्जे याबद्दल गळा काढणे हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे.

In reply to by सुबोध खरे

सहमत! आणि अशा गळे काढणाऱ्यांची तथाकथित कर्जघोटाळेबहाद्दर किंवा सरकारमित्र उद्योजकांची यादी अंबानी-अदानी यापलीकडे जात नाही. कारण सोपे दिसते - मोदी गुजरातचे, अंबानी गुजरातचे, अदानी गुजरातचे!

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, स्पष्टीकरण ढिसाळ आहे आणि युक्तिवाद अनाकलनीय. त्यामुळे निष्कर्ष कशाच्या जोरावर काढला ते कळंत नाहीये. आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

हे गणित सोडवा बॉ कोणीतरी...
८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतला निम्मा कालावधी सुद्धा संपलेला नाही. हा कालावधी संपू देत आणि नंतरच निष्कर्ष काढणे योग्य होईल.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी? तसेही तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...

In reply to by संदीप डांगे

म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी? मग याच लॉजिकने "निर्णय चुकले" म्हणून कशाला आकांडतांडव करत आहात..? थांबा की ३१ पर्यंत.

In reply to by संदीप डांगे

म्हणजे तुम्ही काढलेल्या चुकीच्या निष्कर्षांशी जे सहमत नाहीत ते भाजपचे कार्यकर्ते!

In reply to by संदीप डांगे

तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत... किती सोयीस्कर निष्कर्ष हो. तुमच्या बुद्धीमत्तेचे कौतुक वाटत आहे. किमान राहुल गांधीला तरी टक्कर द्याल तुम्ही. :=))

In reply to by संदीप डांगे

मलाही एका धाग्यावर "मिपावरचे केजरीवाल" असे म्हणण्यात आले होते याचं सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय. तो प्रतिसाद व्यक्तिगत नसावा तुमच्या मते.

In reply to by संदीप डांगे

विषय बदलू नका. आधी एखाद्याला केजरीवाल म्हणणे हा व्यक्तिगत प्रतिसाद आहे की नाही ते स्पष्ट करा. तसं नसेल तर एखाद्याला राहुल गांधी म्हणणे हे कसं व्यक्तिगत होईल?

In reply to by संदीप डांगे

>>>मोदक यांनी स्पष्ट माझ्यावर नाव घेऊन आरोप केले आहेत आणि आता निर्लज्जपणाचा खेळ चाललाय... हे वैयक्तीक नाही का..?

In reply to by संदीप डांगे

तुम्ही विसंगती म्हणाल म्हणून विसंगती होत नाही हो. तुमच्या लिखाणातून विसंगती दिसत आहे. ती कळाली का तुम्हाला..??

In reply to by संदीप डांगे

माई मोड ऑन " हा संदीप नोटबंदीनंतर जास्तच त्रागा करून घेतोय, कुठेतरी जळत असल्याशिवाय धूर येणार नाही, आमच्या यांचे मत." माई मोड ऑफ

In reply to by संदीप डांगे

माई मोड ऑन " हा संदीप नोटबंदीनंतर जास्तच त्रागा करून घेतोय, कुठेतरी जळत असल्याशिवाय धूर येणार नाही, आमच्या यांचे मत." माई मोड ऑफ

In reply to by lakhu risbud

डूआयडीमागून व्यक्तिगत हल्ले करणाऱ्या भ्याड भक्तभाटांमुळे जास्त त्रागा होतोय, काही उपाय आहे का तुमच्याकडे लखु रिसबुड साहेब?

In reply to by संदीप डांगे

प्रश्न रिसबुड साहेबांना आहे तरीपण मी उत्तर देतो. डुआयडीमुळे जास्त त्रागा होत असेल तर दुर्लक्ष करा आणि ज्या खर्‍या आयडींमुळे (कमी प्रमाणात) त्रागा होत आहे त्यांना योग्य उत्तरे देवून गप्प करा. उत्तरे नसतील तर... तर काही नाही. उत्तरे नसताना काय करायचे ते तुम्हाला व्यवस्थीत माहिती आहेच. ;) (हलके घ्या वो..)

In reply to by मोदक

तुम्हाल काय त्रास होतोय? भक्तभाटांना बोललेलं तुम्हाला का बोचतंय बॉ...? तुम्ही आहात काय भक्तभाट?

In reply to by संदीप डांगे

तुम्हाला त्रास झाला म्हणून उपाय सुचवला. मला त्रास झाला असे कुठल्या चष्म्याने वाचले..?

In reply to by संदीप डांगे

एकदा एक माणूस डॉक्टर कडे जातो,उजव्या हाताचं अंगठ्याशेजारचं बोट सगळया अंगावर .... हातांवर पायावर पोटावर ठेऊन म्हणतो माझे सगळे अंग दुखतंय.डॉक्टर बारकाईने निरीक्षण करून म्हणतात प्रॉब्लेम अंगात/शरीरात नाही त्या बोटात आहे. ते बोट म्हणजे आपण स्वतः आणि अंग म्हणजे भोवताल (सिस्टिम) असे समजतात ती सुज्ञ माणसे. डॉक्टर म्हणजे सद्सतविवेक बुद्धी. आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते तुम्ही ठरवा.

In reply to by संदीप डांगे

निर्णय चांगलाच आहे. या निष्कर्षासाठी ३१ डिसेंबर पर्यंत थांबण्याची गरज नाही. निर्णय चुकला आहे का याचा निष्कर्ष काही काळानंतरच कळू शकेल. तोपर्यंत जरा धीर धरा. उतावळेपणा सोडा. या निर्णयाविरूद्ध ज्या तर्‍हेने काही विशिष्ट व्यक्तींचा थयथयाट सुरू आहे, त्यावरून यामागचा मुख्य उद्देश सफल होत आहे हे स्पष्ट आहे. चष्मा काढल्यास तुम्हालाही ते दिसून येईल.

तसेही तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत... असं झ्हाल का ? वा वा वा ! असे झटक्यात अचूक नीष्कर्ष काढणे हे सोपे काम नाही ! आपण अभिनंदनास पात्र आहात !!चला एक सत्कार करून टाकू