100 नंबर ला कुणी फोन केलाय का?
केला असेल तर प्रतिसाद सकारात्मक होता का?
बऱ्याच वेळा सामान्य लोक फोन करायच्या आधी दहा वेळा विचार करतात. (त्यात मी पण) तर कुणाचे कसे अनुभव आहेत प्लिज शेअर करा..
मी अनेक वेळा वेगवेगळ्या शहरामध्ये केला आहे. मला नेहमी उत्तम अनुभव आला आहे. अगदी परत फोन देखील आले आहेत की तुम्ही तक्रार नोंदवली त्याचे पुढे काय झाले असे प्रश्न देखील विचारले गेले आहेत.
प्रतिक्रिया
20 Nov 2016 - 11:42 pm | अभिजीत अवलिया
मी एकदा केलाय. अनुभव सकारात्मक होता. पोलीस फोन केल्यावर १० मिनिटाच्या आत आले.
21 Nov 2016 - 12:23 am | निओ१
मी अनेक वेळा वेगवेगळ्या शहरामध्ये केला आहे. मला नेहमी उत्तम अनुभव आला आहे. अगदी परत फोन देखील आले आहेत की तुम्ही तक्रार नोंदवली त्याचे पुढे काय झाले असे प्रश्न देखील विचारले गेले आहेत.
22 Nov 2016 - 8:20 pm | प्राची अश्विनी
आजच या नंबरवर फोन करायची वेळ आली. पाचव्या मिनिटाला पोलीस हजर झाले. खूप चांगला अनुभव आला.
22 Nov 2016 - 8:24 pm | जॉनी
मी सुद्धा पर्वा स्पीकर च्या भिंतीबद्दल केला होता. 20 मिनिटं तरी कनेक्ट होत नव्हता. पण एकदा फोन लागल्यावर 15 मिनिटात स्पीकर चा आवाज खूप कमी झाला.
23 Nov 2016 - 12:29 pm | गणामास्तर
मी एकदा साताऱ्यातून सलग चार वेळा केला होता, उचलला गेला नव्हता.
23 Nov 2016 - 3:01 pm | चांदणे संदीप
मास्तर, लंच टैमात केला असेल ओ तुम्ही! ;)
अतिअवांतर: झैरात!! झैरात!! झैरात!!
कंट्रोल रूम!
Sandy
24 Nov 2016 - 10:49 am | असंका
झैरातीची गरज त्या धाग्याला????
हे पहा:
अजुन वाट बघतोय....
24 Nov 2016 - 12:32 pm | चांदणे संदीप
लवकरच लिहितो!
गॉड प्रॉमीस!
Sandy
23 Nov 2016 - 3:53 pm | सामान्य वाचक
11 वाजले तरी लाऊडस्पीकर बंद झाले नव्हते म्हणून
कुणी हि उचलला नाही तो फोन
लोक नि शेवटी कंटाळून लाऊडस्पीकर बंद केले
23 Nov 2016 - 3:53 pm | सामान्य वाचक
11 वाजले तरी लाऊडस्पीकर बंद झाले नव्हते म्हणून
कुणी हि उचलला नाही तो फोन
लोक नि शेवटी कंटाळून लाऊडस्पीकर बंद केले
24 Nov 2016 - 6:19 am | vcdatrange
राज्यात अत्यायिक सेवासाठी आता केवळ एकच नंबर राहणार आहे. १००' १०२ १११२ या वेगवेगळ्या सेवासाठी आता ११२ हा एकच नंबर राहणार आहे
24 Nov 2016 - 6:19 am | vcdatrange
राज्यात अत्यायिक सेवासाठी आता केवळ एकच नंबर राहणार आहे. १००' १०२ १११२ या वेगवेगळ्या सेवासाठी आता ११२ हा एकच नंबर राहणार आहे
24 Nov 2016 - 6:20 am | vcdatrange
राज्यात अत्यायिक सेवासाठी आता केवळ एकच नंबर राहणार आहे. १००' १०२ १११२ या वेगवेगळ्या सेवासाठी आता ११२ हा एकच नंबर राहणार आहे