Skip to main content

लांगूलचालनाचा एक नवीन अध्याय: इस्लामिक बँक

लेखक वटवट यांनी मंगळवार, 22/11/2016 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही लोकशाहीचा एक मूळ नियम असावा कि कायदे सर्वांसाठी सारखे असावेत. आणि हा नियम पाळला जावा. असे कायदे असतील तरंच सर्वजण कायदे इतमामाने पाळतील. त्यांचा आदर राखतील. इथे सर्वांसाठी म्हणजे सर्व धर्मीयांसाठी असे अभिप्रेत आहे. ह्या नियमाला हा देश स्वतंत्र झाल्या झाल्या तडाखा बसला. हिंदू कोड बिलाने... आंबेडकर आणि नेहरू प्रचंड आग्रही होते म्हणून हे बिल पास झालं.. आणि फक्त हिंदूंना हे बिल लागू करण्यात आले. आधी हिंदू कोड बिल हे एकंच होतं... पण त्याला प्रचंड विरोध होता म्हणून त्याचे चार तुकडे पाडण्यात आले. १. हिंदू मॅरेज ऍक्ट २. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट ३. हिंदू अडॉप्शन अँड गार्डीयनशिप ऍक्ट आणि ४. हिंदू सक्सेशन ऍक्ट... जाणून बुजून मुस्लिमांना ह्यातून वगळण्यात आलं. त्यांना त्यांच्या शरियत प्रमाणे वागायला अनुमोदन दिलं... कारण त्यांनी असला भारताने पारित केलेला कायदा मान्य केला नसता म्हणून... तुम्ही आमचे कायदे मानत नसाल तर त्यांना बाहेरचा दरवाजा किंवा योग्य ती शिक्षा दाखवली गेली नाही...तर त्यांच्यासाठी कायदे वगळले गेले. त्यांच्या धर्मासोबत चाटण्याचा धर्मसुद्धा अवलंबिला गेला... गरज नसताना... त्यांच्या कट्टरतेला खतपाणी घालायला इथून सुरुवात झाली... नंतर स्पष्ट उल्लेख करायचा झाला आणि कशी आपल्या संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला कचऱ्याची टोपी दाखवून, नं पटणारे मुस्लिम लांगुलचालन केले ह्याचा दाखला द्यायचा झाला तर खूप गाजलेली शाह बानो केस सांगावीच लागेल.. तर झालं होतं असं कि ह्या शाह बानोचा मोहम्मद अहमद खानशी निकाह झाला होता १९३२ साली. २ मुलं आणि ३ मुली ह्यांचा नंतर जन्म झाला. मोहम्मद अहमद खाननं साधारण १९७५ च्या सुमारास ह्या शाह बानो ला घरातून बाहेर काढलं. तिने सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत महिना ५०० रुपयांच्या पोटगीसाठी याचिका दाखल केली, इंदोरच्या मॅजिस्ट्रेटसमोर. (सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत कोणतीही बायको, घटस्फोटिता, पालक, पाल्य पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात.) १९७८ मध्ये मोहम्मद अहमद खाननं तिला तलाक दिला. त्यानंतर तिने दुसरं लग्न केलं नाही. आता बचाव करताना मोहम्मद अहमद खाननं सांगितलं कि शाह बानो त्याची बायको नाही. तेंव्हा त्याची तिला पोटगी द्यायची काहीही जबाबदारी नाही. (मुस्लिम पर्सनल लॉ नुसार तलाकनंतर नवऱ्याची बायकोप्रती जबाबदारी फक्त दोनच बाबतीत असते. एक म्हणजे मेहेर, आणि दुसरं म्हणजे इद्दत पुरती पोटगी. मेहेर ही एक रक्कम असते कि जी निकाह करतेवेळेस निश्चित केलेली असते कि जी तलाक, जर झाला तर, नंतर नवर्याने बायकोला द्यायची असते. आणि इद्दत म्हणजे तलाकनंतरचा फक्त तीन महिन्याचा काळ, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर तलाकनंतर तीन मासिक पाळ्यांचा कालावधी. तोही ८७ दिवसांचा... संपलं.) मोहम्मद अहमद खाननं असा बचाव करायचं कारण म्हणजे त्याने आधीच दोन वर्षे २०० रुपये प्रति महिना तिला पोटगी दिलेली होती आणि त्याचबरोबर ३००० रुपये कोर्टात डिपॉझिट केलेहोते, मेहेरम्हणून... तरीही कोर्टाने त्याला अतिरिक्त २५ रुपये प्रति महिना शाहबानोला द्यायची ऑर्डर केली. पोटगीची रक्कम खूप कमी होती म्हणून शाहबानो ने मध्यप्रदेशच्या हायकोर्टात अपील दाखल केलं. हायकोर्टाने ते अलाउ करून १७९.२० रुपयाची पोटगी द्यायची ऑर्डर केली. त्याच्याविरुद्ध मोहम्मद अहमद खाननं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं, जे त्या न्यायालयाने फेटाळून लावलं... आणि ऐतिहासिक निर्णय दिला कि इद्दत च्या कालावधीनंतर सुद्धा मुस्लिम नवर्याने बायकोला पोटगी द्यावी, सीआरपीसीच्या सेक्शन १२५ च्या अन्वये. "इस्लाम खतरेमे है" च्या आरोळ्या सुरु झाल्या. सर्व तथाकथीत मुस्लिम विचारवंत ह्यांच्या बैठका वाढू लागल्या. पहिल्यांदाच न्यायालयाने त्यांच्या धर्मात हात घातला होता.. इतरांच्या बाबतीत जे काही करायचं ते करा पण इस्लामला हात नाही कोणी लावू शकत हा त्यांचा स्टॅन्ड होता... अख्खे मुस्लिम जनमानस ढवळून निघाले. राजीव गांधीचे सरकार होते. सर्व मुल्ला, मौलवी गेले त्यांना भेटायला. गंभीर इशारे दिले. सरकारला धोका उत्पन्न करण्याची गर्भित धमकी दिली. राजीव गांधी घाबरले, टरकले... आणि संसदेला हाताशी धरून "मुस्लिम वूमन (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन डायव्होर्स) ऍक्ट १९८६" पास केला. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली. आणि सीआरपीसीचा सेक्शन १२५ हा मुस्लिमांना लागू होणार नाही आणि लागू करायचा असेल तर दोघांनी तसं ऍफेडेव्हिट सादर करावं असं सांगितलं गेलं. आता कोण मुस्लिम नवरा नसती आफत ओढवून घेईल असं ऍफेडेव्हिट सादर करून?? आता पुन्हा तो इद्दतचा नियम लागू केला गेलाय.. इथं काय झालं??? मुस्लिम जनता सर्वोच्च न्यालयाचा निर्णय कि जो कायदाच असतो, तो मानायला तयार नव्हती तेंव्हा कायदा पुन्हा वळवला गेला... त्यांचे बूट चाटण्यासाठीच ना? आणि आता पुन्हा हाच मुद्दा आपल्यासमोर येतोय "इस्लामिक बँकेच्या रूपात" शरियत कायद्यानुसार कर्जावर व्याज घेणे पाप आहे. हा कायदा बरेच मुस्लिम लोक पाळतात. बरेच मुस्लिम लोकं बँकेचे व्यवहार करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे पैसे बँकेच्या व्यवहारात येत नाहीत. त्यामुळे जर त्यांचे पैसे बँकेच्या व्यवहारात आणायचे असतील तर शरियतच्या कायद्यानुसार चालणारी बँक असावी ह्या पायावर इस्लामिक बँक उभी आहे. ह्या बँकेत कर्जावर व्याज आकारले जात नाही कारण शरियत कायद्यानुसार कर्जावर व्याज घेणे पाप आहे. मग ह्या बँका कशा चालतात... त्या प्रत्यक्षरित्या नाही पण अप्रत्यक्ष रित्या व्याज घेतातंच. उदाहरण द्यायचं झालं तर... एकाला होमलोन घ्यायचं आहे.. तर बँक ते घर एकतर विकत घेईल किंवा बांधून देईल. त्यानंतर त्याव्यक्तीकडून त्या घराचे भाडे आकारेल. ह्या अश्या भाड्यामधून बॅंक नफा मिळवते. जर धंद्यासाठी कर्ज हवे असेल तर प्रॉफिट-लॉस शेअरिंगच्या तत्वावर ही बँक चालते, प्रत्यक्ष व्याज नं घेता. आखातात हि बँक जोरात चालते (अर्थात तिथे काही पर्यायच नाही म्हणा). तिथे मूळ व्यवसाय हा तेलाचाच आहे म्हणून तोट्याची शक्यता खूप कमी. प्रॉफीटशेअरिंगच जास्त चालतं. काही प्रगत राष्ट्रांमध्येही इस्लामिक बँकेचं फायदेशीर आस्तित्व आहे, कारण त्यांच्याकडे कर्ज वसुलीचे तगडे मेकॅनिझम आहे. भारतात बँकेचा जास्त लोचा हा कर्जवसुलीचाच आहे. त्यामुळेच तो बॅलेन्सशीटचा फुगवटा येतो. उद्या हे असं झालं तर त्याचा बोजा प्रत्यक्षरित्या इतर जनतेवर येणार नाही हे कशावरून? तर ह्या अश्या बँका भारतात कितपत चालतील हा प्रश्न आहे. पण मुळात गोष्ट अशी आहे आता पुन्हा एकंच विषय अधोरेखित होत आहे कि, इथेही मुस्लिम लोकं रेग्युलर बँकिंग स्वीकारत नाहीयेत म्हणून आम्ही आमचे कायदे वळवत आहोत, पुन्हा एकदा... युनिफॉर्म मॉनिटरी कोडसाठी काही काळानंतर लढा द्यावा लागेल कि काय अशी स्थिती उद्भवायला काहीच वेळ नाही लागणारे... हे लांगूलचालन नाही तर काय आहे? जे काही बँकिंग आपण सर्व जण वापरत आहोत. त्याचंच कंपल्शन जर त्यांच्यावर केलं तर नाही का चालणार? कि हे गृहितंच धरायचं कि ते हे मान्य करणार नाहीत? इलेक्शनच्या बाबतीत पण इस्लाममधे दोन प्रवाह आहेत. सुन्नी म्हणतात इलेक्शन हि सुन्नत (म्हणजे प्रॉफेट महम्मदने अंगिकारलेली) आहे. आणि शिया वारसाहक्काच्या बाजूने आहेत, इलेक्शनच्या नाही.. तर मग उद्या आपण भारतात शिया पंथीयांसाठी एक वेगळा प्रांत उभारणार आहोत कि जिथे निवडणूक नसेल? हे कुठे चाललंय? हे योग्य आहे? बर्याचदा आपली न्यायालये पण भेदभाव करतात कि काय असं वाटतं... त्या याकूब मेननसाठी मध्यरात्री २.३० वाजता सुनावणी होते. सलमान साठी ७.३० पर्यंत कोर्ट उघडं होतं. कर्जावर व्याज मंजूर नाही पण जर मेहेर दिलेली नसेल तर त्या अनपेड मेहेरवर व्याज घेणं मंजूर आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. (हमीरा बीबी वि. झुबैदा बीबी) हेच आहे का आपले "धर्मनिरपेक्ष शासन"? भाजपा हि भगवी काँग्रेस आहे हे कोणीतरी म्हणालं होतं ते खरंच आहे कि काय? केरळ सरकार ह्या अश्याच बँकेच्या स्थापनेच्या प्रयत्नात होतं तेंव्हा डॉ. सुब्रमनियम स्वामींनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली तीही अत्यंत आदर्श कारणे देत (जर कोणाला हे जजमेंट हवं असेल तर माझ्याकडे आहे) ह्याच आदर्शाच्या नावाखाली जगभर पसरलेला दहशतवाद त्यांना दिसत नाही? मला मुस्लिमांबद्दल कसलाच आकस नाही पण जाणून बुजून हि जी काही वेगळी वागणूक दिली जातीये त्या विरोधात मी नक्कीच आहे. (ह्या लेखावर टीका जरूर करावी पण कुठलंतरी एक वाक्य घेऊन मागचा पुढचा संदर्भ हेतुपुरस्सर वगळून, एनडीटीव्ही स्टाईलने, टीका करणे टाळावं, ही मनापासून विनंती... मार्गावरून भटकू नये वा दुसऱ्याला भटकवू नये. कारण मिपावर काही सन्माननीय सदस्य असे आहेत कि जे सोलापुरवरून पुण्याच्या गाडीत बसतात आणि हि गाडी हैद्राबादला कशी जात नाही हे बघतो, ह्या अट्टाहासात असतात)

वाचने 16345
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

http://www.thehindu.com/business/Industry/Sharia-banking-RBI-proposes-%… या लेखानुसार सध्यातरी फक्त "एक खिडकी " उघडायचा विचार आहे.. पूर्ण बँक नाही . आणि यातून साधे सोपे व्यवहार कसे होतात ते बघून पूर्ण बँकिंग सिस्टम चालू करतील . पण तरी .. अशी धर्माधारित बँक हा फक्त चाटूपणा आहे . भाजपकडून हि अपेक्षा नव्हती .

लोकहो, शरियामते व्याज घेणे निषिद्ध आहे. तर मग व्याज घेण्यासोबत देणेही तेव्हढेच निषिद्ध आहे का? नसल्यास वेगळ्या इस्लामिक ब्यांकेची गरजच काय मग? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै चर्चेस येताना बेसिक चाळून घ्या की जरा नाही तर अलगद विकेट जाऊ शकते, विकिपीडिया लेख तुमच्या माझ्यासारख्यांसाठीच असते, ह. घ्या.

In reply to by गामा पैलवान

इस्लाम मध्ये प्रॉफीट ला ना नाही व्याजाला नकार आहे म्हणून व्याज द्यायचे घ्यायचे नाही पण प्रॉफीट द्यायचे घ्यायचे म्हणून तथाकथित इस्लामिक बँका त्याला पार्टनरशीप म्हणून दाखवतात, आपल्या कोऑपरेटीव्ह बँकींग सारखेच पण को-ऑपेरेटीव्ह बँकींग मध्ये डिपॉझीटर कर्जघेणार्‍याच्या व्यवसायातली रिस्क स्वतःच्या डोक्यावर गेहत नाही. प्युअर इस्लामीक बँकींग मध्ये कर्ज घेणार्‍याचा डिपॉझीटर हा पार्टनर म्हणून दाखवला जातो आणि कर्ज घेणार्‍याचे नफा नुकसान ही झेलावे लागते. अर्थात इस्लामीक बँकींग नावा खाली होणारे बहुतांश बँकींग प्युअर इस्लामीक बँकींग या प्रकारात मोडणारे नसते.

In reply to by गामा पैलवान

गापै आपण मोरे सरांची अलिकडची लेखमाला वाचली असेल तर, व्यक्ती ज्या काही वस्तु आणि सेवांचे उत्पादन करते त्याची नोंद घेणे आणि गरजे नुसार नेमका चलन पुरवठा करण्यासाठी, तसेच भविष्यातील चलन विरहीत आर्थीक व्यवहारांसाठी सर्व जनता बँकींगशी जोडली जाणे गरजेचे आहे म्हणजे बँकींगचा फायदा इतरांना व्हावा एवढाच उद्देश नाही तर सरसकट (किमान बहुतांश समाज) बँकींगशी जोडला जाणे हि अर्थशास्त्रीय गरज वास्तव आणि ठीक आहे. त्यासाठी लोकांना व्याजा एवजी प्रॉफीट शेअरीग वाले इत्यादी बँकींग पर्याय देणे अगदीच गैर आहे असे नाही पण त्यात विशीष्ट धर्मांची नावे स्विकारण्याची गरज नसतानाही त्याचा आग्रह धरला जातो आहे तो अनाठायीच आहे.

In reply to by गामा पैलवान

गा पै गूगलल्या नंतर सियासत डॉट कॉमवर हा लेख सापडला छोटेखानी लेख पण फायदे आणि मर्यादांची चटकन माहिती देतो.

In reply to by माहितगार

जिज्ञासूंसाठी हा लेख पण उत्तम दिसतो. व्याजरहीत -पार्टनरशीप बँकीग मध्ये मॅच्युरीटी पिरीएड मिसमॅचचा घोळ या लेखात नेमकेपणाने पकडला आहे. या लेखात म्हटल्या प्रमाणे विशीष्ट मर्यादीत चौकटीत काम करणारे म्युच्यूअल फंड हे या (अज्ञान)श्रद्धावंतांसाठी अधिक बरे असावेत.

इस्लामिक बँकेची गरज नक्की कोणाला आहे, का आहे, अशा बँकेचा सर्वसामान्यांना काही फायदा आहे का फक्त एका विशिष्ट वर्गाला आहे? इस्लामला व्याज देणेघेणे मान्य नसेल तर पठाणी व्याज हा शब्द कोठून आला असेल? इस्लामवाल्यांसाठी वेगळे व्यक्तिगत कायदे, इस्लामी बहुसंख्य असलेल्या राज्याला विशेष दर्जा, नंतर त्यांच्यासाठी वेगळ्या शिक्षणसंस्था, नंतर शरिया कोर्ट, आता इस्लामिक बँक . . . state within state कडे वाटचाल सुरू आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

इस्लामला व्याज देणेघेणे मान्य नसेल तर पठाणी व्याज हा शब्द कोठून आला असेल?
इस्लामला मान्य नसले तरी काही समुदायांनी वेळोवेळी व्याजाने पैसे देण्याचा व्यवहार केला आहे. भारतातला पठाण समाज आज या व्यवसायात तेवढासा दिसत नाही पण वाकप्रचारावरुन कोण्याकाळी त्यांनी पिळून व्यवसाय केला असला पाहीजे. माझा एक सहकारी मुस्लिम खोजा समाजातून होता आणि मुस्लिम खोजा समाज कशी मोठ्या प्रमाणावर मुनाफाखोरी करणारी सावकारी करुन उदर निर्वाह दक्षिण आशिया आणि जगात इतरत्र करतो त्याचे वर्णन त्याच्या कडूनच ऐकले आहे. बहुतांश मुस्लिम राष्ट्रांनी सॉव्हरीन डेब्ट्सचा वेळोवेळी अंगिकार केला आहे आणि करतात, ओटोमन साम्राज्याच्या कर्जबाजारीपणा आणी युरोपियनांनी सर्वसामान्य तुर्कस्थानींकडून केलेली कर्जवसूली इतिहासाच्या पानांवर विराजमान आहे. आजही तथाकथित इस्लामिक बँकीग अगदी बहुतांश इस्लामिक देशांमध्येही आजाही ४० टक्क्यांच्या वर नसावे. बांग्लादेशातील मायक्रो फायनान्स करणारी ग्रामीण बँक इस्लामीक बँक नाही तरीही या धागा चर्चेत बर्‍यांनी ती तशी आहे समजून चर्चा केली आहे म्हणजे गैरसमज बरेच आहेत.

In reply to by माहितगार

या प्रतिसादाचे शीर्षक आपोआप तयार झाले आहे, 'इस्लामला व्याज देणेघेणे मान्य नसेल' असेच वाचावे

In reply to by असंका

व्यस्तता आहे हे खरे चलन अनुपलब्धतेमुळे सवड गावली तसा काही दिवस अधून मधून दिसेन

In reply to by असंका

=))
कॉपीपेस्ट केलेले गुरुजींचे वाक्य मिपा सॉफ्टवेअर ने नको तेथे तोडले त्यास आम्ही हतबल आहोत केवळ मिपा मालकांकडे कळवू शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

अशा बँकेचा सर्वसामान्यांना काही फायदा आहे का फक्त एका विशिष्ट वर्गाला आहे?
याच उत्तर हो आणि नाही असेही आहे, ज्यांना नवा व्यवसायात गुतंवणूकदार पार्टनर हवा आहे त्यांना गुतंवणूकदार पार्टनर मिळण्यात अधिक साहाय्य होते, इथे गुतंवणूकदार व्यवसायात हस्तक्षेप करू शकतो त्या शिवाय गुंतवणूकदारांनी बँकेचा पाठींबा अचानक काढून घेण्याचे ठरवलेतर अशा बँकेमार्फत गुंतवणूक घेतलेले व्यावसायिक टेक्नीकली गोत्यात येऊ शकतात. अशा बँकेमार्फत सर्वसामान्य गुंतवणूकदार (यांना ठेवीदार म्हणण्यात पॉईंट नाही) आहेत त्यांची इच्छा असो अथवा नसो त्यांच्यावर बँकेने गुंतवलेल्या व्यवसायांची रिस्क स्विकारावी लागते म्हणजे गुंतवणूकीवर परतावा मिळेल याची हमी नाहीच पण लॉसही स्विकारावा लागू शकतो (मी प्युअर इस्लामिक बँकींग तत्वा बाबत म्हणतो आहे), जर औकाफ मध्ये आर्थीक सावळा गोंधळ होऊ शकतो तर इस्लामिक बँकेत होणार नाही याची हमी काय म्हणजे ज्या सर्वसामान्यांच्या नावाने टाहो फोडला जात आहे त्यास क्रेडीट वर्दीनेस कमी पडतो म्हणून गुंतवणूक तर मिळणार नाही अशी गुंतवणूक केवळ क्रेडीट वर्दीनेस असलेल्या बलाढ्य व्यावसायिकांनाच मिळेल आणि सामान्य गुंतवणूकदार बलाढ्य व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायावर तोटा दाखवू नये म्हणून एकमेव परमेश्वराची प्रार्थना करत असेल तर शेअर मार्केट आणि या नव्या रुपातल्या बँकातल्या रिस्क मध्ये सर्वसामान्यासाठी फरक काय राहतो ? रिटायरमेंट नंतरसाठी म्हातारपणाच्या सोईसाठी रिस्कफ्री गुंतवणूक करण्याचा यात तत्वतः मार्ग असू शकणार नाही हे माझे मत चुकभूल देणे घेणे असो.

जेथे जेथे आणि/किंवा जेव्हा जेव्हा धर्म आणि राज्यप्रशासन यांची सरमिसळ झाली आहे, तेथे तेथे आणि/किंवा तेव्हा तेव्हा त्याचे पर्यवासन एकांगी आणि जुलुमी राज्यव्यवस्था निर्माण होण्यात झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अश्या व्यवस्थेत धर्माच्या नावाखाली चालणार्‍या अनेक जुलुमी / अतार्किक गोष्टींना केला जाणार्‍या गोष्टींना "धर्मावर आक्रमण" या नावाखाली सहजपणे मोडून काढणे शक्य होते. त्यामुळे, आजतागायत कोणतीही धर्माधिष्टीत राज्यव्यवस्था फार काळपर्यंत सुजाण, सुप्रशासित किंवा समतापूर्ण राहू शकलेली नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धर्म नसलेली कम्युनिस्ट व्यवस्था अन सोविएत तरी कुठं टिकलं काका? बिसाईड्स, प्रपोजल आरबीआय म्हणजे केंद्र सरकारने मान्य केलेले आहे, रोजचे व्यवहार सरकारी नियंत्रणात येऊन टेरर फायनान्स किंवा संबंधित गतीविधींवर चेक ठेवण्याच्या विचारावर आपले मत काय ते जाणून घ्यायला आवडेल !

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कम्युनिस्ट ही निधर्मी व्यवस्था आहे हा गैरसमज आहे :) किंबहुना, कार्ल मार्क्सच्या मनात असलेला; आणि आताच्या कम्युनिस्टांच्या मनात नसलेला पण त्यांनी धूर्तपणे पसरवलेला हा गैरसमज आहे. कम्युनिझम ही; "गरज नाही तिथे धर्माला अफूची गोळी म्हणत ठेचणारी (उदा: झिंजियांग)" आणि "गरज असेल तेथे धर्माच्या नावाखाली चिथावणी देऊन (उदा: युएनमध्ये चीनने केलेली धार्मिक अतिरेक्यांची आणि त्यांना संरक्षण देणार्‍या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची पाठराखण व त्यांची ऑल-वेदर मैत्री )" आपला कार्यभाग साधणारी धूर्त, पाताळयंत्री व कोणत्याही कडव्या धर्माइतकीच (किंवा कांकणभर जास्तच) कडवी, आणि केव्हाही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू शकणारी कडवी विचारसरणी आहे. याच धूर्त, पाताळयंत्री व प्रसंगी क्रूर धार्मिक अतिरेक्यांचाही थरकाप उडवणार्‍या कम्युनिस्टांच्या वैशिष्ट्यामुळे, झिंजियांगमध्ये इस्लामी अतिरेक कडवेपणाने मोडून काढला गेला/जात आहे; तेथे मुस्लिम सरकारी नोकरांना कामाच्या वेळात अगदी, रमजानमध्येही, नमाज पढायला बंदी आहे. तरीही, कोणत्याही इस्लामी राष्ट्राने किंवा तथकथित इस्लामी अतिरेकी संघटनांनी त्याविरुद्ध ब्र काढल्याचे ऐकू येत नाही. किंबहुना, बर्‍याच इस्लामी अतिरेक्यांचा आणि देशांचा तो "प्रिफर्ड ऑल-वेदर फ्रेंड" आहे ! :) निधर्मीपणाच्या "धर्माचा" मुखवटा घावून कम्युनिस्ट इतर धर्मांशी मैत्रीचे संबंध ठेवून होते/आहेत/असतील. आताही मध्यपूर्वेत कम्युनिस्ट व कॅपिटॅलिस्ट यातल्या दोघांपैकी कोणाच्या साथीत (डझनांनी असलेले) कोणते धार्मिक मर्सिनरी गट आहेत हे रोज बदलत्या हितंसंबंधांबरोबर आणि लावलेल्या बोलीच्या किंमतीप्रमाणे बदलत आहे. भारतातल्या अतिरेक्यांच्या नावे शहीदी नारे देणार्‍या फुटीरतावादी संघटनांबरोबर तथाकथित भारतिय कम्युनिस्ट हिरीरीने उभे आहेत. आणि इस्लमिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची आयएसआय भारतातील माओवाद्यांना पैसा आणि इतर मदत पुरवत आहे. ज्यांच्या मते "देव न मानणे केवळ देहदंडयोग्य कृती आहे" त्यांची "देव व धर्म या अफूच्या गोळ्या आहेत" असे म्हणणार्‍यांबरोबर युती होणे, हा अत्युच्च्य प्रतीचा कांगावाखोरपणा आणि धर्माचा राजकिय-आर्थिक स्वार्थाकरिता उपयोग नाही तर काय आहे ? लोकशाहीत, सेक्युलर झूल पांघरून व कोणत्याही धर्माच्या मागे लपून स्वार्थ साधणे यासारखा कांगावाखोर आणि धोकादायक प्रकार दुसरा नाही. ======================== बिसाईड्स, प्रपोजल आरबीआय म्हणजे केंद्र सरकारने मान्य केलेले आहे, रोजचे व्यवहार सरकारी नियंत्रणात येऊन टेरर फायनान्स किंवा संबंधित गतीविधींवर चेक ठेवण्याच्या विचारावर आपले मत काय ते जाणून घ्यायला आवडेल ! प्रश्न तितकासा स्पष्ट नाही, पण, तरीही मला समजला त्याचे उत्तर असे आहे. सद्याच्या डीमॉनेटायझेशनमुळे अतिरेक्यांच्याविरुद्ध खालील तडक फायदे झाल्याचे दिसत आहे... १. रु ५०० व रु१००० च्या नोटा रद्दबातल झाल्याने, पाकिस्तानात छापून भारतात पाठविण्यासाठी साठवलेल्या व भारतातील अतिरेक्यांचा जाळ्यांत पोचलेल्या खोट्या नोटा निकालात निघाल्या. पाकिस्तान स्वतःला जरूर आहे त्यापेक्षा तीनपट नोटांचा कागद गेले एकदीड दशक खरेदी करत आहे, यावरून या समस्येच्या व्याप्तीची थोडी कल्पना यावी. या खोट्या पैशाचा अचूक आकडा केवळ आयएसआयच सांगू शकेल, पण अनेक अंदाजां प्रमाणे तो अनेक दशहजार किंवा लक्ष कोटीत असावा. मात्र, त्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला, नागरिकांना आणि सुरक्षादलांना होणार्‍या मोठ्या धोक्याबद्दल कोणाच्याच मनात संदेह नसावा. नोटा रद्दबातल केल्यानंतर एकदोन दिवसांतच काश्मीरमधील दगडफेक बंद होणे, ९०-९९% मुले शालेय परिक्षांना जाणे आणि सर्वसाधारण परिस्थितीत लक्षणिय सुधारणा होणे, हे हुरियत व इतर फुटीरतावादी गटांची आर्थिक शक्ती कमी झाल्याचे व त्यामुळे त्यांचा जनतेवरची पकड कमी झाल्याचे निदर्शक आहे. २. डीमॉनेटायझेशनचा असाच परिणाम माओवाद्यांच्या संबंधातही दिसत आहे. हे पाहता, माझ्या अल्पमतीप्रमाणे... अ) अतिरेक्यांच्या संबंधात डिमॉनेटायझेशनचा, हाच (१ व २ मध्ये लिहिलेला) मुख्य, त्वरीत प्रभाव दाखवणारा आणि इतकाच तात्कालीक परिणाम अपेक्षित होता. आणि तो झाला आहे असेच दिसत आहे. यानंतर... आ) आता या काही काळासाठी नियंत्रणात आलेल्या संघर्षाच्या व सामाजीक शांततेच्या स्थितीचा फायदा घेऊन संरक्षक दले आणि गुप्तचरसंस्थांनी एकत्रितपणे सीमेवर आणि सीमेच्या आत दीर्घकालीन प्रभाव पाडणार्‍या कारवाया करणे आणि वरचढपणा मिळविणे अपेक्षित आहे. सद्याच्या घडीला इतकेच अपेक्षित आहे. त्यांनतर, त्या वरचढपणाचा प्रभाव वाढवत नेत... (इ) देशांतर्गत समस्येचा इतर अनेक सामाजिक-आर्थिक-राजकीय उपायांच्या मदतीने दीर्घकालीन प्रयत्न करून खातमा करण्याचा करावा लागेल. याला आपण "हार्ट्स अँड माइंड्स ऑपरेशन" म्हणू शकतो. (ई) सीमेवरच्या चकमकी व सीमेवरून होणार्‍या घुसखोरीच्या (पक्षी : पाकिस्तानच्य) समस्येचा उतारा, अर्थातच, खूप वेगळा आणि अधिक कठीण असेल. त्यासंबंधातल्या जरूर त्या कारवाया सीमेवर आणि काश्मीरमध्ये सैन्यदल, सीमासुरक्षा दल, अर्धसैन्यदले अधिक जोमाने करत असल्याचे दिसत आहेच. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्देगिरी आणि महत्वाच्या देशांशी असलेले राजकीय-आर्थिक-सामरिक संबध घट्ट करणे, नवीन संबंध प्रस्थापित करणे व त्यांच्या तर्फे पाकिस्तानला वाळीत पाडणे, त्याला कडक संदेश देणे, इत्यादी चालू आहेच. नुकत्याच झालेल्या सार्क सभेच्या संबंधात आणि याच (नोव्हेंबर) महिन्यात रशिया, जपान, चीन, इझ्रेल, इत्यादी देशांबरोबर भारतात व भारताबाहेर घडलेल्या कृती व संवाद (इंटरअ‍ॅक्शन्स) हेच दाखवतात, असे माझे निरिक्षण आहे. असो, थोडक्यात, "केवळ नोटा रद्द करण्याने सर्व काळा पैसा नष्ट होईल" आणि "केवळ खोट्या नोटा निकामी झाल्या म्हणजे अतिरेकी खतम झाले" ही दोन्हीही वाक्ये एकाच उच्च प्रतीची हास्यास्पद वाक्ये आहेत. ती वाक्ये ना कोणी जाणकार म्हणत आहेत ना कोणी जबाबदार सरकारी सूत्रे. मात्र, विरोधक सरकारवर बळजबरीने (पक्षी : कांगावाखोरपणे) ते आरोप लादतान दिसत आहेत; हा भारतीय राजकारणाचा जुना रोग आहे. सद्यातरी, (कोणत्याही सत्तेत असलेल्या) सरकारला आणि सुजाण नागरिकांना ते दुखणे अंगावर काढण्याशिवाय दुसरा उपाय दृष्टीपथात नाही. असो. तुमचा प्रश्न वरवर साधा दिसला तरी तो सोपा किंवा बायनरी नसल्याने गैरसमज टाळण्यासाठी त्याचे सविस्तर उत्तर देणे योग्य वाटले. शिवाय, या समस्येतल्या काही खाचाखोचा व निर्देश जेवढे शक्य आहेत तेवढे आणि तेवढेच दिले आहेत. तुम्ही जाणकार आहात, त्यामुळे त्याबाबत अधिक लिहायची गरज नव्हतीच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेथे जेथे आणि/किंवा जेव्हा जेव्हा धर्म आणि राज्यप्रशासन यांची सरमिसळ झाली आहे, तेथे तेथे आणि/किंवा तेव्हा तेव्हा त्याचे पर्यवासन एकांगी आणि जुलुमी राज्यव्यवस्था निर्माण होण्यात झाले आहे. धर्म नसलेली कम्युनिस्ट व्यवस्था अन सोविएत तरी कुठं टिकलं काका? हे वाक्य "सेपरेशन ऑफ स्टेट अँड चर्च / रिलिजन" या वाक्प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पहा. कधी कधी मुद्दा समजवून द्यायला विंग्रजीचा आधार घेतला की सोपे पडते. ;) :) आणि तसं बघितलं तर या जगात काहीच / कोणीच अमरपट्टा घेऊन येत नाही. वर मुद्दा जुलुमी राजवटीचा होता, नश्वरतेचा नव्हता :)

माहितगार,
गापै चर्चेस येताना बेसिक चाळून घ्या की जरा नाही तर अलगद विकेट जाऊ शकते
मान्य. विकीवरचा लेख अगोदरच चाळायला हवा होता. उशीर झाला खरा. पण काही हरकत नाही. देर से आये दुरुस्त आये. तो लेख चाळल्यावर रिबा म्हणून पापासामान संकल्पना सापडली. व्याज हे रिबा आहे असं अनेक मुस्लिम लोकं मानतात. आता विकीवरचा उल्लेख पहिला तर रिबा म्हणजे unjust, exploitative gain अशी स्पष्ट शब्दयोजना आहे. यांतला gain हा शब्द परम महत्वाचा आहे. कारण उघड आहे. समजा गाम्याने शेखचिल्लीला व्याजाने पैसा दिला. बदल्यात शेखचिल्लीने रीतसर व्याज भरून यथोचित समयी मुद्दलाची परतफेड केली. तर रिबाचं (=व्याजाचं) पाप शेखचिल्लीला कधीच लागणार नाही. कारण या व्यवहारात gain गाम्याचा झाला आहे. इस्लामिक ब्यांकिंगची गरज शेखचिल्लीला नसून गाम्याला आहे. सर्वसामान्य मुस्लिमास आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी इस्लामिक बँकेची गरज नाही. प्रचलित बॅंकिंग पद्धतीत ते आरामात सामावले जाऊ शकतात. आ.न., -गा.पै.