मुलीचा संपत्तीतला वाटा आणि समाज.
कायद्या प्रमाणे मुलगा आणि मुलीला सामान हक्क आहे.पण खरंच समाजाची मानसिकता बदलली आहे का ?
निमित्त होते माझ्या मावस बहिणीच्या घरात सध्या सुरु असलेले संपत्तीच्या वाट्यातले वाद.
ती तिच्या आईवडिलाची एकुलती एक लेक.आणि तिच्या पाठचा एकाच भाऊ.तिचे कुटुंब तसे पुण्यातल्या एका प्रतिष्ठित गोतावळ्यातले, सध्या लोक ' पाटील' लावतात त्या प्रकारातले. घरची परिस्थिती जरी बेताची असली तरी स्थावर मालमत्ता,शेती भरपूर.
माझी मावस बहिणीच्या वडिलांचे निधन तिच्या लग्ना आधी झाले.तिच्या लग्न जो काही खर्च येईल तो तिच्या चुलत्यांनी उचलला.
आता यात त्यांचे खरंच पुतणीच्या बापाचे कर्तव्य पार पडणे असा उद्देश असू शकतो का यावर प्रश्नचिंन्ह कारण तिचे लग्न होऊन
दोन वर्ष झाले तरी दोन वर्षात फक्त दोनदाच ते तिच्या सासरी जाऊन तिची तिच्या घरच्यांची भेट घेऊन आले आहेत.
कदाचित आज ना उद्या जर मालमत्तेतील काही भाग जर विकला गेला तर लग्नाचा खर्च वळता केला जाऊ शकेल अशी अपेक्षा असू शकते,किंवा समाजात आपले स्थान राहावे म्हणून देखील असेल.
आता तिचे लग्न व्हायच्या आधी चुलत्यांनी सर्वांच्या मिळून वाटल्यातला काही जमीन एका नामांकित बिल्डरला विकली आणि
फ्लॅट घेतले.आता ते परस्पर म्हणतात कि तिचा लग्ना आधी केलेल्या कोणत्याही व्यवहारात तिचा वाटा नाही.
आणि राहिला इतर मालमत्तेचा भाग तर,त्यांच्या मते घरातल्या कोणत्याही मुलीने तिचा वाटा ते देतील तेवढा घ्यावा आणि स्वतःहून मागू नये.
तिच्या माहेरच्यांचा अस म्हणणं आहे कि लग्नाचा खर्च केलाय,लग्नात जो काही खर्च केला तिथेच तो विषय संपला असं चुलत्यांचा आणि तिच्या आईचही म्हणणं आहे .
पण संपत्तीतच्या मूल्याचा विचार केला तर लग्नाचाचा खर्च अगदीच नगण्य आहे.
आणि भावाचा उदरनिर्वाह जर शेतीवरच चालत असेल तर वाटा मागणं एकवेळेस रास्त नसेल.
खरंच आज कायदा झाला तरी इतकी वेळ का यावी कि मुलीला तिचा वाटा मागावा लागावा ?
दोन मुलं असली तर असा प्रश्न येत नाही मुलांना सामान वाटा दिल्या जातो ,पण मुलींना मागितला तरच वाद होऊनच मिळते असं का ?
मुलीने वाटा मागितला तर ती वाईट होते असे का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आमच्या आईने काहीच न विचारता
पण का ?
मुलीच्या लग्नाचा आणि
मुलीच्या लग्नाचा आणि
हेच म्हणतो, वकील गाठा,
नाती बिघडणे.
ह्याच भावनेच्या खेळामुळे अनेक
बरोबर आहे !
माझा व्यक्तीगत अनुभव, कायदा
आमची आई आणि तिचे ३ भाऊ दोन
बहीण भावांमधे आपले आणि दुसऱ्याचे
मुलींनाही बरोबरीने वाटा
संपत्ती कोटीत आहे.
हे मान्य आहेच! जर काही
प्रामाणिकपणा!! Exactly, तोच
या हक्कासोबत पालकांना
अगदी अगदी!
फक्त संपत्ती साठी आई वडिलांना
मला वाटतं तुम्ही गैरसमज करुन
बरोबर
कितपत योग्य आहे.
अगदी
+१
हिस्सा
जी मुलगी स्वतःच्या वडिलांकडे किंवा भावाकडे हिस्सा मागत आहे तिला
नवर्याची बहीण नवर्याचा बाप
बहिणीच्या लग्नात खर्च करणारे,
जरी बहिणी रेटून मागत नसल्या
हो ..व्यहवारच. पण व्यहवार
यांच्या प्रतिसादाच्या
हल्ली लग्नाचा खर्च अर्धा
हल्ली लग्नाचा खर्च अर्धा
जरी बहिणी रेटून मागत नसल्या
मरण्याआधीच ?
त्यांनी त्यांची मालमत्ता
जर कळलावी धागा नसेल तर