Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मोदक on Fri, 11/11/2016 - 21:47
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
नमस्कार मंडळी. व्यायामाच्या धाग्यावर उदंड प्रतिसाद झाल्याने "फिटनेस अ‍ॅप आणि गॅजेट्स" च्या वापराबद्दल नवीन धागा काढत आहे. गोड मानून घ्या. ;) (एस रावांनाही बरेचदा लिहितो लिहितो म्हणून सांगितले होते.) सर्वप्रथम, आपण आपल्या आनंदासाठी व्यायाम / सायकलिंग करतो मग त्याचे असे रेकॉर्ड ठेवणे किंवा ट्रॅक ठेवणे अनेक जणांना पटत नाही. मात्र महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या मोठ्या राईड नंतर "आपले आत्तापर्यंत इतके इतके किमी झाले..!!" ही भावना जबरदस्त असते. अवर्णनीय..!!

अ‍ॅपसाठी आवश्यक गोष्टी -

या अ‍ॅपसाठी सर्वप्रथम आवश्यक गोष्ट म्हणजे भरपूर बॅटरी बॅकअप देणारा मोबाईल. काही कारणाने बॅटरीने मान टाकली तर अ‍ॅपवर रेकॉर्ड झालेले राईडचे आकडे शिल्लक राहिलच याची कोणतीही खात्री देता येत नाही. बहुतांश वेळा बॅटरी संपपर्यंत ट्रॅक झालेले आकडे बॅटरी चार्ज केल्यानंतर दिसतात पण अनेक अ‍ॅप असेही असतात की ते आपली राईड सेव्ह करेपर्यंत राईडची माहिती त्यांच्याकडे कुठेही सेव्ह करत नाहीत, त्यामुळे बॅटरी गेली की अ‍ॅपही जाते आणि आकडेही जातात. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे इंटरनेट डेटा शिवाय GPS चालू आणि कनेक्टेड राहण्याचे फिचर असलेला फोन. कारण इंटरनेट डेटा खूप बॅटरी खातो आणि अ‍ॅपला बॅटरी पुरत नाही. बाकी आवश्यक गोष्टी म्हणजे GPS, लोकेशन, अनेक वेगवेगळे सेन्सर्स वगैरे वगैरे.. हल्लीच्या सर्वच स्मार्टफोन मध्ये हे फीचर असतातच.

अ‍ॅप निवडताना..

सायकलिंग आणि रनिंगसाठी अ‍ॅप निवडताना "ऑटो पॉझ" वाले अ‍ॅपच शक्यतो वापरावे. अन्यथा ते अ‍ॅप दर थांब्याला चालू / बंद करावे लागते. तर मी आत्तापर्यंत वापरलेली कांही अ‍ॅप येथे देत आहे, बाकी माहिती प्रतिसादांमध्ये मिळत जाईलच. सायकल लॉग - विंडोज फोन - हे अ‍ॅप अगदी सुरूवातीला वापरले, पण यात ऑटो पॉझ नाहीये त्यामुळे मोठय राईडमध्ये पॉझ करणे आणि आठवणीने परत चालू करणे हे त्रासाचे काम होते. यात एलेव्हेशन ग्राफ मस्त निघतो. पण नंतर हे अ‍ॅप वापरणे बंद केले. . . GPS Tracker Free - विंडोज फोन - हे सध्या वापरत असलेले अ‍ॅप, एकदम भारी आहे आणि झकास ग्राफ निघतात. आपल्या वेगाचाही ग्राफ निघतो. मला सापडलेले सर्वात भारी अ‍ॅप समजायला हरकत नाही. ;) पुढील प्रकारची माहिती या अ‍ॅप वर रेकॉर्ड होते. . . . . Sports Tracker - अ‍ॅन्ड्रॉईड - हे दुसर्‍या फोनवरील अ‍ॅप, हे पण चांगले आहे, विंडोजवरील GPS Tracker Free इतके चांगले नसले तरी चांगले अ‍ॅप आहे. . . . पायी चालण्यासाठी पेसर नामक एकच अ‍ॅप वापरायला सुरूवात केली आहे. तुम्ही इतर कोणते अ‍ॅप वापरत असाल तर जरूर माहिती द्या. फिटबिट किंवा फिटनेस बँड बद्दल व्यायामाच्या धाग्यात चर्चा झाली आहेच, येथेही ती चर्चा सुरू ठेवता येईल.
  • Log in or register to post comments
  • 7266 views

प्रतिक्रिया

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 11/11/2016 - 21:54

Permalink

ऑफलाईन जीपीएस चालू ठेवणारा

ऑफलाईन जीपीएस चालू ठेवणारा फोन नाही बहुदा आमचा (मोटो जी प्रथम पिढी) त्यामुळे, ऍप इंस्टॉल करायची इच्छाही अपूर्णच राहणार असे दिसते. असो!
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 11/11/2016 - 22:00

In reply to ऑफलाईन जीपीएस चालू ठेवणारा by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

अजुन थ्री नॉट थ्री वापरताय

अजुन थ्री नॉट थ्री वापरताय होय..? :D
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 11/12/2016 - 22:28

In reply to अजुन थ्री नॉट थ्री वापरताय by मोदक

Permalink

आता काय ब्रे बोलावे, भाऊंनी

आता काय ब्रे बोलावे, भाऊंनी पाकच इज्जत काढली!. =)) होय महाराजा. तितकासा गेजेट सेवी नाही मी. मोबाईल पार कचरा होउस्तोवर वापरतो आजही. मोटो जी प्रथम पिढी करता काही उपयुक्त एप असले तर नक्की कळवा आमचा एखाद इंचाचा घसारा तुम्हाला खुपश्या दुआ देऊन जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पार्टाकस on Sat, 11/12/2016 - 00:32

Permalink

अ‍ॅपल वॉच

आयफोन ६ प्लस आणि अ‍ॅपल वॉच. (अजून ७ घेतलेला नाही) त्यात बिल्ट इन अ‍ॅक्टीव्हीटी आणि वर्कआऊट अ‍ॅप्स आहेत त्या खूप चांगल्या आहेत. कदाचित मला त्याची सवय झाली आहे म्हणूनही असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बेकार तरुण on Sat, 11/12/2016 - 05:06

Permalink

अ‍ॅपल ६, रनकीपर आणि फिट्बीट

अ‍ॅपल ६, रनकीपर आणि फिट्बीट ब्लेझ वापरतो रनकीपर बरेच अचुक नोंदी करतो, फिट्बीट अधुन मधुन गंडत असतो
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sat, 11/12/2016 - 07:05

Permalink

या धाग्यासाठी आभार. कृपया

या धाग्यासाठी आभार. कृपया अँड्रॉइडसाठीच्या अॅपची माहिती द्यावी. विशेषतः दूरच्या अंतरासाठी सायकलस्वार कोणते अॅप वापरतात आणि त्यामुळे मोबाईलची बॅटरी उतरत नाही का याबद्दल कुतूहल आहे. दुसरे म्हणजे फिटनेस बँड्स आणि अशा अॅपचा समन्वय कसा साधतात. फिटनेस बँड्सची गरज खरंच असते का. सायकलिंग कॉम्पुटर म्हणून काही वाचले होते. ते काय असते. इ. प्रश्नांवर काही लिहिल्यास मदत होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 11/12/2016 - 08:21

Permalink

एस हेल्थ वापरतो. एप चालू बन्द

एस हेल्थ वापरतो. एप चालू बन्द करावे लागत नाही. आपली हालचाल अचूक टीपते. चालणे आणि धावण्यासाठी उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by अरिंजय on Sun, 11/13/2016 - 09:48

Permalink

मी स्ट्रावा वापरतो.

मी स्ट्रावाची मोफत आवृत्ती वापरतो. स्ट्रावा हे अँड्रॉईड अॅप आहे. हे सायकलींग व रनिंग दोन्ही साठी वापरता येते. तुमची राईड यावर अशी दिसते Image removed. Image removed. Image removed. याशिवाय आपण मित्रांना फॉलो करुन त्यांच्या राईड्स बघु शकतो व त्यांच्या राईड्स वर कमेन्ट्स देखील करु शकतो. माझ्याकडे अडिच वर्षांपुर्वीचा कार्बन कंपनीचा ४.२.२ अँड्रॉईड चा हातसंच आहे. त्यावर हे अॅप व्यवस्थित चालते. जिपीएस बोंबलण्याची अगदी क्वचित १-२ उदाहरणे आहेत. बाकी अॅप मस्त.याला बॅटरी देखील कमी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 11/15/2016 - 12:31

In reply to मी स्ट्रावा वापरतो. by अरिंजय

Permalink

स्ट्रावा वापरायला सुरूवात

स्ट्रावा वापरायला सुरूवात केली आहे. भारी अ‍ॅप आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 11/14/2016 - 21:49

Permalink

स्राव्हा बंद कसे करायचे हो

स्राव्हा बंद कसे करायचे हो रनिंग झाल्यावर?? काय सुधारना ते टाकलं डिलिट करून
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 11/14/2016 - 22:53

In reply to स्राव्हा बंद कसे करायचे हो by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

रेकॉर्ड राईडच्या बटणा शेजारी

रेकॉर्ड राईडच्या बटणा शेजारी एक झेंडा आहे, लालपिवळा. त्यावर क्लिक करा आणि ऍक्टिव्हिटी सेव्ह करा स्ट्रावा भारी आहे, अर्थात आम्हाला खुद्द प्रशांत मालकांनी स्ट्रावा कसे वापरावे याचे धडे दिल्याने अनेक खाचाखोचा कळाल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 11/14/2016 - 21:50

Permalink

मोदकाचं फिटनेसवेड असंच सुरू

मोदकाचं फिटनेसवेड असंच सुरू राहिलं तर त्याचा आयडी बदलून सुरळीची वडी करावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 11/14/2016 - 23:18

In reply to मोदकाचं फिटनेसवेड असंच सुरू by आदूबाळ

Permalink

ठ्ठो महालोल हहपुवा

ठ्ठो महालोल हहपुवा
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 11/14/2016 - 23:51

In reply to ठ्ठो महालोल हहपुवा by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

वजन काय कमी होत नाय राव :(

वजन काय कमी होत नाय राव :(
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदराव on Tue, 11/15/2016 - 14:05

In reply to वजन काय कमी होत नाय राव :( by मोदक

Permalink

जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे.

जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे. (खाण्याच्या बाबतीत)
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Tue, 11/15/2016 - 16:49

In reply to जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे. by आनंदराव

Permalink

जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे.

जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे. (खाण्याच्या बाबतीत)
(खाण्याच्या बाबतीत) हे खास लिहिण्यामागचे प्रयोजन?? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 11/15/2016 - 10:21

Permalink

मॉर्निंग वॉकला चांगले अ‍ॅप

मॉर्निंग वॉकला चांगले अ‍ॅप कोणते?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 11/15/2016 - 12:31

In reply to मॉर्निंग वॉकला चांगले अ‍ॅप by प्रकाश घाटपांडे

Permalink

मी पेसर नामक एक अ‍ॅप वापरतो

मी पेसर नामक एक अ‍ॅप वापरतो आहे. पण ते मठ्ठ अ‍ॅप माझ्या सायकलिंग दरम्यानच्या वेळेतले कांही अंतर मोजत आहे. म्हणजे काल ५७ किमी सायकलिंग केले आणि फार चालणे झाले नाही तर हे अ‍ॅप बरोब्बर राईडच्या वेळेत १२ किमी चालणे झाले असे असे दाखवत आहे. तुम्ही सायकलिंग करत नसलात तर एकदम चांगले अ‍ॅप आहे
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on Tue, 11/15/2016 - 13:45

Permalink

माझ्याकडे फिटबीट चा फिटनेस ट्रॅकर बेल्ट आहे .

सगळ्यासाठी उपयुक्त . अर्थात मी कधीच सिरिअसली वापरला नाही आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Tue, 11/15/2016 - 14:52

Permalink

GPS Tracker Free

GPS Tracker Free हे अँप वापरून पाहिले. चांगले आहे पण त्यात मध्ये पॉझ(Pause ) नाही करता येत. परत सुरुवातीपासून मोजायला सुरुवात करत ते बेन.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 11/15/2016 - 20:06

In reply to GPS Tracker Free by पाटीलभाऊ

Permalink

दोन "GPS Tracker Free" आहेत..

दोन "GPS Tracker Free" आहेत.. मी दिलेली लिंक बघा. त्यात ऑटो पॉझ आहे म्हणण्यापेक्षा राईड टाईम वेगळा मोजला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on Tue, 11/15/2016 - 19:54

Permalink

मी हे अॅप वापरते.पण आॅटो पाॅज

Image removed. मी हे अॅप वापरते.पण आॅटो पाॅज नाही याच्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Mon, 11/21/2016 - 17:32

In reply to मी हे अॅप वापरते.पण आॅटो पाॅज by त्रिवेणी

Permalink

हे रनकिपर आहे असे वाटते.

हे रनकिपर आहे असे वाटते. मी पण हेच वापरतो. GPS चा मात्र यात प्रॉब्लेम वाटतो चांगली रेंज असून सुद्धा. google मॅप्स वर योग्य लोकेशन दाखवतं पण यात येत नाही. आणि हो ऑटो pause नाही यात.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Tue, 11/15/2016 - 20:07

Permalink

गॅझेट्स आणि ऍप बद्दल

गॅझेट्स आणि ऍप बद्दल म्हणायचं तर फिटबीट सर्ज विथ HR (फिटबीट सिरीज मधील टॉप मॉडेल) आणि फिटबीट ऍप वापरतो जवळपास सर्व गरज पूर्ण होतात (लॉन्ग रनिंग करत असल्याने पेशल गरजा असतात) बाकी चालण्या / किंवा पाळण्यासाठी पेडोमीटर नावाचं एक फुकट ऍप आहे प्रत्येक चांगला स्मार्ट फोन स्वतःचे फिटनेस ऍप घेऊन येतोच त्यामुळे ढिगाने ऍप आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Tue, 11/15/2016 - 20:25

Permalink

अॅप किंवा फीटनेस बेल्ट

अॅप किंवा फीटनेस बेल्ट वापरल्याने वजन कमी होतं की चालल्याने, मोबाईलला लहान मुलांच्या झोळीत घालुन झोका दिला कि अॅप किंवा फिटनेस बेल्ट मधे आपोआप १०-२० के स्टेप्स चालल्याचा आकडा दिसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Tue, 11/15/2016 - 20:55

In reply to अॅप किंवा फीटनेस बेल्ट by कविता१९७८

Permalink

वजन कशाने कमी होईल हे

वजन कशाने कमी होईल हे ब्रह्मदेव सुद्धा नक्की सांगू शकणार आंही :) तरी पण जितक्या कॅलरी घेतल्या त्यापेक्षा जास्त खर्च (बर्न ) केल्या तरच वजन कमी होऊ शकते आणि इथेच फिटनेस ऍप आणि गॅझेट्स आपल्याला आरसा दाखवतात कि आपण किती कॅलरी कश्या खर्च करतोय (म्हणजेच फक्त आरश्यात बघून कोणी सुंदर होत नाही तसेच )
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Tue, 11/15/2016 - 21:39

In reply to वजन कशाने कमी होईल हे by माझीही शॅम्पेन

Permalink

अच्छा

अच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 11/15/2016 - 20:32

Permalink

गूगल फिट

अँड्रॉईडवर असाल तर गूगल फिट बेस्ट https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.fitness&hl=en जाहिराती वगैरे नाहीत. बॅटरीचा वापरही अतिशय कमी. गूगल अकाऊंटशी कनेक्टेड आहे त्यामुळे हिस्टरी जात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद भागवत १९८७ on Tue, 11/15/2016 - 22:38

Permalink

walkmate चांगले अँप्लिकेशन आहे

walkmate चांगले अँप्लिकेशन आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Sun, 11/20/2016 - 21:25

Permalink

खेळणे

माय लेटेस्ट टॉय - छातीवर लावायचा हार्ट रेट मॉनीटर - वाहू टिकर-एक्स. तसे बाजारात अनेक हार्ट रेट मॉनीटर उपल्ब्ध आहेत - जसे मनगटावर लावायचे घड्याळे (फीटबीट एचार) पण अचूक मोजमाप हवे असेल तर चेस्ट स्ट्रॅप मॉनीटरला पर्याय नाही. चित्र-श्रेयः आंतरजाल Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sun, 11/20/2016 - 22:23

In reply to खेळणे by विंजिनेर

Permalink

छातीला व्यायाम करताना सतत HR

छातीला व्यायाम करताना सतत HR मॉनिटर लावणं अतिशय त्रासदायक आहे त्यापेक्षा मनगटी गॅझेट्स खूप सुटसुटीत आणि दिवसभर सहज लावता येतात म्हणून गॅझेट घेताना विथ HR असलेलीच घ्या , नंतर फारफार बर पडत
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on Mon, 11/21/2016 - 01:18

In reply to छातीला व्यायाम करताना सतत HR by माझीही शॅम्पेन

Permalink

सरसकटीकरण

@माशॅ, तुमचा प्रतीसादातील सरसकटीकरण चूक आहे. आज काल बाजारात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फिटनेस गॅजेट्स आहेत की खरेदी करताना भंजाळून जायला होतं त्यामूळे तुमची गल्लत होणे साहजिक आहे. असो. अ‍ॅक्टीविटी ट्रॅकर तुम्ही म्हणताय तसं "दिवसभर" वापरून "अ‍ॅक्टिवीटी"चा डेटा गोळा करायला उपयोगी आहेत. म्हणून दीर्घ काळ आरामदायी वापर हा महत्वाचा निकष असतो. मनगटी घड्याळात एलीडीने मोजलेला हार्ट रेट "बराचसा" बरोबर असतो (१०-१५ बीपीम इकडे तिकडे). थोडक्यात मनगटी अ‍ॅक्टिवीटी ट्रॅकरमधे तुम्ही अचूकतेपेक्षा आरामादायीपणाला जास्त महत्व देत असता. अरे हो, शिवाय ते मनगटी गॅजेटस वापरून तुमचा कूलनेस फ्याक्टर आणि फ्याशन सेन्स वाढतो बर्का. काही जणासाठी हा बराच मह्त्वाचा निकष असतो :) हार्ट रेट मॉनिटर अंमळ वायला - हा वापरून तुमचं ट्रेनिंग डोळसपणे (efficiency) सुधारता येतं त्यामुळे अचूक मोजमापाला जास्त महत्व असतं. शिवाय तुम्ही हे गॅजेट "दिवसभर" वापरणं अपेक्षित नसतं. असो विस्तारभयास्त्व इथेच थांबतो. पुढे मागे या विषयावर एखादी जिल्बी पाडीन. शेवटी काय, कुठलेही गॅजेट हे "मीन्स टू अ‍ॅन एंड" आहे. - अंतीम लक्ष नव्हे हे ध्यानात ठेवून, आपल्या बजेटचा विचार करून, गरजा लक्षात घेऊन खरेदी करायचे की नाही हे आपण ठरवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Mon, 11/21/2016 - 12:19

In reply to सरसकटीकरण by विंजिनेर

Permalink

@माशॅ, तुमचा प्रतीसादातील

@माशॅ, तुमचा प्रतीसादातील सरसकटीकरण चूक आहे.
दोन्ही प्रकार वापरून पाहण्याऱ्या कमीत कमी ३० लोकांशी बोलून हे माझं मत मांडलं आहे , ह्यातलं एक तर नेहमी छातीला बँड लावून माझ्या बरोबर पळतो , हे सरसकटीकरण अजिबात नाही , एखादा जर नवीन गॅझेट घेत असेल तर दोन्ही बाजू माहिती असलेल्या बऱ्या :)
१०-१५ बीपीम इकडे तिकडे
आणि
थोडक्यात मनगटी अ‍ॅक्टिवीटी ट्रॅकरमधे तुम्ही अचूकतेपेक्षा आरामादायीपणाला जास्त महत्व देत असता. अरे हो, शिवाय ते मनगटी गॅजेटस वापरून तुमचा कूलनेस फ्याक्टर आणि फ्याशन सेन्स वाढतो बर्का
आखिर कहेना क्या चाहते हो भाई !!
असो विस्तारभयास्त्व इथेच थांबतो.
अजून सविस्तर लिहा , काही हरकत नाही आमचं ज्ञान वाढेल:)
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Mon, 11/21/2016 - 19:58

Permalink

HR मॉनिटर व फिटनेस बँड

@माशॅ, छातीला लावायचा HR मॉनिटर हा छातीचे ठोके अचूक मोजतो . याउलट मनगटात वापरायच्या फिटनेस बँड ची अचूकता कमी असते . त्यामुळे जर तुम्हाला दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीचा डेटा गोळा करायचा असेल तर फिटनेस बँड उत्तम. पण High intensity Training सारख्या ऍक्टिव्हिटी करताना, ज्यात आपली क्षमता जास्तीतजास्त वापरायचा प्रयत्न करतो (Stretch to the limit) तेंव्हा heart rate मोजण्याची अचूकता महत्वाची असते. त्यावेळी छातीला लावायचा HR मॉनिटरला पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गरजेप्रमाणे ठरवावे
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Mon, 11/21/2016 - 20:22

In reply to HR मॉनिटर व फिटनेस बँड by अमर विश्वास

Permalink

मी फक्त माझा स्वतःचा अनुभव

मी फक्त माझा स्वतःचा अनुभव शेयर केला , मी कित्येक वेळेला मनगटी गॅझेट आणि अतिरिक्त (बाहेरून) हार्ट मॉनिटरची तुलना केली आहे मला कधीच २-३ % जास्त फरक आढळला नाही. ढोबळ मानाने (२२० - AGE ) कुठलयही परिस्थितीत ह्या पेक्षा हार्ट रेट कधीच गेला नाही पाहिजे ! सोय - किंमत - प्रायोरिटी (मराठी शब्द ? ) हे ज्याचं त्यानं ठरवावं हेच उत्तम :)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Mon, 11/21/2016 - 20:23

In reply to मी फक्त माझा स्वतःचा अनुभव by माझीही शॅम्पेन

Permalink

तुमचं म्हणणं १००% मान्य आहे

तुमचं म्हणणं १००% मान्य आहे , हे पहिले वाक्य चोप्य पस्ते करायचं राहून गेलं
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com