पुनवेच्या चंद्राला नभी शोभतसे, शुभ्र चंद्रिका
यमुनेच्या तीरी साद घाली, हरीची मुग्ध सानिका
ऐकुनि ते सूर, नुपुरे झंकारित येई वेडी राधिका
येई त्वरेने, नजरा चुकवित, परि नसे ती अभिसारिका
परमात्म्याची ओढ तिला, ती होय अलौकिक साधिका
दिव्यत्वावरि प्रीती करी, ती हरीची प्रियतम प्रेमिका
दोन ह्रदयांचे पाहुनि मिलन, मोहुनि जाती वृक्ष-लतिका
साक्ष आहे, या अमरप्रेमाची, वृंदावनातील मधु-मल्लिका
सांगे मजला ही स्नेहकथा, जाईची अबोध कलिका
झुरते मी वेड्या राधेपरि, कधी रे येशील तू... अनामिका....
Taxonomy upgrade extras
वाचने
3404
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिसुंदर! आ
सुंदर
मल्लिका चा
अरे वा
In reply to मल्लिका चा by मृगनयनी
झकास
शॉलिड्चे....
मला वेळ
In reply to शॉलिड्चे.... by शेखर घोरपडे
>>>पुन्हा
In reply to मला वेळ by मृगनयनी
नाही ब्वा