✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सोयीचं प्रेम की प्रेमाची सोय ?

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Wed, 11/16/2016 - 17:12  ·  लेख
लेख
---------------------------------------------------------------------------------------- ती: अहो, आता हा वर्षाचा होईल, बघता बघता दिवस निघून गेले ..मी तरी किती दिवस घरी राहणार अजून ? आपण लगेच पाळणाघर बघायला हवं ! मी एक दोन ठिकाणी चौकशी करून ठेवली आहे. त्यातल्या त्यात शेजारच्या बिल्डिंगमधल्या काकू बऱ्या आहेत, आपल्यालाही बरे पडेल...... तो : बरं , उद्याच जाऊन चौकशी करू .... दुसऱ्याच दिवशी काही रंगीत खेळणी, थोडा खाऊ , औषधं आणि छोटं गोड पार्सल काकूंकडे रवाना..... ---------------------------------------------------------------------------------------- ती : अहो हा बघा ना ... सारखा हट्ट करतोय आज ऑफिसला जाऊ नकोस म्हणून .... तरी ४ वर्षांचा झालाय, काही लहान नाही आता... तो : बाळा हे बघ आता आईला जाऊ दे हां ऑफिसला ... संध्याकाळी ती तुला खाऊ आणेल ....शहाणा आहेस कि नाही तू ? चल काकूंकडे ! ---------------------------------------------------------------------------------------- अमोघ : आई आज आमच्या शाळेत पालकांना बोलावलंय... तू चल माझ्याबरोबर... सगळ्या नववीच्या विद्यार्थ्यांचे आईबाबा येणार आहेत... ती : अरे आजच कुठे ठेवली पालक सभा? काही घोळ नाही ना घातलास शाळेत ? त्यांना सांग घरी कोणी नाही म्हणून ....बाबांना पण आज नेमकं महत्वाचं काम आहे ... प्रगतीपुस्तक बाबांकडून सही करून घे आणि देऊन टाक...पुढच्यावेळी नक्की येऊ म्हणावं ! ---------------------------------------------------------------------------------------- ती आणि तो (रात्री) ती : अहो अमोघ सारखा उठसूट काकूंकडे जातो .... घरी बस म्हटलं तरी थांबत नाही .... आज मला सुट्टी होती तरीही तो दिवसभर काकूंकडे होता... घरी असला तरीही माझ्याशी जास्त बोलत नाही .... सतत काकूंच्या घरचं कौतुक आणि तिथलेच संदर्भ आणि उल्लेख .... आपण कोणीच नाही का त्याचे ? सगळे लाड पुरवतो आपण त्याचे.... काहीही कमी पडू देत नाही पण त्याला किंमतच नाही त्याची .... काय करूया? तो : तरी मी तुला सांगत होतो त्याच्याकडे लक्ष दे.... पण तुला नोकरीचीच काळजी जास्त .... आता त्याला वेगळ्या पद्धतीने समजवायला हवं...बघतो मी ... ---------------------------------------------------------------------------------------- अमोघ : आई मी काकूंकडे जातोय ... तो : अमोघ इकडे ये .... अमोघ : काय? तो: अरे जरा कधीतरी आमच्याशी बोलत जा काहीतरी .....आज रविवार आहे ... सारखा काकूंकडे का जातोस ? आम्हालाही तुझ्याबरोबर राहावंसं वाटतं ... अमोघ : तुम्हीच सवय लावली ना .... त्यावेळी ते गरजेचं होतं मग नाईलाजाने घेतली मी सवय करून, न करून सांगतोय कोणाला ?... आता अजून काय हवंय तुम्हाला ? तो : जास्त शहाणपणा करू नकोस .... सांगतोय तेवढं एक .... तू कुठेही जायचं नाहीस.. आज घरीच थांबायचं !काकूंनी तुला फुकट नाही सांभाळलं ... पैसे देत होतो आम्ही त्यांचे दर महिन्याला.... अमोघ : तुमच्या वाटेकडे रोज डोळे लावून एक एक दिवस मी ढकलत होतो तेव्हा हा विचार नाही आला कधी तुमच्या मनात ? नुसता खाऊ, खेळणी,कपडे दिले कि झालं? मी किती वेळा विनवणी केली की एक दिवस माझ्यासाठी द्या, पण तुमच्याकडे तोही नव्हता....आजी आजोबा कसे असतात ते कधी पाहिलंही नाही कारण नशिबातच नाही...इतरांसारखं भावंडं नसल्यामुळे तोही प्रश्न नाही .... शाळेच्या प्रत्येक सुट्टीला प्रश्न ठरलेलाच ...."करू तरी काय मी ?" ती : अरे पण आम्हीही तुझ्याच चांगल्या भविष्यासाठी नोकरी करतोय .... तुझंच भलं होणार आहे त्यातून... अमोघ : माझा वर्तमानकाळ नासवून कसलं आलंय भविष्य ? ज्या वयात जे हवं होतं तेच दिलं नाहीत तुम्ही ....त्याची भरपाई खाऊ आणि खेळणी कधीच नाही करू शकत ....आता मला आजही आणि यापुढेही काकूच जवळच्या वाटणार... तुम्ही आजपर्यंत सोयीने प्रेम केलंत ... त्या प्रेमाने माझी सोय बघतात ... हाच फरक...येतो मी ... आज तिथेच जेवण करेन..बाय ! दरवाजाचा मोठ्ठा आवाज ..... धडाड ... ती आणि तो निःशब्द !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
7826 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

वाह वाह एकदम दवणीय :)

माझीही शॅम्पेन
Wed, 11/16/2016 - 17:14 नवीन
वाह वाह एकदम दवणीय :)
  • Log in or register to post comments

आज हिकडं कुटं मालक....

माम्लेदारचा पन्खा
Wed, 11/16/2016 - 17:17 नवीन
ते पन पैलेच...नोटा संपवल्या काय जुन्या ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

लाटकर काकांची उणीव भरून

टवाळ कार्टा
Wed, 11/16/2016 - 17:57 नवीन
लाटकर काकांची उणीव भरून काढतोय तो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

+१

कपिलमुनी
Wed, 11/16/2016 - 18:07 नवीन
अगदी दवणीय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

दवणीय म्हणजे ? प्रवीण दवणे

मराठी कथालेखक
Wed, 11/16/2016 - 18:43 नवीन
दवणीय म्हणजे ? प्रवीण दवणे छाप का ? कुठे असतात हो ते आजकाल ? नाव पण नाही ऐकल बर्‍याच काळात. पुर्वी लोकसत्तात बरंच (म्हणजे खूप.. दूसरा अर्थ नाही :) लिहायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या

मोदक
Wed, 11/16/2016 - 19:43 नवीन
साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत बहुदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

नुसते आहेत नाही चांगले

पुंबा
गुरुवार, 11/17/2016 - 18:49 नवीन
नुसते आहेत नाही चांगले आघाडीवर आहेत म्हणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अमोघच्या लहानपणी १२/लिटर

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 11/16/2016 - 17:18 नवीन
अमोघच्या लहानपणी १२/लिटर असणारे दूध तो मोठा झाल्यावर ४२/लिटर झाले असेलच, आता अमोघ अन मिसेस अमोघ नोकरी करणार (त्याचा अन तिचा नात/नातू पाळणाघरात ठेऊन) का कसं हे स्पष्ट झालं तर एकंदरीत पूर्ण प्रकारावर मत देता येईल असं वाटतंय :)
  • Log in or register to post comments

मला नाही वाटत..

शरभ
गुरुवार, 11/17/2016 - 13:07 नवीन
मला नाही वाटत की अमोघ नोकरीवाली बायको करेल. :) तो ज्याच्यातुन गेलाय त्याच्यातून तो मुलाला नाही जाउन देणार. हा आता बायकोची निवडच चुकली तर गोष्ट वेगळी.. :) - शरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

किती लाडिक ,लेडीज

धोणी
Wed, 11/16/2016 - 17:19 नवीन
किती लाडिक ,लेडीज
  • Log in or register to post comments

काटेरी गारवा!

कंजूस
Wed, 11/16/2016 - 17:32 नवीन
काटेरी गारवा!
  • Log in or register to post comments

1980 च्या मुक्तपीठ मधलं लिखाण

निरंजन._.
Wed, 11/16/2016 - 18:05 नवीन
1980 च्या मुक्तपीठ मधलं लिखाण वाटतंय.
  • Log in or register to post comments

ॐ दवणेय नमः ||

प्रसाद गोडबोले
Wed, 11/16/2016 - 19:42 नवीन
ॐ दवणेय नमः || असेच बायका पोराच्या ऐवजी नवर्‍याला शेजारच्या बिल्डींग मधल्या आंटींकडे सोडत असत्या तर जग कित्ती सुंदर झाले असते !
  • Log in or register to post comments

एक नंबर हो प्रगो!! =)) =))

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 11/17/2016 - 08:02 नवीन
एक नंबर हो प्रगो!! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काही

नाखु
गुरुवार, 11/17/2016 - 08:27 नवीन
न सोडताही जातात(च) त्याचे काय हे पोपशास्त्रींनी गुलदस्त्यात ठेवले आहे हे आम्हाला ठाऊक आहे. पोपोशास्त्रींच्या पुढील प्रवचनांची वाट पाहणार्यांपैकी एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सोडणे आणि हळुच स्वतःहुन जाणे

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/17/2016 - 12:28 नवीन
सोडणे आणि हळुच स्वतःहुन जाणे ह्या मध्ये जमीन आसमान चा फरक आहे नाखु ! हे म्हणजे गोव्यात बीचवर बसुन बीयर पिणे अन चिंचवडात गांधीपेठेतल्या बार मध्ये बसुन घाबरत घाबरत बीयर पिणे इतका टोकाचा फरक आहे ! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

तुमची धाव गोव्यापर्यंतच का?

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/17/2016 - 13:09 नवीन
तुमची धाव गोव्यापर्यंतच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कंपनीच्या पैशाने लंडनला

सतिश गावडे
गुरुवार, 11/17/2016 - 22:58 नवीन
कंपनीच्या पैशाने लंडनला जाण्यापेक्षा स्वतःची पैशाने गोव्याला जाणे हीच खरी श्रीमंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कंपनीच्या पैशाने लंडनला

किसन शिंदे
Fri, 11/18/2016 - 10:57 नवीन
कंपनीच्या पैशाने लंडनला जाण्यापेक्षा स्वतःच्या पैशाने गोव्याला जाणे हीच खरी श्रीमंती.
वा वा !! फेबू, व्हॉट्सअपवर फॉरवर्डेड सुविचार म्हणून सहज खपून जाईल. =)) फक्त खाली गावडे सरांचा कॉपीराईट असायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गोव्याला पर्याय म्हणून लंडनचा

टवाळ कार्टा
Fri, 11/18/2016 - 18:02 नवीन
गोव्याला पर्याय म्हणून लंडनचा विचार केल्याने तुमचे लॉजीक अंमळ गंडलेले आहे असे खेदाने नमूद कर्तो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

त्यासाठी बायकोने नेऊन सोडायची

अभिजीत अवलिया
गुरुवार, 11/17/2016 - 09:22 नवीन
त्यासाठी बायकोने नेऊन सोडायची गरज काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गरज आहे

गामा पैलवान
गुरुवार, 11/17/2016 - 19:00 नवीन
अअ, बायकोनं न सोडता स्वत:हून गेलं तर जग रागीट होतं ! माहित नाही तुम्हाला? ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

हां. हे पण बरोबर आहे म्हणा.

अभिजीत अवलिया
Fri, 11/18/2016 - 02:10 नवीन
हां. हे पण बरोबर आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बरं

याॅर्कर
गुरुवार, 11/17/2016 - 11:59 नवीन
बरं
  • Log in or register to post comments

धागा अप्रकाशित करावा

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/17/2016 - 12:18 नवीन
ही नम्र विनंती !
  • Log in or register to post comments

केस मागे घेताय? आपसात मिटवा

कंजूस
गुरुवार, 11/17/2016 - 14:39 नवीन
केस मागे घेताय? आपसात मिटवा मिसळ देऊन.
  • Log in or register to post comments

मा प, क्या हुई?

संदीप डांगे
गुरुवार, 11/17/2016 - 19:05 नवीन
मा प, क्या हुई? चांगलं लिहिलंय, उलट सुलट प्रतिक्रिया येणारच!
  • Log in or register to post comments

कदाचित काहीतरी चुकीचं मांडलंय....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/17/2016 - 19:46 नवीन
किंवा चुकीच्या वेळी मांडलंय.....असो...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मग त्यात काय राव मा.पं ,

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/17/2016 - 19:57 नवीन
मग त्यात काय राव मा.पं , थोडे दिवसांनी पुनर्प्रकाशित करा अन खाली फक्त टॅग लावा अस्सा _________________ (अलिकडुन पलिकडे पुनर्प्रकाशित) ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! (अवांतर : चला दिवाळीत आणलेले फटाके संपले , आता सारायला काड्या शोधायला गेले पाहिजे . टाटा =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

धन्यवाद !

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/17/2016 - 20:18 नवीन
असाच लोभ ठेवा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खिक !

स्रुजा
Fri, 11/18/2016 - 05:37 नवीन
खिक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मापं ठीक आहे

पैसा
Fri, 11/18/2016 - 11:30 नवीन
विषय आणि मटेरियल बरोबर आहे. फक्त ९ वी दहाव्वीतला मुलगा इतके बोलणार नाही. याऐवजी सरळ काथ्याकूट टाकला असतात तर पाश्शे नक्की झाले असते! इट्स ओके. दोन्ही बाजूने बरोबर आहे. या जगात सगळं काळं किंवा गोरं असं काही नसतं. चलता है. कोण लेकाचा इथे अमरपट्टा घेऊन आलाय. सगळं इथेच टाकून जायचंय एक दिवस. सगळे पैसे, नातीगोती आणि अनुभव सुद्धा.
  • Log in or register to post comments

ओ...आता पाश्शेला किंमत नाय =)

टवाळ कार्टा
Fri, 11/18/2016 - 18:03 नवीन
ओ...आता पाश्शेला किंमत नाय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खिखिखि!

पैसा
Fri, 11/18/2016 - 22:28 नवीन
सध्याचे वातावरण फक्त "मोदी" आणि "मोडी"ला ट्यार्पी द्यायचं आहे ना, म्हणून पाश्शे म्हटलं. डिमोनेटायझेशनचा धुरळा खाली बसला की पुन्हा आपल्या फेव्हरिट विषयांकडे वळू. काय म्हन्तांव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वळू की =))

टवाळ कार्टा
Fri, 11/18/2016 - 23:03 नवीन
वळू की =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मराठी भाषा आहे हो श्याम

पैसा
Fri, 11/18/2016 - 23:31 नवीन
मराठी भाषा आहे हो श्याम! वळू दे हवी तशी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बाब्बौ.....फक्त काथ्याकूट असं लिहिलं तरच मिपाकर बोलतात काय ?

माम्लेदारचा पन्खा
Fri, 11/18/2016 - 19:04 नवीन
हे ज्ञान नवीन आहे... भलतेच शिस्तशीर झालेत सगळे...खी खी खी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा