आनंदी आनंद गडे इकडे तिकडे अमेरिकेकडे
अखेर अमेरिकेची दुर्गा-हिलरी(आज्जी), अमेरिकेची ४५ वी आणि पहिली स्त्री प्रेसिडेंट झाली.
ही बातमी ऐकून बहुतांश जगाला आणि विशेषकरून अखील जगातल्या बहुतांश स्त्रीवर्गाला आनंद झाला असेल नाही का रे भाऊ?
तुला खरंच असं वाटतं? पण ते जाऊदे.कोकणीत एक म्हण आसां. "झंय गाव आसां थंय म्हारवड असतलोच."
हिलरी खरीच जीद्दीची स्त्री आहे असं तुला वाटतं कारे भाऊ?
म्हणूनच मी तिला दूर्गा म्हणतो ना रे? अरे,गेल्या ३०,४० वर्षात हिलरीने खूप त्रास भोगलेले आहेत.इथपर्यंत वर येताना तिला खूप अडथळे आणले गेले होते.अरे,गेल्या शंभर वर्षांपासून अमेरिकेत स्त्रीयांना निवडणूकीत मतदान करायला मिळू लागलं आहे.त्यासाठी पूर्वीच्या कित्येक स्त्रीयांनी आपल्या हक्कासाठी लढत दिली आहे.
मतदानाच्या पलिकडे जाऊन कित्येक स्त्रीयांनी निवडणूकीत भाग घेण्यासाठी लढत दिली आहे.तरीसुद्धा सिनेट किंवा कॉंग्रेसमधे म्हणावं तेव्हडं स्त्रीयांना प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही.कारण स्त्रीयांची गळचेपी अजून चालूच आहे.ह्यावेळी हिलरीने मात्र तेही चालू देणार नाही असं दाखवून देऊन सरळ प्रेसिडेंटसाठी लढत दिली आहे.पण असं करताना अडथळा आणणार्या पुरूषांना,आणि काही स्त्रीयांनाही, त्यांच्याकडून होणार्या विरोधाना, दोन हात करून तिने बाजी मिळवली आहे.
हिलरी-आजी प्रेसिडेंट झाली म्हणजे काय झालं रे? ते थोडक्यात सांगशील का रे भाऊ?
अरे,थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी बरंच सांगावं लागेल.
देशाच्या नैतृत्वाची जबाबदारी तिची असणार.
देशाच्या कायद्यांचं पालन करून घेण्याची तिची जबाबदारी असणार.
हाताखाली काम करणारे प्रमुख अधिकारी नेमण्याचं तिच्या अधिकारत असणार.
क्षमादान,जीवदान देण्याचे तिचे अधिकार असणार.
जगातल्या इतर देशाबरोबर केली जाणारी राजनीति ति़चीच असणार.
तिच्याच सहीने कायदे पास होणार किंवा कायदा नाकरणं तिच करू शकते.
ती कायदे प्रस्तुत करू शकते.
कायदेतज्ञाबरोबर देशाचं बजेट तयार करू शकते.
पुढल्या चार वर्षाची देशाची आर्थीक परिस्थिती तिच्या धोरणावर अवलंबून असणार.
अमेरिकेच्या संरक्षणासाठी ती कमांडर -इन-चिफ झाली.याचा अर्थ असा की, सामर्थ्यवान हवाई-दल,पाय-दल,आणि वायु-दल ,ह्या तिनही शाखा आजीच्या हुकमती खाली असणार.देशाचं संरक्षण तिच्या हाती आहे हे उघडच आहे. असैनिक हुकमत तिची असणार. जरूरी लागल्यास जवळ जवळ चार हजार पाचशें न्युक्लीअर बॉम्बचा तिच्याच परवानगीने वापर होऊ शकतो.
अमेरिकेचा प्रेसिडेंट होणं सोपं आहे का रे भाऊ?
हे बघ,अमेरिकेच्या तीस कोटी लोकसंख्येतले जवळ जवळ दहाएक कोटी लोक निवडणूकीत भाग घेतात.निवडणूक कशी होते ते मी तुला मागे सांगीतलं आहेच.
हल्लीच्यादिवसात प्रत्येकाला निवडून येण्यासाठी जवळपास एक बिलीयन डॉलर्सची तयारी ठेवावी लागते. नंतर आपण कसे पैसे खर्च करू यावर आपलं यश बहुतांश अवलंबून असतं.तुलनेने ज्याच्या जवळ एव्हड्या पैशाची तरतुद नसेल त्याला लढत देणं जरा कठीण जातं.हे झालं थोडक्यात पैशाच्या तरतुदी बाबत.
निवडणुकीच्या प्रचाराची रचना आखावी लागते.त्यासाठी पैसे दिलेले आणि व्हालेंटीअर्स असलेले असे दोन प्रकारचे लोक जमवावे लागतात.५० राज्यात त्यांची योग्य
विभागणी आणि आखणी करावी लागते.
मिडीयाकडून आणि अन्य तर्हेने, एकमेकाच्या पर्सनल कुचाळक्या काढून एकमेकाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न होतो.शिवाय टीव्हीवर राज्या-राज्यात जाहिराती देऊन प्रचार करावा लागतो.अशावेळी निगेटीव्ह आणि पॉझीटीव्ह जाहिराती देऊन बाजी मारावी लागते.
दोन वर्ष अगोदर पासून ह्या सर्व गोष्टीची तयारी करावी लागते.आणि योग्ययोग्य वेळी योग्य गोष्टींचा वापर करावा लागतो.थोडक्यात हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नसते हे मात्र नक्कीच.
हिलरी प्रत्यक्ष प्रेसिडेंट केव्हा पासून होणार. रे,भाऊ?
सांगतो.नवीन वर्षाच्या-२००१७च्या जानेवारी २० ला शपथ विधी होणार. प्रे.ओबामा आपला कारभार, शपथ विधी संभारंभात सुप्रिम कोर्टच्या मुख्य जज्जाच्या हजेरीतहिलरीने शपथ घेतल्यानंतर, तिला सुपूर्द करणार. आणि त्यादिवसापासून हिलरी- नवी प्रेसिडेंट, आपला कारभार संभाळणार.
सहाजीक एक प्रश्न उद्भवतो ह्या निवडणूकीचा आपल्या भारताला काय फायदा?असं मी तुला विचारलं तर तुझ्याकडे उत्तर आहे कारे भाऊ?
मागे एकदा एका कोणाला तरी तुझ्या ह्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर दिलं होतं असं मला आठवतं.असो.
त्याचं असं आहे,मला तरी वाटतं की,आपण भारतीयांनी असा प्रश्न म्हणजेच "आपल्याला काय फायदा?"
असं पूर्वी सारखं आशाळभुत होऊन त्या उद्दशाने विचारलं तर ते विचारणं आता नव्या परिस्थितीत सोडून दिलं पाहिजे.
चिनचे लोक विचारतात असा प्रश्न?नाही.कारण त्यांना अमेरिकेकडून आशा नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे,
आपल्याकडे भारतात
१२५ कोटीची जनसंपती आहे.
अतिशय शूर सैनीक संरक्षणासाठी दिवस रात्र जागृत आहेत.
लढाई झाल्यास लढाईसाठी लागणीरी सामुग्री आपण आपल्या देशात बनवतो.
आपल्याकडे हजार नसले तरी शंभर एक न्युक्लीअर बॉम्ब आहेत.आणि आपण ते स्वतः बनवू शकतो.
आपण निरनीराळ्या पल्ल्याची क्षेपण अस्त्रे बनवतो.
बोटी बनवतो,पाण्बुड्या बनवतो.
स्वत:साठी देशात अन्न उत्पादन करतो.
आपले शास्त्रज्ञ,डॉक्टर,इंनजीनीयर,इतर देशात नाव कमवून आहेत.
आणखी कितीतरी गोष्टी सांगता येतील.पण जाऊ दे.
अरे,भाऊ तू मला गंमत सांगणार असं म्हणाला होतास ती सांग की रे भाऊ?
अरे,गंमत म्हणजे त्याचं काय झालं,ही क्लिंटन मंडळी मी गेली २६ वर्षं ओळखतो.ओळखतो म्हणजे समजलं ना? अरे टीव्हीवर पाहून पेपरात वाचून असं मला म्हणायचं आहे.
ह्या ८ नोव्हेंबरच्या रात्री मी बिलला सफेद सदरा धोतर आणि डोक्यावर सफेद टोपी (गांधी टोपी रे) घालून आणि हिलरीला हिरवंगार लुगडं नेसून डोक्यावरून पदर घेऊन,खणाची चोळी घालून, हे जोडपं गणपतीबाप्पासमोर हात जोडून नतमस्तक होऊन प्रार्थाना करीत होतं.सांगत होतं,
"बाप्पा,आम्ही खूप कष्ट घेतले,पाण्यासारखा पैसा खर्च केला,अनेकांच्या आळांना तोंड दिलं आमच्या ह्या कष्टाला फळ दे"
हे द्दष्य बघून मी स्वपनात आहे अशी माझी खात्री होऊन माझे डोळे चोळून पहात होतो.आणि खरंच मी स्वप्नात होतो हे मला कळलं.
गंमत apart,
आपण ह्या अमेरिकन दुर्गेला, हिलरी आजीला सुयश चिंतुया.
मग इतकं करूनसुद्धा हे असं कसं झालं रे भाऊ?
अरे,मी तुला म्हणालो होतो ना?
"होणारे न चुके जरी तया येई ब्रम्हदेव आडवा!"
कुठल्याही घटने बाबत हे पालुपद लक्षात ठेव.मग ती अमेरिकन निवडणुक असो,भारतातली निवडणूक असो किंवा भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच असो.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
याद्या
4520
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
बहार आने से पहले खिजां चली आयी
सामंत काका लवकर जागे व्हा ,
सामंतमामांनु, तुमच्याविषयी व्यक्तिगत आदर आसां, पण,
हिलरींच्या नशिबात अध्यक्षपद नाही असे दिसते
हिलरी समर्थकांचा रडीचा डाव
अतिशय योग्य लिहिलंय आपण
In reply to हिलरी समर्थकांचा रडीचा डाव by गॅरी ट्रुमन
जानेवारी २०१४ मध्ये क्वचितच
In reply to हिलरी समर्थकांचा रडीचा डाव by गॅरी ट्रुमन
जगभरातले राजकारणी इथून तिथून
In reply to हिलरी समर्थकांचा रडीचा डाव by गॅरी ट्रुमन
अमेरिकेत जी पध्दत निवडणुकांसाठी वापरली जाते त्या पध्दतीतून ट्रम्प विजयी झाले आहेत. मग विषय संपला. तो निकाल एखाद्याला कितीही आवडला नसेल तरी तो मान्य केला पाहिजे. लोकशाहीचा अर्थच तो आहे.ट्रम्प निवडून आल्यामुळे वाटोळे होईल असे कितीही वाटले तरी ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आले आहेत हे नाकारून चालायचेच नाही.हे भारतात घडले आहे आणि अजून चाललेच आहे.२०१५ च्या प्रजासत्ताक दिनाला भारतात ओबामांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.आणि जाताजाता 'भारताने सहिष्णुतेचा अंगीकार करावा' अशा प्रकारचे unsolicited लेक्चर ओबामा झोडून गेलेच होते.आता तुमची सहिष्णुता कूठे गेली मिस्टर प्रेसिडेंट? आणि असेच लोक लोकशाही, अमेरिकन मूल्ये, परमताचा आदर वगैरे उच्चभ्रू गोष्टी बडबडताना दिसतात!!+१००> कॅलिफॉर्नियात तर काही
In reply to हिलरी समर्थकांचा रडीचा डाव by गॅरी ट्रुमन
धन्यवाद
In reply to > कॅलिफॉर्नियात तर काही by साहना
एखाद्या राज्याला वेगळे
In reply to > कॅलिफॉर्नियात तर काही by साहना
काही conservative लोकांच्या
In reply to > कॅलिफॉर्नियात तर काही by साहना
सामंत काका , तुम्ही म्हणाजे
मुळात हिलरी क्लिंटन या एका
जबरदस्त
In reply to मुळात हिलरी क्लिंटन या एका by बोका-ए-आझम
ट्रम्पच्या बायकोचा विषय येतो
In reply to मुळात हिलरी क्लिंटन या एका by बोका-ए-आझम
लेखाचे
काका, आर यू सिरियस? ट्रंप आणि
I love Trump and hate hillary
रूरल-अर्बन डिव्हाईड
ग्रामीण-शहरी फरक
In reply to रूरल-अर्बन डिव्हाईड by गॅरी ट्रुमन
मला याचा अर्थ असा दिसतो कि
In reply to ग्रामीण-शहरी फरक by अनुप ढेरे
काकांना एक प्रश्न