ती मला खुप आवडायची
कधी कधी खुप रडवायची
तिचा हसरा चेहरा आणि
डोळ्यातील काजळ मला
नेहमी वेड करायचे
ती खरचं एक परी होती,
की आकाशातील पहाटेची शुक्राची
चांदणी,
काय होती ती , की अस म्हणु काय नव्हती ती
शब्दच नाहीत...!!
पण कधीकधी आपोआप या मनातुन शब्द ओठांवर येतात...
ती माझी होती...
माझी आहे...
माझीच राहिल...
स्वप्नांच्या ही पलिकडे तिच्यासाठी एक जादुचा बगीचा मी बनविला होता....
ती खुश रहावी म्हणुन त्या बगीच्यात पारिजातक वृक्ष लावला होता....
ती दिसायची जणु मत्स्यकन्याच..
म्हणुन बगीच्यात होता सोनेरी चंदेरी
तलाव ...
सोनेरी राजहंस तर होतेच तिथे..
सुंदर जलपऱ्या पण रहायच्या..
स्वर्गात पण नसेल अस अमृतकमळ त्या तलावात उमललं होतं.. .
ती निरागस कळी होती,
ती सुर्याची कोवळी किरण होती,
ती एक मृगजळ होती,,
कि माझी आस होती..
होती ती माझी कोकीळा,
झाडाला बांधलेला झोपाळा,
आणखी काय सांगु ....
बस झालं राव आता
कंटाळलोय कौतुक करुन..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3253
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!
ह..
एवढं चांगलं कधीपासून लिहायला
परिक्षाण
कवीने खुबीने आपल्या पुर्वलिखाणाची झलक आणि विषयावरची पकड या गूढ कवितेत दाखवून दिली आहे, अता ज्ञात आणि अज्ञात पैलूंवर प्रकाश कवडसा टाकू.
म्हण्जे पहा कसा पेच निर्माण केला वाचकांसमोर आवडायची, अता आवडते का नाही हे गुलदस्त्यात ठेवल्म आहे,आणि तिला कवी आवडायचा का नाही याचा थांगपत्ता लागू दिला नाही. बघा म्हणजे कविला रडविण्याइतपत करारी व खंबीर होती,भुताची बोबडी वळविणार्याला रडविणे काही सोपे काम नाही.आणि हे ते सव्तः हसत राहून करीत असे,निव्वळ या जगाची दृष्ट लागू नये म्हणून ती काजळ लावीत असावी असा कयास आहे,कावीने आप्ले वेड हे त्या काजळामुळे आहे असे प्रांजळपणे सांगीतले आहे. ती एक परी होती म्हणजे एक अप्राप्य होती हे ही सूचकपणे सांगीतले आहे,या बरोबर कवीही पहाटे लवकर उठतो आणि चक्क जागे होऊन शुक्राची चांदणी बघतो या मुद्द्याकडे अलवार अंगुलीनिर्देश केला आहे.वाचकांच्या कल्पनाशकतीला ताण देण्यासाठी पुढील कडव्याचा उगम झाला आहे आणि शबदच नाहीत असे म्हणून विचारधाग्याला तत्काळ खुंटीला बांधले आहे. कवीला कल्पना करण्याची मुभा असल्याने कवी निरागसपणे म्हणतो ती परी त्याची आहे आणि त्याचीच राहिल वाचकांना ढगातून थेट जमिनीवर आणण्याचा "भुईसपाट" प्रयत्न म्हणून दाद द्यायलाच हवी. या मर्त्य जगात जागेचे भाव प्रचंड वाढले आहेत आणि अश्या अनवट परीला साधे-सुधे घर देण्यापेक्षा एक सूंदर बघीचा बनविल्याचे सांगून कवीने आपण पर्यावरण प्रेमी असल्याचेही नम्रपणे नमूद केले आहे.तो बगीचा आणि तदंभूत बाबी ह्या स्वर्गातही आलाभ्य आहेत हे सांगण्यासही कवी कचरत नाही. इथेही कवीने खुबीने ती हे होती ते होती असा जप लावून वाचकांना अता ती निरागस व कळी आहे का नाही,मृगजळ आहे का नाही हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिले आहे.(उडवा पतंग कल्प्नांचे पुढे मीच काटणार आहे ते) तिचा (गायनाचाही) गळा सुरेख आणि सुरेल होता हे मोठ्या खुबीने सांगतानाच ती वजनदार नव्हती हे झोपाळ्याचा झोका देऊन सांगीतले आहेच.शेवटी अत्यंत विनम्रतेने कवीने आणखी सांगू शकत नाही असे मोठ्या मनाने सांगीतले आहे.आणि तो (ही) कंटाळलाय गुढ कवीता करून हे सांगण्याचे धाडस खरेच कौतुकास्पद आहे. नाखु परिक्षाणवाला_
In reply to परिक्षाण by नाखु
आयला! चक्क माझा फोटो!
In reply to _ by जव्हेरगंज
ती बाजूलाच
In reply to आयला! चक्क माझा फोटो! by बोका-ए-आझम
उचकलेली वाटतेय आणि! =))
In reply to ती बाजूलाच by चांदणे संदीप
हा .... हा .... हा ... !
In reply to परिक्षाण by नाखु
ब्लास्ट
In reply to परिक्षाण by नाखु
जाऊंद्याना बाळासाहेब
गुढ "ग्रेस"फुल कविता ?
मला शीर्षक बघून वाटलं तुम्ही
णिसो कुठायत आजकाल ?
छान