Skip to main content

गेली जिन्दगी

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 29/10/2016 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
p2 झामलझामल करण्यात गेली जिन्दगी तर्रीपोहा खाण्यात गेली जिन्दगी फिटयाली केली त्या फुटाळ्यावर कधी बाकी बर्डी फिरण्यात गेली जिन्दगी नाईटा मारत पास झालो तर सही क्यूबिकलच्या सपन्यात गेली जिन्दगी दिपवाळी आली वेगळ्या चिंतेसकट अन् तिकटा बुक करण्यात गेली जिन्दगी कोठे फासे लावून बसला पारधी? एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी - संकेत ------------------------- शब्दार्थ: झामलझामल करणे:- टिवल्याबावल्या करणे फिटयाली:- उनाडक्या

वाचने 13560
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

तुही जिंदगी तर अजून बाकी आहे बे! कांदेपोहे कधी खाल्लेस? =))

लिहित राहा. आवडली कविता. अजून दोनचार कडवी भर घालता आली असती, असेही वाटले. पुलेशु.. चित्रही छान. -दिलीप बिरुटे

एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी याचा अर्थ कोणत्या संदर्भात लावावा याचा विचार करतोय ;)

In reply to by तुषार काळभोर

ज्यांना माझं आडनाव माहीत आहे आणि माझे रिलेशनशिप स्टेटस माहीत आहे, त्यांना विचार करावा लागणार नाही.;)

स्वामिज्जी की महान रचनांएँ..! स्वामिज्जी द ग्रेट! चित्र कुटून कहाडलं वो स्वामिज्जीईईईईईई... ? लै खंगरी हाय! ;)

एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी
खिक्क...

कवितेतल्या कारुण्याची वेगळीच खोली आहे.. सहज भाषेत खंत, निराशा व्यक्त केलीय ती अस्वस्थ करते... स्वामी, सुंदर कविता! बाकी लोक्स, फुटाळा बोले तो नागपूर का तलाव!

हि शायरी आठवली यावरून... किया बादलों मै सफर जिंदगीभर, जमींपर बनाया न घर जिंदगीभर, सभी जिंदगी के मजे लुटते हे, न आया हमे ये हुनर जिंदगीभर... शेवटचा शेर वेगळा पण भारी वाटतो एक्दम... मुहोब्बत रही चार दिन जिंदगी में, रहा चार दिन का असर जिंदगीभर...

चित्र मस्त शेवटले कडवे आवडले

धन्यवाद मंडळी. चित्र खूप आवडले. चित्रकाराचे त्याबद्दल विशेष आभार! _/\_

मस्त, झक्कास ! स्वामीजी पैर लागू इस बहतरीन रचना के लिए ।