
झामलझामल करण्यात गेली जिन्दगी
तर्रीपोहा खाण्यात गेली जिन्दगी
फिटयाली केली त्या फुटाळ्यावर कधी
बाकी बर्डी फिरण्यात गेली जिन्दगी
नाईटा मारत पास झालो तर सही
क्यूबिकलच्या सपन्यात गेली जिन्दगी
दिपवाळी आली वेगळ्या चिंतेसकट
अन् तिकटा बुक करण्यात गेली जिन्दगी
कोठे फासे लावून बसला पारधी?
एकच हरणी मिळण्यात गेली जिन्दगी
- संकेत
-------------------------
शब्दार्थ:
झामलझामल करणे:- टिवल्याबावल्या करणे
फिटयाली:- उनाडक्या
प्रतिक्रिया
वेगळी भाषा असल्याने कविता
कविता आवडली
छान.
झक्कास कविता
ज्यांना माझं आडनाव माहीत आहे
In reply to झक्कास कविता by तुषार काळभोर
स्वामिज्जी की महान रचनांएँ..!
हाहा...भारी
कवितेतल्या कारुण्याची वेगळीच
का कोण जाणे, ही निराशेची
छानच लिहिलीये...
भई वाह!
In reply to छानच लिहिलीये... by शब्दबम्बाळ
नेहेमीप्रमाणे छान कविता.
छान कविता न चित्रसुध्दा.
छान कविता
धन्यवाद मंडळी.
धन्स. चित्र कारणी कडून ;)
मस्त, झक्कास !
कविता आवडली, पण समजली नाही.
मस्त!