✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आज केलेला आराम...!!

व
वामन देशमुख यांनी
गुरुवार, 11/10/2016 - 10:58  ·  लेख
लेख
मी आज केलेला आराम नमस्कार, गेली अनेक वर्षे मी जमेल तसे बिछान्यात लोळत आहे आणि लोळत असताना मिसळपाववरचे लेख वाचत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचता वाचता किंवा आपल्या जोडीदाराच्या संगतीने अनेक लोकांना बिछाना गाठावासा वाटतो आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक मस्तपणे आणि नियमीतपणे आराम करतात. मला स्वप्नातून अनेकजण झोपेबद्धल प्रश्न विचारतात आणि तेथेही पुढील प्रगती कळवतात. आरामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही पुरेसा आराम मिळत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला आराम" नोंदवत राहूया. आराम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. वामकुक्षी घ्या, पहाटेची साखरझोप घ्या, घोरा, अस्ताव्यस्त पसारा, शवासन करा, गादीवर नुसतेच लोळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि आरामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती आराम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी आराम करावा" इतकाच आहे. २) आपल्या आरामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर झोपाळू आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन: हाफ / फुल पँट्स घालून मॅरेथॉन लोळतो, झोप्लाभट नियमीतपणे डुलक्या घेतो, निद्रेंद्र, श्रीघोरुजी, केडी (म्हणजे कायम डुलक्या), आनंदी झोपाळ असे अनेक मुरलेले रेस्टिस्ट लोक आहेत. डॉक्टर घोरे आणि डुलक्याकाका निद्रानाशावर उपाय सांगतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले अंथरूण पसरण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10814 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

लोळ!!!

साहेब..
गुरुवार, 11/10/2016 - 11:07 नवीन
मी आज १० तास आराम केला.
  • Log in or register to post comments

.

सत्याचे प्रयोग
गुरुवार, 11/10/2016 - 11:08 नवीन
.
  • Log in or register to post comments

कहर केला आहे अगदी!! जबरदस्त!!

असंका
गुरुवार, 11/10/2016 - 11:11 नवीन
कहर केला आहे अगदी!! जबरदस्त!! जरा आरामात प्रतिसाद द्यायला हवा होता खरं तर! पण ते एक म्हणले होते ना 'आराम हराम है!' म्हणून म्हणलं लगेच प्रतिसाद द्यावा मग आरामात आराम करावा...! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

कवी बडे बाबू यांच्या

आदूबाळ
गुरुवार, 11/10/2016 - 12:04 नवीन
कवी बडे बाबू यांच्या सौजन्याने: आज करे सो कल कर, कल करे सो परसों इतनी जल्दी क्या है बेटा, जब जीना है बरसों?
  • Log in or register to post comments

लोल :)

नीलमोहर
गुरुवार, 11/10/2016 - 13:34 नवीन
आत्ता बसून हे वाचतेय तेवढाच आराम जीवाला, ती सगळी नावे कहर आहेत !! ( या विडंबनामुळे, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, देजा वू फिलींग आली :)
  • Log in or register to post comments

=))

पैसा
गुरुवार, 11/10/2016 - 13:44 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

ये आराम का मामला है

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/10/2016 - 14:04 नवीन
असे सल्ले देणारं कोणीतरी हवंच आयुष्यात राव !
  • Log in or register to post comments

हाहाहा

पाटीलभाऊ
गुरुवार, 11/10/2016 - 14:06 नवीन
याच्यासाठी सुद्धा प्रोत्साहन लागत... :D
  • Log in or register to post comments

केडी (म्हणजे कायम डुलक्या)

केडी
गुरुवार, 11/10/2016 - 14:11 नवीन
केडी (म्हणजे कायम डुलक्या)
हाहाहा, जमलाय, जोरदार जमलाय, हसून हसून पुरेवाट! :-))
  • Log in or register to post comments

__/\__

आनन्दा
गुरुवार, 11/10/2016 - 14:22 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

खि खि !

सस्नेह
गुरुवार, 11/10/2016 - 14:28 नवीन
जोरदार विडंबन ! ..येउद्या आरामात !
  • Log in or register to post comments

लेखाचे नाव वाचुन

सिरुसेरि
गुरुवार, 11/10/2016 - 14:29 नवीन
लेखाचे नाव वाचुन गनबोटे फरसाणाच्या जाहिरातीतला "गट्टमा" आठवला .
  • Log in or register to post comments

अच्छा

नाखु
गुरुवार, 11/10/2016 - 14:35 नवीन
तो ये आराम का मामला है !!!
मिपा जाहीराती (सुद्धा) बघणारा नाखु मिपाकर.
  • Log in or register to post comments

आवडला

सोनुली
गुरुवार, 11/10/2016 - 14:48 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments

हाहाहा

वरुण मोहिते
गुरुवार, 11/10/2016 - 15:19 नवीन
मजा आली वाचताना . आराम पण महत्वाचा आहे हो बाकी
  • Log in or register to post comments

आज लोळुन आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/10/2016 - 16:36 नवीन
आज सकाळी ब्याडमिंटन खेळून आल्यापासून लोळुन आहे. सुट्टी आहे, सो मजा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या.. खुसखुशीत.

मोदक
गुरुवार, 11/10/2016 - 18:04 नवीन
ह्या ह्या ह्या.. खुसखुशीत.
  • Log in or register to post comments

कुणीतरी

धर्मराजमुटके
गुरुवार, 11/10/2016 - 19:05 नवीन
कुणीतरी सांगीतलयं ना की आराम हा राम आहे म्हणून गेल्या आठवड्यात खंप्लीट आराम केला.
  • Log in or register to post comments

जोरदार !!!

जव्हेरगंज
गुरुवार, 11/10/2016 - 19:15 नवीन
जोरदार !!! Image removed.
  • Log in or register to post comments

गेल्या चार महिन्यापासून आम्ही

जयन्त बा शिम्पि
गुरुवार, 11/10/2016 - 19:21 नवीन
गेल्या चार महिन्यापासून आम्ही दोघे पती-पत्नी, अमेरिकेत, मुलाकडे आलेलो आहोत. येथे घराबाहेर बोचर्‍या थंडीमुळे कोठे जाता येत नाही. बाहेर मॉल मध्ये अथवा किराणा आणण्यासाठी, मुलगा कारमधून घेऊन जातो व कारमधूनच परत घरी आणतो. मुलगा, सूनबाई सकाळी आठ वाजता ऑफिसला जातात ते सायंकाळी परत येतात. नात व नातू सकाळी सात वाजता शाळेत जातात ते परत सायंकाळी पाच वाजता परत येतात. त्यामुळे दिवसभर घरात आम्हाला " आरामच आराम " असतो.विषेश म्हणजे असा हा 'सक्तीचा' आराम आम्हाला ३० डिसेंबर २०१६ पर्यंत करावयाचा आहे. एकदाचे भारतात गेलो म्हणजे नेहमीची कामे ( लहान मुलाच्या दोन्ही पिल्लांना- नात व नातू, तेही जुळे !! शाळेत नेणे-आणणे, त्यांचेशी इतर वेळी मस्ती,गप्पा,फिरायला जाणे, बँकेची व घरातील किरकोळ कामे,उरलेल्या वेळात संगणकाशी दोस्ती व मिपावर 'पत्ते पिसणे') सुरु होतील. मग आराम कुठला ? असतं एकेकाचं नशीब ! !
  • Log in or register to post comments

दिलगिरी

स्थितप्रज्ञ
गुरुवार, 11/10/2016 - 19:21 नवीन
मागील दोन दिवस नवीन येणाऱ्या २००० च्या नोटेमध्ये रॉकेट लॉंचरचेही फीचर अॅड करण्यात व्यस्त असल्यामुळे आराम करायला अजिबात सवड मिळाली नाही याबद्दल शासनातर्फे दिलगिरी व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

विडंबन छान झाले आहे. व्यायाम

खटपट्या
गुरुवार, 11/10/2016 - 19:32 नवीन
विडंबन छान झाले आहे. व्यायाम करणार्‍यांसाठीपण आराम खूप महत्वाचा आहे. वजनाचा व्यायाम करतात त्यांचे शरीरातील टीश्यू पूर्ववत व्हायला ४८ तास लागतात. त्यामुळे व्यायामानंतर आराम अत्यावश्यक आहेच अन्यथा अपाय होउ शकतो.
  • Log in or register to post comments

विडंबन आहे का? मी सिरियसली

रेवती
Fri, 11/11/2016 - 01:47 नवीन
विडंबन आहे का? मी सिरियसली सांगायला आले होते.
  • Log in or register to post comments

हा लेख भावला वामना. तू १००००

कंजूस
Fri, 11/11/2016 - 05:29 नवीन
हा लेख भावला वामना. तू १०००० पावलं न टाकता फक्त तीन पावलात जे साध्य केलंस ते सर्वांनाच माहित आहे.
  • Log in or register to post comments

बडे आराम से

तुषार काळभोर
Fri, 11/11/2016 - 11:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

धागा काल वाचला.आज आरामात

अजया
Fri, 11/11/2016 - 11:44 नवीन
धागा काल वाचला.आज आरामात प्रतिसाद देते ;) जमलंय विडंबन!
  • Log in or register to post comments

मस्तं जमलंय.

पद्मावति
Fri, 11/11/2016 - 14:16 नवीन
मस्तं जमलंय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा