गंडलेल्या फिटनेसची कहाणी
ब्लॉग दुवा
मिपावर सद्ध्या फिटणेसविषयक धाग्यांची लाट आलेली आहे. त्यात भर म्हणून हा धागा. खरं तर प्रतिसाद लिहायला घेतला, पण धागा झाला.
लोकं व्यायाम, आहार, आराम यांची आपापली तर्कहीन त्रिसूत्री मांडताना बघितली की फार उद्विग्न व्हायला होतं. अर्थात फिटनेस, आरोग्य याला कुणी किती महत्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कुणी त्या गोष्टीला महत्व दिलं नाही तर त्यात माझं काही नुकसान नसतं, पण त्यांचं स्वतःचं नक्कीच असतं.
फिट असायला हवं, असं सामान्यतः प्रत्येकाला वाटतं. असं असतान अनेकदा इच्छा असूनही आरोग्यासाठी वेळ काढला जात नाही. मान्य; की प्रत्येकाला आपापले व्याप, अडचणी, सुखःदु:ख असतात. आणि कुठेतरी हे ही माहित असतं की व्यायाम हा गरजेचा आहे, ही 'वाटलं तर करा' अशी गोष्ट नाही. पण तरीही प्रचंड आळस माणसांच्या स्वभावात मूळ धरतो, आणि मग तो आळस हटवादीपणाचं रूप घेतो.
साधारण कॉलेजमधे जाण्याच्या वयात फिटनेस, व्यायाम या गोष्टींचं स्वाभाविकपणे आकर्षण वाटतं. मित्रमंडळींच्या संगतीने फिटनेसचा पाठपुरावाही केला जातो. इथेच दोन पंथ होतात. एकांना मेहनत करायची असते, एकांना नसते. ज्यांना मेहनत करायची नसते त्यांच्या फिटनेसचं जीवनचक्र साधारण असं असतं.
काही बाबतीत जिम लावलं जातं. आठवड्याभरातच टीशर्टच्या बाह्या फोल्ड होऊ लागतात. 'सही झालीय रे बॉडी' म्हणणारे दोस्तही मिळतात. इथे फिटनेसची व्याख्याच चुकलेली असते. पण तरीही मग 'झाली आता बॉडी' म्हणून टाळाटाळ सुरू होते.
किंवा सुरुवातीपासूनच 'मला कुठे स्पर्धेत उतरायचंय?' आणि अशा इतर अनेक कारणांपैकी कारणं दिली जातात. म्हणजे, समोर असलेला ऑडियन्स बघून वेगवेगळं कारण लोक देतात. 'पावडर बॉडी', 'जिम सोडलं की डबल व्हायला होतं' वगैरे भलभलत्या तर्कांचाही आधार घेतला जातो. जिम बंद होतं.
छायाचित्र आंतरजालावरून साभार
मग कधी अशी वेळ आलीच की बाबा एखादी गोष्ट बरोबरचे लोक करतायत, आपल्याला झेपत नाहीये, की मग कारणांवरून गाडी प्राधान्यक्रमाकडे येते. उदाहरणार्थ: 'ट्रेक ला जाऊ' असं ग्रूपमधे कुणी म्हणावं, की 'ट्रेक बिक काय यार त्यापेक्षा रेसॉर्ट ला जाऊ. मस्त चिल्ल करू.' असं म्हणणारी व्यक्ती तुम्ही बघितली असेलच. ट्रेक ला नं जाणं हा तिथे प्रेफरन्स नसतो, ती इनॅबिलिटी असते. पण, प्रेफरन्स मानून ती व्यक्ती स्वतःला फसवते.
मग एखादी टेस्ट कधीतरी केली जाते तापानिमित्त वगैरे. त्यात कळतं की कोलेस्टरॉल किंवा काही इतर गोष्टी वर खाली आहेत. मग डॉक्टर वजन कमी करायला सांगतात. डॉक्टरांचं पण मला कळत नाही. ते ही अशा वेळी अर्धवट सल्ले देतात. वजन म्हटलं की मग सर्वसाधारण दोन पर्याय समोर येतात, व्यायाम किंवा डाएट. डाएट अर्थातच सोप्पा पर्याय, माणीस तोच निवडतो. चूझिंग द ईझी ऑप्शनः माणसाची सहजप्रवृत्ती. मग एखाद्या डायटिशियनचा पाच-सात हजारचा धंदा केला की घरी जोशात सांगितलं जातं, 'आजपासून मी गोड नाही हं खाणार'. 'चहा बिनसाखरेचा पिणार'. ऑफिसात, फेसबुकवर जाहिरात होते; 'फर्स्ट डे ऑफ डाएट - फीलिंग ऑसम'. हजार बाराशेचा वजनकाटा घरी येतो. त्यावर येताजाता उभं राहिलं जातं. साखर बंद करणं, ही ती अति खाण्याइतकंच घातक असतं हे डॉक्टर सांगत नाहीत बहुदा किंवा ती मंडळी तेवढं नेमकं ऐकत, वाचत नाहीत. रणबीर कपूर ची सध्याची मैत्रीण कोण हे वाचतील मात्र. असे काही दिवस जातात. अधे मधे दिवसाच्या शेवटी 'थोडंसं श्रीखंड खाल्लं म्हणून काय होतंय' असं म्हणून ते साखर बंद प्रकरणही मोडलं जातं. पुन्हा स्वतःशी प्रामाणिक न राहणं.
मग पुढे डाएटही झेपत नाही. डिटर्मिनेशनचा अभाव. निग्रह नाही. मग चीट डे ची वाट बघणं सुरू होतं. 'डाएटचं सर्वात काय आवडतं सांगू, चीट डे!' असं सांगून दोन डाएट करणारे टाळ्या देतात, हसतात; चीट कोण होत असतं हे जणू माहितीच नसल्यासारखं. हे चीट डे कधीकधी एकापेक्षा अधिकही होताना दिसतात. दरम्यान डाएट चालू असतानाही व्यायाम किंवा तत्सम श्रमाचं काही कुणी सुचवलं, की 'अरे व्यायाम कितीही केला तरी डाएट नसेल ना प्रॉपर, तर काह्ह्ही फायदा नाही' असं सांगून पुन्हा 'आपण करतोय ते योग्यच आहे' अशा भावनेने स्वतःची फसवणूक होते.
मधेच एखादा मित्र मॅरेथॉन धावून फेसबुकवर फोटो लावतो. मिलिंद सोमणांच्या पोस्ट वाचनात येतात. आणि स्पोर्ट्स शूजची घरच्या चपलाबुटांच्या कपाटात प्राणप्रतिष्ठा होते. पहिल्या दिवशी धावायला मित्रमैत्रिणींसोबत जाऊन, मग नाश्ता करून घरी आल्यावर 'आज आम्ही फक्त चाललो. अॅक्चुअली चालून सुधा किती फ्रेश वाटतं माहित्ये. चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे खरं तर' असं सगळं बोलणं होतं. (रिमेंबरः चूझिंग द ईझी ऑप्शन) मग ते रनिंग शूज चालण्यासाठी वापरले जातात. रमत गमत, गप्पा मारत चालणं, कट्ट्यावर बसणं, अशा काही सकाळी जातात. मग त्याची वेळ संध्याकाळ किंवा रात्री जेवल्यावर अशी बदलते. 'सकाळी उठणं नाही जमत यार! बाकी काहीही बोल' असं पुन्हा आपलं एक कारण.
छायाचित्र आंतरजालावरून साभार
हे सगळं मागे पडतं, जेंव्हा 'रोज प्राणायम करतो!' असं सांगणार्या कुण्या सत्तरीच्या आजोबांबद्दल माहिती कळते. मग काय! पडत्या फळाची आज्ञा. चूजिंग द ईझी ऑप्शन. चालणं बिलणं, डाएट बिएट बंद आणि फुसफुस सुरू. 'आपले पूर्वज ग्रेट होते यार. आज अमेरिकेतही लोक योगा करतात. त्यांनाही महत्व पटलंय त्याचं.' पुन्हा एकदा फसवणं.
तरीही गुडघे दुखतात. तरीही पाठ आखडते. मग डॉक्टर गाठतात, डॉक्टर व्यायाम सांगतात. त्याला फिजिओथेरपी म्हटलं जातं. मग त्यावर पैसे खर्च होतात. आता संसाराचे व्याप असतात. करियर असतं. म्हणून ब्लेम लाइफस्टाइलवर जातो. ती बदलायचा प्रयत्न होत नाही केवळ कुढतच बसलं जातं. या स्थितीत सद्ध्या मी स्वतः आहे. मला आळस नाही उलट खूप इच्छा आहे परंतु वेळ खरंच मिळत नाही. अर्थात, हे मीच म्हटलं तरी मला पटत नाही. तेंव्हा हे डेडलॉक ब्रेक करण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. घरी का होईना, जमेल तितका का होईना मी व्यायाम करतो. हे नमूद यासाठी केलं की धागा वाचून 'आपण स्वतः काय करता?' हा प्रश्न वाचकांकडून उपस्थित होऊ शकतो.
पुढे तब्येतीच्या कुरबुरी चालूच राहतात. एव्हाना वय जरासं वाढलेलं असतं. मग ते एक कारण मिळतं, की 'आता आम्ही कुठे व्यायाम करणार या वयात' वगैरे. मग गोळ्या, ज्यूस, मलमं आणि काय काय करायचं. आमच्या वेळी आम्हीही केला होता व्यायाम! असं सांगताना 'आमची वेळ' संपली असं कुणी जाहीर केलं होतं का? हा प्रश्न मंडळींना पडत नाही. ज्या तळमळीने 'त्याने किंवा तिने कस्स्लं मेंटेन ठेवलंय स्वतःला!' हे वाक्य म्हटलं जातं, ते बघून तसं म्हणताना नक्की अभिमान वाटतो, की हळहळ असं विचारावंसं वाटतं.
पण नाही. हटवादीपणा संपेल कसा? मग तत्व असं असतं की 'काही नाही सग्गळं खायचं भरपूर! विचार नाही करायचा, मोजून मापून नाही जगायचं' 'पूर्वीची माणसं बघ. काय आहार होता त्यांचा!' सो; ईट एव्हरीथिंग. बी हॅपी. अशा तर्हेने 'वाट'चाल चालू राहते.
यापैकी कुठल्याही वर्णनात आपण बसत असू तर आपण चुकतोय असं समजावं. हे लिहिता लिहिता मी स्वतःलाही बजावतोय, व नेहमीच बजावत असतो. उगीच 'लोका सांगे...' व्हायला नको. पण इथे वर्णन केल्यासमान असलेल्या कुणीही एक जरी व्यायाम, एक जरी डाएट, काहीही; फॉर दॅट मॅटर नियमितपणे, नेमाने, केलं तर या सगळ्या चक्रालाच फाटा मिळेल. पण तसं त्यांच्याकडून होतच नाही. एका नंतर दुसर्या प्रकारे ते शिस्तीला, मेहनतीला टाळत राहतात, आणि स्वतःला फसवत राहतात. अमूक एकच काहीतरी करा अशी सक्ती नसतेच आरोग्याच्या बाबतीत, किंवा हा एकच व्यायाम सर्वश्रेष्ठ, बाकी भंपक असंही नसतं. पण जे कराल त्यात सातत्य ठेवा इतकीच अट असते. फिटनेसमधे धरसोड, टाळाटाळ कामाची नाही. तिथे सातत्य हवं. काठिण्य पातळीत सतत प्रगती हवी. विविधता हवी. तरच परिणाम दिसतात.
असो. यात हेटाळणीचा, दोषारोपाचा हेतू अजिबात नाही. साधा विचार आहे, की प्रत्येकाने आरोग्याची, शरीराची काळजी घ्यावी, आणि सुदृढ, सशक्त रहावं. शेवटी शरीर, आरोग्य ही एकमेव शाश्वत संपत्ती आपल्याकडे आहे. आता तिला गोळीसारखं मानून झाडून द्यायचं आयुष्यावर आदळण्यासाठी की बंदुकीसारखं मानून आपली पकड तिच्यावर मजबूत ठेवायची, जेणेकरून येणार्या अडचणींचा वेध घेता येईल, हा आपापला निर्णय आहे.
शुभेच्छा.

शुभेच्छा.वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त लिवलंय
पटतय.
मस्त लिहीलंय
शरीर, आरोग्य ही एकमेव शाश्वत
भारी लेख
छान लिहिलंय. नेमकं आणि
+१ नेमक लिहिलय!
सहमत ....
सहमत
छान लिहीलंयत. कोणाचा नाही
भारी लिहिलंय वेल्ला भटा ..
उत्तम लेख.
व्यामाची त्रिसूत्री
शालेय जीवनतली उदासीनता
संपूर्ण सहमती!
लेख आवडला.. छान लिहिलंय.
मस्त लिहिलंय ...
डोळे उघडवणारा लेख! अगदी नेमका
आरसा दाखवणारा लेख!
आवडला लेख.
व्यायामप्रेमी
समर्थांच्या मूर्खाम्च्या
आरोग्याकरता व्यायाम
चौफेर वेध घेणारा वास्तवदर्शी
एकच फॉर्म्युला/तर्क सगळ्यांना