नमस्कार मंडळी,
अमेरिकेत मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान होईल. भाप्रवे सकाळी ५.३० पासून मतमोजणी सुरू होईल. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडायच्या प्रायमरी सुरू झाल्यानंतर मिपावर त्याविषयी लिहायला सुरवात केली होती पण नंतर इतर काही कामांमुळे त्या धाग्यांवर पाहिजे तितक्या प्रमाणात लिखाण करता आले नव्हते. तेव्हा निदान भारतातील निवडणुकांच्या मतमोजणीप्रमाणे अमेरिकेतल्या या निवडणुकांच्या मतमोजणीवर लाईव्ह धागा काढावा हा मानस आहे. शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे. जरी रजा घेता आली नाही तरी कल स्पष्ट होऊन कोण अध्यक्षपदी विराजमान होणार हे नक्की झाल्यावरच ऑफिसला जायला निघणार आहे :)
अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल कॉलेज हा महत्वाचा घटक असतो. याविषयी मी मिपावर पूर्वी इथे लिहिले आहे. या निवडणुकांसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये पुढीलप्रमाणे मते आहेतः
सध्याच्या विविध मतदानपूर्व चाचण्यांमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे:
वरील चित्रात डेमॉक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद लाल रंगात दाखविली आहेत. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या लाल रंगाने दाखविली आहेत. तर चुरस असलेली राज्ये पिवळ्या रंगाने दाखविली आहेत.
नेब्रास्का आणि मेन राज्यात इलेक्टोरल कॉलेजमधील मते विभागली जातात तर इतर सर्व राज्यांमध्ये विजयी उमेदवाराला संबंधित राज्यातील सर्व मते मिळतात. नेब्रास्कामधील ५ मतांपैकी ४ मते रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे मिळतील तर पाचव्या मतासाठी चुरस असेल तसेच मेनमधील ४ मतांपैकी ३ मते डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे मिळतील तर एक मत रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारे असेल असा चाचण्यांचा अंदाज आहे.
सर्व आकडे एकत्र केल्यावर डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे २०० मते तर रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे १५७ मते मिळतील. तसेच ६८ मते डेमॉक्रॅटिक पक्षाकडे झुकणारी असतील तर ४७ मते रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी असतील. या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर हिलरींना २६८ तर ट्रम्प यांना २०४ मते मिळतील तर उरलेल्या ६६ मतांसाठी चुरस असेल. तेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांना जिंकायचे असेल तर ही सगळी ६६ मते (अॅरिझोना, फ्लॉरीडा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना आणि नेब्रास्कामधील चुरस असलेले एक) जिंकावी लागतील तर हिलरींना चुरस असलेल्या राज्यांपैकी एक राज्य जिंकले तरी चालणार्यातले असेल.
तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच.

तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच. वर्गीकरण
वाचने
49960
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट्रम्प ३०४+ ने जिंकण्याची
एक मूलभूत प्रश्न
नाही
In reply to एक मूलभूत प्रश्न by रविकिरण फडके
अब की बार, ट्रंप सरकार!
जिंकले हो ....
Trump 268, Hillary 215
ट्रम्प तात्या जिंकले
या लोकसत्ता वाल्याच्या थोतरीत
ट्रम्पभाऊ अभिनंदन
ट्रम्पभाऊंचं अभिनंदन
दुसर्या उमेदवारांना मिळालीत
In reply to ट्रम्पभाऊंचं अभिनंदन by पाटीलभाऊ
पण...
In reply to दुसर्या उमेदवारांना मिळालीत by संदीप डांगे
https://www.google.co.in
In reply to पण... by पाटीलभाऊ
धन्यवाद
In reply to https://www.google.co.in by संदीप डांगे
असे उमेदवार रिपब्लिकन किंवा
In reply to धन्यवाद by पाटीलभाऊ
एन्जोय युअर स्टे अॅट व्हाईट
मुड गेला.
अर्थात
In reply to मुड गेला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+ १
ट्रम्पनी घडविलेला इतिहास आणि अमेरिकन पध्दतीतली त्रुटी
डेमोक्रॅट ट्रंप
In reply to ट्रम्पनी घडविलेला इतिहास आणि अमेरिकन पध्दतीतली त्रुटी by गॅरी ट्रुमन
ट्रम्प बरेच बेरकी निघाले :)
In reply to डेमोक्रॅट ट्रंप by गामा पैलवान
अगदी...
In reply to ट्रम्पनी घडविलेला इतिहास आणि अमेरिकन पध्दतीतली त्रुटी by गॅरी ट्रुमन
हिलरीचे स्पीच आता होत आहे. ती
अत्यंत अप्रतिम भाषण! मला तरी
सुंदर भाषण !
In reply to अत्यंत अप्रतिम भाषण! मला तरी by पिलीयन रायडर
ट्रंपचे विजयी भाषणही
In reply to सुंदर भाषण ! by डॉ सुहास म्हात्रे
अगदी खरं... सोनिया गांधीनी
In reply to सुंदर भाषण ! by डॉ सुहास म्हात्रे
हिलरी हरावी अशी इच्छा होती.
गेल्या काही वर्षांपासून
मागील वर्षी आचरटशिरोमणी