✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307093 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

होय,

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 11/09/2016 - 12:59 नवीन
अन तेही नसे थोडके?
↩ प्रतिसाद: सस्नेह

ब्लॅकने घेतलेल्या जमिनी

आनंद
Wed, 11/09/2016 - 18:17 नवीन
ब्लॅकने घेतलेल्या जमिनी,स्थावर मालमत्ता यांच्या किंमती कमी होतिल, काळा पैसा नस्ल्या मुळे ज्यांच्या कडे व्हाईट पैसा आहे तेच मालमत्ता घेउ शकतिल गिर्‍हाइक नस्ल्या मुळे भाव कमी होतिल.
↩ प्रतिसाद: सस्नेह

सुरुवात झालीही

नाखु
गुरुवार, 11/10/2016 - 14:57 नवीन
आग्नेय स्वाहा
↩ प्रतिसाद: आनंद

हां मलाही हाच डाऊट आहे.मोठ्या

प्रीत-मोहर
Wed, 11/09/2016 - 08:31 नवीन
हां मलाही हाच डाऊट आहे.मोठ्या प्रमाणात काळा पैसा असलेले, किंवा देशाबाहेर काळा पैसा असेलेले लोक त्यांच काय?

नुसता काळा पैसा नाही ...

चौकटराजा
Wed, 11/09/2016 - 10:54 नवीन
काळा पैसा तसा पूर्ण काळा नसतोच कधी. तो खर्च केला की निर्निराळे एक्सपेन्डीचर कर त्यावर भरावेच लागतात. पण आपल्या देशाचे बजेट जे आयकर , फी, व वेगवेगळे वस्तू सेवा कर या सर्वांवर आधारित आहे. म्हणून आय वरील कर ही महत्वाचा आहे . भारताच्या लोकसंख्यंच्या तुलनेत तो अर्त्यंत कमी डोकी भरतात असे वास्तव आहे. पाच लाखाची गाडी घेतली आहे पण आयकर रिटर्नच भरत नाही अशी ही माणसे आपल्याकडे आहेत.
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

Just wait and watch ...!

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 09:39 नवीन
Just wait and watch ...!

मोदींचा मास्टर स्ट्रोक... :)

मदनबाण
Wed, 11/09/2016 - 10:05 नवीन
मोदींचा मास्टर स्ट्रोक... :) काळा पैसा असणार्‍यांची झोप मोदींनी उडवली आहेच, पण त्याच बरोबर विरोधी पक्षांना देखील चांगलाच इंगा दाखवला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे डी-कंपनी आणि पाकिस्तानची पण चांगलीच ठासली आहे,कारण मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आपल्या देशात आणुन अर्थव्यवस्था कमकुवत करण्याच्या त्यांच्या उध्योगांची चांगली पुंगी वाजली आहे ! :) येत्या काही दिवसात १०० रुं च्या नोटांचा तुटवडा भासु शकेल असे सध्या तरी वाटत असुन, सोन्याची झळाळी वाढेल असे दिसते. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- अब कि बार नही, हर बार मोदी सरकार... ;)

हम्म बरे झाले हा मुद्दा

आनन्दा
Wed, 11/09/2016 - 11:06 नवीन
हम्म बरे झाले हा मुद्दा काढलात. काळा पैसा हा एकमेव ड्रायव्हर यामागे नाहे. तर बनावट नोटांची उभी झालेली यंत्रणा देखील यामागे आहे.
↩ प्रतिसाद: मदनबाण

सोने चार हजारांनी वाढले.

एस
Wed, 11/09/2016 - 10:22 नवीन
सोने चार हजारांनी वाढले.

त्याचा याच्याशी काहीही संबंध

आनन्दा
Wed, 11/09/2016 - 11:10 नवीन
त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. भविष्यात ते ४०००० वर पोचले तरी आश्चर्य नाही
↩ प्रतिसाद: एस

धाडसी पाऊल

झेन
Wed, 11/09/2016 - 11:06 नवीन
पण परीणाम बघण्यासाठी थोडं थांबाव लागेल बहुधा. एक बाळबोध शंका नोएडा असो किंवा बाकी मोठ्या शहरात जागेच्या भावांचा जो फुगा अवास्तव फुगला आहे तो एकदम फुटून अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याचे काही चान्सेस आहेत का ? अमेरीके प्रमाणे.

खरोखरच धाडसी निर्णय घेतलाय.

मार्मिक गोडसे
Wed, 11/09/2016 - 11:06 नवीन
खरोखरच धाडसी निर्णय घेतलाय. आता सोन्यावरही संक्रांत येईल असे वाटते कारण, सुवर्ण योजनेला फारच अल्प प्रतिसाद मिळाला होता. धातू रुपात सोने खरेदी करणे अवघड करायला हवे, जसे आयात शुल्क अधुन मधून मोठ्या प्रमाणात कमी जास्त करणे ज्यामुळे सोन्याच्या तस्करीला आळा बसू शकेल.
सोने चार हजारांनी वाढले.
चार हजारांनी नाही, ४% नी. आणि तेही अमेरेकेतील निवड्णूक निकालांमुळे, नोटांच्या बंदीमुळे नव्हे.

राजकीय पक्ष आणि आय एस आय

पैसा
Wed, 11/09/2016 - 11:07 नवीन
राजकीय पक्ष आणि पाकिस्तानी आय एस आय यांची पंचाईत आहे. बाकी धंदेवाल्यांनी /काळा पैसेवाल्यांनी घरात क्याश भरून ठेवायचे दिवस कधीच गेले. बहुतेकांनी सोने, शेअर्स आणि जमीनजुमल्यात काळे पैसे गुंतवलेले आहेत.

नाही

नाखु
Wed, 11/09/2016 - 11:22 नवीन
अजूनही सरकारी (खाबू) बाबू यांच्या घरी रोकड असतेच असते. बरेचदा लाखो रुपये सापडल्याचे येते पेपरात
↩ प्रतिसाद: पैसा

तरी प्रमाण कमी असणार

पैसा
Wed, 11/09/2016 - 11:23 नवीन
म्हणजे ते लोक दहा वर्षे पैसे खात आले असतील तर फार तर एखाद्या महिन्याची कमाई घरात सापडत असेल.
↩ प्रतिसाद: नाखु

बरोबर!

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 11:27 नवीन
बरोबर!
↩ प्रतिसाद: पैसा

सहमत!

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 11:24 नवीन
सहमत!
↩ प्रतिसाद: पैसा

माझे विरोधी मत...

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 11:24 नवीन
ज्या समाजवादी विचारसरणीने आपल्या मनावर गेले सत्तर वर्से राज्य केले आहे त्यामुळे मी जे लिहिणार आहे ते किती जणांच्या पचनी पडेल याची माझ्या मनात शंकाच आहे. पण आपले मत नोंदवावे याच एका विचाराने हे मत लिहिण्याचे धाडस करीत आहे. काही गृहितके मी जमेस धरली आहेत ती अचूक नाहीत याची मला जाणीव आहे पण मुलभूत विचार केला तर कदाचित आपल्याला माझं म्हणणे पटावे. काळा पैसा: ज्यावर सरकारला कुठल्याही प्रकारचा कर भरला जात नाही तो. म्हणजे तो पैसा वाईट असतो असे नाही. काळा पैसा बाजारात खर्च होतच असतो. त्यातील सरकारचा हिस्सा सरकारकडे जात नाही एवढाच काय तो फरक. पण जर हा पैसा देशाबाहेर गेला नाही तर या पैशात या ना त्या प्रकारे व्यवहार होतच असतात व तो खाली झिरपतच असतो. यातील सरकारचा हिस्सा मिळविण्याचे प्रयत्न अपूरे पडले म्हणून या नोटा रद्द करण्याची वेळ आली. ४५ % टक्के पैसे भरुन हा हिस्सा बर्‍याच लोकांनी पोहोचता केला नाहीए याची कारणे शोधायला हवीत. कदाचित ५ % भरुन लोकांनी सरकारची तिजोरी भरलीही असती. आता हा काळा पैसा जर बाजारपेठेतून काढला गेला तर जवळजवळ ५० % संपत्ती आपण फाडून टाकलीए असा त्याचा अर्थ होतो. हा पैसा आता बाजारपेठेत येणार नाही त्याचे दुष्परिणाम लवकरच आपल्याला पहावयास मिळतील. अगदी साधे उदाहरण द्याचे झाल्यास, समजा एका घरात महिन्याला ४०,००० येत असतील त्यातील २०००० रुपायाच्या नोटा तुम्ही फाडून टाकल्या तर काय होईल ? ते कुटुंब २०००० कमी खर्च करणार म्हणजे त्या २०,००० वर अवलंबून असलेल्या लोकांना ते मिळणार नाहीत. उदा. ते कुटुंब हॉटेलमधे जाणार नाही, कपडे खरेदी करणार नाहीत, गाडी घेणार नाही..इ.इ.इ..... तेच आता आपल्या अर्थव्यवस्थेत होणार आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे नोकर्‍या कमी होतील व अत्यंत दुष्ट अशा चक्रात आपण अडकू अशी मला भिती वाटते. मला तर वाटते काळा पैसा जर देशातच राहिला असता तर त्याचे दुष्परिणाम एवढे नाहीत जेवढे या उचललेल्या पावलांनी होईल... (काळा पैसा परदेशी जाणार नाही यासाठी अधिक कडक पावले उचलली असती तर बरे झाले असते) अर्थात तज्ञांचे मत वाचण्यास आवडेल.

जर कोणी असे पैसे फाडून टाकणार

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 11:35 नवीन
जर कोणी असे पैसे फाडून टाकणार असेल किंवा खर्च न करता तसेच ठेवणार असेल तर फरक पडेल. मात्र बदलून घेतले, खर्च केले तर पैसा बाजारात खेळेल. नोटांची ओळख मिटली पण किंमत, मूल्य नव्हे! अर्थात मला काय म्हणायचं ते नीट मांडता येत नाहीये! क्षमस्व.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

डांगे साहेब, कुठलिही संपत्ती

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 11:38 नवीन
डांगे साहेब, कुठलिही संपत्ती ही बाजारात येनकेनप्रकारेण खेळतेच पण ती नष्ट केली तर ती शक्यताच नष्ट होते. नाही का ?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

येन केन प्रकारेण..

चौकटराजा
Wed, 11/09/2016 - 14:14 नवीन
आपली अर्थ व्यवस्था थेट कर ( आयकर ) व थेट नसलेले कर या दोन्ही प्रकारच्या कराम्वर अवलंबून आहे. आपण सारेच जण हे दोन्ही कर भरतो . आपल्याला नोकरी असल्याने कोणतीही टाळाटाळ करता येत नाही. तरीही व्याजाचे उत्पन्न सर्रास कमी दाखवणारे ५० टक्क्याच्या वर नोकरीदार करदाते आहेत. आपल्यातील किती जण आपल्या मेडिकल कन्सल्टटं ना बिलाची पावती मागतो.? किती लोक रंगार्‍याला , सुताराला तीस तीस हजार मजुरीचे देऊन पावती मागतात ? इथे सर्व ठिकाणी आपण काळा पैसा निर्माण करतो. त्यावर थेट नसलेले कर भरले जात असले तरी आयकर भरला जात नाही. फुगेवाडीपुणे येथे एक प्रसिद्ध चहाचे हॉटेल आहे त्यावर नजर ठेवून आयकर खात्याने धाड टाकली होती. आपल्या आयकर खात्याची पोलिसांची, न्यायव्यवस्थेची औकात ( लायकी) समाजकंटकानी ओळखली आहे त्यामुळे बिन्धास्त आयकर , सेवा कर बुडविणे, सिग्नल तोडणे, अनधिकृत बांधकामे करणे , अतिक्रमण करणे ई अराजक माजले आहे. आपण नोकरशाहीला, राजकारण्याना सरळ करू शकत नाही याची जाणीव मोदीना झाल्याने त्यानी हा प्रशासकीय मार्ग क्रमला आहे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

काळा पैसा का तयार झाला याची

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 11:37 नवीन
काळा पैसा का तयार झाला याची कारणे गेल्या ७० वर्षात काय घडत होते यात शोधली पाहिजेत. ज्या काळात ७०% पर्यंत आयकर होता त्या काळात दुसरे काही झाले असते हे मानणे भाबडेपणा होईल. थोडक्यात काय चुका सरकार करणार आणि आपल्याला व आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचे दुश्परिणाम भोगावे लागणार... :-(
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

जास्त फरक पडणार नाही

पैसा
Wed, 11/09/2016 - 11:42 नवीन
छोट्या धंदेवाल्यांकडचा काळा पैसा एकूण काळ्या पैशाच्या नगण्य प्रमाणात असावा. त्यातूनही मोठे मासे आधीच सुटून गेले असणार. जेटली अर्थमंत्री असताना क्रिकेट कंट्रोल बोर्डसारख्या मंडळीला काही चिंता नाही. मला वाटते की फक्त राजकीय पक्ष आणि पाकिस्तानी आय एस आय या तडाख्यात सापडतील. बाकी कोणाला फारसा फरक पडत नाही. काळा पैसा तयार व्हायचा तसाही थांबणार नाहीच. कारण वडापाववाले काही रिसिट्स देणार नाहीत की रस्त्यावरचे पोलीस मामा शंभर रुपये घेऊन हेल्मेटशिवाय सोडणे थांबवणार नाहीत. सोन्याची किंमत वाढली याचा अर्थ मी असा लावत आहे की सोनार लोक आधीच्या तारखेच्या पावत्या देऊन सोने विकत आहेत.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मला उलटे वाटते.. याउलट

आनन्दा
Wed, 11/09/2016 - 11:45 नवीन
मला उलटे वाटते.. याउलट जास्तीत जास्त काळा पैसा पांधरा करण्यासाठी तो जनधन किंवा गरीब वस्तीतून फिरवला जाईल, ज्यातून त्यांना काही काळ सुगीचे दिवस बघायला मिळतील.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

कै कळ्ळं नाही. २०००० रु कमी

खेडूत
Wed, 11/09/2016 - 11:48 नवीन
कै कळ्ळं नाही. २०००० रु कमी का येतील? आणि प्रामाणिकपणे मिळवणारे खर्च का करणार नाहीत? फाडलेल्या नोटांइतक्या मूल्याच्या सुरक्षित नोटा मिळणारच आहेत. फरक नक्की कुणाला पडतो?
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

कदाचित मला नीट लिहिता आले

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 11:57 नवीन
कदाचित मला नीट लिहिता आले नसेल. समजा मी तुमचे २०००० रुपये काढूनच घेतले तर काय होईल याबद्दल मी लिहिले आहे. बदलायचा वैगेरे प्रश्र्नच नाही.....म्हणजे अर्थव्यवस्थेतील निम्मे पैसे मी काढून घेतले. जसे शेअर मार्केट मधून परदेशी बँका पैसे एकदम काढून घेतात त्याप्रमाणे....
↩ प्रतिसाद: खेडूत

मलाही नीट लिहीता येणार नाहीये

खेडूत
Wed, 11/09/2016 - 12:05 नवीन
मलाही नीट लिहीता येणार नाहीये. म्हणून सविस्तर लेखाची वाट पहातोय. पण मी फक्त कायदेशीर मार्गाने मिळालेला पैसा बाळगून असल्याने फरक पडत नाही, असा विश्वास आहे, इतकंच. जे काढून घेतलेत त्यातले खूप खोटे आहेत, पण म्हणूनच मला माझ्याकडचे बँकेत भरता येणार आहेत. अन्य प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पळवाटा काढणारे, पळून जाणारे, मोठ्ठ्या प्रमाणात असणारच. पण बराच सकारात्मक फरक पडेल हे नक्की. बाकी आज लोकसत्तेत इतका बालिश अग्रलेख (?) कसा आला काय माहीत!
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

तसं नाहीये

पैसा
Wed, 11/09/2016 - 12:06 नवीन
काळा पैसा सरकारने बजेट तयार करताना हिशेबात घेतलेला नसतो. मात्र प्रत्यक्षात तो बाजारात असतो. अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे पैशाचा पुरवठा जास्त असला की त्यामुळे विकत घ्यायच्या वस्तू महाग होणार. आता पुरवठा कमी झाला तर वस्तूंची किंमत योग्य जागी यायला थोडीफार मदत होईल. महागाई कमी होऊ शकेल.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

जेव्हा काळा पैसा अत्यल्प असतो

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 12:13 नवीन
जेव्हा काळा पैसा अत्यल्प असतो त्या अर्थव्यवस्थेत तुम्ही म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण येथे म्हणतात की ५० % टक्के आहे. (खात्री नाही) येथे काय होईल याचा विचार करुन पहायला हवा...
↩ प्रतिसाद: पैसा

त्यातला रोखीने फार थोडा असावा

पैसा
Wed, 11/09/2016 - 12:17 नवीन
काळा पैसा असला समजा ५०% तरी तो बराचसा मालमत्तेच्या स्वरूपात आहे. रोख कॅश फारच थोडी असणार आहे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

हं हे सम्जू शकतो...

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 12:32 नवीन
हं हे सम्जू शकतो...
↩ प्रतिसाद: पैसा

आकडेवारी माहीत नाही. क्लिंटन

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 12:33 नवीन
आकडेवारी माहीत नाही. क्लिंटन यांच्या लेखाची वाट पहावी लागेल...
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

पण एकदा मालमत्ता घेतली की तो

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 12:39 नवीन
पण एकदा मालमत्ता घेतली की तो पांढराच झाला ना ? हे स्पष्ट होत नाही... विचार करायला पाहिजे... :-) म्हणजे समजा मी शेतजमीन घेतली एक लाखाची आणि रेडीरेकनर प्रमाणे त्याचे ६०,००० चेकने दिले आणि चाळीस दिले रोख तर ४०,००० बाजारत आलेना रोख... म्हणजे हे चाळीस अगोदरपासूनच काळ्यामधे होते... बरोबर ना ?
↩ प्रतिसाद: पैसा

ती जमीन जेंव्हा विकाल तेंव्हा

सुबोध खरे
Wed, 11/09/2016 - 12:45 नवीन
ती जमीन जेंव्हा विकाल तेंव्हा त्यावर होणाऱ्या नफ्यावर आपल्याला भांडवल वृद्धी कर भरावा लागेल. तेंव्हा जेवढी मूळ रक्कम कमी दाखवलं तेवढा जास्त कर पडेल. हीच वस्तुस्थिती जेंव्हा आपण घर विकाल तेंव्हाही होणारच.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

+१

पैसा
Wed, 11/09/2016 - 12:51 नवीन
शिवाय जे ४०००० काळे राहिले ते या ना त्या स्वरूपात मार्केटमधे येणार आहेत. त्यातले काही पांढरे सुद्धा होतील पुन्हा. कारण तुम्ही बिल्डरला द्याल त्यातून तो सिमेंट खडी रेती, लेबर यांची बिले देणार आहे. जे सेव्हिंग राहील त्यातून तो पुन्हा जमीन घेईल किंवा बायको पोरांसाठी गिफ्ट घेईल. फार पूर्वी कोणातरी बँकेच्या सीएम्डीच्या घरी बाथरूमच्या माळ्यावर पैशाची बंडले लपवलेली सापडली होती तसे पैसे आता कोणी घरात ठेवत नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर ! पण आता हेच ४०,०००

जयंत कुलकर्णी
Wed, 11/09/2016 - 12:58 नवीन
बरोबर ! पण आता हेच ४०,००० पूर्णपणे नष्ट झाले असे मला म्हणायचे आहे... :-)
↩ प्रतिसाद: पैसा

ते ४०००० नसतील

पैसा
Wed, 11/09/2016 - 13:05 नवीन
त्या ४०००० मधून जो खर्च झाला असेल ते पुन्हा सर्क्युलेशनमधे आलेच असतील. चार ते दहा हजार जे त्याने आणीबाणीच्या खर्चासाठी म्हणून घरात नकद ठेवले असतील तेवढ्याचाच प्रॉब्लेम आहे. त्यातलेही काही सोनार, देवळे, छोटे लोक यांच्या माध्यमातून वाचवले जातील. व्यक्तींना फारच थोडा प्रॉब्लेम आहे. त्यांचे फार नुकसानही होणार नाही.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

नष्ट झालेले पैसे (म्हणजेच

हतोळकरांचा प्रसाद
Fri, 11/11/2016 - 12:15 नवीन
नष्ट झालेले पैसे (म्हणजेच अर्थात हिशेब नसलेली मालमत्ता) हि नष्ट झाली नाही तर ती बाजारात खेळेल आणि विशेष म्हणजे सर्वसाधारण व्यवहारातच वापरली जाईल हे गृहीतक योग्य वाटत नाही. सध्य परिस्थितीत तरी तो पैसा १. निवडणूका २. भ्रष्टाचार ३. गुंडगिरी आणि अवैध धंद्यांमधील गुंतवणूक ४. बांधकाम व्यवसायातील गुंतवणूक (तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे यातील काही पैसा परत बाजारात खेळेल पण बऱ्याच प्रमाणात तो परत निवडणुका किंवा भ्रष्टाचार यात येण्याची शक्यता आहेच) ५. शैक्षणिक क्षेत्र (प्रवेशप्रक्रियेतील गैरवापर अर्थात भ्रष्टाचार) ६. कायदा वाकवणे (हे काय हे सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच माहित आहे). या आणि अशा इतर अनेक कामांतच मोठ्या प्रमाणात वापरला जातोय असे दिसतेय आणि यात समाज आणि अर्थव्यवस्थेची मोठी हानी असे नाही का वाटत? अवांतर : सरकारच्या या निर्णयामागचे कारण अर्थव्यवस्थेतील काळा पैसा काही प्रमाणात तरी बाहेर काढणे हेच एकमेव नसून भारतात मुरवण्यात आलेला खोटा पैसे बाद करणे हे हि महत्वाचे कारण होते असं बऱ्याच अर्थतज्ञांचं मत दिसतंय.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सरकारच्या या निर्णयामागचे

मार्मिक गोडसे
Fri, 11/11/2016 - 12:29 नवीन
सरकारच्या या निर्णयामागचे कारण अर्थव्यवस्थेतील काळा पैसा काही प्रमाणात तरी बाहेर काढणे हेच एकमेव नसून भारतात मुरवण्यात आलेला खोटा पैसे बाद करणे हे हि महत्वाचे कारण होते असं बऱ्याच अर्थतज्ञांचं मत दिसतंय.
हेच मुख्य कारण आहे. उगाचच गुप्तता पाळून काळा पैसा बाहेर काढण्याचे नाटक केले गेले. विनाकारण लोकांना व बॅकांना त्रास दिला गेला.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

एन आय ए आणि Statistical

जयंत कुलकर्णी
Fri, 11/11/2016 - 12:30 नवीन
एन आय ए आणि Statistical Institute of India, Kolkata यांच्या संयुक्त आभ्यासाचा निष्कर्ष मागच्या वर्सीच जाहीर झाला त्यात कुठल्याही क्षणी ४०० कोटी पेक्षा जास्त बनावट नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत नसतात असे म्हटले आहे.... स्त्रोत : कालची इंडिया टुडेवरील चर्चा.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

मलाही कालपासुन हाच प्रश्न

चिनार
Wed, 11/09/2016 - 12:02 नवीन
मलाही कालपासुन हाच प्रश्न पडला आहे..A query: Lot of blackmoney holders have not declared black money till Oct 16 as per the time frame given by govt. Before today's decision: His money was hidden somewhere but definately was geting rotated in the economy in small denominations. After today's decision: Only a fool blackmoney holder will go to bank and submit his money. Rather he will prefer to burn the currency. In this scenario how this decision will help to bring the black money into the white economy?
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

नाही. या पैसा इकॉनोमीमध्ये

आनन्दा
Wed, 11/09/2016 - 12:44 नवीन
नाही. या पैसा इकॉनोमीमध्ये येऊन पैसा फ्लड होईल अशी भीती मला वाटते. कारण त्यांना पैसा पडून राहणे परवडणार नाही. त्यामुळे कोणत्यातरी मार्गाने हा पैसा इकॉनॉमीमध्ये आणण्याचा ते प्रयत्न करणार यात शंका नाही. ़किंबहुना हे २ महिने त्यासाठीच दिलेले असावेत. तसेही माझ्याकडे जर काळा पैसा असेल तर तो जाळण्यापेक्षा मी तो वाटेन, आणि त्याबदल्यात लोकांचे गुडविल घेईन.. आणि हाच हेतू असावा असे वाटते. या व्यतिरिक्त जो काळा पैसा नुसताच पडून आहे पोत्यांमध्ये तो राहिला काय किंवा जळला काय काय फरक पडतो?
↩ प्रतिसाद: चिनार

५०% संपत्ती जी फाडून टाकली

अप्पा जोगळेकर
Wed, 11/09/2016 - 14:03 नवीन
५०% संपत्ती जी फाडून टाकली याचा अर्थ लोकांची क्रयशक्ती कमी झाली. फक्त त्या लोकांची ज्यांनी कर न भरता पैसे घरात ठेवले होते. हे तेच लोक आहेत ज्यामुळे घरे, जमीन, सोने वगैरे किमती अवाच्या सवा फुगल्या होत्या आणि ओव्हर ऑल महागाई वाढली होती. जे कर भरत आहेत त्यांची क्रयशक्ती तेवढीच राहिली. शिवाय पैशांची चण्चण निर्माण झाल्याने मॉरिशस- एफ्डीआय- शेअर मार्केट मार्गे जो पैसा चलन फुगवत होता तो मोकळा होउन बँकांमधे येईल. हे चांगलेच आहे.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

शेअर मार्केट पडलंय

पैसा
Wed, 11/09/2016 - 14:32 नवीन
आज शेअर मार्केट पडलंय. सकाळी १५०० पॉइंट्स्ने पडले होते. आता बरेचसे रिकव्हर झाले. ट्रम्प निवडून येणे आणि ५००/१००० च्या नोटा रद्द दोन्हीचा परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स जास्त मोठ्या प्रमाणात कोसळले.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

मजा एका घरात महिन्याला ४०,०००

मराठी कथालेखक
Wed, 11/09/2016 - 14:07 नवीन
मजा एका घरात महिन्याला ४०,००० येत असतील त्यातील २०००० रुपायाच्या नोटा तुम्ही फाडून टाकल्या तर काय होईल ? ते कुटुंब २०००० कमी खर्च करणार म्हणजे त्या २०,००० वर अवलंबून असलेल्या लोकांना ते मिळणार नाहीत.
पण याची दूसरी बाजू काळा पैसा बाळगणार्‍यां अतिश्रीमंतांची क्रयशक्ती कमी होईल. त्याने महागाई कमी होण्यास मदत होईल. झालंचतर अर्थिक विषमता किंचित का होईना कमी होईल.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

या निर्णयाचा फटका अंबानी

अनुप ढेरे
Wed, 11/09/2016 - 11:41 नवीन
या निर्णयाचा फटका अंबानी-अदानी-मल्ल्या छाप लोकांना बसणार नाही. त्यांनी ऑल्रेडी तो पैसा बाहेरून फिरवून शेअर बाजार किंवा तत्सम ठिकाणी आणला असणार आहे. पण खासगी कॉलेजवाले, डॉक्टर, बिल्डर, हॉटेलवाले, सरकारी कंत्राटदार, दुकानदार हे लोक जे भरपूर काळा पैसा बाळगतात (आणि भ्रष्टाचाराच्या नावाने श्या घालतात) त्यांना फटक

+११

नाखु
Wed, 11/09/2016 - 12:06 नवीन
बरोबर आहे ज्या अंबानी आणि बिर्ला यांना (करचुकवेगिरी आणि काळा पैसा) या बद्दल शिव्या/दूषणे देणार्यांना वर उल्लेख केलेल्या शिक्षणसम्राट्,मालमत्ता माफिया,सरकारी कंत्राटदार,आणि आडत्+दलाल्+कमीशन एजंट ९थोडक्यात जे मोठ्ठ्या रकमेचे (रोकड) व्य्वहार करतात आणि अर्थात त्याची कोठेही नोंद नसते (त्यामुळे आपसूक कर्+करदायीत्व-लाभार्थी हे होतच नाहीत) त्यांचा आवाकाही मोठ्ठा असेलच की! किमान १००० जरी वाळू माफीया धरले तरी एका मिनि अंबानीइतके तरी असतील्च की. राजकीय लोकांना यांचेकडून येणारी रसद रोडावेल (चाप बसेल) ही माहीत असूनही असा निर्णय घ्यायचे धाडस केल्याबद्दल तरी नमोंना धन्यवाद देऊयात की. पांढरापेषा नाखु
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

एकतर इतके पैसे घरात ठेवायला लोकं वेडी नाहीत

वरुण मोहिते
Wed, 11/09/2016 - 12:08 नवीन
ज्यांच्याकडे आहे त्यांनी अर्जंट सोनं घेतलं ओळखीच्या ज्वेलरी शॉप मधून . मुंबईचा डायमंड मार्केट सर्वात मोठं मार्केट आहे कित्येक कोटींचे व्यवहार चालतात . तिथे आज एजन्ट झालेत नवीन कॅश पन्नास लाख पर्यंत एक्सचेंज करून मिळेल त्यासाठी.कारण ज्यांना हवेत त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे . खरा प्रॉब्लेम होणारे तो छोटे उद्योजक ,गैरव्यवहार करणारे ,गुन्हेगार ,बार मध्ये काम करणाऱ्या बायका,अनधिकृत रस्त्यावर गाडी लावून धंदा करणारे लोकं. पण काहीतरी होईल इंडिया इस जुगाड कंट्री . बाकी निर्णय धाडसी आहे पेंडिंग होता घेतला ह्या बद्दल मोदी यांचे अभिनंदन .

त्यानाही प्रॉब्लेम नाही

पैसा
Wed, 11/09/2016 - 12:12 नवीन
या सगळ्यांची बँकामधे खाती असतात आणि आताही ते कितीही पैसे बँकेत स्वतःच्या खात्यात भरू शकतात. काहीच नाही तर झोपडपटीतल्या लोकाना लायनीत उभे करून नोटा बदलून घेतील. कदाचित पुढच्या वर्षी इन्कम टॅक्सच्या जाळ्यात सापडतील एवढंच.
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

ज्यांच्याकडे आहे त्यांनी अर्जंट सोनं घेतलं ओळखीच्या ज्वेलरी शॉप

तुषार काळभोर
Wed, 11/09/2016 - 12:44 नवीन
ह्यामुळे सोन्याचा भाव रात्रीतून १३% वाढलाय! ज्वेलरकडे वाढलाय, कमोडिटी मार्केटमध्ये/अधिकृत भाव अजून ३००००+ आहे.
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा