✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डी फॉर डान्सबार (१)

व
वरुण मोहिते यांनी
Tue, 11/08/2016 - 16:28  ·  लेख
लेख
तर ती मला भेटली. असं कधी झालं नव्हतं.म्हणजे विचार करणारे माझे कित्येक मित्र घाटावरून उतरून यायचे खाली पनवेलला. पण मी नुसता टाईमपास करायचो. पार सोलापूर मोडनिंब पासून ते लातूरच्या पुढे. बारीच्या कहाण्या अजून वेगळ्या, सांगेन ती गम्मत. बाकी असं कसं होऊ शकत असं नेहमी वाटायचं. कारण (तिथे) गेलो तरी माझं माझ्या बायकोवर होणाऱ्या जीवापाड प्रेम.. मी बोलू पण शकणार नाही तिला सोडून कुठल्या मुलीशी, अशी परिस्थिती. पण झालं. थोडे पैसे उडवल्यावर ती मला मॉल मध्ये भेटली. नुसती चॉकलेटचं माझ्या भावाला आवडतात म्हणून २-३ हजारांची घेतलेली. बाकी खरेदी तर विचारू नका. पण मला तेव्हापण चाललं. घे हवा ते. एव्हाना ४ लाखांवरून आकडा ९ लाखांपर्यंत गेला होता. आता खूप बोलण्यातून तिला पण वाटत होतं की बोलावं. पण मी माझी बायको सोडून मरेपर्यंत कोणाचा विचार करू शकणार नाही. जेव्हा ती बोलली की अजून काही मदत कर घराला आणि ऑल, तेव्हाही मी केली. पण झालं असं की तिच्या सोबत काही वेळा फिरणं इतकच माझं उद्दिष्ट होतं. चूक आहे माहित होतं कारण ती मला फसवत पण नव्हती. एकदा पैसे देणार की नाही यावरून त्यांचं ठरत आणि माणूस कसा आहे त्यावरून म्हणजे मुलींचं त्या. सो प्रॉब्लेम मलाच होता.(त्यांची बाजू पुढे येईलच). आता पण मी बायको सोडून कोणाचा विचारही करू शकत नव्हतो. काय करू ह्या पेचात होतो. तोवर १ वर्ष झालेलं. मला समजत नव्हतं की निश्चित काय झालय. कारण परदेशापासून सगळीकडे जात आलो (पण) असं कधी माझ्याबाबतीत झालं नव्हतं. पण खरं सांगतो होऊ शकतं असं. एकेक मुंबईतले बार पहिले तर लक्षात येईल. नुसता आमच्या मुलुंड ठाण्यालाच २-२ लॉक लावलेले बार आहेत. सिलेक्टड एन्ट्री ओन्ली अश्या टाईपचे. अंधेरी, मीरारोड काही प्रमाणात गिरगाव इथे खूप एलिट क्लासचे बार आहेत. काय करावं मला कळत नव्हतं. तिच्यावर प्रेम नव्हतो करत, पण सवय झालेली. रेग्युलर बारला जाणे आणि स्टाईल मध्ये बसणे. क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
9207 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

डान्सबारचा फर्स्टहॅण्ड अनुभव

तुषार काळभोर
Tue, 11/08/2016 - 16:35 नवीन
असलेले काही नातेवाईक आहेत. जेजुरीला जाणारे काही आहेत. असो.. लेखन थोडं विस्कळित वाटलं. रोचक अनुभवही मग वाचायचा कंटाळा येतो. तेवढी किंचीत काळजी घ्या. पुढील भाग आवर्जून वाचायचेत.
  • Log in or register to post comments

हे लिखाण सुरेख, परिणामकारक

यशोधरा
Tue, 11/08/2016 - 16:40 नवीन
हे लिखाण सुरेख, परिणामकारक आहे, पण थोडे शुद्धलेखनाचे नियम पाळून लिहिलेत तर अधिक परिणामकारक होईल. हवे असल्यास माझी मुशो करायची तयारी आहे. आणि अजून थोडे लिहा, इतके त्रोटक, लहान भाग रसभंग करतात जरा.
  • Log in or register to post comments

प्रयत्न करतो यशो ताई

वरुण मोहिते
Tue, 11/08/2016 - 17:15 नवीन
कारण एकच असतं लिहायला कंटाळा येतो .
  • Log in or register to post comments

९ लाख?!!

किसन शिंदे
Tue, 11/08/2016 - 17:41 नवीन
.एव्हाना 4 लाखांवरून आकडा 9 लाखांपर्यंत गेला होता
आम्हा सामान्यांच्या तर विचारापलीकडील गोष्ट !!
  • Log in or register to post comments

हो...

तुषार काळभोर
Tue, 11/08/2016 - 17:45 नवीन
घरात बसून २०-५० लाखांचं वार्षिक उत्पन्न केवळ व्याजावर (किंवा सेट झालेला फॅमिली बिजनेस-ज्यात स्वतःचं काही अ‍ॅक्टीव सहभाग नाही) असणार्‍यांना पैशांचा पाऊस पाडताना बघितलंय. इस्टेट एजंट्स एका एका व्यवहारात १०-२० लाख कमवतात. एकदम १० लाखाची रोकड हातात आली की त्यातले लाखभर रुपये पनवेलला जायला वेळ नाही लागत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हेवा वाटतो

किसन शिंदे
Tue, 11/08/2016 - 17:58 नवीन
बेफाम खर्च करतात म्हणून नाही तर सगळ कसं हाताशी आयतं मिळालेलं असतं याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

या सोफिस्टीकेटेड वेश्याच

Ram ram
Tue, 11/08/2016 - 18:17 नवीन
या सोफिस्टीकेटेड वेश्याच असतात असं माझं मत आहे
  • Log in or register to post comments

असोत बापड्या. ज्याचा त्याचा

अप्पा जोगळेकर
Tue, 11/08/2016 - 18:23 नवीन
असोत बापड्या. ज्याचा त्याचा कामधंदा आहे शेवटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram

काहीतरी गफलत होत आहे समजण्यात

वरुण मोहिते
Tue, 11/08/2016 - 18:40 नवीन
एकतर मी ट्रिपल ग्रॅजुएट आहे मी माझ्या जीवावर पैसे उडवले. घरून पैसे घेणं मला कधीच पसंद नाही पण अश्या काही आमच्या गुंठामंत्र्यांच्या स्टोर्या पण सांगणारे .
  • Log in or register to post comments

आवं पाटील

किसन शिंदे
Tue, 11/08/2016 - 20:07 नवीन
हे वरील संभाषण तुम्हाला उद्देशून नाहीये. पैलवान यांनी त्यांच्या प्रतिसादात ज्या लोकांबद्दल बोलतायत त्यांच्याबद्दल आहे. उगा तुमचाच गैरसमज नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

अर्रर्रर्रर्र

वरुण मोहिते
Tue, 11/08/2016 - 21:08 नवीन
चुकलो मी समजण्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हेच

तुषार काळभोर
Wed, 11/09/2016 - 11:57 नवीन
शिकलेले अ‍ॅण्ड्/ऑर स्वतः कमावणारे अपवादात्मकच असतात डान्सबारमध्ये. माझा रोख डान्सबारमध्ये जाणार्‍या ९०+% लोकांकडे आहे. तुम्हाला 'जाणीव' होण्याचे कारण 'तुम्ही शिक्षित असणे + स्वतः पैसे कमवणे' हे असणार, याची खात्री आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

वाचतोय. फार थोडे असं लिहायला

सूड
Tue, 11/08/2016 - 18:40 नवीन
वाचतोय. फार थोडे असं लिहायला धजावतात. लिहीत राहा. शुद्धलेखनासाठी काही मदत लागल्यास बेलाशक व्यनि करा.
  • Log in or register to post comments

पूर्णविरामांचा प्रॉब्लम आहे.

Ram ram
Tue, 11/08/2016 - 18:52 नवीन
पूर्णविरामांचा प्रॉब्लम आहे. भले तुम्ही स्वत: कमविले पण असे खर्च करणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments

वाचतेय.विस्कळीत वाटला हा भाग.

अजया
Tue, 11/08/2016 - 19:05 नवीन
वाचतेय.विस्कळीत वाटला हा भाग.
  • Log in or register to post comments

तुटक, तुटक , तुटक!

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/08/2016 - 19:06 नवीन
तुटक, तुटक , तुटक!
  • Log in or register to post comments

मलाही व्याकरणाचे नियम अगदी

पिलीयन रायडर
Tue, 11/08/2016 - 19:07 नवीन
मलाही व्याकरणाचे नियम अगदी १००% माहिती नाहीत. पण वाचायला सोप्पं पडेल असं मुशो २-५ मिनिटात केलंय. सासंनी अपडेट केला धागा तर सगळ्यांनाच सोयीचं होईल. विचार करा, मिपाकर एवढे कष्ट घेऊन सुद्धा वाचायला तयार आहेत. तेव्हा अजुन मनापासुन मोठे भाग लिहा. आणि टंकाळा बाजुला ठेवा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ तर ती मला भेटली. असं कधी झालं नव्हतं.म्हणजे विचार करणारे माझे कित्येक मित्र घाटावरून उतरून यायचे खाली पनवेलला. पण मी नुसता टाईमपास करायचो. पार सोलापूर मोडनिंब पासून ते लातूरच्या पुढे. बारीच्या कहाण्या अजून वेगळ्या, सांगेन ती गम्मत. बाकी असं कसं होऊ शकत असं नेहमी वाटायचं. कारण (तिथे) गेलो तरी माझं माझ्या बायकोवर होणाऱ्या जीवापाड प्रेम.. मी बोलू पण शकणार नाही तिला सोडून कुठल्या मुलीशी, अशी परिस्थिती. पण झालं. थोडे पैसे उडवल्यावर ती मला मॉल मध्ये भेटली. नुसती चॉकलेटचं माझ्या भावाला आवडतात म्हणून 2-3 हजारांची घेतलेली. बाकी खरेदी तर विचारू नका. पण मला तेव्हापण चाललं. घे हवा ते. एव्हाना 4 लाखांवरून आकडा 9 लाखांपर्यंत गेला होता. आता खूप बोलण्यातून तिला पण वाटत होतं की बोलावं. पण मी माझी बायको सोडून मरेपर्यंत कोणाचा विचार करू शकणार नाही. जेव्हा ती बोलली की अजून काही मदत कर घराला आणि ऑल, तेव्हाही मी केली. पण झालं असं की तिच्या सोबत काही वेळा फिरणं इतकच माझं उद्दिष्ट होतं. चूक आहे माहित होतं कारण ती मला फसवत पण नव्हती. एकदा पैसे देणार की नाही यावरून त्यांचं ठरत आणि माणूस कसा आहे त्यावरून म्हणजे मुलींचं त्या. सो प्रॉब्लेम मलाच होता.(त्यांची बाजू पुढे येईलच). आता पण मी बायको सोडून कोणाचा विचारही करू शकत नव्हतो. काय करू ह्या पेचात होतो. तोवर 1 वर्ष झालेलं. मला समजत नव्हतं की निश्चित काय झालय. कारण परदेशापासून सगळीकडे जात आलो (पण) असं कधी माझ्याबाबतीत झालं नव्हतं. पण खरं सांगतो होऊ शकतं असं. एकेक मुंबईतले बार पहिले तर लक्षात येईल. नुसता आमच्या मुलुंड ठाण्यालाच 2 -2 लॉक लावलेले बार आहेत. सिलेक्टड एन्ट्री ओन्ली अश्या टाईपचे. अंधेरी, मीरारोड काही प्रमाणात गिरगाव इथे खूप एलिट क्लासचे बार आहेत. काय करावं मला कळत नव्हतं. तिच्यावर प्रेम नव्हतो करत, पण सवय झालेली. रेग्युलर बारला जाणे आणि स्टाईल मध्ये बसणे.
  • Log in or register to post comments

मुशो अपडेटेड

किसन शिंदे
Tue, 11/08/2016 - 20:13 नवीन
मुशो अपडेटेड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

किती पैसे गेलेत हे महत्वाचं

मराठी कथालेखक
Tue, 11/08/2016 - 19:18 नवीन
किती पैसे गेलेत हे महत्वाचं नाही.. एक मस्त आयटम तुम्ही फिरवलीत ह्याचा हेवा वाटतो. त्याकरिता कदाचित ९० लाख कुणाला खूप जास्त वाटतील पण लेखकासाठी ते कदाचित ९० हजार वा ९ हजारासारखे असू शकतील. कल्पना करा जर ९ हजार रुपये खर्च करुन मस्त आयटमबरोबर टाईमपास करता येणार असतील कित्येक लोक सहज तयार होतील. इथे लेखकाने ९ लाख खर्च केलेत म्हणून 'योग्य नाही' असा सूर लावला जातोय. वरुण साहेब लिहित रहा.. थोडं तिच्या मादक सौंदर्याचं वर्णन पण येवू देत.. सोबत फिरतानाचा रोमान्स पण लिहा
  • Log in or register to post comments

. एक मस्त आयटम तुम्ही फिरवलीत

सुबोध खरे
Tue, 11/08/2016 - 20:12 नवीन
. एक मस्त आयटम तुम्ही फिरवलीत ह्याचा हेवा वाटतो. हे काय पटलं नाही बुवा. म्हणजे चार पैसेही न घालवता एखादी मुलगी (जी तुमच्यावर भाळली आहे) (एखादा "आयटम" तुमच्याच भाषेत) फिरवता आली तर अजून चांगलं का?
  • Log in or register to post comments

म्हणजे चार पैसेही न घालवता

मराठी कथालेखक
Wed, 11/09/2016 - 11:22 नवीन
म्हणजे चार पैसेही न घालवता एखादी मुलगी (जी तुमच्यावर भाळली आहे) (एखादा "आयटम" तुमच्याच भाषेत) फिरवता आली तर अजून चांगलं का?
हो.. का नाही ? पैसे न घालवता मिळाली अजूनच उत्तम ... इच्छा अनेकांना (सगळ्यांना म्हणत नाहीये) असतेच. पण जमत नाही इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आधी बायकोच्या इच्छा तरी पूर्ण कराव्यात.....

माम्लेदारचा पन्खा
Wed, 11/09/2016 - 20:07 नवीन
आयटम वगैरेची गरज असते तरी कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

कीती तो निरागस प्रतिसाद...

खटपट्या
Wed, 11/09/2016 - 20:24 नवीन
कीती तो निरागस प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

आधी बायकोच्या इच्छा तरी पूर्ण

मराठी कथालेखक
गुरुवार, 11/10/2016 - 15:42 नवीन
आधी बायकोच्या इच्छा तरी पूर्ण कराव्यात...
.. बरोबर आहे, बायकोच्या शॉपिंग, आउटिंगमधून पैसे उरलेत तरच आयटम फिरवता येईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मग काय झालं?

चलत मुसाफिर
Tue, 11/08/2016 - 23:56 नवीन
प्रामाणिकपणे लिहिलेले वेगळे अनुभव कधीही वाचनीय असतात. दुसरे म्हणजे विशिष्ट शब्द हे विशिष्ट संदर्भात योग्यच असतात. जर त्या मुलीचे स्वातंत्र्य आणि कायदेशीर हक्क हे अबाधित रहात असतील आणि अन्य कुणावर अन्याय होत नसेल, तर ग्राहक- विक्रेती असा संबंध प्रस्थापित होणे किंवा तसा तो साहित्यात दर्शविला जाणे याला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

त्रोटक लिखाण वाटलं. पुढच्या

ज्योति अळवणी
Wed, 11/09/2016 - 19:17 नवीन
त्रोटक लिखाण वाटलं. पुढच्या भागात अजून लिंक लागेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

वरुणभाउ लीहा. धाडस लागतं असं

खटपट्या
Wed, 11/09/2016 - 19:57 नवीन
वरुणभाउ लीहा. धाडस लागतं असं लीहायला. पु. भा. प्र. थोडं रंगवून लीहायचं असेल तर बाकीचे लोक मदत करायला आहेतच...
  • Log in or register to post comments

पहिल्या वेलांटीसाठी i वापरा.

मोदक
Wed, 11/09/2016 - 20:33 नवीन
पहिल्या वेलांटीसाठी i वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

वापरा म्हणालात हे नशीब.......

माम्लेदारचा पन्खा
Wed, 11/09/2016 - 20:43 नवीन
काही लोक घाला असं म्हणतात हो.....;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

:))

मोदक
Wed, 11/09/2016 - 21:36 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मला पहीली वेलांटी कुठे

खटपट्या
Wed, 11/09/2016 - 20:49 नवीन
मला पहीली वेलांटी कुठे द्यायची आणि दुसरी कुठे द्यायची हेच माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

लेखन

स्वाती दिनेश
गुरुवार, 11/10/2016 - 16:58 नवीन
इतर सर्वांनी सांगितले आहेच, जरा शु ले कडे लक्ष द्या, विस्कळित विचार आधी रफ स्वतःच्या व्य नि त किवा जीमेल ला साठवून ठेवा, मग परत एकदा वाचा आणि नीट एकत्र करून प्रकाशित करा. ह्याबाबत काही मदत लागल्यास मि पा कर आहेतच. तुम्ही एक अत्यंत वेगळा अनुभव मनापासून लिहित आहात म्हणून ही सुचवण. पु भा प्र. स्वाती
  • Log in or register to post comments

आंदो!!! वाचतोय.

जव्हेरगंज
Fri, 11/11/2016 - 00:19 नवीन
आंदो!!! वाचतोय.
  • Log in or register to post comments

वाचतोय

पाटीलभाऊ
Fri, 11/11/2016 - 14:27 नवीन
पुढचा भाग थोडा मोठा येऊ द्या.
  • Log in or register to post comments

९ लाख ??

सच६४८६
Fri, 11/11/2016 - 15:13 नवीन
मी असतो तर पहिले गृह कर्ज ९ लाखाने कमी करून टाकले असते ...
  • Log in or register to post comments

प्यार अपनी जगह...और गृह कर्ज

सच६४८६
Fri, 11/11/2016 - 15:14 नवीन
प्यार अपनी जगह...और गृह कर्ज अपनी जगह ...
  • Log in or register to post comments

पकाव

कमवू
Fri, 11/11/2016 - 15:25 नवीन
पकाव
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा