गाव...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कवितेबद्दल थोडंसं
काही वर्षांपूर्वी मी एका गावात काही वर्षं राहिलो होतो. माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर कालखंड मी तिथे घालवला. पुढे मी ते गाव सोडलं. पण त्या आठवणी काही जाणार नाहीत. परवा अचानक तिथे परत जायचा योग आला. पण गाव जरी तेच असलं तरी मी तिथे अनोळखीच ठरलो. मधे खूप दिवस गेले होते. ओळखीचं कोणी नव्हतं. आज अचानक हे लिहावंसं वाटलं.
***
एक आहे गाव,
त्याचं असंच काहीतरी नाव.
तसं आहे ते नकाशात,
पण खरं तर ते आहे माझ्याच मनात.
पहिल्यांदा जेव्हा गाव पाहिलं होतं,
तेव्हा खूपच अनोळखी वाटलं होतं.
असं वाटलं, आपण कुठे आलो?
मूळापासून तर नाही ना तुटलो?
मग रडलो, धडपडलो,
स्वतःच स्वःला समजवत राहिलो.
मी केलं खरं गावात घर,
पण गावानेच केलं मनात घर.
कालचक्र फिरत होतं,
भराभर पुढे जात होतं,
जाताना सोनं देत होतं.
असाच एक दिवस आला,
गावातला शेर संपला.
नाइलाज होता, खूप जड गेलं,
पण गाव सोडावंच लागलं.
***
कालचक्र फिरतच होतं,
भराभर पुढे जातच होतं.
आता... मी गावात नव्हतो,
गाव मात्र तिथेच होतं....
नकाशातलं नकाशात,
मनातलं मनात.
परत गावात जायचे बेत करायचो,
आणि येणार्या आठवणी दाबून टाकायचो.
पण आठवणी कसल्या लबाड,
आणि खरं म्हणजे मन हे आठवणींचंच झाड.
***
परवा मात्र गंमतच झाली,
परत गावाला जायची संधी मिळाली.
मानातल्या मनात मोहरलो,
तडक गावात दाखल झालो.
सगळं कसं तस्संच होतं,
गाव होतं तस्संच होतं,
तरीही सारखं वाटत होतं
काही तरी चुकत होतं
त्याच गल्ल्या तेच रस्ते,
पाय माझे भटकत होते,
मन मात्र अडखळत होते,
काय चुकतंय शोधत होते,
पण शोधूनही काही कळतच नव्हते.
माग मात्र मी नाद सोडला,
मनाचा घोडा मोकळा सोडला,
आणि एकदम जादू झाली,
सगळी ओळख पटू लागली.
गावाने मला कुशीत घेतलं,
मलाही छान उबदार वाटलं,
काय चुकत होतं एकदम समजलं,
मीच चुकीच्या ठिकाणी गाव शोधलं.
गाव तर आहे तिथेच आहे.....
नकाशातलं नकाशात,
मनातलं मनात.
वाचने
17051
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
कडक!
ग्रेटच
In reply to ग्रेटच by रेवती
१+
रोचक
हाय क्लास
In reply to हाय क्लास by मीनल
+१
In reply to +१ by सहज
+२
मनातले विचार
मस्तच..
वरील
In reply to वरील by दशानन
+२
In reply to वरील by दशानन
+३
In reply to +३ by अनिल हटेला
+४
मस्तच..
मस्त
क्लास ...!
In reply to क्लास ...! by छोटा डॉन
+१
दादा, छान
पण आठवणी
माजा
सुंदर
In reply to सुंदर by परिकथेतील राजकुमार
+१
छान
उत्तम... मजा
जियो मेरे शेर !!
छान कविता.
साधी सरळ
आभार
अरे बिपिनदा, काय सुरेख आठवण आहे रे!
मनमोकळे विचार
गाव
मस्त
In reply to मस्त by शुभान्गी
खोबार...
गाव
व्वा !
In reply to व्वा ! by जयवी
ह्म्म्म...
मेरा गांव ..मेरी मिट्टी ....
In reply to मेरा गांव ..मेरी मिट्टी .... by वाहीदा
वाह!
In reply to मेरा गांव ..मेरी मिट्टी .... by वाहीदा
माशाल्लाह...
In reply to माशाल्लाह... by बिपिन कार्यकर्ते
बिपीनमिया
मस्त रे!
In reply to मस्त रे! by आपला अभिजित
हो रे...
खूप सुंदर, सरळ कविता. आवडली.
सुंदर कविता..एक मराठी गाणे आठवले.
कविता आवडली.
गड्या आपुला गाव बरा.. झकास
गाव तर आहे तिथेच