✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रांगोळी नंतरची रांगोळी

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 11/02/2016 - 18:14  ·  लेख
लेख
दिवाळी म्हटली की घरोघरी रांगोळ्या ह्या हव्यातच. स्वतःचे घर, वाडा बंगला वगैरे असलेले भाग्यवान आपल्या अंगणात रांगोळ्या काढतात तर चाळ वा सहनिवासात राहणारे वरांडा वा सामायिक जागेत रांगोळी काढतात. चकचकित संगमरवरी वा आधुनिक फरसबंद जमिनीवर गेरु सारवायचा उपदव्याप करण्यापेक्षा विटकरी रंगाच्या सिरॅमिक टाईल वर रांगोळी काढणे उत्तम. याचे दोन फायदे. एकतर गेरुकाम करावे लागत नाही आणि दुसरे महत्वाचे म्हणजे ज्यांना बराच वेळ जमिनीवर बसणे शक्य नाही त्यांना मस्त टाईल टेबलावर ठेवून समोर खुर्चीत बसून आरामात रांगोळी काढता येते. पाडव्याची ओवाळणी झाली, जेवण झाले, आता मस्त ताणुन द्यावी असा विचार मनात आला मात्र, लग्गेच आदेश आला की आज नवी रांगोळी काढायची आहे सबब कसलीही सबब न सांगता ताबडतोब फरशीवरची काढलेली रांगोळी कागदावर जमा करुन व टाईल साफ करुन आत आणावी. आम्ही हुकुमाचे ताबेदार. गपचुप वर्तमानपत्राचा कागद घेतला. ( ते वर्तमानपत्र नवे नाही याची खातरजमा करुन घेतली - होतोय तेवढा उद्धार पुरेसा आहे). टाईल कागदावर अलगद तिरकी करताच रांगोळी व रंग घसरगुंडीसारखे हळुवार घसरत कागदावर जमा झाले. टाईलच्या रुंदीच्या आकाराचा तो रंगप्रवाह मला रंगीत आकाशगंगेसारखा भासला. टाईल उचलुन आणली आणि कागद उचलण्यापूर्वी एक प्रतिमा टिपली. रात्री अचानक डोक्यात किडा आला. मी तो फोटो बारकाईने पाहिला तर गुलमोहर अ‍ॅस्टर तेरडा गुलाब बोगनवेल अशा भरगच्च बहरलेल्या आणि दाटीवाटीने लावलेल्या ताटव्याचा खूप उंचावरुन फोटो काढलेला असावा असा वाटला. मी तात्काळ माझ्या हस्तसंचाच्या पटलावर तो भित्तीचित्र म्हणून उतरवला. बरा वाटला. a दुसर्‍या दिवशी मी हुकुम होताच मोठा पांढरा कागद एका मोठ्या वर्तमानपत्रावर अंथरला. टाइल अलगद कलती करत पांढर्‍या कागदावर रांगोळी घसरवली. आज योजुन रंग घसरवल्याने कलत्या टाईलची थोडी हालचाल करत रंगकण विस्ताराने पसरवले. एकाच वेळी परस्पर विरोधी रंग दिवाळीनिमित्त एकमेकात मिसळुन गेले होते. ते दृश्य मला बर्फात रुतलेली पानगळीचे रंग धारण केलेली झाडे आणि त्यात काही आपली हिरवाई टिकवुन असलेली झाडे असे काहीसे भासले. सगळा कल्पनेचा खेळ. a1 a2 लाल मातीचा दूरवर पसरलेला चढ उताराचा आणि समुद्राच्या निळ्या पाण्यात, हिरव्या कांजळात उतरलेला डोंगर जर आकाशातून ऊंचावरुन टिपला तर असाच दिसेल a2 खवळलेल्या समुद्राशी झुंजणार्‍या आयवा मारुच्या डेकवरचा फ्लॅग पोल उचकटुन नेणारी लाट अशीच असावी a3 हा आकार नक्की कसला असावा? कुठल्याश्या किल्ल्यावरच्या एखाद्या देवळातला दगडात कोरलेल्या देवतेचा की बाहेरुन गर्द हिरव्या झाडीने झाकलेल्या पण आत लावा रस ठासुन भरलेल्या पर्वताच्या छेदासारखा? a4 ओहोटीवर माघार घेण्यापूर्वी आलेली एखादी लाट जाता जाता किनार्‍यावर हिरे, माणके, पाचू भिरकावुन गेली असावी a5
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4794 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

वा!

पैसा
Wed, 11/02/2016 - 18:33 नवीन
कसलं सुंदर आहे! पहिल्या फोटोला पब्लिक अ‍ॅक्सेस नाहीये वाटतं. कारण क्लिक केले तर चित्र दिसत नाही आणि गूगल लॉग इन पेजला जातंय.
  • Log in or register to post comments

वाह! सुंदर कल्पना!

एस
Wed, 11/02/2016 - 18:33 नवीन
वाह! सुंदर कल्पना!
  • Log in or register to post comments

आता?

सर्वसाक्षी
Wed, 11/02/2016 - 19:10 नवीन
आधी लॉग न करता मलाही दिसत नव्हते, आता गुगल सेटींगमध्ये बदल केल्यावर दिसत आहेत. आपल्यालाही दिसतात का सांगा
  • Log in or register to post comments

दिसत नाहीत फोटो :(

पिलीयन रायडर
Wed, 11/02/2016 - 19:16 नवीन
दिसत नाहीत फोटो :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

सगळेच गायब आता

पैसा
Wed, 11/02/2016 - 19:24 नवीन
मगाशी फक्त पहिला दिसत नव्हता. आता सगळेच गायब झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

आता पाहा

सर्वसाक्षी
Wed, 11/02/2016 - 22:19 नवीन
मला लॉग इन न करता क्रोम, आय ई व फाफॉ वर दिसत आहेत तेव्हा सर्वांना दिसू शकतात.
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Wed, 11/02/2016 - 22:51 नवीन
दिसले आता! रांगोळीच्या बाहेर आले तरी रंग आपले काम करतात नाही का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

ऑस्सम!!!!

तुषार काळभोर
गुरुवार, 11/03/2016 - 16:43 नवीन
ऑस्सम!!!!
  • Log in or register to post comments

हे हे हे! लै भारी!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/03/2016 - 16:53 नवीन
हे हे हे! लै भारी!
  • Log in or register to post comments

क्या बात है

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/03/2016 - 17:06 नवीन
समजून घेतोय आणि आकारांचा अर्थ अजून आत उतरवून घेतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त!

वेल्लाभट
गुरुवार, 11/03/2016 - 17:28 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

सुंदर

नूतन
Sat, 11/05/2016 - 19:54 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Sat, 11/05/2016 - 20:05 नवीन
सुंदर! रांगोळीनंतरची रांगोळीही तितकीच सुंदर आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

वाह ! वाह...

स्रुजा
Sat, 11/05/2016 - 21:04 नवीन
वाह ! वाह...
  • Log in or register to post comments

मस्त!

स्वीट टॉकर
Sat, 11/05/2016 - 23:28 नवीन
'जे न देखे रवी' च्या पद्धतीची कल्पना आहे. साफसफाई आम्ही सगळेच करतो. पण त्यातून इतकी सुरेख कल्पना सुचणं हे तुमच्या सौदर्यदृष्टीची साक्ष देतं
  • Log in or register to post comments

wallpapers!!!

कंजूस
Sun, 11/06/2016 - 06:24 नवीन
wallpapers!!!
  • Log in or register to post comments

रंगांची उधळण एकदम सुंदर!

बोका-ए-आझम
Sun, 11/06/2016 - 11:19 नवीन
अमूर्त चित्रकलेसारखी अमूर्त रांगोळी!
  • Log in or register to post comments

किती सुरेख!खूप छान आहेत या

नूतन सावंत
Sat, 11/19/2016 - 21:08 नवीन
किती सुरेख!खूप छान आहेत या रांगोळ्या आणि लेखसुद्धा.
  • Log in or register to post comments

वा! सुंदर

अजया
Sun, 11/20/2016 - 13:10 नवीन
वा! सुंदर
  • Log in or register to post comments

बळवंतरावांकडुन अधिकची अपेक्षा

मदनबाण
Sun, 11/20/2016 - 13:25 नवीन
बळवंतरावांकडुन अधिकची अपेक्षा होती... आजची स्वाक्षरी :- नशे सी चढ़ गयी ओय कुड़ी नशे सी चढ़ गई... पतंग सी लड़ गई ओये कुड़ी पतंग सी लड़ गई... ;) :- Befikre
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा