Skip to main content

मिपाकर औरंगाबाद

लेखक वैभव पवार यांनी बुधवार, 02/11/2016 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व औरंगाबादकर मंडळींना नमस्कार! माझ्या मनात असा विचार आला की यत्कदाचित भविष्यात औरंगाबादकरांचा मिपाकट्टा करायचा ठरला तर तो यशस्वी व्हावा यासाठी एक कायअप्पा समुह बनवला तर चालेल का? मिपाची परंपरा काय! वगैरे बाबी मला माहित नाही त्यामुळे आपले मत काय ते सांगा. कायअप्पा समुहासाठी सहमत असाल तर येथे टीचकी मारा

वाचने 3094
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

वैभव, टिचकीची लिंक गंडली राव. एक झलक दिसती औरंगाबाद ग्रुपची आणि नंतर अ‍ॅड्रेस वॉजन्ट अन्डरस्टुड म्हणतंय.

कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा इथेच मिपावर टाकून सर्व मिपाकरांना त्याची माहिती दिली तर ते जास्त चांगले होईल. कारण त्यामुळे विशिष्ट कायप्पागृपवर नसलेल्या स्थानिकांना, परगावाहून येऊ इच्छिणार्‍यांना * किंवा परगावच्या पण कर्मधर्मसंयोगाने कट्ट्याच्या जागेजवळ असणार्‍यांनाही कट्ट्यात भाग घेता येईल. शिवाय वाचनमात्र मिपाकरांना भेटण्याची आणि त्यांना मिपापरिवारात अधिक घट्ट सामावून घ्यायची संधीही मिळेल. * : ८ तास चारचाकी चालवत कट्ट्याला येऊन कट्टा संपल्यावर लगेच परत ८ तास चारचाकी चालवत परतीचा प्रवास करण्याचा स्पृहणिय विक्रम करणारे लोक मिपापरिवारात आहेत, काय समजलात ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ओ एक्काकाका, ते विक्रम परदेशातल्या मख्खन रस्त्यावर, भारी भारी एसी गाडी आणि शिस्तीत ट्राफिकमध्ये. म्या कट्ट्यासाठी टूव्हीलरवर, पावसात भिजत, सोलापूर ते पुण्यातल्या दिव्य ट्राफिकात ५ तास चालवून आलोय, आणि परत गेलोय. काय समजलात ;)

In reply to by अभ्या..

मग तर माझा मुद्दा अजूनच जास्त ठामपणे सिद्ध झाला नाही का ? भारतातले ५ तास पावसात दुचाकी चालवणे => अम्रिकेतले ८ तास चारचाकी चालवणे... हाकानाका ! ;) :)

In reply to by अभ्या..

लोकांनी मध्यवर्ती ठिकाणी (अर्थात पुणे किंवा नगर इथे कट्टा करावा ) हजेरी लावू.नगरच्या जवळ काही लेणी-मंदीरे आहेत का? म्हणजे आम्चे गडकरी येतील. महानगरी नागरीक नाखु