✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वादळ (अंतिम)

प
प्राजु यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 23:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4309 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

कथेसाठी

अनामिक
Fri, 02/06/2009 - 02:08 नवीन
कथेसाठी शब्दच नाहीत... केवळ अप्रतिम! "..... आणि त्या भिंतीवर असलेला शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला...ज्या घरात या महापुरूषाची पूजा होते तिथे माझ्या अब्रूला काहीही धक्का नाही लागणार याची मला खात्री पटली.. आणि मी घरात पाऊल ठेवलं........." कालचा भाग वाचुन मानसीक/नैतीक घालमेल होणार असे वाटत होते खरे... पण वरच्या वाक्याने मनातली घालमेल दुर केली... रागाच्या भरात (सुड घेण्याच्या भावनेने) एका क्षणात आपण काय करतो याचे भान रहात नाही. कदाचित माझीही अवस्था प्रसाद, अजिंक्य सारखी झाली असती. पण अशा कठीण क्षणी मनावर ताबा ठेवणे, आपण कोण आहोत, आपले संस्कार काय याची जाणिव असणे अतिशय महत्वाचे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन! अनामिक
  • Log in or register to post comments

सुभेदाराची सून

धनंजय
Fri, 02/06/2009 - 02:15 नवीन
तिच्या गोष्टीशी साधर्म्य वाटले. शिवाजी महाराजांच्या या कथेत औदार्य आणि दाक्षिण्य दिसतेच. पण मुख्य म्हणजे आपल्याविरुद्ध लढणार्‍यांशी लढायचे, विरोधी गटातल्याही न-लढणार्‍या लोकांशी लढायचे नाही, हे भान राखलेले दिसते. त्याला कथा ऐकणारे असामान्य म्हणतात, पण तशी वागणूक सामान्य असायला पाहिजे. स्फूर्तिदायक कथा व्यक्तिपूजा करण्यासाठी नसाव्यात, पटल्या तर अनुकरणीय असाव्यात. कथेतल्या मुलांना आली तशी नाट्यपूर्ण द्विधा आपल्या आयुष्यात क्वचितच येते. तरी लहान प्रमाणात हा प्रसंग आपल्यासाठी दररोजचा आहे. अगदी बसून-बसून वर्तमानपत्र वाचत असतानाही, क्रोध आणि त्वेष संचारला असताना, विरोधी गटापैकी लढणारे आणि न-लढणारे यांच्यामध्ये आपण मनात फरक ठेवतो का? नाट्यपूर्ण प्रसंग योजून, आपल्या मनापुढचे हे दैनंदिन नैतिक आह्वानच प्राजूंनी प्रभावीपणे सादर केले आहे. बोध स्पष्ट असला तरी त्याचा अंगीकार कष्टसाध्य आहे.
  • Log in or register to post comments

स्फूर्तिद

शाहरुख
Fri, 02/06/2009 - 11:39 नवीन
स्फूर्तिदायक कथा व्यक्तिपूजा करण्यासाठी नसाव्यात, पटल्या तर अनुकरणीय असाव्यात. लाखमोलाची बात...दुर्दॅवाने आपण फक्त हारतुर्‍यातच अडकुन पडलो आहोत. बाकी एकांकिका आवडली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

कथा आवडली

संदीप चित्रे
Fri, 02/06/2009 - 02:28 नवीन
शेवटी ते दोघंही चांगले वागतील हा अंदाज होता पण शिवाजी महाराजांचा संदर्भ अचानक आला ... आवडला :) अजूनही काही कथा लिही.
  • Log in or register to post comments

सुंदर

पिवळा डांबिस
Fri, 02/06/2009 - 04:12 नवीन
सुंदर कथा.... आवडली!!!
  • Log in or register to post comments

+१

सहज
Fri, 02/06/2009 - 07:08 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

२+

शितल
Mon, 02/09/2009 - 05:24 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+३

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/10/2009 - 02:14 नवीन
सहमत. कथा काय अंगाने जाईल त्याचा अंदाज बांधता येत होता पण महाराजांचा उल्लेख एकदम छान टर्न. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

कथा स॑पवु नको

जयेश माधव
Fri, 02/06/2009 - 04:25 नवीन
अप्रतीम्,प्राजु मला वाट्ते ही कथा ईथे स॑पवु नये.अत्ता कुठे कथा सुरुवात होते आहे असे वाटत असतानाच कथा स॑पुन गेली.या कथानकाचे उत्क्रुष्ठ काद॑बरीत रुपा॑तर करण्याची तुझी प्रतीभा आहे.या कथेचे एका काद॑बरीत रुपा॑तर झालेले आम्हाला पहायचे आहे.कम ऑन प्राजु!! आत्तापसुन कामाला लाग. यश तुझेच आहे! जयेश माधव
  • Log in or register to post comments

वाह प्राजुताई !!

अनिल हटेला
Fri, 02/06/2009 - 07:48 नवीन
काय कलाटणी दिलीये !!! अप्रतीम !!!! ज्या घरात या महापुरूषाची पूजा होते तिथे माझ्या अब्रूला काहीही धक्का नाही लागणार याची मला खात्री पटली.. आणि मी घरात पाऊल ठेवलं................... =D> बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

+१ +१ +१ अती

दशानन
Fri, 02/06/2009 - 08:23 नवीन
+१ +१ +१ अती सुंदर कथा प्राजु ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

प्राजू, सुरेख कथा!

चतुरंग
Fri, 02/06/2009 - 08:46 नवीन
बंदिस्त आणि वेगवान कथानक आहे. काय घडणार हे अंधुकसे समजत होते पण ते घडण्यामागचे कारण अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक होते! जियो!! अशाच सशक्त लघुकथा येऊदेत! अभिनंदन. चतुरंग
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

भडकमकर मास्तर
Fri, 02/06/2009 - 13:53 नवीन
कथा आवडली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

खुपच

मुक्ता
Fri, 02/06/2009 - 09:38 नवीन
खुपच सुंदर.... प्रसंग अगदी जिवंत केला आहे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

प्रसंग

विसोबा खेचर
Mon, 02/09/2009 - 16:12 नवीन
प्रसंग अगदी जिवंत केला आहे. अतिशय नाजुक विषय खुप सुंदर पद्धतीने हाताळल्या बद्दल अभिनंदन! हेच बोल्तो..! प्राजू, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्ता

फुल्ल स्पीड...

केवळ_विशेष
Fri, 02/06/2009 - 10:35 नवीन
पा व र बा झ कथा आहे... जियो!!!
  • Log in or register to post comments

उत्तम कथा

अवलिया
Fri, 02/06/2009 - 11:12 नवीन
कथा आवडली. अवांतर - नैतिक घालमेल होणार असा काहिसा कयास होताच. ती घालमेल होवुन अर्थातच सगळे शेवटी गोड होईल अशीच कथा असेल असे वाटले होते. हे लेखिकेने कसे मांडले असते या बद्दल उत्सुकता होती. पण शिवाजीमहाराजांचा वापर करुन लेखिकेने शिताफीने तो भाग सोपा केला आहे असे वाटते. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

नैतिक विचार..

प्राजु
Sat, 02/07/2009 - 08:38 नवीन
इथे दोघे वहावत निघाले होते.. जे तिच्या शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने सावध झाले इतकंच सांगितलं. यात कोणत्याही विचारांचं युद्ध नाही दाखवलेलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर कथा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/08/2009 - 14:18 नवीन
कथेचा अनपेक्षीत यू टर्न जरासा वेगळा पण आवडला !
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्राजु
Mon, 02/09/2009 - 00:42 नवीन
वादळ आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

संतुलीत वैचारीक वारश्याचे एक उत्तम उदाहरण ...

छोटा डॉन
Mon, 02/09/2009 - 22:11 नवीन
दोन्ही भाग आत्ताच एकत्रपणे वाचुन काढले, पहिल्या भागात केलेले वर्णन वाचुन दुसर्‍या भागात त्याच अनुषंगाने काही घडणार ह्याची पुसटशी कल्पना आलीच होती. पण ज्या पद्धतीने कथा पुढे जाते व एक धक्कादायक म्हणावा असा शेवट होतो तेथे कथा आपल्या मनावर प्रभाव टाकते ... एखाद्या प्रायोगीक एकांकिकेसाठी अतिशय उत्तम "कच्चा मसाला" म्हणुन ह्याचा वापर व्हायला अजिबात हरकत नाही ...! असो. प्राजुताईने मस्त कथा विणत न्हेली आहे, वेगवान तर आहेच पण ह्या नादात कुठेही "बेअरिंग" ढासळलेले नाही ह्यातच सर्व आले. तरी अवलियाशेठ म्हणतात त्याप्रमाणे "शिवाजी महाराज" इथे आल्याने शेवट थोडासा सोपा झाला पण त्यात "अशक्य अथवा अतर्क्य" असे काही नाही.... मुळात इथे "दंगलीतली सामान्य माणसाची मानसीकता, त्यातुन होऊ चाललेला अत्याचार व त्यावर कडी केलेली शिवरायांची शिकवण" असा संकुचित व तात्कालिक अर्थ निघुच शकत नाही. इथे संदर्भ पोहचतो तो थेट "क्षणिक अवैचारीक मानसीक असमतोलाचा व समृद्ध व सुजाण वैचारीक वारश्याचा" .... त्यात अनुषंगाने कथा गुंफली गेली आहे (असे माझे मत आहे). क्षणिक अवैचारीक मानसीक असमतोलाचा परिणाम म्हणु अथवा प्रतिक्षीप्त क्रिया म्हणु पण इथे त्यामुळे अजिंक्य व प्रसाद आपल्या समाजावर होत असलेल्या अन्यायाचा बदला सध्या त्यांच्याच आश्रयाला आलेल्या व सध्या अतिशय सॉफ्ट टार्गेट असलेल्या एका असाह्य, अबला नारीवर अत्याचार करुन घेऊ पहात होते. इथे त्यांचा "विवेक" पार अस्ताला गेला होता. पण जेव्हा त्या मुलीच्या तोंडुन शिवरायांचे नाव येते व त्यांच्या वागणुकीची आठवण करुन दिली जाते तेव्हा " आश्रयास असलेयाचे संरक्षण करावे व कुणा आश्रीतावर अकारण अत्याचार करु नयेत" असे समॄद्ध वैचारीक वारसा असणार्‍या त्यांच्या मनातला एक प्रवाह पुन्हा एकदा त्या क्षणिक अवैचारीक असंतुलीत मन असलेया प्रभावाला दाबुन टाकतो व त्यांच्या हातुन एक "गुन्हा" होण्यापासुन त्यांना वाचवतो ... प्राजुताई कितीही नाकारत असली तरी हे एक "वैचारीक युद्धच, क्षणिक असमतोलाचे समॄद्ध वैचारीक वारश्याशी " .... मात्र हे अनपेक्षीतरित्या अंगावर आले तर मात्र त्याचा धक्का हा कदाचित सहन न करण्यापलीकडचा असतो, एखाद्या रोरावत येणार्‍या चक्री"वादळा"सारखाच ... हेच ते "वादळ" ...! असो. मस्त मजा आली वाचताना व एक उत्तम लेख वाचल्याहा आनंद मिळाला ..! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा