Skip to main content

काजू गुलकंद विडा

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 29/10/2016 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
काजू-गुलकंद विडा . साहित्यः १ वाटी काजूपूड अर्धी वाटी साखर पाच टे.स्पून पाणी पाव वाटी काजू-बदाम काप अर्धी वाटी गुलकंद चांदीचा वर्ख खाण्याचा हिरवा रंग . कृती : एका नॉन-स्टिक पॅनमध्ये साखर, पाणी व खाण्याचा हिरवा रंग एकत्र करून साखर विरघळेपर्यंत उकळावे. साखर विरघळली की त्यात काजूपूड घालून मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे. हळूहळू मिश्रण कडेने सुटू लागेल व गोळा होऊ लागेल. एका ताटात मिश्रण काढून हाताला सोसवेल इतके थंड झाले की चांगले मळून घ्यावे. गुलकंदामध्ये काजू-बदाम काप मिक्स करून घ्यावे. . मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन पुरीप्रमाणे लाटावा. चार भागात तो कापून घ्यावा. प्रत्येक चत्कोराचा कोन बनवून त्यात गुलकंद भरावा. तयार विड्याला चांदीचा वर्ख लावून सजवावे. . काजू-गुलकंद विडा खाण्यासाठी तयार आहे. . दिवाळीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा!!

वाचने 19582
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

आयडिया चांगली आहे. सर्व खाद्यप्रकारांनंतर विडा, तोही इतका टेस्टी देण्याची कल्पना आवडली.

मस्त ग. असा विडा मी एका लग्नात रुखवतात पाहिला होता. तेव्हाच भन्नाट आवडला होता. आज कृती पण कळाली. मस्तच दिसतोय

आणि सोपी, सुटसुटीत पाककृती

आवडती पाकृ ! कराचीवालाकडे गेलो की नक्की आणतो. तिथल्या गुलकंदामध्ये कुटलेले खाण्याचे पानही असते.

सुंदर दिसतोय विडा... एकदम भारी

मस्तच टेम्टिंग आहे हा विडा. स्वाती

वाह

मिठाईच्या दुकानात गेल्यासारखं वाटलं !

लै भारी प्रकार!

नेमक्या वेळी आल्याचं सार्थक झालं. ;) आल्याआल्या स्वीट-स्वीट विडे बघून मन तृप्त झालं. किती दिवसापासून वाट पाहत होतो सानिकाताईंची? आज मनोकामना पुर्ण झाली. ;) लगेच पेजच सेव्ह करुन ठेवतो. =)) =)) बाकी या बाबतीत आमच्या सानिकाताईंका जवाब नहीं! स्वतः अन्नपुर्णा आहेत त्या :)

या सानिकातै विड्यालाही सोडत नाहीत! क्या बात है! असा विडा खायचा तर फराळ कमी करावा लागेल!