काजू-गुलकंद विडा
साहित्यः
१ वाटी काजूपूड
अर्धी वाटी साखर
पाच टे.स्पून पाणी
पाव वाटी काजू-बदाम काप
अर्धी वाटी गुलकंद
चांदीचा वर्ख
खाण्याचा हिरवा रंग
कृती :
एका नॉन-स्टिक पॅनमध्ये साखर, पाणी व खाण्याचा हिरवा रंग एकत्र करून साखर विरघळेपर्यंत उकळावे.
साखर विरघळली की त्यात काजूपूड घालून मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे.
हळूहळू मिश्रण कडेने सुटू लागेल व गोळा होऊ लागेल.
एका ताटात मिश्रण काढून हाताला सोसवेल इतके थंड झाले की चांगले मळून घ्यावे.
गुलकंदामध्ये काजू-बदाम काप मिक्स करून घ्यावे.
मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन पुरीप्रमाणे लाटावा.
चार भागात तो कापून घ्यावा.
प्रत्येक चत्कोराचा कोन बनवून त्यात गुलकंद भरावा.
तयार विड्याला चांदीचा वर्ख लावून सजवावे.
काजू-गुलकंद विडा खाण्यासाठी तयार आहे.
दिवाळीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा!!
वाचने
19582
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयडिया चांगली आहे. सर्व
बेस्ट
क्या बात. कसला दिसतोय विडा..
अप्रतिम रेसीपी , तु मिठाईच
कसला सुरेख दिसतोय तो विडा._/\
जबराट,खतरा,कातिल दंडवत तुला--
वॉव....काय सुंदर!!!!!
ज ब र द स्त्त्त्त... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masalaजबरदस्त!!
आवडती पाकृ ! कराचीवालाकडे
निव्वळ अप्रतिम !! ___/\__
वाह!
व्वाह! अप्रतिम!
क्लास..
काय दिसतोय विडा! अप्रतिम!
असाच उचलून तोंडात टाकावा
वा! सुंदर दिसत आहे एकदम!
वाह
आवडले.. _/\_
अप्रतिम! सुंदर!
सुरेख. तुझ्या रेसिपी म्हणजे
जबरी !
वा!
सारखे सारखे काय तेच तेच
आह!!
अरे काय हे?